Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

अॅम्फीचा ‘लूक’ नवा

$
0
0
‘पुरुषोत्तम’च्या तालमींपासून ते प्रख्यात नामवंतांच्या सभांपर्यंत आणि मित्र-मैत्रिणींच्या कौतुक समारंभांत त्यांना चिअर-अप करण्यापासून ते एकाग्रतेने अभ्यास करण्यापर्यंत... फर्ग्युसन कॉलेजसह पुण्यातील अनेकांच्या आठवणींशी जोडल्या गेलेल्या अॅम्फी थिएटरच्या अंतरंगाचा पूर्ण कायापालट झाला आहे.

नरेंद्र मोदी आज पुण्यात

$
0
0
गुजरातचे मुख्यमंत्री आणि भारतीय जनता पक्षाच्या प्रचार समितीचे प्रमुख नरेंद्र मोदी रविवारी (१४ जुलै) पुण्यात येत असून, दिवसभरात त्यांचे तीन कार्यक्रम होणार आहेत. शहरात ‘हाय अॅलर्ट’ असतानाच मोदींच्या दौऱ्यामुळे शहर पोलिसांनी सुरक्षाव्यवस्था अधिक कडक केली आहे.

सुरक्षा ‘ऑन’; रस्ते ‘ऑफ’

$
0
0
दगडूशेठ मंदिराच्या आवारात वाढविण्यात आलेल्या सुरक्षाव्यवस्थेचा ताण शहरातील वाहतुकीवर पडला; तसेच दुपारनंतर चालू झालेल्या पावसामुळे शनिवारी शहरातील वाहतूक पूर्णपणे ‘जॅम’ झाली.

भय सरले; बाप्पा पावले

$
0
0
बोधगया बॉम्बस्फोटांच्या पार्श्वभूमीवर पुण्यामध्ये ‘हाय अलर्ट’ असतानाच एका माथेफिरूने दगडूशेठ हलवाई मंदिर, दापोडीतील चर्च आणि पुणे रेल्वे स्टेशन येथे स्फोटकांची बॅग ठेवल्याची माहिती दिल्यामुळे शनिवारी संपूर्ण पोलिस यंत्रणा कामाला लागली.

मोदींचे मिशन… बिल्डिंग नेशन!

$
0
0
पुण्याच्या फर्ग्यूसन कॉलेजमधून आज गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातील युवा पीढीसाठी स्वप्नांचा पिटारा उघडत ‘नेशन बिल्डिंग’चा नारा दिला. आपल्या मॅरेथॉन भाषणात त्यांनी काँग्रेसच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या धोरणांवर हल्ला करतानाच गुजरातच्या विकासाचा पुन्हा एकदा गजर केला.

... तर ४०० कोटी वाचतील: मोदी

$
0
0
गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी पुण्यातील जाहीर सभेत राज्यातील आघाडी सरकारच्या नाकर्तेपणावर तोफ डागली. राज्यातील काँग्रेस आघाडी सरकारला दिल्लीत कोणी विचारतही नाही, अशी खिल्ली मोदींनी उडवलीही. शिवाय सरदार सरोवर धरणाची उंची वाढवून वीज निर्मिती केल्यास महाराष्ट्राचे दरवर्षी विजेसाठी खर्ची होणारे ४०० कोटी रूपये वाचतील, असे मोदी म्हणाले.

प्रमुख देवस्थानांचे ‘सिक्युरिटी ऑडिट’

$
0
0
बोधगया या धार्मिक स्थळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर महाराष्ट्रातील प्रमुख देवस्थानांचे ‘सिक्युरिटी ऑडिट’ करण्यास सुरुवात झाली आहे.

८७वं साहित्य संमेलन सासवडला

$
0
0
८७वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आचार्य अत्रे यांच्या जन्मगावी, सासवड येथे डिसेंबरच्या अखेरीस रंगणार आहे. सासवडला प्रथमच हा मान मिळत असून ‘कोटीच्या कोटी उड्डाणे न घेता लोकसहभागातून संमेलन यशस्वी होऊ शकते, याचा आदर्श सादर करू’, असा दावा संयोजकांनी केला.

काँग्रेसवर मोदीहल्ला!

$
0
0
अन्न सुरक्षा विधेयकाचे श्रेय लाटण्यासाठीच काँग्रेसने ते संसदेत मांडले नसल्याची टीका करीत गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी रविवारी पुण्यात आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा जणू नारळच फोडला! काँग्रेस संकटात असली की धर्मनिरपेक्षतेचा बुरखा पांघरून बंकरमध्ये लपून बसते, असा आरोपही त्यांनी केला.

