Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

विवाहविषयक चॅनेल

$
0
0
भारताचं पहिलं २४ तास चालणारी विवाहविषयक चॅनेल संपूर्ण उत्तर भारत आणि पश्चिम भारतामध्ये नुकतंच सादर करण्यात आलं आहे. हे चॅनेल डीटीएच आणि डिजिटल नेटवर्कच्या माध्यमातून प्रेक्षकांना पाहाता येणार आहे.

राजकीय कारभारातही पारदर्शकता शक्य

$
0
0
माहितीच्या अधिकाराचा कायदा लागू केल्यामुळे राजकीय पक्षांच्या कारभारातही पारदर्शकता येईल, अशा शब्दांत विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी या निर्णयाचे मंगळवारी स्वागत केले. मात्र, स्थानिक किंवा राज्य पातळीवर या निर्णयाची अंमलबजावणी कशी होणार, याबाबत अद्याप संभ्रम आहे.

राजकीय पक्षांची पोलखोल करण्याचा कायद्याने अधिकार

$
0
0
देशभरातील कोणत्याही नागरिकाने अर्ज केल्यापासून तीस दिवसांत माहिती.... ही माहिती न दिल्यास पंचवीस हजार रुपयांपर्यंत वैयक्तिक दंड... आणि बैठकांच्या इतिवृत्तासह सर्वच माहिती जाहीर करण्याचे बंधन...!

भोसरी पोटनिवडणूक सात जुलैला

$
0
0
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या भोसरी गावठाणमधील (प्रभाग क्रमांक ३५) पोटनिवडणूक सात जुलैला होणार आहे. त्यासाठीची आचारसंहिता मंगळवारपासून (चार मे) लागू झाली आहे.

प्रगतीकडे नेणारे 'महाऊर्जा'

$
0
0
अपारंपरिक, पुनर्निर्मितीक्षम आणि पर्यायी ऊर्जास्रोतांचा प्रचार, प्रसार आणि विकास करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र सरकारने जुलै १९८५मध्ये महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा) ही स्वायत्त संस्था स्थापन केली.

पुण्याचा 'वाइल्ड' इंटरेस्ट!

$
0
0
देशभरातील नावाजलेल्या छायाचित्रकारांनी काढलेल्या निवडक छायाचित्रांचं 'वाइल्ड इंडिया' हे प्रदर्शन सध्या बालगंधर्व कलादालनात सुरू आहे. मान्यवर छायाचित्रकारांसह पुण्यातील काही हौशी आणि उभरत्या छायाचित्रकारांची छायाचित्रंही यात मानानं सजली आहेत.

तहान भागविण्यासाठी पिंपरी-चिंचवडचा पुढाकार

$
0
0
आषाढी वारीसाठी देहू ते पंढरपूर पालखी सोहळ्यात भाविकांसाठी पाण्याचे टँकर उपलब्ध करून दिले जातील, असे आश्वासन पिंपरी-चिंचवडच्या महापौर मोहिनी लांडे मंगळवारी (४ जून) दिले.

वाघांची डरकाळी सुरक्षेच्या शोधात…

$
0
0
दीर्घकालीन अस्तित्व टिकविण्यासाठी आता वाघाला झगडावे लागत आहे. वाघांच्या अस्तित्वाचे क्षेत्र गेल्या दशकभरात ४१ टक्क्यांनी घटले असून त्यांच्या ऐतिहासिक क्षेत्रापैकी केवळ सात टक्के क्षेत्रातच त्यांचा वावर उरला आहे.

पावसाळापूर्व साधनेच 'महावितरण'कडे नाहीत

$
0
0
पावसाळापूर्व (प्री मान्सून) देखभाल- दुरुस्तीच्या कामांसाठी महावितरणच्या कर्मचाऱ्यांना पुरेसे सुटे भागच उपलब्ध न झाल्याने पहिल्याच पावसात शहरातील वीजपुरवठ्याच्या व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचे स्पष्ट झाले आहे.

वडिलांनी केला मुलाचा खून

$
0
0
वडिल आणि मुलगा यांच्यात झालेल्या भांडणात वडिलांनी रागाच्या भरात आपल्या मुलाच्या डोक्यात बॅट घालून खून केला. मंगळवारी (४ जून) सकाळी काळेवाडी येथे हा प्रकार घडला. अनिल दगडू सूर्यवंशी (वय ३४, रा. गजराज कॉलनी, ज्योतीबानगर, काळेवाडी) असे मृताचे नाव आहे.

