Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

पूर नियंत्रण कक्ष झाले सजग

0
0
भीमा व कृष्णा खोऱ्यातील धरणांच्या परिसरात पडणारा पाऊस, पाणीसाठा आणि पूरस्थितीची सविस्तर माहिती ठेवण्यासाठी पूर नियंत्रण कक्ष सजग झाले आहेत. कृष्णा खोऱ्यातील कोयना धरणाच्या पूर नियंत्रण कक्षाची पाहणी मुख्य अभियंता दीपक मोडक व अविनाश सुर्वे यांनी केली.

पालखी तळांसाठी मिळणार हक्काची जागा

0
0
संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखीमार्गांवरील तळांच्या जागांच्या सातबारा उताऱ्यांवर पालखीतळ अशी नोंद करण्यात येणार आहे. त्यामुळे पालखी सोहळ्यात विसावा आणि मुक्कामांसाठी हक्काची जागा उपलब्ध होणार आहे.

'महावितरण'चा कक्ष २४ तास सुरू राहणार

0
0
पावसाळी परिस्थितीत वीजपुरवठ्याच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी महावितरणच्या वतीने २४ तास कार्यरत असणारे कक्ष सुरू करण्यात आले आहेत. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये वादळ व पावसामुळे वीजवाहिन्यांवर झाडे पडून वीज खंडीत होण्याचे अनेक प्रकार घडतात.

आंतरराज्यीय चो-या करणा-या दोघांना अटक

0
0
हायप्रोफाइल राहून आंतरराज्यीय घरफोड्या करणाऱ्या दोघांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट तीनने अटक केली आहे. आरोपींकडून ४० घरफोड्यांचे गुन्हे उघडकीस आले असून त्यांच्याकडून वीस लाखाचे सोन्याचे आणि चांदीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.

वाड्यांवरील कारवाई सुरू

0
0
धोकादायक झालेल्या अप्पा बळवंत चौकातील तांबडी जोगेश्वरी मंदिरासमोरील तीन मजली वाड्यावर कारवाई करत पालिकेने बुधवारी हा वाडा पाडून टाकला. रस्त्यांना अडथळा ठरणाऱ्या आणि अतिधोकादायक असलेल्या शहरातील वाड्यांवर कारवाई करण्यास पालिकेने सुरुवात केली आहे.

ग्राहकांसाठी 'कार्पेट एरिया'चे 'रेड कार्पेट'

0
0
'बिल्टअप,' 'सुपर बिल्टअप' असे फंडे आता बांधकाम व्यवसायातून कागदोपत्री हद्दपार होणार असून भविष्यात फक्त 'कार्पेट एरिया'चीच विक्री करता येणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने नुकत्याच मान्य केलेल्या रियल इस्टेट नियमनाच्या मसुद्यामध्ये या तरतुदीचा समावेश करण्यात आला आहे.

धर्मादाय हॉस्पिटलची व्याप्ती वाढली

0
0
गोरगरिबांना सवलतीत किंवा मोफत उपचार देण्याकरिता पुण्यातील धर्मादाय हॉस्पिटलमध्ये आणखी आठ हॉस्पिटलचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे आता पुणे जिल्ह्यात धर्मादाय हॉस्पिटलची संख्या ५५ झाली आहे.

दूध खरेदीच्या दरात ५० पैशांची वाढ

0
0
राज्य सरकारने शेतकऱ्यांना दूध खरेदीचा दर पन्नास पैशांनी वाढवून दिला आहे. पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष बाळासाहेब खिलारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे.

'बालगंधर्व'ची गळती थांबवली

0
0
छताला तडे गेल्याने पहिल्या पावसात बालगंधर्व रंगमंदिराच्या रंगमंचावर झालेली गळती प्रशासनाने तातडी दूर केली आहे. रासायनिक प्रक्रियेमार्फत छतामध्ये निर्माण झालेले तडे बुजवण्यात आले आहेत.

