Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

मावळात भातपेरणीला वेग

$
0
0
मावळात मान्सून पूर्व पावसाने विजेच्या कडकडाट व मेघ गर्जनेसह सलग दुसऱ्या दिवशी जोरात हजेरी लावल्याने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. मान्सून पूर्व पावसामुळे मावळातील शेतकरी भात पेरणीच्या कामात मग्न झाला असून, भार पेरणीला वेग आला आहे.

गाडी वाहून गेली

$
0
0
पुणे-सातारा रोडवरील शिंदेवाडी जकातनाक्यावर पावसाच्या पाण्याच्या लोंढ्यात गुरुवारी रात्री अल्टो गाडी वाहून गेली. त्यामधील तिघांना बाहेर काढण्यात यश आले असले, तरी गाडीतील आई आणि छोटी मुलगी पाण्यात वाहून गेल्या. रात्री उशिरापर्यंत त्यांचा शोध सुरू होता.

लग्नांमधील वेळखाऊ प्रथा थांबवा

$
0
0
रस्त्यांवरून निघणाऱ्या नवरदेवांच्या मिरवणुका- वराती..., पुढाऱ्यांचे आगमन होईपर्यंत टळून जाणारे मुहूर्त... आणि आशिर्वादपर चालणारी भाषणे...! लग्नसमारंभांमधील अशा वेळखाऊ प्रथांना फाटा देऊन वधू-वरांसह नातेवाइकांना होणारा त्रास थांबविण्याचा निर्णय कोथरूड व आसपासच्या गावांमधील जाणत्या मंडळींनी गुरुवारी घेतला.

भीमाशंकरमध्ये आढळला बिबट्या

$
0
0
भीमाशंकर अभयारण्यात सांबर आहे, भेकर आहे, ससेही आहेत, पण बिबट्या नव्हता…. पण वनाधिकाऱ्यांना त्याबाबत वाटणारी खंत बिबट्यानेच दूर केली आहे. नुकत्याच झालेल्या प्रगणनेमध्ये बिबट्याची विष्ठा, ठसे आणि त्याने गावात केलेल्या शिकारींचे पुरावे मिळाल्याने वनाधिकारी सध्या खूष आहेत.

पुणे बनले तळ्यांचे शहर

$
0
0
मुसळधार पावसामुळे रस्तोरस्ती साचलेली तळी, बंद पडलेले सिग्नल्स आणि पडलेल्या झाडांमुळे गुरूवारी सायंकाळी शहरातील बहुतेक रस्त्यांवर आणि हायवेवरही वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली. आधीच पावसामुळे हैराण झालेल्या पुणेकरांचे या ट्रॅफिक जॅममुळे अतोनात हाल झाले.

पुणे स्टेशनवर ५० CCTV

$
0
0
पुणे स्टेशनवरील सुरक्षा कडक करण्यासाठी त्याठिकाणी अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. आगामी तीन महिन्यांमध्ये याठिकाणी आधुनिक यंत्रणा असणारे ५० कॅमेरे बसवण्यात येणार आहेत.

पुणेकरांची 'धारां'बळ

$
0
0
पाणी साठले... झाडे पडली... लाईट गेली... पूर्वमान्सून जलधारांच्या वर्षाने सलग तिसऱ्या दिवशी पुणेकरांची तारांबळ उडवली. सायंकाळी सुरू झालेल्या जोरदार पावसाने शहर व परिसराला झोडपले. रात्री साडेआठपर्यंत शहरात ३६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.

नेमबाजीच्या शिबिरात 'चाळे'बाजी

$
0
0
फिक्सिंग आणि बेटिंगमुळे क्रिकेटच्या खेळाला बट्टा लागलेला असतानाच देशातील दोन नेमबाजांनी नियमांच्या ‘रेंज’बाहेर जाऊन केलेल्या चाळ्यांमुळे क्रीडाजगत ढवळून निघाले आहे. पुण्यातील राष्ट्रीय शिबिरात हे दोन नेमबाज भर दुपारी सेक्स करताना पकडले गेले आहेत. हे दोघेही नेमबाज झारखंडचे असून त्यांच्यावर तत्काळ बंदी घालण्यात आली आहे.

एकताचा रचतेय 'इतिहास'

$
0
0
हार्वर्डमधून एक महिन्याचा अभ्यासक्रम पूर्ण करून एकता कपूर नुकतीच स्वदेशी परतली; पण याचा अर्थ ती आराम करतेय असा नाही. 'जोधा अकबर' या तिच्या नव्या शोच्या तयारीत ती आहे.

