Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

चिंचवडमध्ये पोपटाच्या पिलांची सुटका

0
0
नागरिक आणि पक्षिमित्रांच्या जागरूकतेमुळे चिंचवडगावात विक्रीसाठी आणलेल्या पोपटांच्या सुमारे २० पिलांची रविवारी सुटका करण्यात आली. कात्रज येथील प्राणीसंग्रहालयात त्या पिलांना दाखल करण्यात आले आहे.

सदस्यांचा आवेश अन् विद्यार्थ्यांना गणवेश

0
0
पिंपरी-चिंचवड महापालिका शिक्षण मंडळाकडून विद्यार्थ्यांसाठी खरेदी करावयाच्या गणवेशांसाठी सुमारे दोन कोटी रुपये खर्चाच्या ऐनवेळच्या प्रस्तावास स्थायी समितीच्या बैठकीत बुधवारी मंजुरी देण्यात आली.

चित्रपट शताब्दी सोहळ्यात 'स्टारडम'

0
0
'अटेन्शन....' म्हणत आपल्या खास शैलीत 'आप सब आबा बागुल के साथ ही रहो...' अशी ज्येष्ठ अभिनेते असरानी यांची टिप्पणी..., 'मैं शायर तो नहीं....' म्हणत शैलेंदसिंग यांनी घातलेली साद अन् तारे-तारकांच्या मांदियाळीत रंगलेली सांज... अशा रुपेरी पडद्यावरील 'स्टार' झळाळीने चित्रपट शताब्दी महोत्सवाचा आरंभ झाला.

अखेर 'हापूस'चा भाव उतरला

0
0
ऐन सीझनमध्ये रुसलेल्या 'कोकणचा राजा'ची पुण्यातील आवक आता वाढली आहे. त्याचा भाव काहीसा कमी झाला आहे. रविवारी चार ते सहा डझनाच्या पेटीचा भाव दोन हजार रुपयांपर्यंत होता. जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत आंब्याची चव चाखता येणार आहे.

कारच्या धडकेने वॉचमनचा मृत्यू

0
0
हिंजवडी येथील स्वराज्य पेट्रोल पंपासमोर एका वॉचमनला कारने चिरडल्याने तो ठार झाला. या प्रकरणी कारचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माननीयांच्या 'सौजन्याची' ऐशीतैशी

0
0
वॉर्डस्तरीय निधीतून उभारलेले बस स्टॉप, बाकडी आणि फलकांवर नगरसेवकांच्या नावांच्या पाट्या लावण्याबाबत स्पष्ट नियम नसल्याचे आढळून आले आहे. महापालिकेच्या विधी विभागाने नुकतीच ही बाब स्पष्ट केली आहे.

माजी पो.अधिकारी आंधळकर यांना अटक

0
0
पोलिस खात्यात असताना आणि नसतानाही वादग्रस्त ठरलेले माजी अधिकारी भाऊसाहेब आंधळकर यांना लाचलुतपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी सांयकाळी अटक केली. आंधळकर यांच्याकडे १ कोटी ५६ लाख रुपयांची बेहिशेबी मालमत्ता सापडल्याने ही कारवाई करण्यात आली.

पतंगरावांना राष्ट्रवादीची ऑफर

0
0
मुख्यमंत्रीपदाच्या रांगेत बराच काळ 'वेटिंग'वर असलेले काँग्रेसचे वनमंत्री पतंगराव कदम यांची अस्वस्थता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी अचूक हेरली आणि पतंगरावांची अस्वस्थता जरूर दूर करू, असे सांगत त्यांना राष्ट्रवादीत येण्याचे खुले आमंत्रण दिले.

राज्यातील धरणांत २३ टक्केच पाणी

0
0
उन्हाचा चटका वाढल्याने धरणांतील पाणी आणखी खोल गेले असून, राज्यातील प्रमुख धरणांत केवळ २३ टक्के पाणीसाठा उरला आहे.

थेट शेतक-यांकडून धान्य खरेदी

0
0
उत्तम प्रतीचा भेसळमुक्त शेतीमाल खरेदी करण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे. त्यासोबतच गावरान चवीचे पिठले व खर्डा भाकरी, मासवडी, उसळी, वांग्याचे भरीत आणि आमरस असे लज्जतदार पदार्थही चाखता येणार आहे.

दिवेआगरमध्ये आता चांदीचा गणपती?

