Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

शहराच्या काही भागात 'मीटर डाउन'

$
0
0
पिंपरी-चिंचवडमध्ये काही भागात रिक्षाला मीटर पद्धत सुरू करण्याबाबत चर्चा सुरू असून, त्याची अंमलबजावणी होईल, अशी अपेक्षा असल्याचे महाराष्ट्र रिक्षा पंचायतीचे अध्यक्ष बाबा कांबळे यांनी सांगितले.

लोणावळ्यात सराफी दुकानात ९ लाखांची चोरी

$
0
0
लोणावळ्यातील मयूर गोल्ड या सोन्याच्या दुकानात चोरी झाली असून, चोरट्यांनी नऊ लाखांच्या सोन्याचांदीच्या वस्तू घेऊन पळ काढला आहे. ही घटना मंगळवारी रात्री घडली आहे.

झाड तुम्ही लावले, मग उचलायचे पैसेही द्या!

$
0
0
झाड रस्त्यावर पडले असले, तरी ते सोसायटीच्या हद्दीत लावले होते. त्यामुळे ते उचलायचे असेल, तर पैसे द्यावे लागतील. अन्यथा तुम्ही झाड लावले ना मग तुम्हीच ते उचला… अशी उत्तरे उद्यान विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांना ऐकायला मिळत आहेत.

गवळी धडधडीत खोटे बोलले

$
0
0
वृक्षारोपण केलेली झाडे तोडली असा आरोप करणारे माजी नगरसेवक पंडीत गवळी धडधडीत खोटं बोलल्याचा दावा महापालिकेचे आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी केला आहे.

टेकडी फोडणा-या राठोडवर अखेर गुन्हा दाखल

$
0
0
शिंदेवाडी येथील टेकडीवर अनधिकृत बांधकाम करणाऱ्या 'सॅफ्रॉन डेव्हलपर्स'चा किसन राठोड याच्यावर राजगड पोलिस ठाण्यात मंगळवारी रात्री अकराच्या सुमारास गुन्हा दाखल झाला. राठोड याचा शोध घेण्यात येत असून, राजगड पोलिस ठाण्याची दोन पथके त्याच्या मागावर आहेत.

सोनसाखळी चोरीचे शहरात दोन गुन्हे

$
0
0
पुणे-आळंदी रोडवर वडमुखवाडी येथे साई मंदिराजवळ उभ्या असलेल्या महिलेच्या गळ्यातील दीड लाख रुपयांचे दागिने हिसकावण्यात आल्याचा प्रकार मंगळवारी सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास घडला.

अनधिकृत 'अंडर कन्स्ट्रक्शन'

$
0
0
जिल्ह्यातील अनधिकृत बांधकामांच्या विरोधात जिल्हा प्रशासनाने हातोडा उगारला असून पावसाळ्याच्या काळात प्राधान्याने सुरू असलेल्या बांधकामांवर (अंडर कन्स्ट्रक्शन) प्राधान्याने कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी विकास देशमुख यांनी दिले आहेत.

'डेक्स्ट्रो प्रोपॅक्सिफीन' औषधाच्या उत्पादनावर बंदी

$
0
0
हाडांची दुखणे, कंबर, मान; तसेच पाठदुखीवर वेदनाक्षामक (पेन किलर) म्हणून सर्रास वापरण्यात येणारे 'डेक्स्ट्रो प्रोपॅक्सिफीन' या औषधाच्या उत्पादनासह विक्रीवर केंद्र सरकारने बंदी घातली आहे.

पुरेशी औषधे देण्याची हॉस्पिटलची तयारी

$
0
0
औषध खरेदी बंद आंदोलनामुळे शहरात नजीकच्या काळात मोठ्या प्रमाणात औषधांचा तुटवडा झाल्यास हॉस्पिटलशी संलग्नित औषध विक्रेत्यांसह साखळी दुकानांतून(चेन शॉपी) औषधे उपलब्ध करून देण्याची तयारी दाखविण्यात आली आहे.

हिंजवडीत सापडले ब्रिटिशकालीन बॉम्ब

$
0
0
हिंजवडीच्या फेज टू मध्ये बांधकाम करण्यासाठी सुरू असलेल्या खोदकामाच्या वेळी ब्रिटिशकालीन बॉम्ब सापडले आहेत. सदर बॉम्ब लष्कराकडे सोपविण्यात येणार असल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली आहे.

