Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

‘भारतीय संस्कृती जगण्याचे बळ देणारी’

$
0
0
‘पाश्चिमात्य संस्कृतीमध्ये जगा आणि जगू द्या, अशी संकल्पना आहे. भारतात मात्र, जगण्याची, जगू देण्याची आणि जगण्याचे बळ देण्याची पद्धत आहे,’ असे प्रतिपादन गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले.

घातपाताचा बनाव करणा-यावर गुन्हा

$
0
0
दगडूशेठ मंदिरात घातपात होणार असल्याचा बहाणा केल्याने नऊ तास वाहतुकीचा खेळखंडोबा, दोनशेहून अधिक पुणे पोलिसांना तसेच दहशतवाद विरोधी पथकाला कामाला लावणाऱ्या वाशिम येथील तरुणाविरुद्ध बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

शिक्षण, संशोधनातूनच राष्ट्रउभारणी

$
0
0
कुशल मनुष्यबळ निर्मिती, प्रगत शेती, तंत्रज्ञान, शस्त्र निर्मिती, क्रीडा, वैद्यकीय क्षेत्रातील विकास हा शिक्षण, संशोधनावर अवलंबून असून त्यातून राष्ट्र उभारणी शक्य आहे, असा कानमंत्र गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी रविवारी पुण्यात दिला.

पालिकेची झोळी एलबीटीने रिकामी

$
0
0
स्थानिक स्वराज्य संस्था कराच्या (एलबीटी) माध्यमातून जुलै महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात पुणे महापालिकेला केवळ नऊ कोटी रूपये उत्पन्न मिळाले आहे.

वेळापुरी भारुडाचे गारुड

$
0
0
अनिष्ठ प्रथांवर घणाघाती घाव व विनोदी सादरीकरणातून यथासांग प्रबोधन करणाऱ्या भारुडाचे गारुड अजूनही वारकऱ्यांवर कायम आहे.

पालिकेची झोळी 'एलबीटी'ने रिकामी

$
0
0
स्थानिक स्वराज्य संस्था कराच्या (एलबीटी) माध्यमातून जुलै महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात पुणे महापालिकेला केवळ नऊ कोटी रुपये उत्पन्न मिळाले आहे. परिणामी, जकात रद्द करून 'एलबीटी'चा आग्रह धरणाऱ्या पालिका प्रशासनाचा आर्थिक आघाडीवर कसा निभाव लागणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

विमानतळाबाबत शेतकरी अधांतरीच

$
0
0
चाकण-राजगुरुनगर परिसरात विमानतळ नेमका कुठे होणार, याविषयी परस्परविरोधी वक्तव्ये केली जात असल्याने स्थानिक शेतकरी संभ्रमावस्थेत आहे. राज्यकर्ते विमानतळ होणारच हे अगदी ठासून सांगत असले, तरी तालुक्यातील शेतकरी मात्र पुरता गोंधळून गेलेला आहे.

'सरकारी शाळांमध्ये घटती विद्यार्थी संख्या'

$
0
0
जिल्हा परिषद, पालिका शिक्षण मंडळांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची घटती पटसंख्या ही चिंतेची बाब असल्याचे शिक्षकांच्याच लक्षात आले तरच शैक्षणिक गुणवत्ता विकासात दर्जात्मक सुधारणा होईल, असे मत महसूल विभागचे उपायुक्त इंद्रजित देशमुख यांनी शिक्षक मेळाव्यात केले.

पारधी समाजाचा पालिकेवर मोर्चा

$
0
0
शहरातील पुलांखाली आणि फुटपाथवर राहणाऱ्या पारधी तसेच स्थलांतरीत अंगमेहनती कष्टकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी फुटपाथवासी परिषदेतर्फे सोमवारी महापालिकेसमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

ताम्हिणीला वेढा मद्यपी पर्यटकांचा

$
0
0
ताम्हिणीच्या निसर्गसौंदर्य आणि फेसाळणाऱ्या धबधब्यांना सध्या दारूपार्ट्या आणि हुल्लडबाजी करणाऱ्या उपद्रवी पर्यटकांची नजर लागली आहे. निसर्ग पर्यटनाच्या नावाखाली मजा करणाऱ्या या तळीरामांच्या त्रासामुळे कौटुंबिक पर्यटकांवर जणू अघोषित बंदीच आली आहे.

