Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

रस्त्यांवर पथारी टाकल्यास गुन्हा

$
0
0
एकदा कारवाई केल्यानंतरही वारंवार रस्त्यांवर अनधिकृत दुकाने थाटणाऱ्या पथारी व्यावसायिकांवर गुन्हा दाखल केला जाणार असल्याची माहिती अतिक्रमण विभागाचे प्रमुख उपायुक्त माधव जगताप यांनी दिली. शहरातील प्रमुख ४५ रस्त्यांवरील अनधिकृत पथारी व्यावसायिकांविरोधात हे गुन्हे दाखल करण्यात येणार आहे.

यंदाचा पाऊस जोरात!

$
0
0
पुणे, मुंबईसह राज्याच्या विविध भागांत पावसाने पुन्हा जोर धरलेला असतानाच हवामान खात्याने, संपूर्ण हंगामातच चांगला पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तवून दिलासा दिला आहे. दुसऱ्या टप्प्यातील अंदाजानुसार, हंगामात सरासरीच्या ९८ टक्के पाऊस होईल.

राजभवनात चोरांचा सुळसुळाट!

$
0
0
राष्ट्रपती, पंतप्रधानांसह राज्यपालांसारख्या अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या निवासाचे स्थान असलेल्या राजभवनात चोरांचा सुळसुळाट झाला असून, पोलिसपहारा केवळ नावापुरताच उरला आहे. देखरेख व सुरक्षाव्यवस्था वाढविण्याबाबत पोलिसांना स्मरणपत्रे देऊनही सुरक्षेचे तीनतेरा वाजत आहेत.

'चिंटू'कार प्रभाकर वाडेकर कालवश

$
0
0
अवघ्या महाराष्ट्राला आपल्या अवखळ विनोदाने हसवणा-या चिंटू या अस्सल मराठमोळ्या चित्रकथेचे लेखक प्रभाकर वाडेकर यांचे शनिवारी पुण्यात निधन झाले. ब्रेन हॅमरेजमुळे त्यांना पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण तेथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वैकुंठ स्मशानभूमीत संध्याकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

धरण परिसरात पावसाची हजेरी

$
0
0
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळे धरणांचा पाणीसाठा वधारण्यास मदत होणार आहे.

पराग इंगळेची प्रकृती ४ महिन्यांनीही नाजूकच

$
0
0
राष्ट्रीय छात्रसेनेच्या (एनसीसी) सरावादरम्यान गोळी लागलेल्या पराग इंगळे याच्या तब्येतीत चार महिने उलटले, तरी सुधारणा झालेली नाही.

औषध उपलब्धतेसाठी ५० कंपन्यांचा पुढाकार

$
0
0
‘औषधखरेदी बंद’चा फटका सर्वसामान्य जनतेला बसू नये, यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) पर्यायी व्यवस्था उभारण्याची तयारी केली असून, ५० कंपन्यांनी शहरात औषधे उपलब्ध करण्याची तयारी दाखविली आहे.

बेटिंगमध्ये हरल्याने केले अपहरणाचे नाटक

$
0
0
‘आयपीएल’च्या सामन्यावर लावलेल्या बेटिंगमध्ये सात लाख रुपये हरून कर्जबाजारी झाल्यामुळे पैसे मिळविण्यासाठी स्वतःच्याच अपहरणाचा बनाव रचणा-या इंजिनीअरला आणि सट्टेबाजाला पोलिसांनी अटक केली. नवनीत वर्मा (वय २५) असे अटक करण्यात आलेल्या इंजिनीअरचे नाव आहे.

चर्चची सीमाभिंत कोसळून मुलाचा मृत्यू

$
0
0
पिंपरीतील काळेवाडी भागात असलेल्या सेंट पॉल चर्चची सीमाभिंत अंगावर पडल्याने एका मुलाचा मृत्यू झाला. तर, तीनजण गंभीर जखमी झाले आहेत. घटनेनंतर संतप्त जमावाने चर्चची दुसरी सीमाभिंत पाडून टाकली.

