Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

खासगीकरणाच्या वाटांमध्ये माननीयांचाही वाटा

$
0
0
हॉस्पिटलसाठी इमारती बांधल्यानंतर पुरेसे मनुष्यबळ नसल्याचे कारण पुढे करत खासगीकरणाचा घाट घालण्यात पालिका प्रशासनासह माननीयांचाही मोठा वाटा असल्याचे स्पष्ट होत आहे.

सुनावणीत राऊतच्या समावेशासाठी अर्ज

$
0
0
सॉफ्टवेअर इंजिनीअर नयना पूजारी खून खटल्यातील मुख्य आरोपी योगेश राऊत फरार झाल्यानंतर त्याच्यावरील खटला वगळून कोर्टात सुरू असलेल्या सुनावणीत राऊतचा परत समावेश करण्यात करण्यासाठी कोर्टात सरकारी पक्षातर्फे अर्ज देण्यात येणार आहे.

हॉस्पिटल खासगीकरण धोरणाला काँग्रेसचा विरोध

$
0
0
ठराविक व्यक्ती आणि हॉस्पिटलच्या फायद्यासाठी काढण्यात आलेल्या टेंडरमुळे पालिकेचे ५० कोटी रुपयांहून अधिक नुकसान होणार आहे. टेंडरच्या अटी, शर्तींमध्ये सामान्य पुणेकरांचा विचार केलेला नाही.

तज्ज्ञांच्या मानधनात वाढ होणार?

$
0
0
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सेवेत मानधनावर कार्यरत असणाऱ्या डॉक्टरांच्या मानधनात साधारण दुपटीने वाढ करण्याचा प्रस्ताव आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी स्थायी समितीपुढे ठेवला आहे. येत्या चार जूनला होणाऱ्या सभेत यावर निर्णय अपेक्षित आहे.

दिल्लीपर्यंत... १.५ वर्षे तपास

$
0
0
गल्लीपासून दिल्लीपर्यंत... अविरत दीड वर्षे तपास केल्यानंतर अखेर नयना पुजारी खून खटल्यातील मुख्य आरोपी योगेश राऊत याला शिर्डीत पकडण्यात गुन्हे शाखेच्या टास्कफोर्सला यश आले.

'ज्ञानप्रबोधिनी'चे प्रवेश रद्द

$
0
0
पाचवीसाठी प्रवेश परीक्षा घेतल्यामुळे शिक्षणहक्क कायद्याचे (आरटीई) उल्लंघन झाल्याचा ठपका ठेवत जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाने ज्ञानप्रबोधिनी प्रशालेतील प्रवेश रद्द केले आहेत. तसेच, 'आरटीई'नुसार प्रवेश प्रक्रिया पुन्हा राबविण्याचा आदेशही बजाविण्यात आला आहे.

फरार योगेश राऊत पुन्हा गजाआड

$
0
0
नयना पुजारी या सॉफ्टवेअर इंजिनीअर विवाहितेवर बलात्कार करून तिचा निर्घूण खून करणाऱ्या योगेश राऊतला गुन्हे शाखेच्या दरोडा प्रतिबंधक विभागाने शिर्डी येथे शुक्रवारी सकाळी अटक केली.

पत्नीच्या नावे १३ फ्लॅट्स

$
0
0
महानगरपालिकेत उपायुक्त पदावर काम करणाऱ्या एका अधिकाऱ्याच्या पत्नीच्या नावावर एक नव्हे तर चक्क १३ फ्लॅट असल्याची माहिती समोर आली आहे.

पाकविरोधात अफगाणिस्तान आक्रमक

$
0
0
पाकिस्तानपुरस्कृत मूलतत्त्ववाद आणि कट्टरतावाद ही अफगणिस्तानपुढील प्रमुख आव्हाने आहेत. त्यामुळे भारताकडून आम्हाला सहकार्य अपेक्षित आहे, असे प्रतिपादन अफगाणिस्तानचे माजी उपाध्यक्ष अहमद झिया मसूद यांनी शुक्रवारी केले.

डेक्कन क्वीन झाली ८३ वर्षांची

$
0
0
वक्तशीर असलेल्या 'तिच्या' येण्याकडे सर्वांचे डोळे लागले होते... तिच्यावर मनापासून प्रेम करणारे आबालवृद्ध तिची वाट पाहत उभे होते... ऑर्केस्ट्रा, हार-तुरे अशी जय्यत तयारी झाली होती... ती वेळेवर आली, तसा जल्लोष सुरू झाला अन् 'हॅपी बर्थ डे'ची धून सुरू झाली! निमित्त होते डेक्कन क्वीनच्या ८३ व्या वाढदिवसाचे.