0
0
दिवेआगर येथील सुवर्णगणेशाची मूर्ती चोरट्यांनी विघटित केल्याने पुण्यातील जितेंद्र घोडके सराफ यांच्यातर्फे त्याच वजनाची सोन्याचा वर्ख चढविण्यात आलेली चांदीची मूर्ती देवस्थानला दिली जाणार आहे. ही मूर्ती मंदिराच्या गाभाऱ्यात स्थापन केली जाणार का, याबाबतचा निर्णय ग्रामस्थांकडून घेतला जाईल.

सामाजिक सुरक्षा पोहोचणार कधी

0
0
कामगार संघटित असो वा असंघटित आतापर्यंत मालक आणि ठेकेदारांकडून तो भरडला गेला आहे. आगामी काळात कामगार म्हणून प्रतिमा टिकविण्यासाठी असंघटितांना मोठ्या प्रमाणावर एकत्र येण्याची गरज निर्माण झाली आहे.

कोट्यवधी रुपयांची फसवणूक

0
0
भिशीद्वारे जादा परताव्याचे आमिष दाखवत ५० ते ६० व्यक्तींना कोट्यवधी रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार म्हाळुंगे गावात उघडकीस आला आहे. या प्रकरणी निखिल प्रमोद घाटकर (वय २९, रा. म्हाळुंगे गाव) याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नवजात अर्भक सापडले; मातेविरुद्ध गुन्हा

0
0
भारती विद्यापीठ हॉस्पिटलच्या कॅज्युअॅलिटी वॉर्डालगत असलेल्या ड्रेनेजलाइनजवळ नवजात अर्भकाला सोडून गेलेल्या मातेविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. भारती हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी या अर्भकावर तातडीने उपचार केल्याने ते बचावले असल्याचे पोलिसांनी सांगितले.

४२ गावे बंडाच्या पवित्र्यात

0
0
'राज्याच्या स्थापनेला ५२ वर्षे झाली, तरी आम्हाला साधे पाणी मिळत नाही. रस्ते, वीज, आरोग्य, शिक्षण या दर्जेदार सुविधा तर दूरच. मग आम्हाला आता नाईलाजाने महाराष्ट्राशी काडीमोड घ्यावा लागेल आणि कर्नाटकात जाणे भाग पडेल,' असा बंडाचा इशारा सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते महादेव अंकलकी यांनी दिला.

काळ्या काचा असणा-या गाड्यांविरोधात कारवाई

0
0
काळ्या काचा असणा-या गाड्यांच्या विरोधात कारवाई करण्याची मोहीम वाहतूक पोलिस हाती घेणार आहेत. येत्या आठवड्यात त्याची सुरवात होणार आहे, अशी माहिती वाहतूक पोलिस उपायुक्त विश्वास पांढरे यांनी दिली.

राहुलमुळे 'त्यांना' दुष्काळ कळला!

0
0
दुष्काळाच्या प्रश्नावर राज्यपाल के. शंकरनारायण यांना केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी पुन्हा लक्ष्य केले.

शब्दांच्या फडातही पाटील..

0
0
'मराठी साहित्यावर पुणे, मुंबईतल्या बामणांचे वर्चस्व होते, आणि पाटील म्हणजे उसाचा नाहीतर तमाशाचा फड असेच चित्र मराठी साहित्य-चित्रपटातून मांडले जात होते. अशी टिपण्णी विश्वास पाटील यांनी केली.

अतिक्रमण कारवाई न थांबविल्यास आंदोलन

0
0
'पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाकडून राबविण्यात येत असलेली अतिक्रमण हटाव मोहीम त्वरीत थांबवावी, जुन्या बांधकामांवर कारवाई करण्याऐवजी नवीन बांधकामे रोखावीत,' अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आझम पानसरे यांनी केली असून, ही मोहीम अशीच सुरू राहिली, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून तीव्र आंदोलन करण्यात येईल,' असा इशाराही त्यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिला.

राज्यातील धरणांत २३ टक्के पाणी

0
0
उन्हाचा चटका वाढल्याने धरणांतील पाणी आणखी खोल गेले असून, राज्यातील प्रमुख धरणांत केवळ २३ टक्के पाणीसाठा उरला आहे. आणखी दीड महिना पावसाची प्रतीक्षा करावी लागणार असल्याने धरणांतील पाण्यासाठ्याचा वापर अधिक काटेकोरपणे करावा लागणार आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images