Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

बनावट औषधांची विक्री रोखण्यासाठी मोहीम

0
0
किरकोळ औषध विक्रेत्यांमार्फत बनावट औषधांची विक्री होत असल्याचे निदर्शनास आल्यानेच राज्यातील विक्रेत्यांकडून 'शेड्यूल एच' आणि 'नॉन शेड्यूल' औषधांच्या बिलांची तपासणीची मोहीम अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) राज्यभरात सुरू केली आहे.

पहिल्या अंतराळवीराला एनडीए छात्रांचा 'सॅल्यूट'

0
0
वीस-पंचवीस विद्यार्थ्यांच्या गराड्यात उभी असलेली एक व्यक्ती, चारही बाजूंनी मोबाइल आणि कॅमेराचे लखलखणारे फ्लॅश, त्या व्यक्तीची एक सही मिळविण्यासाठी सुरू असलेली धडपड आणि आम्हालाही तुमच्यासारखं अंतराळवीर किंवा लढाऊ वैमानिक होऊन देशसेवा करायची आहे, यासारख्या प्रश्नांचा भडिमार.

ढिसाळपणामुळे जेट एअरवेजला पाच लाखांचा दंड

0
0
अमेरिकेतील प्रवासादरम्यान जेट एअरवेजच्या कामातील ढिसाळपणामुळे ग्राहकाला झालेल्या शारीरिक आणि मानसिक त्रासपोटी पाच लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याचा आदेश पुणे जिल्हा ग्राहक न्याय मंचाने जेट एअरवेज कंपनीला दिला आहे.

बालगंधर्व परिवार पुरस्कार

0
0
बालगंधर्व रंगमंदिराच्या ४५ व्या वर्धापनदिनानिमित्त २५ आणि २६ जून रोजी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या दोन दिवसीय कार्यक्रमात बालगंधर्व परिवार पुरस्कारही दिले जाणार आहेत. या पुरस्कार सोहळ्याचे हे पाचवे वर्ष आहे.

डेंगी, मलेरियाच्या निर्मूलनासाठी हेल्पलाइन

0
0
लोगोताप डेंगीचा डेंगी, मलेरियाच्या निर्मूलनासाठी हेल्पलाइनआरोग्य विभागाच्या डास निर्मूलनासाठी उपाय योजनाम टा...

भाडेकरूंना काढण्यासाठी पोलिसांची मदत

0
0
शहरातील धोकादायक वाडे मोकळे करूनही त्याच जागेत राहणाऱ्या भाडेकरूंना बाहेर काढण्यासाठी यापुढे पोलिसांची मदत घेण्यात येणार आहे. तसेच, वाडे मोकळे करताना पंचनामा करून भाडेकरूंची नोंदणी करण्यात येणार असल्याचे पालिका प्रशासनाने गुरुवारी स्पष्ट केले.

ऋतुपर्ण घोष चित्रपट महोत्सव

0
0
ज्येष्ठ दिग्दर्शक ऋतुपर्ण घोष यांना आदरांजली म्हणून आशय फिल्म क्लबतर्फे 'आठवण ऋतुपर्ण घोष यांची' हा महोत्सव रविवारी (२३ जून) राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय (एनएफएआय) येथे आयोजित करण्यात आला आहे.

... आणि पालटले लक्ष्मी रोडचे रूपडे!

0
0
अतिशय सुरळीत वाहतूक… चालण्यासाठी मोठे फूटपाथ… पथारीवाल्यांची व्यवस्थितपणे मांडलेली दुकाने…शांत वातावरण... सदैव गजबजलेला लक्ष्मी रोड असाही असेल याचा कधी विचार केलाय? 'व्हीआयटी'च्या पीव्हीपी कॉलेज ऑफ आर्किटेक्चरच्या विद्यार्थ्यांनी लक्ष्मी रस्त्याचे रूपडे पालटणारा प्रकल्प तयार केला आहे.

सुप्रियांकडून राजीनाम्याची भाषा

0
0
तुम्ही कोठे आहात? आताच्या आता अर्ध्या तासाच्या आत तुम्ही मला इथे हवेत. एकतर तुम्ही तरी राजीनामा द्या, नाहीतर मी तरी राजीनामा देते... खासदार सुप्रिया सुळे यांनी हवेलीचे तहसीलदार संदेश शिर्के यांना उद्देशून या शब्दांत आपला त्रागा गुरूवारी व्यक्त केला.

मोरे-जगताप अधिकच जुंपली

0
0
राष्ट्रवादी काँग्रेसशी संलग्न आमदार लक्ष्मण जगताप यांनी अपमानास्पद वागणूक दिल्याच्या आरोपानंतर औंध येथील जिल्हा रुग्णालयाचे शल्य चिकित्सक डॉ. विनायक मोरे यांनी पदाचा राजीनामा दिला आहे.

