Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

शेलारांचा खुलासा त्रिसदस्यीय समितीकडे

$
0
0
पालिकेचा लाखो रुपयांचा प्रॉपर्टी टॅक्स बुडवून पालिकेला प्रॉपर्टीची खोटी माहिती सादर करणारे पालिकेचे उपायुक्त आणि अतिक्रमण विभागप्रमुख रमेश शेलार यांनी आपला खुलासा आयुक्त महेश पाठक यांच्याकडे सादर केला आहे.

निधी असूनही विकासेकामे नाहीत

$
0
0
पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाकडे निधी असूनही गेल्या वर्षभरात नवीन रस्ता आणि ड्रेनेजलाइन टाकण्यासाठी एक पैसाही खर्च करण्यात आला नाही. उलट अस्तित्त्वात असलेले जुने रस्ते आणि पाइपलाइन यांना मुलामा लावण्यावर भर देण्यात आला आहे.

खडकवासला चौपाटीला वालीच नाही

$
0
0
खडकवासाला चौपाटीची स्वप्न रंगविणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांनीच या चौपाटीकडे पाठ फिरवल्याने पावसाळ्यातील पहिल्याच रविवारी पर्यटनाची कोंडी अनुभवायला मिळाली.

APL रेशनकार्डवर तांदूळ उपलब्ध

$
0
0
गेल्या तीन महिन्यांपासून शहर व जिल्ह्यातील दारिद्र्यरेषेवरील (एपीएल) रेशनकार्ड धारकांना बंद झालेला तांदूळ पुन्हा उपलब्ध झाला आहे. त्यामुळे शहरातील सुमारे सात लाख कुटुंबांना रेशनकार्डावर नऊ रुपये साठ पैसे किलो दराने दरमहा पाच किलो तांदूळ मिळणार आहे.

अँजिओप्लास्टीला 'सीटीओ'चा पर्याय

$
0
0
रक्त पुरवठा खंडित झाल्यानंतर कराव्या लागणाऱ्या अँजिओप्लास्टीला पर्याय म्हणून आता 'क्रॉनिक टोटल ऑक्ल्युजन' (सीटीओ) या नव्या तंत्राच्या ऑपरेशनचे जहांगीर हॉस्पिटलमध्ये थेट प्रक्षेपण दाखविण्यात आले.

आता CNG पुरवठादारांचा अल्टीमेटम

$
0
0
सीएनजीचे थकीत सात कोटी रुपये न दिल्यास बसला केला जाणारा सीएनजीचा पुरवठा बंद करण्यात येईल, असा 'अल्टीमेटम' महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडने (एमएनजीएल) पीएमपीएमएलला दिला आहे. याची अंमलबजावणी झाल्यास पीएमपीच्या ५०० बस रस्त्यावर येऊ शकणार नाहीत.

रामटेकडी कचरा डेपोत बॉम्ब

$
0
0
रामटेकडी येथील कचरा डेपोमध्ये मंगळवारी दुपारी एका बॉम्ब सापडला असून, तो जिवंत आहे का मृत, याची तपासणी करण्यात येत आहे. या बॉम्बवर 'एआरडीई' लिहिले असून तो तेथे कसा पोहोचला, याचा शोध सुरू झाला आहे.

शिंदेवाडीतील अतिक्रमणांवर कारवाई

$
0
0
डोंगरफोडीमुळे रस्त्यावर आलेल्या पावसाच्या पाण्याच्या लोंढ्यात मायलेकींना जीव गमवावा लागल्यानंतर महसूल प्रशासनाने शिंदेवाडी ते खेडशिवापूर दरम्यानच्या महामार्गावरील अतिक्रमणांवर मंगळवारी धडक कारवाई केली.

संस्कृतीचा मृतदेह सापडला

$
0
0
पुण्यानजीक कात्रज बोगद्याजवळ शिंदेवाडी येथील पाण्यात वाहून गेलेल्या संस्कृती वाडेकर या चौदा महिन्यांच्या चिमुरडीचा मृतदेह आज, बुधवारी सापडला. गेली सहा दिवस तिचा शोध सुरु होता.

वरंध्याचं आरस्पानी सौंदर्य

$
0
0
रणरणतं ऊन, वैताग देणारा उकाडा आणि घाम असा हा त्रासदायक उन्हाळा. त्यातच परीक्षा, अभ्यास असं विचित्र कॉम्बिनेशन. मग बातम्या सुरू होतात, त्या मान्सून प्रतीक्षेच्या आणि आमची प्रतीक्षा सुरू होते, ती मनमुराद बाइक राइड आणि वरंध्याच्या भेटीची.

