Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

निवासी उपजिल्हाधिका-यांची नियुक्ती काही तासांत स्थगित

$
0
0
'लाभाच्या पदां'साठी होणारी रस्सीखेच पुण्याच्या निवासी उपजिल्हाधिकारीपदासाठीही सुरू असून, या पदासाठी झालेली नियुक्ती काही तासांतच स्थगित करण्यात आली आहे. निवासी उपजिल्हाधिकारी अनिल पवार यांचा कार्यकाळ संपल्याने त्यांची बदली होणार आहे.

सहायक पोलिस आयुक्तांच्या बदल्या

$
0
0
पुणे शहर पोलिस दलातील सहायक पोलिस आयुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. विष्णू माने यांची सहायक पोलिस आयुक्तपदी (प्रशासन) बदली करण्यात आली आहे.

कुंपणानेच खाल्ले शेत

$
0
0
नऊ वर्षे महानगरपालिकेचा लाखो रुपयांचा प्रॉपर्टी टॅक्स बुडविणाऱ्या, पालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या प्रमुखांच्या पत्नीने अनधिकृत बांधकाम केल्याचे समोर आले आहे.

दापोडी ST वर्कशॉप भरतीमध्ये गोंधळ

$
0
0
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एस.टी) दापोडी वर्कशॉपमध्ये सहायक पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना ऑनलाइन अर्जातील गोंधळामुळे नोकरीची संधी गमावण्याची वेळ आली आहे.

सात बांगलादेशी मुलींची सुटका

$
0
0
बांगलादेशातून वेश्याव्यवसायासाठी पुण्यात आणलेल्या सात मुलींची पुणे पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाने सुटका केली. यात सहा अल्पवयीन मुलींचा समावेश आहे. या कारवाईत सातजणांना अटक करण्यात आली आहे.

संजयला प्रतिदिन २५ रु. मजुरी

$
0
0
येरवडा जेलमध्ये शिक्षा भोगणाऱ्या संजय दत्तला दैनंदिन दिनचर्येचा भाग म्हणून कागदी पिशव्या बनविण्याचे काम शिकविण्यात येणार आहे. या कामातून त्याला प्रतिदिन २५ रुपये मजुरी मिळणार असल्याची माहिती जेलच्या सूत्रांनी दिली आहे.

'आयआयटी'चे कटऑफ जाहीर

$
0
0
'आयआयटी'च्या प्रवेशांसाठी आवश्यक असलेले बारावीच्या २० टक्के गुणांचे 'कट ऑफ' महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने अखेर शनिवारी जाहीर केले. त्यामुळे राज्यभरातील 'जेईई अॅडव्हान्स्ड'साठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांचा जीव भांड्यात पडला आहे.

नोटांवर आंबेडकरांचे छायाचित्र हवे

$
0
0
'अमेरिकेतील प्रत्येक राष्ट्रपुरुषाचे एका चलनावर छायाचित्र आहे; त्याप्रमाणेच भारतातही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचेही छायाचित्र नोटांवर छापावे,' अशी इच्छा नियोजन आयोगाचे सदस्य डॉ. नरेंद्र जाधव यांनी व्यक्त केली.

न नाटकाचा...

$
0
0
कॉलेज संपल्यानंतरही रंगभूमीशी संलग्न राहावं या हेतूनं काही कॉलेजातील विद्यार्थ्यांनी मिळून 'नाट्यमंडळ'ची स्थापना केली आहे. यामधील शुभारंभाचा प्रयोग नुकताच झाला.

अभिजात दर्जासंबंधीचा अंतिम अहवाल सादर

$
0
0
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याबाबतचा अंतिम अहवाल साहित्यिक रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने राज्य सरकारला सादर केला. 'मल्याळमला अभिजात भाषा म्हणून मान्यता देण्यापूर्वी एकदा नाकारण्यात आले होते.

'एलबीटी'च्या तरतुदी सोप्या करण्याचा प्रयत्न

$
0
0
उद्योजक व व्यापाऱ्यांच्या दृष्टीने जकातीपेक्षा स्थानिक संस्था कर (एलबीटी) हितकारक आहे. 'एलबीटी'मधील तरतुदी सोप्या आणि सुटसुटीत करण्याचा आमचा प्रयत्न राहील, अशी ग्वाही पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी वाकड येथे दिली.