'यंग सिनिअर्स'ची पोलिसांकडे नोंदणी अत्यल्पच !

$
0
0
भर रस्त्यावर ज्येष्ठांचे खून करण्याचे प्रकार घडत असताना पोलिसांचा सामाजिक सुरक्षा विभाग त्यांच्या सरंक्षणासाठी पुढे सरसावला आहे. आतापर्यंत शहरातील सर्व पोलिस ठाण्यांमध्ये 'यंग सिनिअर्स'ची नोंदणी मात्र अत्यल्पच असल्याची माहिती पुढे आली आहे.

वृद्धेच्या खूनप्रकरणी पथके रवाना

$
0
0
सदाशिव पेठेत सोमवारी रात्री झालेल्या वृद्धेच्या खूनातील आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत. त्या प्रकरणातील आरोपींचा लवकरच शोध लागेल, असा दावा पोलिसांनी केला आहे.

दुभाजकाला धडकून दुचाकी स्वाराचा मृत्यू

$
0
0
भरधाव वेगाने दुचाकी चालवताना दुभाजकाला धडकल्याने स्वतःच्या मृत्यूला कारणीभूत झाल्याची घटना वारजे येथे सोमवारी घडली. महादेव आश्रोबा लोंढे (वय २४, रा. गगनगिरी विहार, शिवणे) असे दुचाकीस्वाराचे नाव आहे.

पाचगाव पर्वती टेकडीचे सर्वांगीण संशोधन

$
0
0
वनस्पती अभ्यासक झाडाझुडपांचा अभ्यास करायला जातात, पक्षिप्रेमी पक्ष्यांच्या नोंदी घेतात, तर कधी प्राणिप्रेमी फक्त प्राण्यांच्या अधिवासाचे संशोधन करतात; पण सगळ्यांनी एकत्र येऊन एखाद्या टेकडीचा सविस्तर अभ्यास करण्याचा प्रसंग क्वचितच घडतो.

'भाजयुमो'चे पालिकेत आंदोलन

$
0
0
पालिकेचा लाखो रुपयांचा प्रॉपर्टी टॅक्स थकविणारे आणि बेकायदा बांधकाम करून पालिकेला प्रॉपटी‍ची खोटी माहिती देणाऱ्या पालिका उपायुक्त आणि अतिक्रमण विभागाचे प्रमुख रमेश शेलार यांना निलंबित करावे, यासाठी भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाच्या वतीने पालिकेत आंदोलन करण्यात आले.

विनापरवाना पिस्तुल बाळगणा-या दोघांना अटक

$
0
0
विनापरवाना पिस्तुल व काडतुस बाळगणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पोलिसांना सापळा रचून अटक केली. या दोघांना ५ जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश कोर्टाने दिला आहे.

रविवार पेठेतील खूनप्रकरणी एकाला कोठडी

$
0
0
रविवार पेठेतील दगडी नागोबा गणपती मंदिराजवळ झालेल्या खुनातील एका आरोपीला फरासखाना पोलिसांनी अटक केली. कोर्टाने त्याला दहा जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.

पावसामुळे शहर परिसरात 'बत्ती गुल'

$
0
0
शहर आणि परिसरात झालेल्या संततधार पावसामुळे झाडे आणि फांद्या कोसळून वीजवाहिन्या तुटल्याने अनेक भागांमधील वीजपुरवठा मंगळवारी खंडित झाला. रात्री उशिरापर्यंत विविध परिसरात विजेचा लपंडाव सुरू होता.

शेलारांना कारवाईचा बडगा दाखवा

$
0
0
पालिकेच्या आरोग्य, बांधकाम, अतिक्रमण विभागात कामासाठी येणारा सर्वसामान्य नागरिक अधिकाऱ्यांच्या त्रासाने पिचला आहे. त्यातच आरोग्य विभाग, अतिक्रमण विभागातील अधिकाऱ्यांचे गैरव्यवहार समोर येत असताना आयुक्त म्हणून कारवाई करायचे सोडून त्यांना पाठीशी घालण्याचे काम तुम्ही करता, हे चालणार नाही.

जात दाखले देण्यासाठी जादा कर्मचारी

$
0
0
दहावी व बारावीच्या परीक्षांच्या निकालांनंतर रहिवास, उत्पन्न व जातीचे दाखले काढण्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन नागरी सुविधा केंद्रात जादा कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहेत. बारावीचे निकाल लागल्यानंतर या दाखल्यांसाठी गर्दी वाढू लागली आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images