Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

गॅलक्सी हॉस्पिटल बंदीची नोटीस

$
0
0
अग्निशामक दलाचे 'ना हरकत प्रमाणपत्र' घेऊ, या महापालिकेला दिलेल्या प्रतिज्ञापत्राची तीन महिन्यांत पूर्तता न केल्याने कर्वे रस्त्यावरील गॅलक्सी हॉस्पिटलचा परवाना आरोग्य खात्याने गुरुवारी रद्द केला.

पालिका अभियंत्याला अटक

$
0
0
महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागाचे उपअभियंता राजदीप बिशनदास धुसिया यांना पंधरा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलचुपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी सायंकाळी अटक केली.

यात्रेचा एकाच कंपनीकडे परवाना

$
0
0
तात्पुरता परवाना न घेताच ट्रॅव्हल कंपन्या वेगवेगळ्या प्रवास मार्गांवर प्रवाशांसह फिरत असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे उत्तराखंडमध्ये पुण्यातील नक्की किती प्रवासी आहेत, याची अधिकृत आकडेवारी उपलब्ध होऊ शकलेली नाही. केवळ एकाच ट्रॅव्हल कंपनीने उत्तरखंड यात्रेसाठी तात्पुरता परवाना घेतल्याचे उघडकीस आले आहे.

भाड्याने दिलेल्या मालमत्तांची चौकशी होणार

$
0
0
पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाने भाड्याने दिलेल्या निवासी मालमत्तांचा संबंधित भाडेकरांकडून व्यापारी वापर केला जात असल्याने त्या मालमत्तांचा प्रशासनाकडून शोध घेतला जाणार असल्याचे सांगण्यात आले.

दरोड्याच्या तयारीतील आरोपींना अटक

$
0
0
कंपनीवर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या चार आरोपींना पकडण्यात एमआयडीसी पोलिसांना यश आले. गुरुवारी (२० जुन) रात्री आठ वाजता भोसरी येथे हा प्रकार घडला.

वेळेत चार्जशीट नसल्याने दोघांची जामिनावर मुक्तता

$
0
0
वारजे-माळवाडी पोलिस स्टेशनच्या हद्दीत सोनसाखळी चोरी, घरफोडी आणि लोकांना धमकावून लुटल्याप्रकरणी पाच गुन्हे दाखल असलेल्या दोन आरोपींविरुद्ध् पोलिसांकडून वेळेत चार्जशीट दाखल न केल्यामुळे कोर्टाने त्यांची जामिनावर मुक्तता केली.

रस्ता खोदल्याप्रकरणी पालिकेकडून गुन्हा दाखल

$
0
0
विनापरवाना रस्ता खोदून पाइप टाकणाऱ्या अज्ञात व्यक्तिविरुद्ध पालिकेच्या पथ विभागाने विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पथ विभागाचे अधीक्षक अभियंता सुरेश मारुती साखळे (वय ४१, रा. शिवाजीनगर) यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

मोबाइल नंबर द्या, वेळेत पत्र घ्या

$
0
0
पोस्ट खात्याचा कारभार आणखी वेगाने होण्यासाठी 'मोबाइल नंबर द्या आणि वेळेत पत्र मिळवा' अशी खास योजना आखण्यात आली आहे. त्यानुसार स्पीडपोस्ट सेवेप्रमाणे कागदपत्रे पाठवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या सीलबंद पाकिटे किंवा अन्य पत्रांवर मोबाइल नंबर दिल्यास नागरिकांना वेळेत पत्र मिळू शकणार आहेत.

शहरातील पर्यटकांच्या सुटकेसाठी व्यवस्था

$
0
0
उत्तराखंडमधील पुरात अडकलेल्या पिंपरी-चिंचवडमधील सुमारे १९० पर्यटक हरिद्वार, उत्तरकाशीमध्ये सुरक्षित पोहोचले असून, त्यापुढे शहरात आणण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे.

एलबीटीच्या माध्यमातून २ महिन्यांत १२५ कोटी

$
0
0
स्थानिक संस्था कराच्या (एलबीटी) माध्यमातून पिंपरी-चिंचवड महापालिकेला एप्रिल आणि मे या दोन महिन्यात १२५ कोटी १३ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे, अशी माहिती सहायक आयुक्त अशोक मुंढे यांनी दिली.

