Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

कंटेनर कलंडल्याने वाहतूक विस्कळित

$
0
0
निगडी-तळवडे रस्त्यावर बुधवारी (१९ जून) पहाटे कंटेनर कलंडल्यामुळे या मार्गावरील वाहतूक सकाळी विस्कळित झाली. तळवडे आयटी पार्क आणि चाकणकडे जाणाऱ्या नोकरदारांना या वाहतूक कोंडीचा फटका बसला.

'त्यांच्या' मदतीसाठी प्रयत्न करा हो....

$
0
0
उत्तराखंडमधील महापुरात गौरीकुंडाजवळ आमचे नातेवाइक अडकले आहेत...त्यांच्याशी आमचा एकदाच संपर्क झाला; पण आता ते कोठे आहेत याची माहिती मिळत नाही...प्रशासन नीट उत्तर देत नाही, त्यांना मदत मिळण्यासाठी प्रयत्न करा हो...

नोटिसा बजावूनही रहिवाशांचे दुर्लक्षच

$
0
0
'जुन्या वाड्यांचा सर्व्हे करून राहण्यास अतिधोकादायक ठरणाऱ्या वाड्यांना पालिका प्रशासनाने वेळोवेळी नोटिसा बजाविल्या आहेत. मात्र, या वाड्यांमधील रहिवासी वाडा सोडून जात नसल्याने वाडा कोसळण्याच्या दुर्घटना घडत आहेत', असे पालिका आयुक्त महेश पाठक यांनी म्हटले आहे.

सर्वच हायवेंवर हातोडा

$
0
0
शिंदेवाडी येथील दुर्घटनेनंतर पुणे विभागातील सर्व हायवे आणि डोंगरांवरील अनधिकृत बांधकामांच्या विरोधात धडक मोहीम हाती घेण्याचे आदेश पाचही जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

अतिक्रमणे काढा, गुन्हे दाखल करा

$
0
0
वाहतूक कोंडी फोडण्यासाठी वाहनांची वर्दळ असलेल्या रस्त्यांवर स्टॉल आणि टपऱ्या मांडणारे आणि ‌फेरीवाले, पथारीवाल्यांवर थेट गुन्हे दाखल करा, असा आदेश गृह खात्याचे अप्पर मुख्य स‌चिव अमिताभ राजन यांनी मंगळवारी महापालिका आयुक्त महेश पाठक यांना दिला.

तूर्तास मतदारसंघ बदलाचा विचार नाही

$
0
0
लोकसभेच्या आगामी निवडणुकीत काही मतदारसंघ अदलाबदल करण्याची मागणी होत असली तरी अंतिम निर्णय हायकमांड घेईल. तूर्तास मतदारसंघ बदलण्याचा कसलाही विचार नाही, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी बुधवारी (१९ जून) स्पष्ट केले.

'पाच' नंबरची किंमत अडीच लाख

$
0
0
टू‌व्हीलरची‌ नवी सिरीज सुरू होण्याआधीच पुण्यातील एका व्यक्तीने आपल्या नव्या कारला 'पाच' हा नंबर घेण्यासाठी विक्रम‌ी अडीच लाख रुपये मोजले. नियमित फीपेक्षा एक लाख रुपये जादा देऊन हा नंबर बुक केला आहे. दुसऱ्या एका कार मालकाने सव्वादोन लाख रुपयांमध्ये 'सात' हा नंबर मिळविला आहे.

आमदारांकडून अपमानास्पद वागणूक

$
0
0
पिंपरी- चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी अर्वाच्य आणि असंसदीय भाषा वापरून अपमानास्पद वागणूक दिल्याची तक्रार औंध येथील जिल्हा रूग्णालयाचे शल्य चिकीत्सक डॉ. विनायक मोरे यांनी अतिरिक्त आरोग्य सचिवांकडे केली आहे.

योगेश राऊतला मदत करणा-या मित्राला अटक

$
0
0
नयना पूजारी खूनप्रकरणातील मुख्य आरोपी योगेश राऊतला ससून हॉस्पिटलमधून पळून जाण्याच्या कटात मदत केल्याप्रकरणी त्याच्या मित्राला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या दरोडा प्रतिबंधक पथकाने अटक केली आहे. या प्रकरणी सतीश अशोक पाडेकर (रा. सावरगाव, संगमनेर) याला अटक करण्यात आली आहे.