झाड पडले... पालिकेला एसएमएस करा

$
0
0
पावसामुळे रस्त्यांवर पडलेली झाडे, कचऱ्याने भरलेले कंटेनर यासह शहरात होणारी अनधिकृत बांधकामे याबाबत नागरिकांना येत असलेल्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी पुणे महापालिकेने पावले उचलली आहेत.

पुण्याचीही होणार 'शिंदेवाडी'

$
0
0
नाल्यांवरील बांधकामे, नाल्यांवरील अतिक्रमणे काढून नालेसफाईची मोहीम हाती घेणाऱ्या पुणे महापालिकेनेच बांधकाम परवानगी देताना नाला अलाइनमेंटमध्ये बदल केले असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बुधवारी केला.

मानवनिर्मिती 'प्रलया'चे २ वर्षांपूर्वीच 'भाकीत'

$
0
0
कात्रज घाटाजवळील शिंदेवाडीच्या बोगद्याजवळील डोंगरावर अनाधिकृत उत्खनन सुरू आहे. डोंगरावरील अनाधिकृत कामामुळे पावसाळ्यात रस्त्यावर पाणी घुसू शकते, मोठी दरड कोसळल्यास बोगद्याला धोका निर्माण होऊ शकतो.

स्कूलबसच्या फेरीला कराराअभावी 'ब्रेक'?

$
0
0
शालेय विद्यार्थ्यांच्या बस वाहतुकीसंदर्भात करार करण्यास शाळांनी नकार दिल्याने स्कूलबस चालक अडचणीत आले आहेत. या कराराशिवाय स्कूलबस चालकांच्या परवान्याचे नूतनीकरण होऊ शकत नाही. परिणामी, येत्या सोमवारपासून विद्यार्थ्यांना स्वतःच्या वाहनाने किंवा पायीच शाळा गाठावी लागण्याची भीती निर्माण झाली आहे.

राठोड यांच्या अनधिकृत बांधकामावर बुलडोझर

$
0
0
सातारा रोडवर वनीकरण झोन आणि हायवेच्या संपादित जमिनीत उभारलेल्या किसन राठोड यांच्या अनधिकृत बांधकामावर जिल्हा प्रशासनाने बुधवारी बुलडोझर चालविला. गेल्या आठवड्यात या परिसरात अचानक आलेल्या पूरस्थितीमुळे (फ्लॅश फ्लड) मायलेकींचा बळी गेला होता.

सारस मोरे यांचा अपघातात मृत्यू

$
0
0
हवेली युवक काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष सारस राजाराम मोरे (वय ३७) यांचा शिवणे येथील शिंदे पुलाजवळ झालेल्या अपघातात मंगळवारी रात्री मृत्यू झाला. या प्रकरणी भगवान दत्तात्रय मोरे (वय ५१, रा. कोपरे गाव) यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

दमलेल्या पावसाची अल्पशी विश्रांती

$
0
0
मान्सूनच्या आगमनानंतर जवळपास आठवडाभर राज्यभर दमदार कोसळून दमलेल्या पावसाने बुधवारी अल्पशी विश्रांती घेतली. दुपारच्या सुमारास पडलेल्या काही हलक्या सरी वगळता बुधवारी पुण्यात पाऊस पडला नाही.

चौघांना ५० लाखांना लुटले

$
0
0
अॅडमिशनचे पैसे परत घेण्यासाठी आलेल्या चौघांना लुटून ५० लाख रुपयांची रोकड लांबविण्याचा प्रकार बुधवारी दुपारी कोरेगाव पार्क येथील लेन नंबर सातमध्ये घडला. या प्रकरणी गुन्हे शाखा आणि कोरेगाव पार्क पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

स्वस्त घरकुल योजना गुंडाळली

$
0
0
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या स्वस्त घरकुल योजनेचा दुसरा टप्पा न राबविण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाच्या वतीने घेण्यात आला आहे. त्यामुळे सुमारे साडेपाच हजार लाभार्थ्यांची फसवणूक होणार असून, त्यांच्या घरांच्या स्वप्नाचा भंग होणार आहे.

१२७ कंपन्यांवर फौजदारी कारवाई

$
0
0
कामगार आयुक्तालयाने गेल्या वर्षभरात पुण्यात २५० छापे घालून १३५ बालकामगारांना मुक्त केले आहे. या छाप्यांमध्ये ५२८५ कंपन्यांची तपासणी करण्यात आली व त्यातील १२७ कंपन्यांवर फौजदारी कारवाई करण्यात आली, अशी माहिती कामगार उपायुक्त रत्नदीप हेंद्रे यांनी बुधवारी दिली.
Viewing all 75772 articles
Browse latest View live


Latest Images