Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

शेट्टी हत्याः दहाजणांची पॉलिग्राफिक टेस्ट

$
0
0
माहिती अधिकार चळवळीतील कार्यकर्ते सतीश शेट्टी यांच्या खून प्रकरणातील संशयित आरोपीसह 'आयआरबी' कंपनीचे वीरेंद म्हैसकर, नितीन साबळे यांच्यासह या प्रकरणी तपास केलेले जिल्हा ग्रामीणचे पोलिस अधिकारी आणि कर्मचारी असे मिळून दहा जणांची पॉलिग्राफ टेस्ट करण्यास कोर्टाने बुधवारी परवानगी दिली.

सांगलीचा श्रीधर बेंदे राज्यात सर्वप्रथम

$
0
0
'महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदे'तफेर् घेण्यात येणाऱ्या माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यातून सांगलीचा श्रीधर बेंदे (२९० गुण) शहरी विभागातून तर कोल्हापूरचा कपिल मेथे (२८२ गुण) ग्रामीण भागातून सर्वप्रथम आला.

सिद्दिकी 'एटीएस'च्या जाळ्यात

$
0
0
जर्मन बेकरीत बॉम्बस्फोट झाला त्या सायंकाळी दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या परिसरातही बॉम्बस्फोट घडविण्याचा प्रयत्न करणारा महंमद कातिल सिद्दिकी उर्फ सज्जन उर्फ साजन उर्फ शहजादा सलीम (वय २७, रा. बिहार) याला दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) बुधवारी दिल्ली येथे ताब्यात घेतले.

बुद्धपौर्णिमेला होणार वन्य प्राण्यांची गणना

$
0
0
जंगलामध्ये किती प्राणी राहतात, त्यांची संख्या वाढली अथवा कमी झालेले कसे कळते, मानवी हस्तक्षेपाचा त्यांच्या अस्तित्वावर परिणाम होतो का? अशा प्रश्नांची उत्तरे हवी असतील तर बुद्धपौर्णिमेच्या प्रगणनेचा अनुभव घेतलाच पाहिजे.

'तारीख पे तारीख'वर हायकोर्टाने टाकला प्रकाश

$
0
0
कामकाजाची क्लिष्ट पद्धत आणि तारीख पे तारीखच्या सिलसिल्यामुळे दोन ते पाच वषेर् या कालावधीत प्रलंबित असलेल्या केसेसचे प्रमाण सध्या ३१ टक्के आहे.

छत्रपतींच्या पुतळ्यावर छत्र उभारणार

$
0
0
'रायगडावरील छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या संरक्षणासाठी लवकरच छत्र उभारण्यात येणार आहे,' अशी घोषणा सातारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली.

नैराश्यातून शेतकऱ्याची आत्महत्या

$
0
0
कर्जाच्या बोजाने हैराण झालेल्या देवराष्ट्रे येथील शेतकरी हिंदुराव शामराव महिंद (वय ४५) यांनी विष पिऊन आत्महत्या केली आहे.

राष्ट्रवादीच्या अरिफ कांचवाला यांचा राजीनामा

$
0
0
पुणे महापालिकेच्या निवडणुकीत उमेदवारी नाकारल्याने आणि स्वीकृत सदस्य म्हणूनही डावलण्यात आल्याने राष्ट्रवादी काँगेसच्या अल्पसंख्याक सेलचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य आरिफ कांचवाला यांनी पदाचा राजीनामा दिला आहे.

पतंगरावांना 'राष्ट्रवादी'ची ऑफर

$
0
0
मुख्यमंत्रीपदाच्या रांगेमध्ये बराच काळ 'वेटिंग' वर असलेले काँग्रेसचे वनमंत्री पतंगराव कदम यांची अस्वस्थता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि केंदीय कृषीमंत्री शरद पवार यांनी अचूकपणे हेरली आणि पतंगरावांची अस्वस्थता जरूर दूर करू असे सांगत त्यांना राष्ट्रवादीत येण्याचे खुले आमंत्रण दिले.

जुन्या रिक्षांच्या ई-मीटरसक्तीचा श्रीगणेशा

$
0
0
जुन्या रिक्षांना लागू झालेल्या इलेक्ट्रॉनिक मीटरच्या सक्तीचा बुधवारी 'श्रीगणेशा' झाला. गेल्या आठवड्यात फिटनेस टेस्ट (योग्यता चाचणी) घेतलेल्या एका रिक्षाला इलेक्ट्रॉनिक मीटर बसविण्यात आला. आतापर्यंत शहरातील सुमारे साडेतीनशे नव्या रिक्षांना इलेक्ट्रॉनिक मीटर बसला आहे.

