Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

अर्धवट काम करणा-यांवर कारवाई नाही

$
0
0
शहरी गरिबांसाठीचा (बीएसयूपी) हडपसर येथील प्रकल्प अपूर्णावस्थेत ठेवणा-या ठेकेदारावर कारवाई करण्याऐवजी त्याचे काम वारज्यातील ठेकेदाराकडे सोपविण्याचा निर्णय स्थायी समितीने मंगळवारी घेतला.

राज्यभर मान्सूनच्या सरीवर सरी

$
0
0
नैर्ऋत्य मोसमी पावसाने मंगळवारी राज्याची वेस ओलांडून तळकोकणासह दक्षिण मध्य महाराष्ट्रात प्रवेश केला आहे. केरळपासून राज्यापर्यंतचा प्रवास तीन दिवसांत करणाऱ्या मान्सूनच्या पुढील प्रगतीसाठी काही दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

शेलारांचे 'अतिक्रमण' हटविले

$
0
0
महापालिकेचा लाखो रुपयांचा प्रॉपर्टी टॅक्स थकविणारे पालिकेचे उपायुक्त आणि अतिक्रमण विभागप्रमुख रमेश शेलार यांचा अतिक्रमण आणि आकाशचिन्ह विभागाचा कार्यभार मंगळवारी अखेर काढून घेण्यात आला.

'सीईटी'चा निकाल आज जाहीर होणार

$
0
0
इंजिनीअरिंग आणि फार्मसी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या राज्याच्या अखेरच्या 'सीईटी'चा निकाल बुधवारी (५ जून) जाहीर होत आहे. निकाल जाहीर झाल्यावर लवकरच प्रवेश प्रक्रियेबाबतची अधिसूचना जारी होणार आहे.

नासधूस होऊनही उद्घाटनाला मान्यता

$
0
0
नासधूस झालेल्या पालिकेच्या उद्यानाचे उद्घाटन करण्याच्या प्रस्तावाला मान्यता देण्याचा निर्णय मंगळवारी पक्षनेत्यांच्या बैठकीत घेण्यात आला. सहकारनगर येथील नाला गार्डनमध्ये 'अवतार' चित्रपटातील एलियन्सचे सहा पुतळे उभारण्यात आले होते.

जंगली प्राण्यांसाठी जंगलातच पाणी

$
0
0
दुष्काळात केवळ माणसेच होरपळतात असे नव्हे, तर पक्षी-प्राण्यांनाही त्याचा फटका बसतो. पाण्याच्या शोधात जंगली प्राणी शहरात येतात आणि कोणाची तरी शिकार होतात. त्यामुळे प्राण्यांच्या पिण्याच्या पाण्यासाठी जंगलातच 'बोअर' घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

'स्वच्छ'तर्फे आज 'व्ही-कलेक्ट' मोहीम

$
0
0
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त 'स्वच्छ' संस्थेतर्फे पुण्याच्या विविध भागात आज (५ जून) 'व्ही-कलेक्ट' ही मोहीम राबविण्यात येणार आहे. नागरिकांनी घरातील जुने कपडे, ई-कचरा, चपला, जुने फर्निचर संस्थेच्या स्वयंसेवकांकडे जमा करून पर्यावरण रक्षणाच्या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थेने केले आहे.

खडकवासला धरणातून काढला ६० हजार ट्रक गाळ

$
0
0
'ग्रीन थम्ब' या सामाजिक संस्थेने खडकवासला धरणातील गाळ काढण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात सुमारे दोन किलोमीटरहून अधिक परिसरातील सुमारे साठ हजार ट्रक गाळ काढण्यात आला आहे.

....अन् स्वप्न साकार झाले

$
0
0
जन्मतः विकलांग असल्यामुळे व्हीलचेअरवरच आयुष्य काढणा-या प्रज्ञा कुलकर्णी यांनी फक्त पत्राद्वारे व्यक्त केलेली भेटीची इच्छा आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांनी थेट त्यांच्या घरी भेट देऊन पूर्ण केली.

सरकारच्या योजनांची करा जाहिरात

$
0
0
लोकसभा, विधानसभा निवडणुकांकरिता सरकारच्या विविध योजना, त्यांची माहिती आणि सर्वसामान्यांना त्यामुळे होणारे फायदे, अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे उद्दिष्ट ठेवा, असे निर्देश प्रदेश काँग्रेसतर्फे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना देण्यात आले.

पुण्यात फक्त सात डॉक्टर बोगस?

