Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

ढोलपथकांनी धरला ‘नेटवर्किंग’चा ठेका

$
0
0
पावसाळ्याच्या सुरुवातीला कॉलेजच्या कट्ट्याचे वेध लागले असतानाच वर्षभर जपून ठेवलेले ढोलाचे टिपरूही तरुणाईने हाती घेतले आहे. पहिल्या पावसाबरोबरच ढोल पथकांच्या तालमींची चर्चा रंगू लागली आहे.

पुणे-मुंबई रेल्वे वाहतूक सुरळीत

$
0
0
गेल्या दीड दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे पुणे-मुंबई मार्गावरील रेल्वेसेवा रविवारी सकाळी खोळंबली. परिणामी, पुणे रेल्वे स्टेशनहून मुंबईकडे जाणाऱ्या डेक्कन क्वीन, सिंहगड एक्स्प्रेस, प्रगती एक्स्प्रेस दोन तास ‌उशिराने धावल्या.

वडगाव बुद्रुकमध्ये अपार्टमेंटमध्ये आग

$
0
0
सिंहगड रोडच्या वडगाव बुद्रुकच्या गोसावी वस्ती येथील चतुर्भूज अपार्टमेंटमधील फ्लॅटमध्ये आग लागली. या फ्लॅटमध्ये राहाणाऱ्या प्रसाद म्हाळगे या तरुणानेच आग लावल्याचे आसपासच्या नागरिकांचे म्हणणे आहे. वन रुम किचनच्या त्या फ्लॅटमध्ये प्रसाद हा एकटाच राहात होता.

धरण क्षेत्रात पावसाचा 'पॉवर प्ले'

$
0
0
गेले दोन दिवस सातत्याने सुरू असलेल्या दमदार पावसामुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये सुमारे शंभर दशलक्ष घनफूट इतका पाणीसाठा वाढला आहे. धरणांच्या पाणलोटक्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे पाणीसाठ्याबाबत पुणेकरांच्या आशा उंचावल्या आहेत.

शहरात पावसाचा जोर कायम

$
0
0
वेळेपूर्वी आगमनानंतर काहीशी विश्रांती घेतलेल्या मान्सूनने शहरात जोरदार पुनरागमन केले. शनिवारी रात्रभरात ५८ मिलीमीटर जलधारा बरसल्या. तर रविवारी सायंकाळपर्यंत २७.५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. पुढील दोन दिवसांमध्येही हा जोर कायम राहणार आहे.

पिंपरी, लोणावळ्यात मुसळधार पाऊस

$
0
0
पिंपरी-चिंचवड आणि परिसरात मुसळधार पावसामुळे दोन दिवस जनजीवन विस्कळीत झाले. शहरातील नद्यांच्या पाण्याच्या पातळीतही रविवारी (१६ जून) मोठी वाढ झाली तर लोणावळ्यात ३६ तासात ४१५ मिलिमीटर पावसाची विक्रमी नोंद झाली आहे.

होलसेल विक्रेत्यांना 'एफडीए'चा इशारा

$
0
0
होलसेल औषध विक्रेत्यांकडील औषधसाठ्याची गुरुवारपासून तपासणी सुरू केल्याने सदाशिव पेठेतील ‘ औषध बाजारां’मध्ये चांगलीच घबराट निर्माण झाली आहे. तर, दुसरीकडे विक्रेत्यांनी खरेदी सुरू केली नाही; तर त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्याचा इशारा अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) दिला आहे.

सहाय्यक दिग्दर्शकांची फौज

$
0
0
एखाद्या सिनेमात सहा- सात कलाकार, तीन- चार संगीत दिग्दर्शक असू शकतात हे आपण समजू शकतं, परंतु सहाय्यक दिग्दर्शकांची संख्या नेहमी मर्यादितच असते. दिग्दर्शक प्रकाश झा यांचा आगामी सत्याग्रह हा सिनेमा याला अपवाद ठरावा.

वाराणसीची रामलीला मोठ्या पडद्यावर

$
0
0
वाराणसीच्या रामलीला सोहळ्याला पारंपरिक महत्त्व आहे. या सोहळ्याचं आकर्षण भल्याभल्यांना असताना सिनेमावाले दूर कसे राहातील? या सोहळ्यामध्ये शूटिंग करण्याची परवानगी अद्याप कुणाला देण्यात आली नव्हती.

हे जीवन सुंदर आहे!