हिंजवडीत भूमिगत वीजवाहिन्या करा

$
0
0
हिंजवडी दावातील छत्रपती शिवाजी चौक आणि लगतच्या रस्त्यांवरील वाहतुकीला अडथळा ठरणारे विद्युत वाहिनीचे खांब काढावेत, तसेच या वाहिन्या भूमिगत कराव्यात अशी मागणी ग्रामविकास (मुळशी) तालुका संस्थेतर्फे करण्यात आली आहे.

'कोरिया दौ-याची चौकशी करा'

$
0
0
दक्षिण कोरियाच्या अभ्यासदौऱ्याची केंद्र तसेच राज्य सरकारकडून परवानगी घेणे गरजेचे असत‌ाना पालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी याकडे कानाडोळा करत हा दौरा केला.

कोंढव्यात टेकडीफोड

$
0
0
कात्रज परिसरातील शिंदेवाडी येथील डोंगर फोडल्याप्रकरणी कारवाई केली जात असताना कोंढवा बुद्रुकमध्ये मोठ्या प्रमाणावर डोंगर फोडून सपाटीकरणाचे काम सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे.

विचित्र अपघातात ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू

$
0
0
लक्ष्मी रोडवर सिटी पोस्ट चौकाकडे जाताना जुबेर हार्डवेअरसमोर पार्क केलेल्या फियाट कारला 'पीएमपी'ची जोराची धडक बसली. या धडकेने फियाट कार फुटपाथवर उभ्या असलेल्या एका ज्येष्ठ नागरिकावर आदळल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी घडली.

सॅलिसबरी पार्कमधून चंदन चोरी

$
0
0
राजभवनातील चंदनाची झाडे चोरणारी टोळी जेरबंद झाली असली तरी शहरात चंदन चोरी करणारी दुसरी टोळी कार्यरत झाली आहे. या टोळीने सॅलिसबरी पार्कमधून गुरुवारी रात्री चंदनाची तीन झाडे तोडून नेली आहेत.

डोळ्यात तरळतेय प्रशासकीय सेवेचे स्वप्न

$
0
0
दिवसभर नोकरी, संध्याकाळी चार तास शाळेत जाऊन अभ्यास आणि त्यानंतर पालिकेच्या कसबा पेठेतील शाळेच्या खोलीतील 'घरी'असा दिनक्रम. ना नोट्स, ना गाइड, ना कुठला कोचिंग क्लास! दहावीसारख्या महत्त्वाच्या शैक्षणिक वर्षात अशा प्रतिकूल परिस्थितीशी झुंज देत सचिन कांबळे याने जिद्दीने ७५.४० टक्के गुण मिळविले. उच्चशिक्षण घेऊन त्याला प्रशासकीय सेवेत दाखल व्हायचे आहे.

धरणग्रस्तांकडून जमीन मोजणी बंद

$
0
0
पवना धरण परिसरातील कोळे चाफेसर येथे धरणग्रस्तांसाठी शासनाच्या वतीने सुरू असलेले एक एकर जमिनीच्या मोजणीचे काम पवना धरणग्रस्त कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी बंद पाडण्याचा प्रयत्न केला.

गणपती मंडळे झाली... 'एनजीओ'

$
0
0
'आपला मुलगा गणपती मंडळात असल्याने दक्षिण कोरियाच्या दौऱ्यात स्वयंसेवी संस्थांचा (एनजीओ) प्रतिनिधी म्हणून सहभागी झाला होता. त्यामुळे महापालिकेच्या दौऱ्यात पदाधिकाऱ्यांच्या नातेवाईकांना नेण्यात आम्हाला काहीही चुकीचे वाटत नाही,' या शब्दांत पालिकेचे सभागृह नेते सुभाष जगताप यांनी कोरियातील 'फॅमिली टूर'चे समर्थन केले.

चारधामचा ताण ठरला जीवघेणा...

$
0
0
केदारनाथमध्ये नैसर्गिक परिस्थितीचा हाहाकार माजलेला असताना चारधाम यात्रेदरम्यान रुद्रप्रयाग येथे आशा यशवंत काटे (वय ५८) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. या यात्रेदरम्यान आलेला प्रवासाचा ताण हे या घटनेमागील कारण आहे.

मोशी कन्व्हेंशन सेंटरला गती

$
0
0
पुण्याला जागतिक नकाशावर घेऊन जाणाऱ्या मोशी येथील बहुचर्चित आंतरराष्ट्रीय प्रदर्शन व कन्व्हेंशन सेंटरला पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या बैठकीत शुक्रवारी मंजुरी देण्यात आली.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images