$
0
0
बेकायदेशीर वैद्यकीय व्यवसाय करीत गोरगरीब पेशंटची आर्थिक फसवणूक करणारे पुणे जिल्ह्यात आतापर्यंत अवघे सातच डॉक्टर आढळल्याची माहिती पुणे जिल्हा परिषदेने दिली आहे.

आणखी दीड लाख मतदार वगळले

$
0
0
'बोगस' मतदारांमुळे फुगलेली पुणे जिल्ह्याची मतदार यादी रोडावत चालली असून मृत, स्थलांतरित व दुबार नावे असलेले एक लाख ५५ हजार मतदार वगळण्यात आले आहेत.

जातीच्या दाखल्यासाठी जा मूळ गावी

$
0
0
दहावी- बारावीच्या निकालानंतर पुढच्या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी आवश्यक जातीचे दाखले आता मूळ गावीच मिळणार असून राज्य सरकारच्या या आदेशामुळे ऐन प्रवेशाच्या काळात विद्यार्थ्यांची चांगलीच धावपळ होणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी यंदाच्या शालेय वर्षापासूनच सुरू झाली आहे.

अन्नाच्या नासाडीतही पुणे नसे उणे

$
0
0
घरी आलेल्या पाहुण्याची हातचे राखूनच सरबराई करण्याचा 'पुणेरी'पणा करतानाच हॉटेल आणि मंगल कार्यांमध्ये पुणेकर अन्नाची सढळ हाताने नासाडी करतात. थोडेथोडके नव्हे, तर पुण्यात दररोज सुमारे चार हजार किलो शिजविलेले अन्न वाया जाते!

'मान्सून एक्स्प्रेस' महाराष्ट्रात

$
0
0
केरळमध्ये वेळेआधीच धडकलेली 'मान्सून एक्स्प्रेस' कर्नाटक राज्यातही वेगाने धावली असून मंगळवारी नैऋत्य मान्सून पावसाने राज्याची वेस ओलांडून तळकोकणासह दक्षिण मध्य महाराष्ट्रात प्रवेश केला आहे. केरळपासून राज्यापर्यंतचा प्रवास तीन दिवसांत करणाऱ्या 'मान्सून एक्स्प्रेस'च्या पुढील प्रगतीसाठी काही दिवसांची प्रतीक्षा करावी लागेल.

पोलिसांचा आता ‘ई-शस्त्र’ने लढा

$
0
0
राज्यातीलच नव्हे; तर देशभरातील पोलिसांना गुन्ह्यांची नोंद विनाविलंब उपलब्ध करून आंतरराज्य टोळ्यांना आळा घालण्यासाठी पोलिसांना लवकरच ‘ई-शस्त्र’ उपलब्ध होणार आहे.

आयुष्याचा 'अज्ञात' प्रवास

$
0
0
आठ वर्षांनी पुन्हा भेटल्यावर आपल्या आयुष्याचा लेखाजोखा मांडणाऱ्या दोन मैत्रीणींची कथा 'अज्ञात झऱ्यावर रात्री'मध्ये आहे. रविवारी (दि. ९) सुदर्शन रंगमंच इथं संध्याकाळी ७.३० वाजता या नाटकाचा प्रयोग होतोय.

पाषाणच्या उद्यानाचं झालं काय?

$
0
0
पाषाण आणि बाणेर या भागात उद्यानाची गरज आहे. ग्राम उद्यान अद्याप पूर्ण झालेलं नाही आणि सूस रस्त्यावरचं उद्यान बांधून तयार आहे; पण तिथे जाण्यासाठी रस्ताच नाही. हे प्रश्न कधी सुटणार?

व्यवस्थाच 'ऑफ द ट्रॅक'

$
0
0
'पुणे-लोणावळा' लोकलने प्रवास करणाऱ्यांची संख्या घटल्याचे नुकत्याच जाहीर झालेल्या प्रवासी अहवालातील आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. मुंबईत प्रवासासाठी महत्त्वाचे माध्यम असणारी लोकल पुण्यात नागरिकांचा विश्वास संपादन करू शकली नाही, हेच यातून जाणवते.

नाटक, फिल्म आणि गाण्यांची मेजवानी

$
0
0
आसमंत संस्थेतर्फे लघुपट, विनोदी नाटक, माहितीपट आणि मराठी गाण्यांचा कार्यक्रम असा सांस्कृतिक नजराणा शनिवारी (दि. ८) पुणेकरांना अनुभवता येणार आहे. कलमाडी स्कूल इथं संध्याकाळी ४ वाजता हा कार्यक्रम होईल.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images