मोबाइल चोरांना अटक

$
0
0
खंडाळा रेल्वे स्टेशन येथे रेल्वेच्या एसी डब्यातील दरवाज्यात थांबून प्रवाशांच्या हातावर काठी मारून मोबाइल चोरणाऱ्या दोघांना रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना रेल्वे कोर्टात हजर करण्यात आले असता, २४ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

सॉफ्टवेअर इंजिनीअर व्हायचंय

$
0
0
वयाच्या सहाव्या वर्षी पितृछत्र हरपले.. उत्पन्नाचे काहीच साधन नाही.. घरात फक्त आई आणि आजी…त्यांनीच सांभाळ केला.. वडिलांनी दहा वर्षांपूर्वी साठवलेल्या पैशांच्या व्याजावर घर किती दिवस चालणार? शिक्षकांच्या मदतीमुळे शाळेची फी माफ झाली; पण आता 'त्याला' सॉफ्टवेअर इंजिनीअर व्हायचंय..

संयुक्त हद्दमोजणीची तयारी

$
0
0
'पाचगाव पर्वतीच्या वनक्षेत्रात अतिक्रमण केल्याबाबत वन विभागाने आम्हाला नोटिसा पाठविल्या आहेत; पण त्या आम्हाला मान्य नाहीत. हद्द मोजणीसाठी आम्ही वनाधिकाऱ्यांना वारंवार बोलावले.

मनसेचा पालिकेला घेराव

$
0
0
शहराच्या विकास आराखड्यात (डीपी) करण्यात आलेल्या जाचक तरतुदींना विरोध करण्यासाठी महाराष्ट्र नव‌निर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी महापालिकेला घेराव घालून आंदोलन केले. मानवी साखळी करून मनसेने हे आंदोनल केले.

पर्यटकांबाबत माहिती नाही!

$
0
0
उत्तराखंडमधील जलतांडवात अडकलेल्या पुण्यातील पर्यटकांशी संपर्क झाला असून, जीवितहानी झाल्याची कोणतीही अधिकृत माहिती आपल्याकडे नसल्याचे विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी बुधवारी सांगितले.

वाडा कोसळून दोघींचा मृत्यू

$
0
0
कसबा पेठेतील शिंपी आळी परिसरात असलेल्या एका जुन्या वाड्याची भिंत बैठ्या वाड्यावर कोसळून एक वयोवृद्ध महिला आणि नातीचा जागीच मृत्यू झाला. बुधवारी पहाटे ही दुर्घटना घडली.

झणझणीत गडपायथा

$
0
0
इतिहासाच्या वाटा धुंडाळत भटकणाऱ्या भटक्यांची तहान-भूक गडदर्शनानंच हरपते. तरीही सोबत नेलेला फौजफाटा हा पोटावरच चालत असतो. खाण्याचे कितीही नखरे असले तरी दुर्गम ठिकाणी मिळालेला बिनदुधाचा चहा, झुणका-भाकरी, आमटी भात हे पदार्थही चवदार लागतात. या ठिकाणी भटक्यांना मायेनं रांधून घालणाऱ्या ठिकाणांविषयी

भरत आता वेबसाइटवरही

$
0
0
अभिनेता भरत जाधव यांची वेबसाइट येत्या २९ जूनला लाँच होतेय. आगामी सिनेमांचे अपडेट्स, नव्या कलाकारांना व्यासपीठ म्हणून एक पोर्टल आणि ऑनलाइन बुकिंगची सोय यावर उपलब्ध आहे.

कुणी घर देता का घर

$
0
0
पालक आणि मुलं यांच्यातले नातेसंबंध आणि कुटुंबव्यवस्था यावर भाष्य करणारा कुणी घर देता का घर हा विनोदी सिनेमा २८ जूनला प्रदर्शित होत आहे.

थेरगावात भोंदूबाबाला अटक

$
0
0
घरातील अडी-अडचणी दूर करण्यासाठी विविध विधी करण्याच्या बहाण्याने एका महिलेला दहा लाखाचा गंडा घालणाऱ्या भोंदूबाबाला पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून सव्वालाखाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.

आळंदीत हवंय स्वच्छतेचं पसायदान

$
0
0
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या अलंकापुरीत सध्या ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिग दिसून येत आहेत. इंद्रायणी नदीच्या घाटावर जलपर्णी इस्ततः पसरली असून, स्वच्छतेच्या कामात कमालीची गती मिळावी, अशी मागणी होत आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images