Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

आयोगाच्या अहवालाकडे लक्ष

$
0
0
जातीचा बनावट दाखला सादर केल्याच्या मुद्यावरून पिंपरी-चिंचवडचे नगरसेवकपद रद्द झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सीमा फुगे यांच्याविरोधात हायकोर्टाने दिलेल्या निकालाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे.

दि पूना मर्चंट्स चेंबरची निवडणूक २२ जून रोजी

$
0
0
दि पूना मर्चंट्स चेंबरच्या कार्यकारिणीची द्विवार्षिक निवडणूक येत्या २२ जून रोजी होणार आहे. या निवडणुकीसाठी सात माजी अध्यक्षांसह ४२ जणांनी अर्ज दाखल केले होते.

सरकारी योजनांच्या अंमलबजावणीत कोल्हापूर प्रथम

$
0
0
वेगवेगळ्या सरकारी योजनांच्या अंमलबजावणीत पुणे विभागात कोल्हापूर जिल्ह्याने पहिला क्रमांक पटकावला आहे. पुणे जिल्ह्याचा यामध्ये दुसरा क्रमांक लागला असून, सोलापूर जिल्हा परिषदेचा पाचवा क्रमांक आला आहे. तालुक्यांमध्ये सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्याने पहिला क्रमांक मिळविला आहे.

राठोडला पुन्हा नोटीस

$
0
0
शिंदेवाडी येथील डोंगर फोडून पावसाच्या पाण्याचे नैसर्गिक ओहोळ बंद केल्याप्रकरणी किसन राठोड याला भोर उपविभागीय अधिकारी संजय आसवले यांनी नोटीस बजावली आहे.

पुन्हा मुसळधार बरसणार

$
0
0
ओडिशाच्या किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने येत्या दोन ते तीन दिवसांत पुण्यासह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण, गोव्यात चांगला पाऊस होण्याचा अंदाज पुणे वेधशाळेतर्फे वर्तविण्यात आला आहे.

'आरटीओ'चे काम थंडावले

$
0
0
पक्के लायसन्स देणे...रिक्षाचे पासिंग....अशी अनेक कामे होण्यास सध्या आरटीओ कार्यालयात विलंब लागत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. आरटीओमध्ये असणाऱ्या १६ इन्स्पेक्टरची बदली झाली आहे.

महसूल यंत्रणा केवळ कागदीवाघ

$
0
0
पावसाच्या पाण्याच्या लोंढ्यात शिंदेवाडी येथे मायलेकींचा मृत्यू झाल्यानंतर महसूल यंत्रणेच्या कामावर बोट ठेवले जात असतानाच ही यंत्रणा म्हणजे केवळ कागदीवाघ असल्याचे स्पष्ट झाले आहे.

जुना वाडा पाडताना मजूर ठार

$
0
0
कसबा पेठेतील जुना वाड्याचे बांधकाम पाडत असताना वाड्याशेजारील पिंपळाचे झाड कोसळून झालेल्या दुर्घटनेत एका मजुराचा मृत्यू झाला, तर एक मजूर गंभीर जखमी झाला. २४०, कसबा पेठ येथील डेरे वाड्यात ही घटना घडली.

‘एमबीए’ची मागणी आणखी घसरली

$
0
0
गेल्या चार-पाच वर्षांपर्यंत प्रतिष्ठेचा विषय बनलेल्या एमबीए अभ्यासक्रमाची ‘डिमांड’ यंदा चांगलीच घसरली असून, ‘एमबीए’च्या जागा विक्रमी संख्येने रिक्त राहतील, अशी स्थिती आहे. ‘एमबीए’साठी अर्ज करण्याची मुदत बुधवारी संपली. राज्यातील एकूण ४५ हजार जागांसाठी केवळ २० हजार अर्ज आले आहेत.

'डीपी' नव्हे 'एपी' प्लॅन- तावडे

$
0
0
शहराचा विकास आराखडा (डीपी) नसून, अजित पवार (एप‌ी) प्लॅन आहे. मोठ्या पवारांचा 'आयपीएल' तर छोट्या पवारांचा 'डीपीएल' (डेव्हलपमेंट प्रीमिअर लीग) चा उद्योग सुरू आहे. अशा कडक शब्दात विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गुरुवारी टीकास्त्र सोडले.

रिक्षा चालकांसाठी आयुर्विमा संरक्षण

$
0
0
महाराष्ट्र नवनिर्माण सेना, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आणि वाहतूक सेना यांच्या वतीने पिंपरी-चिंचवडमधील रिक्षा चालकांसाठी आयुर्विमा संरक्षण योजना सुरू करण्यात आल्याची माहिती विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी शुक्रवारी (१४ जून) पत्रकार परिषदेत दिली.

