Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

धरणातील पाणीसाठा १३ अब्ज टीएमसी

$
0
0
पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील चारही धरणांचा पाणीसाठा १३ अब्ज घनफूट (टीएमसी) झाला आहे.

समनव्याची भूमिका घ्या

$
0
0
'ढोलपथकांना गेल्या वर्षी देण्यात आलेल्या सवलतींचा काहींनी गैरफायदा घेतला. पुण्याच्या गणेशोत्सवावर या वर्षी दहशतवादाचे सावट आहे. त्यामुळे ढोलपथकांनी आततायीपणा न करता समन्वयाची भूमिका घेऊन मिरवणुकीत सहभागी व्हावे,' असे आवाहन अतिरिक्त पोलिस आयुक्त चंद्रशेखर दैठणकर यांनी केले आहे.

निम्हण पिता-पुत्रांविरुद्ध दखलपात्र गुन्हा

$
0
0
निवृत्त विंग कमांडर अरुण देशमुख यांनी मुख्यमंत्री-उपमुख्यंमत्री यांच्याकडे पोलिसांविरोधात केलेल्या तक्रारीची दखल घेत चतुःश्रृंगी पोलिसांनी अखेर आमदार विनायक निम्हण, नगरसेवक चंद्रशेखर उर्फ सनी निम्हण यांच्यासह तिघांविरोधात दखलपात्र गुन्ह्याची शुक्रवारी नोंद केली.

सरकारचा भर कशावर?

$
0
0
अनधिकृत बांधकामे, त्याकडे डोळेझाक करणारे स्थानिक प्रशासन, इमारतींच्या मोकळ्या जागांमध्ये फोफावणारी व्यवसायाची गणिते... अशा अनिर्बंध 'चालीरितीं'वर बंधने घालून शहराच्या शाश्वत विकासासाठी पायाभूत सुविधांच्या निर्मितीवर सरकारचा भर असेल का, हे विधिमंडळाच्या अधिवेशनात स्पष्ट होऊ शकणार आहे.

पूरग्रस्तांची राहती घरे नावावर होणार

$
0
0
पानशेत पूरग्रस्तांच्या नावावर त्यांची राहती घरे करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याचे आमदार मोहन जोशी यांनी शुक्रवारी सांगितले.

फार्मासिस्टना आता प्रशिक्षणाचे 'धडे'

$
0
0
राज्यात औषध दुकानात कार्यरत असणाऱ्या फार्मासिस्टना प्रशिक्षण देण्याची योजना अन्न आणि औषध प्रशासनाकडून हाती घेण्यात येणार असल्याचे राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त महेश झगडे यांनी सांगितले.

पावसाचा जोर २ दिवस कायम

$
0
0
पुण्यासह राज्यात अनेक ठिकाणी सक्रिय झालेल्या पावसाचा जोर आणखी दोन दिवस कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. गुरुवार-शुक्रवारच्या २४ तासांत पुण्यात २६.४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.

लोणावळा-पुणे लोकल धिम्या गतीने

$
0
0
लोणावळा-पुणे रेल्वेमार्गावरील रेल्वे वाहतूक धिम्या गतीने सुरू असल्याची माहिती एका खासगी वृत्तवाहिनीवरून देण्यात आली आहे. रेल्वे ट्रॅकला तडे गेले असल्याने या मार्गावरील रेल्वे वाहतूकीचा वेग मंदावल्याची माहिती मिळते.

कडकट्ट... कडकट्टचा आवाज उद्यापर्यंत

$
0
0
कडकट्ट ...कडकट्ट ...अशी लय असलेली देशातील तारसेवा १४ जुलैला रात्री ठीक बारा वाजता बंद होणार आहे. भारत संचार निगम लिमिटेडच्या (बीएसएनएल) मुख्यालयाने देशभरातील सर्व तारकेंद्रांना हे वृत्त कळवणारे पत्र शुक्रवारी पाठवले.

डॉ. शर्मिला रेगे यांचे निधन

$
0
0
पुणे विद्यापीठाच्या ‘क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्त्री अभ्यास केंद्रा’च्या संचालिका आणि ज्येष्ठ स्त्रीवादी लेखिका डॉ. शर्मिला रेगे यांचे शनिवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्या ४८ वर्षांच्या होत्या.

