Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

पालखी सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात

$
0
0
आषाढी वारीनिमित्त संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यानिमित्त पिंपरी-चिंचवड आणि परिसरात जय्यत तयारी सुरू आहे. पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी महापालिकेबरोबरच शहरातील विविध संस्था आणि संघटनांनी देखील दरवर्षीप्रमाणे पुढाकार घेतला आहे.

ध्येयवेडाचं 'विश्वासा'र्ह रोल मॉडेल!

$
0
0
आयटी कंपनीत नोकरी, महिन्याला सहा आकडी पगार, जगभर फिरण्याची संधी... कोणालाही हेवा वाटावं असं करिअर! अशा करिअरमध्ये रुढार्थानं 'सेट' झाल्यावर एखाद्या तरूणानं वयाच्या ३४ व्या वर्षी नोकरी सोडून, 'आता मी समाजासाठी काम करणार,' असं जाहीर केलं, तर त्याला काय म्हणाल?

'मैत्री'ला हवायं दात्यांचा सहभाग

$
0
0
उत्तराखंडमध्ये झालेल्या पूर प्रलयात अडकलेल्या व्यक्तींना मदत करण्यासाठी 'मैत्री'चा प्रशिक्षित स्वयंसेवक आणि डॉक्टरांचा गट उत्तराखंडमध्ये रवाना झाला आहे. तिथोरागडातील अस्कोट गावात त्यांचे काम सुरू असून पुढील मदतीसाठी संस्थेला आता दानशूर व्यक्तींच्या सहभागाची अपेक्षा आहे.

एलबीटी, व्हॅटवर जुलैपासून बहिष्कार

$
0
0
'एलबीटी करप्रणाली संदर्भात महाराष्ट्र सरकारने २० जूनला काढलेल्या अध्यादेशावर आम्ही समाधानी नाही. या अध्यादेशाद्वारे आमच्या ९५ टक्के मागण्या मान्य झाल्या असल्या इतर महत्वाच्या मागण्यांबाबत मात्र अद्याप सरकारी अध्यादेश निघालेला नाही. तो येत्या ३० जूनपूर्वी न निघाल्यास ठरल्याप्रमाणे येत्या एक जुलैपासून प्रथम एलबीटीवर व नंतर व्हॅटवर बहिष्कार घातला जाईल,' असा इशारा राज्य व्यापारी महासंघाचे अध्यक्ष अतुल शहा यांनी दिला.

ऊर्जेची गरज अणुऊर्जेने भागवा

$
0
0
'देशाला जेवढ्या प्रमाणात ऊर्जेची गरज आहे, तेवढी आपली मानसिकता अजूनही तयार झालेली नाही. त्यावर मात करण्यासाठी पर्यावरणीय समस्या निर्माण होऊ न देता सध्याच्या वापराच्या दहापट ऊर्जा आपल्याला निर्माण करावी लागेल. त्यासाठी सौरऊर्जा आणि थोरियमपासून निर्माण केलेली अणुऊर्जा हेच पर्याय उपलब्ध आहेत,' असे प्रतिपादन ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी मंगळवारी केले.

बेपत्ता व्यक्तींच्या शोधासाठी बीएसएनएल सरसावले

$
0
0
मोबाइलच्या माध्यमातून देणार लोकेशनची माहिती म टा...

गावातूनच करा वारीची सुरुवात

$
0
0
आषाढीवारीला जाणाऱ्या भाविकांच्या ग्रुपसाठी थेट त्यांच्या गावामधूनच बससेवा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. वारीसाठी जाणाऱ्या ग्रुपमध्ये ४५ ते ५० जणांचा समावेश असल्यास त्यांना पंढरपूरला जाण्यासाठी बसस्थानकावर न येता त्यांच्या गावातूनच बससेवा उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे एसटीच्या पुणे विभागाचे नियंत्रक अशोक जाधव यांनी सांगितले. त्यासाठी भाविकांनी एसटीच्या संबधित विभागाच्या नियंत्रकाशी संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

तळेगावातील पवार परिवार बेपत्ता

$
0
0
तळेगाव दाभाडे येथील पवार कुटुंबातील चार नातेवाइक अद्यापही बेपत्ता आहेत. पवार कुटुंबीयांच्या नातेवाइकांनी उत्तराखंड येथे जाऊन त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना यश आले नाही.

आम्ही दोघे आलो, पण बहीण मागे राहिली

$
0
0
देवदर्शन होईपर्यंत निसर्गाचे रुप एवढे पालटेल असे वाटले नव्हते. केदारनाथचे दर्शन झाले आणि परतीच्या प्रवासात मी आणि रंजना पायी चालायला लागलो. रंजना यांची बहीण रत्नमाला अरूप या डोलीतून खाली येणार होत्या. याच काळात दरडी कोसळल्या, पूर आला अन् रस्ते बंद झाले.