रेडझोन रद्द करावा

$
0
0
रेडझोनमधील बांधकामांवर कारवाई झाल्यास लोकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार आहे. घरांवर कारवाईची टांगती तलवार कायम राहणार आहे, त्यामुळे देहूरोड येथील अन्यत्र हलवून रेडझोनच रद्द करावा, अशी मागणी देहूरोड रेड झोन संघर्ष समितीने केली आहे.

मैत्रिणीसह आईवर मैत्रिणीचा खूनी हल्ला

$
0
0
मैत्रिणीसह तिच्या आईवर मैत्रिणीने हल्ला केल्याची घटना पिंपरीच्या अजमेरा कॉलनीमध्ये गुरुवारी संध्याकाळी घडली. यामध्ये हल्ला करणारीसह आणि अन्य दोघी जखमी झाल्या आहेत. लिलम्मा सॅम्युअल (वय ५५ ), स्टेफी ( २०, दोघी रा. अजमेरा) अशी जखमींची नावे आहेत.

नापास होण्याच्या भयानेच आत्महत्या

$
0
0
दहावीच्या परीक्षेत नापास होण्याच्या भीतीने निकालापूर्वी चऱ्होलीमधील एका विद्यार्थ्याने गळफास लावून आत्महत्या केल्याचे तब्बल सात दिवसांनी उघड झाले आहे. गुरुवारी (१३ जून) सकाळी सात वाजण्याच्या सुमारास त्याचा मृतदेह आढळून आला. मात्र, निकाल लागला तेव्हा त्याला ४५ टक्के मिळाले.

अडीच महिन्यांत ७९ हजार नागरिकांनी भरला आगाऊ कर

$
0
0
मिळकत कराचा आगाऊ भरणा वाढविण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे यंदा फ्लेक्स आणि १४ लाख एसएमएसव्दारे आवाहन केले जाणार आहे. दरम्यान, गेल्या अडीच महिन्यांत ७९ हजार ४४८ नागरिकांनी आगाऊ कर भरणा केला आहे.

पाइप फुटल्यामुळे सीएनजी गॅस गळती

$
0
0
रस्त्याच्या रुंदीकरणासाठी खोदकाम करताना जेसीबीचा धक्का लागून महाराष्ट्र नॅचरल गॅसच्या अंडरग्राउंड सीएनजी पाइपलाइनचा व्हॉल्व तुटून गॅसगळती झाली. शुक्रवारी (१४ जून) संध्याकाळी साडेचारच्या सुमारास चिंचवडच्या संघवी केसरी कॉलेजजवळ ही घटना घडली.

नटसम्राट नाटकाचे होणार ३ तासांत ५ प्रयोग

$
0
0
'जगावं की मरावं' अशी व्यथा मांडणारा 'नटसम्राट' आता गिनेस बुकात स्थान मिळवण्यासाठी कंबर कसतो आहे. सलग पाच प्रयोग करून लिम्का बुकात नाव नोंदल्यानंतर आता पुण्याची तीर्थराज प्रॉडक्शन ही संस्था 'नटसम्राट' या नाटकाचे २७ आणि २८ ऑगस्टला बालगंधर्व रंगदमंदिर येथे तीस तासांत सात प्रयोग करणार आहे.

गणेशोत्सव मंडळांचे जलसंधारण मॉडेल

$
0
0
राज्यभरातील भीषण दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील साईनाथ मंडळ, तुळशीबाग मंडळ, सेवा मित्र मंडळ आणि नवा विष्णू चौक नवरात्र उत्सव या चार गणेशोत्सव मंडळांनी मिळून राजुरी परिसरात अल्प खर्चात जलसंधारणाचा प्रकल्प यशस्वीपणे राबविला आहे.

बायफोकल अभ्यासक्रम अनुदानित करण्याची मागणी

$
0
0
बायफोकल अभ्यासक्रमांमुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक वाटचाल उत्तम होत असली, तरी या अभ्यासक्रमांना कोणतेही अनुदान मिळत नाही.

कँटोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतही एलबीटी

$
0
0
पुणे महापालिकेकडून जकातीपोटी पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाला निधी मिळणे बंद झाल्यानंतर बोर्डानेही कँटोन्मेंटच्या हद्दीत स्थानिक संस्था कर (एलबीटी) लागू करण्याचे ठरविले आहे. याबाबतचा फेरआराखडा बोर्डाकडून केंद्र सरकारकडे पाठवण्यात येणार आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live


Latest Images