Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

भाजप शहराध्यक्षपदी अनिल शिरोळे

$
0
0
भारतीय जनता पक्षाच्या शहराध्यक्षपदी ज्येष्ठ नेते अनिल शिरोळे यांची सोमवारी निवड करण्यात आली. शिरोळे हे दुसऱ्यांदा शहराध्यक्ष झाले असून त्यांच्या निवडीमुळे पक्षाच्या शहर संघटनेवर पुन्हा मुंडे गटाचा वरचष्मा निर्माण झाला आहे.

शिंदेवाडी प्रलय: दोषींवर फौजदारी

$
0
0
सातारा हायवेवर शिंदेवाडी येथे पूरस्थितीमुळे झालेल्या दुर्घटनेप्रकरणी गुन्हे नोंदविण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाकडून सोमवारी देण्यात आले. तसेच यामध्ये झालेल्या मृत्यूप्रकरणी दंडाधिकाऱ्यांमार्फत चौकशी करून फौजदारी कारवाईचे आदेश जिल्हाधिकारी विकास देशमुख यांनी दिले. यावर मंगळवारपर्यंत कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी पोलिसांना दिले.

लेखक, कवी विद्यार्थ्यांना भेटणार

$
0
0
पाठ्यपुस्तकातील आपली आवडती कविता, किंवा धडा लिहिणाऱ्या कवी अथवा लेखकाला भेटण्याची, त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी आता पुण्यातील विद्यार्थ्यांना मिळणार आहे. यासाठी नातू फाउंडेशनने पुढाकार घेतला आहे.

सर्प विष तस्करी: दोघांना अटक

$
0
0
सर्पविषाच्या तस्करीप्रकरणी लोणावळा शहर पोलिसांनी आणखी दोघांना अटक केली असून, यामध्ये गोव्याच्या एका पोलिस कॉन्स्टेबलचा समावेश आहे. त्यांना १४ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनाविण्यात आली असून आणखी काही मोठे 'मासे' असण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

पालिकेचे कारभारी कोरिया वारीवर

$
0
0
महापौरांसह पालिकेतील प्रमुख पदाधिकारी सोमवारी दहा दिवसांच्या कोरिया दौऱ्यावर रवाना झाले. गेल्या पंधरवड्यापासून प्रमुख अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे थंडावलेला पालिकेचा कारभार पदाधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे आणखी मंदावणार आहे.

चौपाटी बंद करण्याच्या केवळ घोषणाच

$
0
0
खडकवासला धरणालगत विक्रेत्यांनी केलेली अतिक्रमणे आणि वाहनतळ नसल्याने रस्त्याच्या दुतर्फा लावल्या जाणाऱ्या गाड्यांमुळे दरवर्षी वाहतुकीची कोंडी होते आहे, पण प्रशासन यावर कोणतीही ठोस भूमिका घ्यायला तयार नाही.

नियमपालनाअभावीच वाढते बालकामगारांची संख्या

$
0
0
'दुकाने, हॉटेल आदी ठिकाणांपासून अगदी टीव्हीवरील रिअॅलिटी शोज व दैनंदिन मालिकांमध्येही बालकामगारांचा वापर होत आहे. बालकामगार पुरविणारे रॅकेट मोठे असून, बालकामगारांविरोधात कायद्यात कडक तरतूदी असूनही त्याची योग्य अंमलबजावणी होत नाही.

पक्षातील सर्व घटकांना एकत्रित नेणार

$
0
0
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व घटकांना एकत्रित घेऊन पक्ष संघटना मजबूत करण्यावर भर देण्याबरोबर सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केला जाणार असल्याचे भाजपचे नवनिर्वाचित शहराध्यक्ष अनिल शिरोळे यांनी स्पष्ट केले.

ST च्या निवृत्त कर्मचा-यांचे ७९ लाख महामंडळाकडे पडून

$
0
0
राज्य परिवहन महामंडळातून (एसटी) निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनातील फरक, शिल्लक रजा, कराराच्या रकमेपोटीचे सुमारे ७९ लाख रुपये राज्य परिवहन महामंडळाच्या पुणे विभागात पडून आहेत.

स्टेशन घाण करणा-यांवर दंडात्मक कारवाईची मोहीम

$
0
0
पुणे स्टेशन परिसरात घाण करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मोहीम रेल्वे प्रशासनाने हाती घेतली आहे. जानेवारी ते मे या कालावधीत प्रशासनाने ५५२ जणांवर कारवाई करुन त्यांच्याकडून ६५ हजार १०० रुपयांचा दंड वसूल केला आहे.