नालेसफाईच्या कामाची आयुक्तांकडून पाहणी

$
0
0
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या क प्रभाग कार्यक्षेत्रातील नाले सफाईच्या कामांची पाहणी आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी शनिवारी केली. गवळीनगर येथील आळंदी दुर्वांकूर लॉन्स, सँडविक कॉलनी येथील राधानगरी सोसायटी ते सीएमई भिंतीपर्यंत असलेल्या नाल्याची पाहणी त्यांनी केली.

पिंपरी चिंचवडमध्ये जोरदार पाऊस

$
0
0
पिंपरी-चिंचवड परिसरात रविवारी सायंकाळी वादळी पाऊस झाला. या पहिल्याच पावसात भिजण्याचा अनेकांनी आनंद लुटला. तर, चिंचवडला झाडे कोसळण्याच्या दोन घटना घडल्या.

पालेभाज्या महागल्या, आवकही घटली

$
0
0
उन्हाळ्याला निरोप देताना भाज्यांची आवक कमी झाली असून, भाज्यांच्या दरातही वाढ झाली आहे. पाण्याच्या कमतरतेमुळे पालेभाज्यांचे दर वाढले आहेत. बाजारपेठेत आले, टॉमेटो, फ्लॉवर, कोबी, वांगे, मटारच्या किंमतीत वाढ झाली आहे.

औषध विक्रेत्यांचे होणार २४०० कोटींचे नुकसान?

$
0
0
केंद्र सरकारने नव्याने जाहीर केलेल्या 'ड्रग प्राइस कंट्रोल'मुळे (डीपीसी) देशातील साडेसात लाख औषध विक्रेत्यांचे 'मार्जिन' घटल्याने त्यांचे २४०० कोटी रुपयांचे नुकसान होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

लोकसहभागातून शहराचा विकास मुख्यमंत्र्यांचा विश्वास

$
0
0
'लोकसहभागातून कामे केली तरी पुण्यातील उद्याने, क्रीडा, नदी शुद्धीकरणासारखे अनेक प्रश्न सोडविता येणे शक्य असल्याने त्यामुळेच शहराचा विकास होऊ शकतो,' असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रविवारी व्यक्त केला.

किरकोळ वादातून तरुणाचा खून

$
0
0
उसने दिलेले वीस हजार रुपये परत न केल्याच्या भांडणातून तरुणाचा खून झाल्याचा धक्कादायक प्रकार येरवडा येथे शनिवारी रात्री घडला. या प्रकरणी पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगारावर खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.

प्रसारभारतीच्या परीक्षेत शाळकरी प्रश्नांची खैरात

$
0
0
'आकाशवाणी'मध्ये कित्येक वर्षांनंतर शेकडो पदे उपलब्ध झाल्याने प्रवेश परीक्षेची कसून तयारी केल्यानंतर प्रत्यक्षात मात्र उमेदवारांना शाळकरी प्रश्नांना सामोरे जावे लागले. परिणामी, या परीक्षाप्रक्रियेच्या गुणवत्तेवरच उमेदवारांनी प्रश्न उपस्थित केले.

खोटेपणाबद्दल तक्रार करणे तथ्यहीन

$
0
0
'आत्मचरित्र खोटे असते, असे बऱ्याचदा बोलले जाते. मात्र, मानवी व्यवहार संपूर्ण सत्य कधीच नसतो, त्यामुळे आत्मचरित्र खोटे असते, याबद्दल तक्रार करण्यामध्ये तथ्य नाही,' असे मत ज्येष्ठ समीक्षक डॉ. द. भि. कुलकर्णी यांनी व्यक्त केले.

चारा छावण्या पाऊस येईपर्यंत सुरू राहणार

$
0
0
पुण्यासह सातारा, सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये 'जलयुक्त गाव अभियाना'द्वारे लोकसहभागातून करण्यात आलेल्या कामांमुळे सुमारे ८.५४ टीएमसी पाणीसाठ्याची क्षमता वाढली असल्याचे सांगून, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पाऊस येईपर्यंत चारा छावण्या आणि टँकरने पाणीपुरवठा केला जाणार असल्याचे रविवारी जाहीर केले.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images