Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

वेधशाळेच्या आवारातून लाखाचा ऐवज चोरीस

$
0
0
पुणे वेधशाळेच्या आवारातील नवीन पंपहाऊसजवळून तांब्याची वायर, अॅल्युमिनियम आणि कॉपर वायर असा सुमारे एक लाखाचा ऐवज चोरीला गेल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. २५ मे ते चार जून दरम्यान ही घटना घडली.

ज्यु. इंजिनीअर पदासाठी नव्याने परीक्षा घ्या

$
0
0
परीक्षेच्या गुणांत करण्यात आलेल्या वाढीमुळे वादग्रस्त ठरलेली पालिकेतील सि‌व्हिल ज्युनिअर इंजिनीअरिंग या पदाची परीक्षा रद्द करून या पदांसाठी नव्याने फेरपरीक्षा घेण्याचे आदेश राज्य सरकारने महापालिकेला दिले आहेत. यामुळे नव्याने परीक्षा घेऊन या ३७ जागा भरल्या जाणार आहेत.

नियम उल्लंघन करणा-यांवर कारवाई का नाही?

$
0
0
कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असताना जे नागरिक प्रशासकीय नियमांचे उल्लंघन करून सार्वजनिक ठिकाणी कचरा फेकतात, ओल्या कचऱ्याचे वर्गीकरण करीत नाही त्यांना प्रशासन दंड का करीत नाहीत...

अपघात नव्हे; हलगर्जीपणाचे बळी

$
0
0
शिंदेवाडीमधील अनधिकृत डोंगरफोड व नैसर्गिक प्रवाहांना अडथळे निर्माण झाल्याची कल्पना 'राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणा'ने महसूल प्रशासनाला दिली होती.

राजकीय पक्षांवर इन्कम टॅक्सची नजर

$
0
0
देशातील राजकीय पक्ष माहिती अधिकाऱ्याच्या कक्षेत आल्यानंतर आता या पक्षांच्या मागे इन्कम टॅक्स विभागाचा ससेमिरा लागणार आहे.

महाराष्ट्रात महाबरसात पुण्यावरही कृपावृष्टी

$
0
0
कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात सक्रिय असलेला मान्सून शुक्रवारीही या भागात जोरदार बरसला. राज्यातील सर्वाधिक पावसाची नोंद मुंबई (सांताक्रूझ, ८९ मिलीमीटर) येथे व त्याखालोखाल महाबळेश्वर येथे ७२ मिमी पावसाची नोंद झाली. पुण्यातही पावसाने दमदार हजेरी लावल्याने पुणेकर सुखावले.

बदलीविरोधी कामगारांवर कारवाईचा बडगा

$
0
0
बदली झाल्यानंतर नव्या ठिकाणी रूजू न होता जुन्याच विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा महापालिका प्रशासनाने उगारला आहे. बदलीच्या ठिकाणी रूजू न होणाऱ्या कर्मचाऱ्यांना जून महिन्यापासूनचा पगार दिला जाऊ नये, असे परिपत्रकच प्रशासनाने काढले आहे.

संरक्षण देणा-या अधिका-याची चौकशी करा

$
0
0
शिंदेवाडी येथे किसन राठोड याने केलेल्या बेकायदा बांधकामाला ज्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी संरक्षण दिले, त्यांची महसूल विभागामार्फत चौकशी करण्याची मागणी शिवसेनेच्या आमदार निलम गोऱ्हे यांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे केली आहे.

पाणी योजनांच्या लोकवगर्णीची अट शिथिल करणार

$
0
0
दुर्गम भागातील पाणी योजनांसाठी आवश्यक दहा टक्के लोकवगर्णी भरली जात नसल्याने या योजना मंजूर करण्यात अडचणी येत असल्याची कबुली राज्याचे नवनिर्वाचित पाणीपुरवठा मंत्री दिलीप सोपल यांनी शुक्रवारी दिली.

चार तोळे वजनाचे गंठण हिसकावले

$
0
0
मॉर्निंग वॉकला बाहेर पडलेल्या महिलेच्या गळ्यातील चार तोळे वजनाचे सोन्याचे गंठण हिसकावल्याची घटना माळवाडी येथील साने गुरूजी हॉस्पिटलजव‍ळ शुक्रवारी पहाटे घडली. संगिता प्रदीप घोडके (वय ४०, रा. माळवाडी) यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

सेमी लक्झरींना जीपीएस एसटी महामंडळाचा निर्णय

$
0
0
एसटी बसेस अनाधिकृत ठिकाणी थांबतात का, नियोजित ठिकाणी त्या वेळेत जातात का, यावर नजर ठेवण्यासाठी एसटी महामंडळाने सेमी लक्झरी बसेसना जीपीएस यंत्रणा बसवण्याचे काम हाती घेतले आहे.