हल्ल्याच्या तयारीतील आरोपींना अटक

0
0
पूर्व वैमन्यासातून बदला घेण्यासाठी खून करण्याच्या हेतूने जात असलेल्या आठ जणांच्या टोळीला सांगवी पोलिसांनी पकडले. पोलिसांनी त्यांच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल, सहा जिवंत काडतूसे, चायनीज चॉपर, कोयता, नायलॉन दोरी, मिरचीपावडर, तसेच एक कार आणि एक रिक्षा जप्त केली.

पालिकेचीही वनांवर कुऱ्हाड!

0
0
हरित पुणे, पुण्यातील वनसंपदा यांचे कौतुक करीत स्वतःची पाठ थोपटणाऱ्या पुणे महानगरपालिकेनेही वनजमिनींचे लचके तोडण्यात पुढाकार घेतला आहे. पाचगाव पर्वती टेकडी आणि वारजे माळवाडीमधील वनविभागाच्या हद्दीत शिरून महापालिकेच्या पथविभागाने थेट रस्ते केल्याचे स्पष्ट झाले आहे.

संगीतातील दिग्गज अँड्रॉइडवर

0
0
पं. कुमार गंधर्व यांच्यापासून ते गझलगायक जगजितसिंग यांच्यासारख्या दिग्गज कलाकारांच्या संगीताचा आनंद, त्यांच्याविषयी माहिती आता एका टॅबच्या टप्प्यात आली आहे.

गौरीकुंडावर अडकलेले पर्यटक सुखरूप

0
0
उत्तराखंडातील जलप्रलयात गौरीकुंडाजवळ अडकलेल्या शिवगौरी ट्रॅव्हल्सच्या पर्यटकांशी गुरुवारी सकाळी संपर्क झाला आणि त्यांच्या पुण्यातील नातेवाइकांचा जीव अखेर भांड्यात पडला.

सव्वाबाराशे कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनांना मंजुरी

0
0
जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनर्निर्माण योजनेच्या (जेएनएनयूआरएम) दुसऱ्या टप्प्यातून शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या सव्वाबाराशे कोटी रुपयांच्या योजनांना गुरुवारी सर्वसाधारण सभेने मंजुरी दिली.

एका दिवसात पालिकेकडे ३२ कोटींचा भरणा

0
0
स्‍थानिक संस्‍था कर (एलबीटी) भरण्याच्या अखेरच्या दिवशी तब्बल सात हजारहून अधिक व्यापाऱ्यांनी मे महिन्याचा ३२ कोटी रुपये कर पालिकेकडे जमा केला. त्यामुळे महिन्याचा एकूण 'एलबीटी' भरणा ७२ कोटी रुपयांवर पोहोचला. जकात बंद झाल्यानंतरच्या आर्थिक वर्षातील पहिल्या दोन महिन्यात पालिकेला 'एलबीटी'तून सुमारे १२० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.

झेंबे वाजवा...व्हा टेन्शन फ्री

0
0
ताणतणाव, टार्गेट्स, अतिकामामुळे येणारे नैराश्य घालविण्यासाठी किंवा मनमोकळे करण्यामध्ये 'ऱ्हिदम'चा किती महत्वाचा वाटा असू शकतो… याची अनुभूती 'तालइंक' या ग्रुपने झेंबेवादनातून तब्बल दहा हजार लोकांना मिळवून दिली आहे.

हा आमचा पुनर्जन्मच...

0
0
'एरवी पर्यटनाला गेल्यानंतर डोळ्यात साठवून ठेवावे असे दृश्य अनुभवून आपण परततो; पण गंगेचा अनुभवलेला तो रुद्रावतार थरकाप उडविणारा ठरला. त्यामधून सुखरूप वाचून घरी परतल्यावर पुनर्जन्मच झाल्यासारखे वाटते आहे...'

अभ्यासदौरा की फॅमिली पिकनिक?

0
0
सामंजस्य करारासाठी पालिकेने काढलेल्या दक्षिण कोरियाच्या अभ्यास दौऱ्यात चार सामाजिक संस्थांच्या (एनजीओ) प्रतिनिधींमध्ये महापौरांचे पती, मुलगा तसेच अन्य दोन पदाधिकाऱ्यांच्या मुलासह पत्नीचा समावेश असल्याची माहिती पुढे आली आहे.

वनजमिनींची लचकेतोड

0
0
हरित पुणे, पुण्यातील वनसंपदा यांचे कौतुक करीत स्वतःची पाठ थोपटणाऱ्या पुणे महानगरपालिकेनेही वनजमिनींचे लचके तोडण्यात पुढाकार घेतला आहे. पाचगाव पर्वती टेकडी आणि वारजे माळवाडीमधील वनविभागाच्या हद्दीत शिरून महापालिकेच्या पथविभागाने थेट रस्ते केल्याचे स्पष्ट झाले आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images