'एच.ए.'साठी पॅकेजचे आश्वासन

$
0
0
हिंदुस्थान अँटिबायोटिक्स (एच. ए.) कंपनीच्या आर्थिक स्थैर्यासाठी केंद सरकारने पुन्हा पुनर्वसन पॅकेज देण्याची तयारी दर्शविली आहे, अशी माहिती एच. ए. मजदूर संघाचे सरचिटणीस अरुण बोऱ्हाडे यांनी दिली. त्यासाठी संघटनेच्या अध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे या प्रयत्नशील असल्याचेही बोऱ्हाडे यांनी सांगितले.

प्रभारी आयुक्तपदी जोशी

$
0
0
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रभारी आयुक्तपदी 'पीएमपीएमएल'चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आर. एन. जोशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

कुलमुखत्यारपत्राचा होतोय गैरवापर

$
0
0
कुलमुखत्यारपत्राचा गैरवापर करत कॅनरा बँकेतून सुमारे २० कोटी रुपयांचे कर्ज काढणारे दास इलेक्ट्रॉनिक्सच्या मालकांसह कॅनरा बँकेच्या अधिकाऱ्यांविरुद्ध लष्कर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिल्लीत मराठी झेंडा

$
0
0
विज्ञानाकडून अध्यात्माकडे जाण्याचा मार्ग 'त्यांना' ज्या संस्थेत दिसला, त्या संस्थेला आता देशाला महासत्ता बनवण्याच्या वाटचालीत सहभागी करून घेण्याची धुरा त्यांच्या खांद्यावर आली आहे.

दुष्काळी दौरा इमेज बिल्डिंगपुरता नको

$
0
0
कॉंग्रेसचे युवराज राहुल गांधी यांनी दुष्काळग्रस्त तालुक्यांचा केलेला दौरा दुष्काळग्रस्तांना फायद्याचा ठरायला हवा. केवळ 'इमेज बिल्डिंग'साठी त्याचा उपयोग होता कामा नये, अशी अपेक्षा व्यक्त करत, मतदारसंघापुरते मर्यादित झालेले पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांचे राजकारण आणि ढिम्म प्रशासन यामुळेच दुष्काळ वाढला असल्याची टीका विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी रविवारी केली.

अण्णांची सभा जेमतेम

$
0
0
सक्षम लोकायुक्त विधेयकाच्या मागणीसाठी राज्यातील ३५ जिल्ह्यांच्या दौ-यावर निघालेले ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दुस-या राऊंडची पहिली सभा महाराष्ट्र दिनी शिर्डीत घेतली खरी; पण या सभेकडे लोकांनी पाठच फिरवली.

'शरद असता तर पंतप्रधान झाला असता'

$
0
0
'चव्हाणसाहेब, तुम्ही आधी पंतप्रधानपदाची शपथ घ्या आणि नंतर बहुमत सिद्ध करा..., तुमच्या जागी 'शरद' असता, तर आतापर्यंत पंतप्रधान झाला असता.....' मोरारजीभाई देसाई यांचे सरकार कोसळल्यानंतर खुद्द तत्कालीन राष्ट्रपती नीलम संजीव रेड्डी यांनी दिवंगत नेते यशवंतराव चव्हाण यांना पंतप्रधान बनण्याची विनंती केली होती.

'पुण्यासारख्या जिल्ह्यातही कुपोषण ही बाब शरमेची'

$
0
0
'विद्येचे माहेरघर अशी ओळख असलेल्या पुण्यासारख्या प्रगत जिल्ह्यातील काही गावांमध्ये आजही कुपोषित बालकांचे प्रमाण पाहायला मिळते, ही मोठी शरमेची बाब आहे,' अशी खंत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली.

चक्राकार वाहतूक प्रयोग

$
0
0
झेड ब्रिजवरून (काकासाहेब गाडगीळ पुलावरून) येणाऱ्या वाहतुकीमुळे केळकर रस्त्यावरील चौकात होणारी वाहतूक कोंडी कमी व्हावी, म्हणून या ठिकाणी राबवण्यात येणाऱ्या चक्राकार वाहतूक प्रयोगासाठी पुणेकरांकडून अवघ्या दोन सूचना आल्या आहेत.

भाज्या अद्यापही महागच

$
0
0
गेल्या महिनाभरापासून महाग झालेल्या बहुतेक भाज्यांचा 'भाव' अजूनही कायम आहे. काकडी, भेंडी आणि गवार स्वस्त झाली आहे. टोमॅटोचे भाव कडाडले असून, त्याचा किलोचा भाव ४० रुपयांच्या घरात पोहोचला आहे. आवक घटल्यानेच भाज्यांचे भाव उतरत नसल्याचे व्यापा-यांचे म्हणणे आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>