हे मन पावसाळी...

$
0
0
धो धो कोसळणा-या पावसात अंगाचं मुटकुळं करून गादीवर पडून राहाण्यापेक्षा स्वच्छंदपणे भटकायचं, तर ठिकाणाचीही पर्वा करण्याची गरज नाही; कारण ध्येयापर्यंत पोहोचल्याच्या आनंदापेक्षाही तिथपर्यंत नेणारी वाट, तो प्रवास आणि त्यावेळच्या सोबतीचीच खरी मजा असते.

माझा पाऊस

$
0
0
पाऊस सुरू झाला, की कामानिमित्त मुंबईत राहाणाऱ्या पुणेकर सेलिब्रेटींचं मनही पुण्याकडे ओढ घेऊ लागतं. कुणाला सिंहगडावरची कांदाभजी आठवते, कुणाला कॉलेजमध्ये केलेली खडकवासल्याची सैर आठवते.

पावसाळी रानभूल

$
0
0
पावसाळ्यात एखाद्या गडावर असणं नुसत्या आनंदापेक्षाही खूप काही वेगळं देऊन जातं. एखाद्या कड्याच्या टोकाशी बसून अंतर्मुख होताना स्वतःला शोधण्याची संधीही मिळते.

घनगर्द फकीरा...

...पी के रोड पे

$
0
0
स्वतंत्र थिएटर प्रस्तुत शनिवारी (दि. १५) लवासा सिटी इथं होणाऱ्या या पथनाट्याची टॅगलाइन 'हा काही अपघात नाही, तर हा आपण निवडलेला पर्याय आहे' अशी आहे. दारू प्यायल्यामुळे माणसात अति आत्मविश्वास निर्माण होतो आणि प्रतिक्षिप्त क्रिया मंदावते. त्यामुळे अपघाताची शक्यता वाढते. हे त्यातून सांगण्याचा प्रयत्न काही तरुण मुलं करणार आहेत.

`आम आदमी पक्षा`च्या जिल्हा संयोजकपदी भापकर

$
0
0
आम आदमी पक्षाच्या जिल्हा संयोजकपदी पिंपरी-चिंचवडचे माजी नगरसेवक मारुती भापकर यांची निवड करण्यात आली आहे. अन्य प्रमुख पदाधिकाऱ्यांमध्ये आभा मुळे (सचिव) आणि श्रीकांत आचार्य (कोषाध्यक्ष) यांचा समावेश आहे.

'हाय-वे' की 'डाय-वे'?

$
0
0
शिंदेवाडीतील मानवनिर्मित 'प्रलया'त मायलेकी वाहून गेल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले. दुर्घटनेची जबाबदारी एकमेकांवर ढकलण्याची स्पर्धा सुरू झाली. अशा असंवेदनशील कारभारामुळेच राज्यभरातील महामार्ग कमालीचे असुरक्षित होत आहेत.

दीड लाखांची चोरी

$
0
0
देखभालीसाठी कामावर ठेवलेल्या महिलेने घरातील दीड लाख रुपयांच्या दागिन्यांची चोरी केली. पिंपरीमध्ये हा प्रकार उघडकीस आला. के.एम.जॉनी (वय ६८, रा. मारुती कॉम्प्लेक्स, अशोक टॉकीज जवळ, पिंपरी) यांनी पोलिसांमध्ये तक्रार दिली आहे.

कंपनीत पावणेदोन लाखांची चोरी

$
0
0
कंपनीच्या छताचा पत्रा उचकटून चोरट्यांनी कंपनीतील पावणेदोन लाखाचा ऐवज चोरून नेला. सुनील तुकाराम काळे (वय ४०, रा. त्रिवेणीनगर, तळवडे) यांनी पोलिसांमध्ये तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनील काळे यांची कुदळवाडीमध्ये कटिंग इंडस्ट्रीज नावाची कंपनी आहे.

'एमआयडीसी'त टास्क फोर्स

$
0
0
पिंपरी-चिंचवडच्या औद्योगिक परिसरातील चोऱ्या रोखण्यासाठी टास्क फोर्स उपलब्ध करण्याचा प्रस्ताव पोलिसांच्या विचाराधीन आहे. त्यासाठी येत्या सोमवारी (१७ जून) उद्योजकांची बैठक आयोजित करण्यात आली आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images