मार्केट यार्डातील अनधिकृत व्यापा-यांना नोटिसा

$
0
0
परवाना न घेता मार्केट यार्डमध्ये अनाधिकृतपणे व्यापार करणाऱ्या दहा जणांना कृषि उत्पन्न बाजार समितीने नोटिसा दिल्या आहेत. या व्यापाऱ्यांनी तात्काळ व्यवसाय बंद न केल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे कृषि उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक संजय खडके यांनी सांगितले.

राजभवनात झालाय चोरांचा सुळसुळाट!

$
0
0
राष्ट्रपती, पंतप्रधानांसह राज्यपालांसारख्या अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या निवासाचे स्थान असलेल्या राजभवनात चोरांचा सुळसुळाट झाला असून, पोलिसपहारा केवळ नावापुरताच उरला आहे. देखरेख व सुरक्षाव्यवस्था वाढविण्याबाबत पोलिसांना वेळोवेळी स्मरणपत्रे देऊनही सुरक्षेचे तीनतेरा वाजत आहेत.

कँटोन्मेंट बोर्डाचा पहिला मलशुद्धिकरण प्रकल्प मंजूर

$
0
0
पुणे कँटोन्मेंट बोर्डाकडून ९००, बुटी​ स्ट्रीट येथे बांधण्यात येणा-या पहिल्या मलशुद्धिकरण प्रकल्पाला बोर्डाच्या बैठकीत शुक्रवारी मान्यता देण्यात आली.

तुळशीबागेत 'फुल' कारवाई

$
0
0
मंडई-तुळशीबाग परिसरा‌त अनधिकृत स्टॉल उभारून अतिक्रमण करणा-या फुल व्यावसायिकांवर जोरदार कारवाई करून महापालिका प्रशासनाने फूल विक्रेत्यांचे अतिक्रमण शुक्रवारी काढून टाकले.

बार असो.च्या माजी अध्यक्षांवर खटला

$
0
0
शिवाजीनगर जिल्हा न्यायालयातील पुणे बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष अॅड. लक्ष्मण श्रवण घाडगे पाटील यांच्यावर एका तरुणाच्या खूनप्रकरणी आरोपनिश्चिती करण्यात आली. त्यांच्यावर खुनाचा कट रचणे, खून करणे आणि पुरावा नष्ट केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.

कोरेगाव पार्कातील हॉस्टेलला आग

$
0
0
कोरेगाव पार्क येथील आदिवासी विद्यार्थ्यांच्या शासकीय होस्टेलला शॉटसर्किटमुळे शुक्रवारी दुपारी आग लागली. या आगीत जीम तसेच स्टोअर रूममधील साहित्य जळून खाक झाले. कोरेगाव पार्क येथे शंभर विद्यार्थ्यांची क्षमता असलेले मुलांचे होस्टेल आहे.

रेल्वे आरक्षण करा आठ वाजेपर्यंत

$
0
0
सुटीच्या दिवशी रेल्वेच्या प्रवाशांना आरक्षण करता यावे, म्हणून मध्य रेल्वेने पुणे स्टेशनवर रात्री आठ वाजेपर्यंत आरक्षण सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या १६ जूनपासून ही सुविधा सुरू होईल.

राठोडच्या भावाला अटक व सुटका

$
0
0
शिंदेवाडी येथील टेकडीवर अनधिकृत बांधकाम करणाऱ्या 'सॅफ्रॉन डेव्हलपर्स'चा किसन राठोड याचा भाऊ पंडित धावजी राठोड याला राजगड पोलिसांनी शुक्रवारी सकाळी अटक केली. पंडित याची भोर येथील कोर्टाने सायंकाळी जामिनावर मुक्तता केली.

तंबाखू खाण्याचे बहाण्याने लुटले

$
0
0
पुणे- सातारा रोडवर लक्ष्मीनारायण थिएटरजवळ तंबाखू खाण्याच्या बहाण्याने एका नागरिकाला लुटण्याचा प्रकार बुधवारी सायंकाळी घडला. दरम्यान, त्या परिसरात ड्युटीवर असलेल्या पोलिसांनी तत्काळ एका आरोपीला अटक केली तर तिघे आरोपी पसार झाले असून त्यांचा शोध सुरू आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images