Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

तळीराम ड्रायव्हरमुळे वानवडीमध्ये थरार

0
0
बेदरकारपणे एसटी बस चालवून आठ जणांचा बळी घेतलेल्या संतोष मानेची घटना स्मरणात असतानाच ‘पीएमपी’च्या एका तळीराम ड्रायव्हरने बुधवारी दुपारी वानवडीमध्ये असाच थरार केला. मात्र, प्रसंगावधान राखून वाहतूक पोलिसांनी बस रोखल्याने संभाव्य अनर्थ टळला.

वादग्रस्त नकाशाविषयी मागविला खुलासा

0
0
दहावीच्या भूगोलाच्या पुस्तकामध्ये वादग्रस्त नकाशा छापून आल्याप्रकरणी संबंधितांकडून खुलासा मागविण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळातर्फे या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी बुधवारी एक बैठक बोलविण्यात आली होती.

खूनप्रकरणी आर्किटेक्ट दोषी

0
0
आपल्या ऑफिसमधील रिसेप्शनिस्ट महिलेचे अपहरण करुन तिचा खून केल्याप्रकरणी आर्किटेक्ट संतोष भुकनला बुधवारी कोर्टाने दोषी ठरविले. शुक्रवारी, २४ मे रोजी शिक्षा सुनावण्यात येणार आहे.

राज्य सरकारकडून दूध दरवाढीला मंजुरी

0
0
राज्यातील सर्व सहकारी आणि खासगी दूध संघाच्या गायीच्या दूधात दोन रुपये, तर म्हशीच्या दुधात तीन रूपयांनी वाढ करण्यास राज्य सरकारने बुधवारी मंजुरी दिली. या दरवाढीमुळे गाईचे दूध ३२ रूपयांना तर म्हशीच्या दूधासाठी ४३ रूपये मोजावे लागणार आहे.

उत्पादन शुल्कातही अनिय‌मितता

0
0
राज्य सरकारच्या महसुलामध्ये प्रमुख वाटा असलेल्या राज्य उत्पादन शुल्काच्या वसुलीमध्येही अनियमितता आढळून आली आहे.

स्वसंरक्षणाच्या प्रशिक्षणाला ‘ब्रेक’

0
0
पालिका प्रशासन आणि महिला बालकल्याण समितीमध्ये एकवाक्यता नसल्याने महानगरपालिकेच्या वतीने युवतींना स्वसंरक्षणासाठी दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षणाला ब्रेक लागला आहे.

गर्दी टाळण्यासाठीच संजयबाबत पाळली गुप्तता

0
0
पाच वर्षांपूर्वी संजय दत्तला मुंबईहून पुण्याला हलविण्यात आले होते, त्यावेळी चाहत्यांनी आणि माध्यमांनी केलेल्या गर्दीची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून गुप्तता पाळण्यात आल्याचे अप्पर पोलिस महासंचालक मीरा बोरवणकर यांनी बुधवारी सांगितले.

हरित लवादाचा पालिकेला ग्रीन सिग्नल

0
0
नदीसुधार प्रकल्पांतर्गत पर्यावरणवाद्यांचे आक्षेप फेटाळत राष्ट्रीय हरित लवादाने पुणे महापालिकेच्या बाजूने बुधवारी निकाल दिला. त्यामुळे नदीपात्रातील सुधारणांसह सांडपाणी वाहिन्यांचे रखडलेले काम मार्गी लागणार आहे.

‘सेट’ने राखले उत्तरांचे वैविध्य

0
0
राज्यस्तरीय पात्रता परीक्षेतील (सेट) बहुपर्यायी प्रश्नांत एकच बरोबर पर्याय देण्याच्या धोरणाला काही विषयतज्ज्ञांनीच हरताळ फासल्याचे उघड झाले आहे. या परीक्षेतील बारा प्रश्नांना दोन बरोबर उत्तरांचे पर्याय दिल्याचे त्यांनी म्हटले आहे.

भीक मागण्यासाठी ‘पौर्णिमा’ पुन्हा रस्त्यावर

0
0
उपासमार आणि उन्हाचा त्रास झाल्यामुळे आजारी पडलेल्या ‘पौर्णिमा’ हत्तिणीवर योग्य वेळी उपचार करून वन्यप्राणीप्रेमी, डॉक्टर आणि वनाधिकाऱ्यांनी तिला वाचवले. पण भवितव्य कोर्टाच्या हाती असल्यामुळे जगण्यासाठी ‘पौर्णिमा’वर पुन्हा भीक मागायची वेळ आली आहे.