पूररेषा हटविण्यासाठी आटापिटा

$
0
0
नदीची पूररेषा, बीआरटी प्रिमियम आणि टीडीआर इंडेक्स या प्रस्तावांवर विकास नियंत्रण नियमावलीत बदल करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गुरुवारी (२७ जून) प्रयत्नांचा आटापिटा केल्याचे दिसून आले. त्या अनुषंगाने फेरबदलाचा प्रस्ताव मंजूर करून कार्यवाहीचे अधिकार आयुक्तांना दिले आहेत.

आधी भूमिपूजन नंतर मंजुरी

$
0
0
भोसरी परिसरातील काही विकासकामांची भूमिपूजने झाल्यानंतर याविषयीच्या खर्चाला मंजुरी देण्याचे प्रस्ताव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत चर्चेला आले. तीनपैकी दोन प्रस्तावांना सभेने मंजुरी दिली.

झोपडीवासीय जावईच करायचे राहिलेत

$
0
0
शहरात झोपड्यांचे पीक फोफावते असून, झोपडीधारक शहराचे मालक झाल्यासारखे वागतात. मोफत घरे मिळतात म्हणून कोठेही अतिक्रमणे होत आहेत. त्यांना मोफत घरे, मोफत पाणी आणि करसवलती दिल्या जात आहेत. त्यांना फक्त जावई करून घ्यायचेच शिल्लक आहे, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष योगेश बहल यांनी सर्वसाधारण सभेत गुरुवारी (२९ जून) केले.

नाट्यपरिषदेत रंगतेय बदलाची 'नांदी'

$
0
0
नाट्यपरिषदेच्या निवडणुकीत बदलाच्या नाट्याची 'नांदी' झाली आहे. आतापर्यंत नाट्यपरिषदेत असलेले ज्येष्ठांचे वर्चस्व कमी होऊन त्याऐवजी नव्या चेहऱ्यांना संधी मिळावी आणि नाट्यकर्मीच अध्यक्षपदी असावा, अशी अपेक्षा नाट्यवर्तुळातून व्यक्त केली जात आहे. मात्र, निवडणुकीच्या या रंगमंचावर प्रत्यक्षात काय घडते याचीच प्रतीक्षा रंगकर्मींना आहे.

पालखी मार्गावर कमानी, स्टॉलला मनाई

$
0
0
श्री संत तुकाराम महाराज आ​णि श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या रथांवर तसेच पालखी मार्गावर सुरक्षेच्या दृष्टीने 'सीसीटीव्ही' कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. या दोन्ही पालख्यांसाठी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार असून पालखी मार्गांवर खाद्यपदार्थांचे स्टॉल तसेच कमानी उभारण्यास परवानगी नाकारण्यात आली आहे.

माऊलींच्या रथाला नवतेचा साज

$
0
0
आषाढी वारीसाठी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे प्रस्थान दोन दिवसांवर आल्यामुळे वारकऱ्यांची पावले आळंदीकडे चालू लागली आहेत. त्यातच पालखी सोहळ्यासाठी दिघी येथील 'रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट'ने (आरअँडडीई) तयार केलेला खास रथही सज्ज झाल्यामुळे आळंदी दाखल होणाऱ्या वारकऱ्यांचा उत्साह दुणावताना दिसत आहे.

१ जुलैला मतदानकेंद्रांची यादी

$
0
0
'बोगस' मतदार वगळल्यामुळे पुण्यातील मतदान केंद्रांची फेररचना करण्यात येत असून, प्रारूप यादी १ जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. मतदान केंद्राची सोय-गैरसोय वा अन्य प्रश्नांबाबत राजकीय पक्ष तसेच, नागरिकांना हरकती मांडता येणार आहेत. येत्या १५ जुलैपर्यंत या हरकती स्वीकारून त्यावर सुनावणी घेतली जाणार आहे. त्यानंतरच मतदान केंद्रांवर शिक्कामोर्तब होईल.

पालिकेनेच उभारले अनधिकृत मोबाइल टॉवर

$
0
0
शाळा, कॉलेज, हॉस्पिटल्सच्या इमारतींवर मोबाइल टॉवर न उभारण्याच्या निर्देशांकडे दुर्लक्ष करत पालिकेच्याच शाळा आणि हॉस्पिटल्सवर अनधिकृत टॉवर उभारले असल्याचे गुरुवारी सर्वसाधारण सभेत उघड झाले. तसेच, प्रशासनाच्या आकडेवारीपेक्षा तब्बल तिपटीहून अधिक टॉवर प्रत्यक्ष अस्तित्त्वात असल्याचे सदस्यांनीच निदर्शनास आणून दिले.

डॉ जाधव यांच्याकडेआरोग्य प्रमुख कार्यभार नको

$
0
0
भाजपसह मनसे नगरसेवकांची मागणीम टा...

दुष्काळी गावांतील ८८ टँकर बंद

$
0
0
जनावरांच्या अकरा छावण्याही बंद म टा...

बनावट 'युरो' देऊन फसवणूक

$
0
0
परदेशातून प्रक्रिया करून आणलेल्या युरोच्या नोटा पुन्हा मूळ स्वरूपात आणण्याच्या बहाण्याने अनेकांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी गुन्हे शाखेच्या सायबर सेलने एकाला अटक केली असून आणखी दोघाजणांचा शोध सुरू आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live


Latest Images