Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

औषधांशिवाय आम्ही जगायचे कसे ?

$
0
0
'पावसाळ्यात आजार सुरू होतात. त्यात आधीच डायबेटिस आणि बीपी. एकाही दुकानात औषधे मिळत नाहीत. औषधांशिवाय जगायचे कसे,' अशा शब्दांत संतापलेले पेशंट औषध विक्रेत्यांना सवाल करू लागले आहेत.

२९४एकर सरकारी जमिनीवर डल्ला

$
0
0
लोणावळ्यातील निसर्गरम्य नांदगावमधील २९४ एकर सरकारी जमीन एका बिल्डरने गिळंकृत केल्याचे स्पष्ट झाले आहे. जमिनीची कायदेशीर मालकी नसताना 'वळवण व्हॅली' हा प्रोजेक्ट उभारून या बिल्डरने गुंतवणूकदारांची दिशाभूल करीत कोट्यवधी रुपयांची कमाईही केली.

नॉन-क्रिमी लेअरबाबत संभ्रम

$
0
0
राखीव प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे उत्पन्न वार्षिक साडेचार लाख रुपये ते सहा लाख रुपयांदरम्यान आहे, त्यांना नॉन-क्रिमी लेअर प्रमाणपत्र मिळणार की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नॉन-क्रीमी लेअरसाठी उत्पन्नाची मर्यादा वाढविल्याचे केंद्र सरकारचे निर्देश आहेत, असे सांगण्यात येत असले, तरी प्रत्यक्षात त्याविषयी लेखी खुलासा नसल्याने संदिग्धता आहे.

पावसाळ्यात घ्या आरोग्याची काळजी

$
0
0
पावसाळ्यात हिवताप, डेंगी, चिकनगुनियासारखे रोग पसरू नयेत, यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाने नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

'पीएमपी' बस बंदच; पुणेकरांचे हाल

$
0
0
थकीत देणी फेडण्यात पीएमपी प्रशासनाला अपयशच आल्याने सलग दुसऱ्या दिवशी पीएमपीच्या ताफ्यातील ठेकेदारांनी अडीचशेहून अधिक बसेस बंद ठेवल्या.

डॉ.अवचट यांना राष्ट्रीय पुरस्कार

$
0
0
व्यसनमुक्ती क्षेत्रातील योगदानाबद्दल केंद्र सरकारच्या 'सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालया'तर्फे देण्यात येणारा राष्ट्रीय पुरस्कार ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि साहित्यिक डॉ. अनिल अवचट यांना जाहीर झाला आहे.

टेकडी फोडणा-या राठोडला अटक

$
0
0
शिंदेवाडी येथील टेकडीवर अनधिकृत बांधकाम करणाऱ्या 'सॅफ्रॉन डेव्हलपर्स'च्या किसन राठोड याला पोलिसांनी अटक केली. राठोड विरोधात राजगड पोलिस ठाण्यात मंगळवारी रात्री अकराच्या सुमारास गुन्हा दाखल झाला होता.

पंढरीची वारी गॅस, रॉकेलविना

$
0
0
संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांसाठी रॉकेलचा जादा कोटा मंजूर करता येणार नाही, असा पवित्रा राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे पालख्यांच्या काळात वारकऱ्यांना रॉकेलचा पुरवठा कसा करावा, असे प्रश्नचिन्ह जिल्हा प्रशासनापुढे उभे राहिले आहे.

'घरकुल' प्रकरणी फौजदारीचा इशारा

$
0
0
घरकुल योजनेचा दुसरा टप्पा होणार नाही, असे महापालिकेने जाहीर केल्याच्या विरोधात कष्टकरी कामगार पंचायतीने पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात गुरुवारी (१३ जून) सकाळी आंदोलन केले.

उंटांना हटविण्याची मागणी

$
0
0
पुण्यात होणारे उंटाचे बेकायदा वास्तव्य नागरिकांच्या आरोग्यास धोकादायक ठरणारे आहे, त्यामुळे शहराच्या विविध भागांमध्ये असणाऱ्या सुमारे २५० उंटांवर महापालिका आणि पोलिसांनी तत्काळ बंदी घालण्याची मागणी सर्व जीव मंगल प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. कल्याण गंगवाल यांनी केली आहे.