न-हे येथील सरकारी जमीन माजी सरपंचाकडून हडप

$
0
0
न-हे ग्रामपंचायतीच्या मालकीची लाखो रुपये किंमत असलेली पाच गुंठे सरकारी जमीन गावच्या एका माजी सरपंचांनीच परस्पर आपल्या नावावर केल्याचा प्रकार आढळून आला आहे.

धरण परिसरात पावसाची हजेरी

$
0
0
शहराला पाणीपुरवठा करणा-या खडकवासला प्रकल्पातील चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळे धरणांचा पाणीसाठा वधारण्यास मदत होणार आहे.

पुण्यात जोरदार पाऊस

$
0
0
दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर मान्सून पुन्हा पुण्यात सक्रिय झाल्याचे शनिवार दुपारनंतर स्पष्ट झाले. विदर्भासह कोकणालाही मुसळधार पावसाने चांगलेच झोडपून काढले. पुढील ४८ तासांत कोकण, विदर्भ, मुंबईसह राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

राठोडवर आणखी एक गुन्हा

$
0
0
टाटा मोटर्सच्या सर्व्हिस सेंटरसाठी खासगी जागेत अतिक्रमण करून अठरा मीटर लांबीचा रस्ता हायवेला जोडून राष्ट्रीय महामार्गाच्या संपत्तीचे नुकसान केल्याप्रकरणी किसन राठोड याच्याविरोधात राजगड पोलीस ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सौर ऊर्जेवरील स्टोन क्रशर!

$
0
0
सौर ऊर्जेचा वापर केवळ घरगुती उपकरणांसाठीच करता येतो हा समज आता बदलू पाहत आहे. पुण्यातील व्हीएमआर इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीने सौर ऊर्जेचा वापर स्टोन क्रशरसाठी करण्याची अभिनव कल्पना प्रत्यक्षात आणली आहे.

बाणेरमधील नाला झाला मोकळा

$
0
0
घनकचरा आणि मातीचा भराव टाकून बंदिस्त केलेल्या बाणेर परिसरातील एका नाल्याचा प्रवाह महापालिकेच्या वतीने मोकळा करण्यात आला. या नाल्याने मोकळा श्वास घेतल्याने आसपासच्या परिसरातील संभाव्य पूरस्थितीचा धोका आता कमी झाला आहे.

विशेष मुलांची स्पेशल कामगिरी

$
0
0
तसे ते ‘स्पेशल’ विद्यार्थी. इतरांच्या दृष्टीने ‘स्पेशल चाइल्ड’ म्हणून, तर आपापल्या शाळांसाठी ते स्पेशल ठरले ते त्यांच्या अंगी असलेल्या काही ‘स्पेशल’ गुणांमुळे.

पारितोषिकांवर पुण्याचाच हक्क!

$
0
0
पुणे विभागीय मंडळाकडून दहावीच्या परीक्षेत विविध विषयांमध्ये प्रथम क्रमांकाची पारितोषिके पटकावलेल्या विद्यार्थ्यांची नावेही शनिवारी जाहीर करण्यात आली. यामध्येही पुण्यातील विद्यार्थ्यांनी आपली मोहोर उमटवली आहे.

काहीसा आनंद... काहीशी हुरहूर

$
0
0
दहावीची टक्केवारी आधीच समजली असली, तरी लाडक्या शाळेतून लाडक्या बाई-सरांकडून कौतुकाची थाप मिळविण्यासाठी चाललेली घाई...

आणखी तीन लाख ‘बोगस’ मतदार

$
0
0
गेल्या वर्षभरापासून जिल्हा प्रशासनातर्फे तीनवेळा ‘बोगस’ मतदार शोध मोहिम राबविण्यात आली. या तीन मोहिमांमध्ये जिल्ह्यातील तब्बल सव्वासात लाख मतदार वगळण्यात आले आहेत.

‘रुपी बँक कर्मचा-यांच्या रजेबाबत प्रस्ताव देणार’

$
0
0
रुपी को-ऑपेरटिव्ह बँकेच्या कर्मचाऱ्यांना बँक सोडून अन्य बँकेत जाताना रजेचे पैसे मिळावेत यासाठीचा प्रस्ताव लवकरच सहकार आयुक्तांकडे सादर केला जाईल, अशी माहिती बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी रविवारी दिली.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images