शिक्षण, संशोधनातून राष्ट्रउभारणी शक्य

$
0
0
कुशल मनुष्यबळ, शेती, तंत्रज्ञान, शस्त्र निर्मिती आदी क्षेत्रांतील विकास हा शिक्षण, संशोधनावर अवलंबून असून, त्यातूनच राष्ट्र उभारणी शक्य आहे, असे सांगत गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी रविवारी पुणेकरांना 'नेशन बिल्डिंग'साठी 'ह्यूमन बिल्डिंग'चा कानमंत्र दिला.

तरुणाला लुटल्याप्रकरणी दोघांना अटक

$
0
0
पिसोळी रोडवरील जकात नाक्याजवळ शनिवारी रात्री थांबलेल्या तरुणाला मारहाण करत त्याच्याकडील साडे तीन हजार रुपयांच्या ऐवज लुटणाऱ्या दोघा तरुणांना स्थानिक नागरिकांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.

सोनसाखळी चोरीचे दोन गुन्हे

$
0
0
पाषाण आणि धनकवडी येथे शनिवारी दुपारी तासाभराच्या फरकाने सोनसाखळी हिसकावण्याचे प्रकार घडले असून या दोन्ही घटनांमध्ये सव्वा लाख रुपयांचे दागिने हिसकावण्यात आले आहे.

खुनाच्या प्रयत्नातील चौघे आरोपी गजाआड

$
0
0
गेल्या महिन्यात बुधवार पेठेत तरुणावर तलवार, कोयत्याने हल्ला करून त्याचा खून करण्याचा प्रयत्न करणाऱ्या चौघा आरोपींना फरासखाना पोलिसांनी गजाआड केले.

रिंगण टिपण्यासाठी मोबाइल-टॅबचा ‘क्लिकक्लिकाट’

$
0
0
दोन आठवड्यांच्या वाटचालीनंतर वारीतील एकसुरीपणा संपवत, सदाशिवनगरातील पहिल्या गोल रिंगणाने श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये चैतन्य निर्माण केले.

ढोल पथकांसाठी यंदा ‘आचारसंहिता’

$
0
0
यंदा गणपती विसर्जन मिरवणुकीत ढोलपथकांच्या दणदणाटावर पुणे पोलिसांची नजर राहणार आहे.

‘झेब्रा क्रॉसिंग’वरील वाहनचालकांना दंड

$
0
0
वाहतूक पोलिसांच्या डोळ्यादेखतच झेब्रा क्रॉसिंगवर उभी राहिलेली तीन हजार वाहने वाहतूक पोलिसांच्या जाळ्यात अडकली. नोटीस देतानाच अशा बेशिस्त वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करीत तीन लाखांचा दंड वसूल करण्यात आला.

‘PMP’च्या कर्मचा-यांनाही आता ‘बायोमेट्रिक’ हजेरी

$
0
0
शासकीय आणि महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांप्रमाणेच ‘पीएमपीएमएल’मधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना बायोमेट्रिक हजेरी पद्धत सुरू करावी, अशी सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पीएमपी प्रशासनाला केली आहे.

हजारो लिटर पाण्याची नासाडी

$
0
0
खडकवासला धरणातून पाणीपुरवठा करण्यात येणारा मुठा उजवा कालवा वानवडी जवळील भैरोबानाला येथे फुटल्याने रविवारी हजारो लिटर पाणी वाया गेले. कालवा फुटल्याचे लक्षात येताच खडकवासला धरणातून १६०० क्युसेक्स ने सोडले जाणारे पाणी १०० क्युसेक्सवर आणण्यात आले.

अखेरच्या दिवशी ‘तारां’बळ

$
0
0
जनमानसांमध्ये रुजलेल्या तार सेवेने रविवारी रात्री बारा वाजता पूर्णविराम घेतला. तारेबाबत जिव्हाळ्याचे नाते असलेल्या तब्बल ५०० पुणेकरांनी एकमेकांना तार पाठवून ‘कडकट्ट...कडकट्ट’ हा जादुई आवाज श्रवण करत तारेबाबतच्या भावना व्यक्त केल्या.

तीस वर्षांच्या संग्रहातील ‘तारां’चा इतिहास

$
0
0
ब्रिटिशांच्या राजवटीत कॉमनवेल्थची मुद्रा असलेल्या तर स्वातंत्र्योत्तर काळातील राजमुद्रा असलेल्या तारा, ब्रिटिशांच्या काळात सिगारेटपासून रावळप्लगपर्यंतच्या जाहिराती आणि स्वातंत्र्यानंतर राष्ट्रीय बचत पत्रांच्या (एनएससी) जाहिराती, ब्रिटिश काळात पांढऱ्या रंगाच्या कागदावर असलेल्या बहुतांश तारा तर स्वातंत्र्यानंतर गुलाबी रंगाच्या कागदावर आलेल्या तारा...
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images