पिंपरी-चिंचवडचा निकाल ८९ टक्के

$
0
0
दहावीच्या परीक्षेत पिंपरी-चिंचवडचा निकाल यंदा ८९.६० टक्के निकाल लागला आहे. बारावीप्रमाणे दहावीतही मुली मुलांपेक्षा एक पाऊल पुढेच आहेत. मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९४.५८ टक्के आहे, तर मुलांचे ९३.२० टक्के आहे. शहरातील ३४ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे.

दरड कोसळण्यावर कायमस्वरूपी उपाय योजणार

$
0
0
पुणे-सातारा रोडवरील शिंदेवाडीजवळ होत असणाऱ्या दरड कोसळण्याच्या घटनांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याचा निर्णय 'नॅशनल हाय वे अॅथॉरिटी'ने घेतला आहे.

मावळ तालुक्याचा निकाल ९३ टक्के

$
0
0
मावळ तालुक्याचा दहावीचा निकाल ९३.९८ टक्के लागला आहे. यंदाच्याही वर्षी निकालात मुलींनी बाजी मारली असून, मावळातील ६४ शाळांपैकी १५ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे.

सर्पविषाची तस्करी करणा-या टोळीला अटक

$
0
0
सर्पविषाची तस्करी करणा-या टोळीला पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. या टोळीकडून आंतरराष्ट्रीय बाजारमूल्यानुसार अंदाजे १८ ते २० कोटी रुपयांचे पावणेदोन लिटर विष जप्त करण्यात आले आहे.

हव्यासाच्या टेकडीफोडीचा 'पूर'

$
0
0
नदीला पूर यावा अशी हायवेवर भयानक परिस्थिती होती…. रस्त्यावर पाणीच पाणी होते …रात्री झोप लागली नाही… रात्रभर पाऊस आठवत होता.…. पावसाने रौद्र रूप धारण केले होते. गॅरेजमधील सामान डोळ्यादेखत वाहत जात होते… काहीच करू शकलो नाही….

शक्यता अहवालानंतरच विमानतळाची जागा निश्चिती

$
0
0
पुणे आंतराराष्ट्री​य विमानतळासाठी राजगुरुनगरमधील जागेबाबत भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या समितीकडून शक्यापशक्यतेचा​ ​अहवाल आल्यावर जागा निश्चित होणार असल्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शुक्रवारी स्पष्ट केले.

जन्म-मृत्यूच्या दाखल्यांची आता झोननुसार नोंदणी

$
0
0
जन्म-मृत्यू दाखल्यांच्या नोंदीपासून ते दाखले प्रत्यक्षात हातात मिळण्यापर्यंत नागरिकांचे होणारे हेलपाटे वाचविण्यासाठी महापालिकेच्या चार उपायुक्तांच्या (झोन) कार्यालयांतर्गत विभागात नोंदणी होणार आहे.

खूनप्रकरणी चौघांना जन्मठेप

$
0
0
घरातील लोकांवर भानामती केली असल्याने अरिष्ट येत असल्याच्या अंधश्रद्धेतून बाप-लेकाचा खून केल्याप्रकरणी चौघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. जिल्हा सत्र न्यायाधीश सुचित्रा घोडके यांनी हा निकाल दिला.

कारमधून दोन लाखांची चोरी

$
0
0
कारमधील ऑईल गळते आहे असे सांगून चालकाचे लक्ष विचलित करुन एका चोरट्याने दोन लाख ३३ हजार रुपयांची रोख रक्कम चोरुन नेली. शुक्रवारी दुपारी पावणेदोन वाजण्याच्या सुमारास कोथरूड येथे हा प्रकार घडला.

जबाबदार लोकांवर गुन्हा नोंदवा!

$
0
0
कात्रज-शिंदेवाडी येथील दुर्घनेतील लोकांच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या लोकांवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी सुराज्य संघर्ष समिती आणि नागरिक चेतना मंचातर्फे करण्यात आली आहे.

अन् क्षणात होत्याचे नव्हते झाले

$
0
0
मुलांच्या सुट्ट्या संपून शाळा सुरू व्हायच्या आत मस्तपैकी ट्रीपला जाऊन येऊ, असा बेत करून वाडेकर आणि वैरागकर कुटुंबीय महाबळेश्वरला रवाना झाले होते. गुरुवारी पुण्यात परतून शुक्रवारी माथेरानला जाण्याचा त्यांचा मानस होता.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images