औषध तुटवड्यानंतर विक्रेत्यांकडे चौकशी

$
0
0
शहरातील औषध विक्रेत्यांकडे रक्तदाब, डायबेटिस, सलाइनच्या औषधांच्या तुटवड्याची बाब उघडकीस आल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) औषध निरीक्षकांनी विक्रेत्यांकडे धाव घेतली. कोणत्या औषधांचा कोठे तुटवडा आहे, याची दिवसभर चौकशी सुरू होती.

लष्कराने केले दोन रस्ते बंद

$
0
0
लष्कराच्या हद्दीतून जाणारा वानवडीतील राइट फ्लँक रोड नागरिकांसाठी वापरण्यास लष्कराकडून बंद करण्यात आल्यानंतर आता व्हिक्टोरिया रस्तावर बॅरिकेड टाकून नागरिकांना या रस्त्यावरून जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे.

आरोपी योगेश राऊतसाठी 'प्रॉडक्शन वॉरंट'ची मागणी

$
0
0
सॉफ्टवेअर इंजिनीअर नयना पुजारी खूनप्रकरणातील आरोपी योगेश राऊतला या केसच्या सुनावणीला कोर्टात हजर करण्यासाठी 'प्रॉडक्शन वॉरंट' काढण्यात यावे, असा अर्ज सरकार पक्षातर्फे कोर्टात करण्यात आला आहे.

कारची वाहतूक पोलिसाला धडक

$
0
0
पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवरील वाहनांवर कारवाईसाठी उभ्या असलेल्या एका महामार्ग वाहतूक पोलिसाला एका भरधाव कारने धडक दिली. यात पोलिस कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे. ही घटना मंगळवारी दुपारी खोपोलीजवळील फूडमॉलसमोर घडली. अपघातानंतर कारचालक कारसह फरार झाला आहे.

महिला जेल कर्मचा-याला धमकावणा-यास अटक

$
0
0
महिला जेल कर्मचा-यास धमकावणा-या एका गुन्हेगाराला येरवडा पोलिसांनी सोमवारी अटक केली. जेलमधील कैद्याच्या भेटीस आलेल्या या गुन्हेगारावर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

टीबी, कोलेस्टेरॉलच्या औषधांचा तुटवडा

$
0
0
डायबेटिस, रक्तदाब, सलाइनच्या औषधाबरोबर मंगळवारी काही औषध विक्रेत्यांकडे संसर्गजन्य टीबीसाठी वापरण्यात येणाऱ्या 'टॅझोमॅक', कोलेस्टरॉलवरील 'सिमोव्हिटिन', डायबेटिसवरील 'ग्लायबोव्हिन' यासारख्या औषधांचा मंगळवारी तुटवडा निर्माण झाला.

३.२५ कोटींची मालमत्ता गुन्हे शाखेकडून जप्त

$
0
0
गुन्हे शाखेने या वर्षांत ३२८ गुन्हे उघडकीस आणून ३.२७ कोटी रुपयांचे मालमत्ता हस्तगत करण्यात यश मिळविल्याचा दावा गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्त राजेंद्र भामरे यांनी केला आहे.

महामार्गाच्या रुंदीकरणातील ६३ अतिक्रमणे जमीनगोस्त

$
0
0
पावसाच्या पाण्याच्या लोंढ्यात मायलेकीचा मृत्यू झाल्यानंतर जागे झालेल्या महसूल प्रशासनाने शिंदेवाडी ते खेडशिवापूर दरम्यान महामार्गाच्या रुंदीकरणातील ६३ अतिक्रमणे मंगळवारी जमीनदोस्त केली.

सात वर्षांनंतर झाली भूसंपादन कारवाई

$
0
0
पुणे-सातारा महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी खेड शिवापूर येथील जागा सात वर्षांपूर्वी संपादित करण्यात आली होती. मात्र, जागेचा प्रत्यक्ष ताबा घेण्यास विलंब झाल्याने महामार्गालगत अतिक्रमणांचा विळखा पडल्याचे स्पष्ट झाले आहे.

पडलेली झाडे गोळा करण्यास उद्यान विभागाला अपयश

$
0
0
मुसळधार पाऊस पडून आठवडा झाल्यावरही शहराच्या विविध भागांमध्ये पडलेली झाडे उचलण्यास उद्यान विभागाला अपयश आले आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live


Latest Images