NDA देणार हायटेक प्रशिक्षण

0
0
‘लष्करात वापरल्या जाणा-या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे शिक्षण राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत (एनडीए) शिकणाऱ्या छात्रांना देण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

गोष्टीचे पुस्तक दिवसाला रुपया...

0
0
गोष्टीचे पुस्तक दिवसाला रुपया, तर एनसायक्लोपिडिया दिवसाला दहा रुपये; पुस्तकांची ही फी आहे वारज्यातील श्रीराम सोसायटीतील प्रथमेश अपार्टमेंटमधील मुलांनी चालविलेल्या मुलांसाठीच्या लायब्ररीची.

‘ट्रॅक’वर प्लास्टिक बंदी!

0
0
रेल्वे ‘ट्रॅक’वर प्लास्टिकच्या पिशव्या आणि अन्य वस्तू टाकणाऱ्या प्रवाशांवर आता दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. ‘ट्रॅक’वर सांडपाणी सोडणाऱ्या सोसायट्यांनाही रेल्वे प्रशासन नोटीस बजावणार आहे.

दोन हजार घरांत वॉटर मीटर

0
0
शहराला मीटरद्वारे अखंडित पाणीपुरवठा करण्याच्या योजनेंतर्गत सुरुवातीच्या टप्प्यात दोन हजार घरांमध्ये वॉटर मीटर बसणार आहेत. सहकारनगर आणि राजस सोसायटी या भागातील रहिवाशांच्या घरांत पुढील सहा महिन्यांमध्ये मीटरद्वारे पाणी येणार आहे.

संजूबाबा कैदी नंबर १६६५६

0
0
मुंबईतील १९९३च्या बॉम्बस्फोटप्रकरणी शिक्षा भोगत असलेला अभिनेता संजय दत्त याला मुंबईच्या आर्थर रोड तुरुंगातून येरवडा कारागृहात गुप्तपणे हलविण्यात आले.

निवडणूक कामांतून शिक्षकांची सुटका नाही

0
0
शिक्षकांकडे अशैक्षणिक कामे सोपविण्यात येऊ नयेत असे परिपत्रक काढण्यात आले असले, तरी निवडणुकीच्या कामांमधून शिक्षकांची सुटका नसल्याचे स्पष्ट झाले आहे. सुटीच्या दिवशी किंवा शैक्षणिक कामे नसलेल्या दिवशी शिक्षकांना निवडणुकीची कामे करावी लागणार आहेत.

'सेट'ने राखले उत्तरांचे वैविध्य

0
0
राज्यस्तरीय पात्रता परीक्षेतील (सेट) बहुपर्यायी प्रश्नांत एकच बरोबर पर्याय देण्याच्या धोरणाला काही विषयतज्ज्ञांनीच हरताळ फासल्याचे उघड झाले आहे. या परीक्षेतील बारा प्रश्नांना दोन बरोबर उत्तरांचे पर्याय दिल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे या दोनपैकी कोणतेही उत्तर दिलेल्यांना गुण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पुणे स्टेशनातील हाणामाऱ्यांना चाप

0
0
रेल्वेच्या जनरल डब्यामध्ये जागेवरून होणाऱ्या हाणामाऱ्यांना आता चाप लागणार असून, वर्दळीच्या फ्लॅटफॉर्मवर पोलिसांचा चोख पहारा राहणार आहे. तसेच, पोलिसांच्या 'टीम'कडून भुरट्या चोरांवरही नजर ठेवली जाणार आहे.

घरफोडी करणाऱ्या चोरट्याला अटक

0
0
पुणे शहर आणि परिसरात घरफोड्या करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला विश्रांतवाडी पोलिसांनी अटक केली आहे. लखन उर्फ अमर दशरथ जोगदंड (वय २२, रा. साठेनगर, ता. अंबाजोगाई, बीड) याला अटक करण्यात आली आहे.

बाल वाचनालयाला पुस्तकरूपी शाब्बासकी

0
0
वारजे येथील मुलांच्या छोटेखानी वाचनालयाच्या कल्पनेचे कौतुक म्हणून मेहता पब्लिशिंग हाउसने या मुलांना पन्नास पुस्तकांचा संच भेट म्हणून दिला. वाचनालयासाठी मिळालेल्या पुस्तकांच्या या भेटीचे अप्रूप वाटून मुलेही हरखून गेली होती.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images