फुलबाजाराचे अत्याधुनिकीकरण करणार

$
0
0
मार्केटयार्डातील बाजारात येणाऱ्या फुलांचे त्या​चठिकाणी ग्रेडेशन करून लिलाव करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न कृषी उत्पन्न बाजार समितीने सुरु केला आहे.

दोषी डॉक्टरांचे सदस्यत्व आता रद्दच !

$
0
0
वैद्यक व्यवसायात करताना त्याची जाहिरातबाजी, 'कट' प्रॅक्टिस अथवा सोनोग्राफीद्वारे बेकायदेशीर लिंगनिदान करताना आढळणाऱ्या डॉक्टरांचे राज्याच्या इंडियन मेडिकल असोसिएशनचे (आयएमए) सदस्यत्व निलंबित केले जाणार आहे.

शिवाजीनगर कोर्टात मॅकेनाइज्ड पार्किंग

$
0
0
वाहनांच्या पार्किंगसाठी शिवाजीनगर कोर्टातील जागा अपुरी पडू लागल्यामुळे कोर्टाच्या आवारात मॅकेनाइज्ड पार्किंग उभारण्याचा प्रस्ताव मंजुर होण्याची शक्यता आहे. हायकोर्टाने याबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारकडे निधी मंजूरीसाठी पाठवला आहे.

महागाईवर स्वस्ताईचा शिडकावा

$
0
0
पेट्रोल, डिझेलसह पालेभाज्यांचे दर गगणाला भिडलेले असताना तूप, लोणी, खवा, खाद्यतेल यासह जीवनावश्यक वस्तूंसाठी आकारल्या जाणाऱ्या एलबीटीच्या (स्थानिक संस्था कर) दरात घट करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

मंदिरांभोवती सुरक्षेचे कवच

$
0
0
शहरातील महत्वाच्या ठिकाणांबरोबरच मंदिरांची सुरक्षितता वाढविण्यासाठी पोलिस तसेच स्थानिकांनी प्रयत्न सुरू केलेत.

गहाणखत्यांची नोंदणी थेट बँकांमार्फतच

$
0
0
कर्जासाठी केलेली मालमत्तेची गहाणखते रजिस्टर करण्यासाठी आता उपनिबंधक कार्यालयात जाण्याची आवश्यकता नसून थेट बँकांमार्फतच अशी गहाणखते नोंदविता येणार आहेत.

'महावितरण'ची नसती उठाठेव

$
0
0
'महावितरण'च्या कामांवर देखरेख आणि नियंत्रण ठेवण्यासाठी नेमण्यात आलेल्या विद्युत निरीक्षकांची जबाबदारी महावितरणच्या अधिकाऱ्यांकडेच सोपविण्याचा प्रस्ताव तातडीने फेटाळून लावावा, अशी मागणी सजग नागरिक मंचातर्फे मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.

राज्यातील १५८ जण अद्याप बेपत्ता

$
0
0
उत्तराखंडातील हरिद्वार, गंगाधाम यात्रेसाठी तसेच पर्यटनासाठी गेलेल्यांपैकी सुमारे सहा हजार जणांचा शोध महिना उलटून गेल्यानंतरही सुरूच आहे.

औंधच्या सिव्हील सर्जनची बदली

$
0
0
औंध येथील जिल्हा हॉस्पिटलचे सिव्हील सर्जन डॉ. विनायक मोरे यांची आरोग्य विभागाने सोमवारी रात्री उशिरा तडकाफडकी बदली करण्याचे आदेश जारी केले. पुण्यातील कुटुंब कल्याण विभागात सहायक संचालकपदी त्यांची बदली झाली आहे.

ITI ची वेबसाइट शेवटच्या दिवशी हँग

$
0
0
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था अर्थात आयटीआयची ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया शेवटच्या दिवशीही विद्यार्थ्यांसाठी अडथळ्याची शर्यत ठरली. काल (सोमवारी) ऑनलाइन प्रवेशअर्जासाठीची वेबसाइट हँग झाल्याने, अर्ज करता न आल्याची तक्रार काही विद्यार्थ्यांनी केली.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images