वैष्णवांच्या पावलांना शेवचिवड्याची ऊर्जा

$
0
0
दिवसाचा उन्हापावसाचा त्रास टळावा आणि रात्री मुक्कामासाठी पुरेसा वेळ मिळावा, यासाठी पालखीतील वारकरी भल्या पहाटेच मुक्कामाचा तळ हलवितात. भल्या पहाटे सुरू होणाऱ्या या वाटचालीत बरीच दमछाक होत असल्यामुळे, या वाटचालीत वारकऱ्यांसाठी न्याहारीच महत्त्वाची ठरते.

साडेअठरा लाखांचा गुटखा जप्त

$
0
0
मांजरी (ता. हवेली) येथील विठ्ठल निवास येथून साडेअठरा लाख रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) लोणीकंद पोलिसांच्या मदतीने ही कारवाई केली.

पावसाचा लपंडाव

$
0
0
जोरदार सरी अन् त्यापाठोपाठ उन्हाची तिरिप, अशी श्रावणातल्या ऊन-पावसाच्या खेळाची आठवण पुणेकरांना शनिवारी आषाढमासीच झाली. पुढील दोन दिवसांत पावसाच्या हलक्या सरी पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे.

धोकादायक केबलवर कारवाई

$
0
0
शहराच्या विविध भागांत बेकायदेशीरीत्या टाकलेल्या, विविध खांबांवर आणि इमारतींवर लोंबकळणाऱ्या, धोकादायक स्थितीतील १८५ किलोमीटरच्या केबल महापालिकेतर्फे शनिवारी काढण्यात आल्या. शहरातील धोकादायक केबलचे हे जाळे तब्बल पुणे-मुंबई दरम्यानच्या अंतराएवढे होते.

महावितरण कर्मचाऱ्याचा मृत्यू

$
0
0
आंबेगाव पठार येथे विजेची डीपी दुरुस्त करत असताना महावितरणच्या कनिष्ठ तांत्रिक कर्मचाऱ्याचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. शुक्रवारी रात्री ही घटना घडली.

अपघाती मृत्यूनंतर मीडिएशनमुळे भरपाई

$
0
0
घरातील एकमेव कर्त्या व्यक्तीचा अपघाती मृत्यू झाल्यामुळे दुःखाचा डोंगर कोसळलेल्या कुटुंबाला मीडिएशनमुळे नऊ महिन्यांच्या आत मदत मिळाल्यामुळे आधार मिळाला. या कुटुंबाला वीस लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याचा दावा मीडिएशनद्वारे तडजोडीने निकाली काढला.

'पायोग्लिटझॉन'वरील बंदी उठली!

$
0
0
डायबेटिस आजारावर प्रभावी ठरणारे ‘पायोग्लिटझॉन’ औषधांवरील बंदी केंद्र सरकारने उठविली असून त्यामुळे पुन्हा पेशंटला पूर्वीप्रमाणेच हे औषध घेता येणार आहे. त्यामुळे पेशंटला मोठा दिलासा मिळाला आहे.

बेकायदा बांधकामे नियमित होणार

$
0
0
पुणे महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट झालेल्या गावांमधील अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी स्वतंत्र नियमावली तयार करण्याचा ठराव शुक्रवारी शहर सुधारणा समितीमध्ये एकमताने मंजूर करण्यात आला.

सीएनजी किटसाठी २ कोटी

$
0
0
शहरातील रिक्षांना सीएनजी किट बसविण्यासाठी महापालिकेतर्फे देण्यात येणाऱ्या अनुदानाचा लाभ यंदा सुमारे दीड हजारांहून अधिक रिक्षांना होऊ शकणार आहे.

‘सॅनिटरी’ कचरा कोर्टात?

$
0
0
सॅनिटरी नॅपकिन्सच्या वापरामुळे शहरात दिवसाला दोन हजार किलो कचरा होत असतानाही, उत्पादन कंपन्यांनी मात्र या समस्याकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष केले आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी जानेवारीपासून वारंवार पत्रव्यवहार करूनही कोणत्याही कंपन्यांनी याची दखल घेतलेली नाही.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images