$
0
0
हॉलिवुडच्या प्रसिद्ध आणि समर्थ अभिनेत्रींपैकी एक म्हणजे ड्र्यू बेरिमोअर. फिफ्टी फर्स्ट डेट्स, चार्लीज एंजेल्स, स्क्रीम अशा सिनेमांमधून तिनं स्वतःचं वेगळं स्थान आणि चाहतावर्गही निर्माण केला.

बडे कलाकार एकत्र

$
0
0
अभिनेते विक्रम गोखले, उषा जाधव आणि गायिका आरती अंकलीकर-टिकेकर हे राष्ट्रीय पुरस्कार विजेते कलाकार एका मराठी सिनेमात एकत्र येणार आहेत.

झिलमिल...’मध्ये सोनिया

$
0
0
सहारा वनवरील ‘झिलमिल सितारों का आंगन होगा’ मालिकेत सोनिया सिंगचा लवकरच प्रवेश होणार आहे. सौम्यची पहिली पत्नी अंगना उर्फ अंजीच्या भूमिकेत ती दिसणार आहे.

पुण्यात वाहतूक सुरू राहणार

$
0
0
रिक्षाचालकांच्या मागण्यांसाठी येत्या १९ ते २१ जूनला मुंबईतील रिक्षा बंद राहणार असल्या तरी, पुण्यातील रिक्षा वाहतूक सुरू राहणार असल्याचे रिक्षा संघटनांनी रविवारी स्पष्ट केले आहे.

हेल्पलाइनवर तक्रारींचा पाऊस!

$
0
0
पावसामुळे रस्त्यावर खड्डे पडले, सोसायटीत झाड पडले याबरोबरच पावसाचे पाणी सोसायटीत शिरल्यास तातडीने संबधित नागरिकांना मदत मिळावी, या हेतूने पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने सुरू केलेल्या विशेष हेल्पलाइनवर तक्रारींचा पाऊस पडत आहे.

पन्नास लाखांसाठी 'डबलगेम'

$
0
0
अॅडमिशनचे पैसे परत देण्याचा बहाणा करत चॉपर-पिस्तुलाच्या भीतीने ५० लाख रुपये लुटणाऱ्या संग्रामसिंह घाटगे आणि त्याच्या चौघा साथीदारांना गुन्हे शाखेने रविवारी ताब्यात घेतले. गुन्हे शाखेने कोल्हापूरात कारवाई करत तिघा आरोपींकडून लुटीतील ३० लाख रुपये जप्त केले आहेत.

मान्सून सुपरफास्ट

$
0
0
गेल्या वर्षीच्या अवर्षणाची भरपाई जूनमध्येच करण्याच्या इराद्याने जणू पाऊस राज्यात बरसत असून, रविवारी त्याने दमदार हजेरी लावली. पुण्यात शनिवारी रात्रभर तो कोसळत होता. गेल्या दीड दिवसात पुण्यात ७२.८ मिलिमीटर पाऊस झाला आहे.

राठोडच्या नावासाठी दबाव

$
0
0
शिंदेवाडी येथील दुर्घटनेला जबाबदार धरण्यात आलेल्या किसन राठोड याचे नाव सातबाराच्या उताऱ्यावर चढविण्यासाठी पोलिस खात्यातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ऑफिसला बोलावून दबाव टाकला, असा जबाब न्यायालयीन चौकशी समि‌तीसमोर तलाठी-अधिकारीवर्गाने नोंदवला.

माजी आमदार अप्पा गोगटेंचे निधन

$
0
0
सिंधुदूर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्याचे माजी आमदार जनार्दन मोरेश्वर तथा अप्पा गोगटे यांचे रविवारी पुण्यात निधन झाले. देवगड येथील राहत्या घरी त्यांना अपघात झाल्याने पुण्यातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते.

भिंत कोसळून चार ठार

$
0
0
जोरदार पावसाने जमीन खचल्यामुळे सोसायटीची संरक्षक भिंत कोसळून दांडेकर पुलाजवळ चार जण ठार झाले. मृतांमध्ये तीन महिला व एका पुरुषाचा समावेश आहे. रविवारी रात्री आठच्या सुमारास ही दुर्घटना घडली असून, रात्री उशिरापर्यंत ढिगारा दूर करण्याचे काम सुरू होते.

संगीतात रमलेली ‘सावनी’

$
0
0
संगीतकार यशवंत देव आणि रवी दाते यांच्याकडे गझलचं शिक्षण, पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्यासह गायिका म्हणून ‘भावसरगम’मध्ये सादरीकरण आणि ‘सारेगमप’च्या अंतिम फेरीपर्यंत पोहोचलेली गायिका म्हणजे पुण्याची सावनी रवींद्र.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images