'ससून' होणार चकाचक

0
0
फुटलेल्या फरशा, तुटलेल्या खिडक्या, छतातून होणारी गळती, गुळगुळीत झालेले जिने, जुनाट फर्निचर आणि रंग उडून जळमटलेल्या भिंती... ससून हॉस्पिटलमधील हे सध्याचे चित्र आता लवकरच बदलणार आहे.

ज्ञानप्रबोधिनीच्या अभ्यासिकेत आग

0
0
सदाशिव पेठेतील ज्ञानप्रबोधिनी शाळेच्या अभ्यासिकेत कम्प्युटरला शॉर्टसर्किट झाल्याने आग लागली. घटनास्थळी तातडीने पोहोचून अग्निशमन दलाने तातडीने ही आग आटोक्यात आणली.

मान्सून दोन दिवसांत सक्रिय

0
0
राज्यात दाखल झालेला मान्सून हर्णे आणि सातारा परिसरात स्थिरावला आहे. पुढील दोन ते तीन दिवसांनंतर मान्सूनच्या वाटचालीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होईल, असे हवामान विभागाच्या उपमहासंचालक डॉ. मेघा खोले यांनी सांगितले.

आयुक्तांना घेराव अन् शिवीगाळही

0
0
आयुक्तांना घेराव अन् शिवीगाळही अनधिकृत बांधकामावरील कारवाईला नागरिकांचा विरोध म टा...

पिंपरीत जोरदार पाऊस

0
0
अल्पकाळ विश्रांती घेतलेल्या पावसाने पिंपरी-चिंचवडला गुरुवारी (सहा जून) झोडपून काढले. सायंकाळी सुमारे दीड तास जोरदार वाऱ्यासह पाऊस झाल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला.

'ते' चार अधिकारी निलंबित

0
0
जमिनीची मोजणी होऊन कित्येक महिने उलटले, तरी जमीनमालकांना मोजणी नकाशा (क प्रत) न देणाऱ्या चार अधिकारी-कर्मचाऱ्यांवर जमाबंदी आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी निलंबनाची कारवाई केली.

'त्या' कॅबवर होणार कारवाई

0
0
ऑल इंडिया परमिट असताना इलेक्ट्रॉनिक मीटर बसवून बेकायदा प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी कंपन्यांच्या कॅबला 'आरटीओ'ने अखेर ब्रेक लावला. गेल्या दोन दिवसांत सुमारे पंचेचाळीस कॅबवर कारवाई करण्यात आली असून, आता त्यांना दंडात्मक कारवाईला तोंड द्यावे लागेल.

धरणांच्या पाणलोटात जोरदार पाऊस

0
0
पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला, पानशेत, वरसगाव व टेमघर धरणांच्या पाणलोटात पावसाने सायंकाळनंतर जोरदार हजेरी लावली.दरम्यान, जिल्ह्यातील पावसाच्या माहितीसाठी मंडलस्तरावर पर्जन्यमापके बसविण्यात येणार आहेत.

रस्त्यावरील वायरने वृद्ध महिलेचा मृत्यू

0
0
गुरुवारी सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यात तुटून पडलेल्या इलेक्ट्रिक वायरचा शॉक लागून एका ७५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास गांजवे चौक येथे ही घटना घडली.

सर्पदंशावर उतारा 'पिनाक'चा

0
0
कोणतेही साइडइफेक्ट नसलेली आणि अॅलोपॅथी इंजेक्शनऐवजी किफायतशीर ठरणारी आयुर्वेदिक 'पिनाक' गोळी ही साप, विंचू आणि मधमाशीच्या दंशामुळे होणाऱ्या विषबाधेवर जीवनदायी उपाय ठरत आहे.

सर्पविषाची तस्करी करणारे अटकेत

0
0
सर्पविषाची तस्करी करणाऱ्या टोळीला पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. या टोळीकडून आंतरराष्ट्रीय बाजारमूल्यानुसार अंदाजे १८ ते २० कोटी रुपयांचे पावणेदोन लिटर विष जप्त करण्यात आले आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images