फर्ग्युसोनियन्सच्या अध्यक्षपदी मेहेंदळे

$
0
0
फर्ग्युसन कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांची संघटना असलेल्या 'द फर्ग्युसोनियन्स'च्या अध्यक्षपदी वाय. डी तथा यशवंतराव मेहंदळे यांची तर चेअरमनपदी अॅड. विजय सावंत यांची बिनविरोध निवड झाली.

अपघातात महिलेचा मृत्यू

$
0
0
पुणे- मुंबई मार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू झाला. हा अपघात मंगळवारी (११ जुन) रात्री झाला. झेबा तसनिम सय्यद (वय २९, रा. भवानी पेठ, पुणे) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

रेल्वेचे पाच मानवरहित फाटके कायमस्वरुपी बंद

$
0
0
रेल्वेने दौंड ते बारामती दरम्यान असणारी चार आणि मिरज- कोल्हापूर मार्गावरील एक मानवरहित फाटक कायमस्वरुपी बंद केले आहे. २०१५ पर्यंत पुणे विभागातील २८ मानवरहित फाटके बंद करणार असल्याचे मध्य रेल्वेकडून जाहीर करण्यात आले आहे.

महापालिकेचे खबरदारीचे आवाहन

$
0
0
पावसाळ्यात हिवताप, डेंगी, चिकनगुनियासारखे रोग पसरू नयेत, यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाने नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

कारण तुमचं आणि 'मटा'चं घरचं नातं आहे!

$
0
0
पुण्यात घर घेणे किती महाग झाले आहे, आता तर शक्यच नाही, स्वप्नही बघायला नको...अशी चर्चा आपण नेहमीच ऐकतो. 'खरंच पुण्यात घर मिळविण एवढं अवघड झालं आहे का,' असा प्रश्न तुम्ही 'महाराष्ट्र टाइम्स'च्या वाचकांना विचारलात तर ते मात्र त्याचे उत्तर 'घर मिळविण अगदी सोप्प झालं आहे,' असंच देतील.

शेताच्या बांधावर खत उपलब्ध

$
0
0
पावसाला समाधानकारक सुरुवात झाल्याने जिल्ह्यात खरिपाच्या पेरण्यांची तयारी उत्साहाने सुरू झाली आहे. दरम्यान, खरिपासाठी उपलब्ध झालेल्या खतांपैकी ८० टक्के रासायनिक खते शेतकऱ्यांना बांधावरच उपलब्ध करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

शेती महामंडळाच्या जमीनवाटपास मुदतवाढ

$
0
0
राज्यातील खंडकरी शेतकऱ्यांना शेती महामंडळाच्या जमिनींचे वाटप करण्यासाठी येत्या स्वातंत्र्यदिनापर्यंत मुदत देण्यात आली आहे. पंधरा ऑगस्टपर्यंत वाटपाचे काम पूर्ण करण्याचे आदेश महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी गुरुवारी दिले.

विक्रेत्यांकडील औषधसाठा तपासण्याचे आदेश

$
0
0
होलसेल औषध विक्रेत्यांनी खरेदी बंद केल्याने काही औषधांचा तुटवडा निर्माण होऊ लागला. त्यामुळेच अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) औषध निरीक्षकांना विक्रेत्यांकडील साठ्याच्या तपासणीचे आदेश दिले आहेत.

राज्यातील २० सोनोग्राफी केंद्रांना नोटिसा

$
0
0
राज्यातील पुणे जिल्हा, पिंपरी- चिंचवडसह २० सोनोग्राफी केंद्रामध्ये तपासणीदरम्यान त्रुटी आढळल्याने त्यांना आरोग्य विभागाने नोटिसा जारी केल्या आहेत. त्रुटी दूर न झाल्यास त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.

जिल्ह्यात सरासरीच्या ६३ टक्के पाऊस

$
0
0
मान्सूनचे आगमन राज्याच्या विविध भागांमध्ये झाले असून, पुणे जिल्ह्यातही पावसाला सुरुवात झाली आहे. दरम्यान, जिल्ह्याच्या पूर्वभागात पुरंदरसह बारामती आणि दौंड या तालुक्यांमध्ये आतापर्यंतच्या सरासरीच्या तुलनेत शंभर टक्क्यांहून अधिक पाऊस झाला आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images