'गाव तेथे पोल्ट्री'चा संकल्प

$
0
0
'सहकारातून समृद्धीकडे' हा यशाचा मंत्र जपत नऊ वर्षांपूर्वी मावळ अॅग्रो प्रॉडक्ट लिमिटेडची स्थापना झाली. त्यानंतर पहिल्या पाच वर्षांत २५ पोल्ट्री, पुढील साडेचार वर्षांत ५०० आणि आता उर्वरित पाच महिन्यांत एक हजार पोल्ट्री व्यवसाय सुरू करून दशकपूर्ती साजरा करण्याचा निश्चय करण्यात आला आहे.

'डीपी'चा अहवाल स्वीकारू नये

$
0
0
'पालिकेच्या जुन्या हद्दीच्या विकास आराखड्याबाबत (डीपी) राज्य सरकारला पाठविलेल्या अहवालात अनेक त्रुटी आहेत. त्यामुळे सरकारने हा अहवाल स्वीकारू नये, तसेच सरकारला खोटी माहिती पुरविणाऱ्यांची चौकशी करावी,' अशी मागणी पुणे बचाव समितीच्या वतीने करण्यात आली.

महिलांच्या अवैध व्यापाराची चौकशी करा

$
0
0
इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) महिलांचा अवैध व्यापार सुरू असून या संदर्भातील आंतरराष्ट्रीय कायद्यांचा (अँटी ट्रॅफिकिंग) वापर करून या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने शनिवारी करण्यात आली आहे.

'डीपी'विरोधी जनजागृतीसाठी आजपासून नोंदणी अभियान

$
0
0
शहराला बकाल करणाऱ्या विकास आराखड्याविरोधात (डीपी) जनमत जागृत करण्यासाठी भारतीय जनता पक्षातर्फे आज, रविवारपासून हरकती नोंदणी अभियान सुरू करण्यात येणार आहे. डीपीतील आरक्षणावर पक्षातर्फे महाचर्चाही घेण्यात येणार आहे.

२५० बसअभावी पीएमपी प्रवाशांचे हाल

$
0
0
ठेकेदारांची देणी थकल्याने 'पीएमपी'च्या ताफ्यातील सुमारे अडीचशे बस शनिवारी रस्त्यावर येऊ शकल्या नाहीत. अपुऱ्या बससंख्येमुळे हाल सहन करणाऱ्या प्रवाशांच्या समस्यांमध्ये यामुळे आणखीनच भर पडली.

'डीपी'तील कालव्याची जागा बदलणा-यांवर कारवाई करा

$
0
0
शहराच्या नवीन विकास आराखड्यात (डीपी) पुणे विद्यापीठाच्या हद्दीतून जाणाऱ्या कालव्याची जागा बदलण्याचा 'उद्योग' प्रशासनाने केला आहे. ठराविक व्यक्तींच्या फायद्यासाठीच हा प्रकार करण्यात आला असून पालिका आयुक्तांनी याला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी नगरसेवक संजय बालगुडे यांनी केली आहे.

होलसेल विक्रेत्यांची औषध खरेदी बंद

$
0
0
औषध विक्री दुकानांत एकापेक्षा जास्त फार्मासिस्ट नेमण्याची सक्ती आणि अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) कारवाईचा निषेध करण्यासाठी पुण्यासह राज्यातील होलसेल विक्रेत्यांनी उद्या, सोमवारपासून (३ जून) औषधांची खरेदी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

ट्रान्सपोर्ट हमाली दरात २४ टक्क्यांनी वाढ

$
0
0
मोटार वाहतुकीमधील भराई, वाराई आदी प्रकारच्या हमालीच्या दरात २४ टक्क्यांनी दरवाढ करण्यात आली आहे. शनिवारपासून याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे.

विजेच्या धक्क्याने बालकाचा मृत्यू

$
0
0
एमएससीबीच्या उघड्या डीपी बॉक्सच्या विजेच्या धक्क्यामुळे एका चार वर्षांच्या बालकाचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (१ जून) सकाळी साडेदहाच्या सुमारास चिखली, मोरेवस्ती येथे घडली. गोपाळ भरत शिंदे (वय ४ वर्षे, रा. चिखली) असे मृत्युमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे.

बदल्या झाल्या; पण पर्यायी कर्मचारी नाहीत

$
0
0
जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या करण्यात आल्या असल्या, तरी अद्याप तेथे पर्यायी कर्मचाऱ्यांची नेमणूकच करण्यात आलेली नाही. त्यामुळे, आधीच गोंधळाची परिस्थिती असलेल्या कार्यालयात आता अनागोंदी माजली आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images