Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

‘पे अँड पार्क’ अन्यायकारकच

$
0
0
फक्त प्रमुख रस्त्यांवर ‘पे अँड पार्क’ म्हणता म्हणता सर्व गल्लीबोळात ‘पे अँड पार्क’ कधी सुरू होईल, हे कळणारही नाही. सत्तेच्या जोरावर महापालिकेतील समित्या काहीही करू शकतात.

पुण्याच्या मेट्रो प्रकल्पावर केंद्राचा अभ्यास सुरू

$
0
0
शहराच्या मेट्रो रेल्वे प्रकल्प अहवालाचा नगरविकास मंत्रालयातर्फे अभ्यास सुरू आहे. तसेच, इतर संबंधित मंत्रालयांकडेही हा अहवाल पाठविण्यात आला असून, त्यांच्या प्रतिसादानंतर मंत्रालय त्याला मान्यता देईल, असे केंद्रीय नगरविकास मंत्री कमलनाथ यांनी स्पष्ट केले आहे.

डॉक्टरसह ३१ जणांची फसवणूक

$
0
0
वैष्णोदेवी, जम्मू-काश्मीर सहलीसाठी एका डॉक्टरसह त्याच्या ३१ सहकाऱ्यांची १० लाख ७१ हजार ५०० रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पौड पोलिसांनी एकाला अटक केली आहे.

डॉक्टरच्या वेशात महिलेची लूट

$
0
0
डॉक्टरच्या वेशात येऊन इंजेक्शन देण्याच्या बहाण्याने एका महिलेकडील अडीच तोळ्यांचे दागिने चोरून नेले. थेरगाव येथील बिर्ला हॉस्पिटलमध्ये हा प्रकार घडला.

सरकारी मदत नसेल तरच ‘आरटीई’तून सूट

$
0
0
सरकारकडून कोणत्याही प्रकारची मदत घेतली नाही हे अल्पसंख्याक विनाअनुदानित शाळांनी सिद्ध केले, तरच त्यांना शिक्षण हक्क कायद्यातील आरक्षणाच्या अंमलबजावणीतून सूट मिळेल.

करिअरच्या दृष्टीने विद्यार्थ्यांसाठी ‘दिशा दर्शन’ ठरणार मार्गदर्शक

$
0
0
मुलांनी आठवीची परीक्षा दिली की लगेचच करिअरसाठी पालकांपासून काका-मावशांचे सल्ले सुरू होतात. इंजिनीअरिंग नको मेडिकलला जा, बँकेची नोकरी पण चांगली असते, सैन्यात जाण्यासाठी आवड हवी...

दक्षता न बाळगल्यास १९६२ ची पुनरावृत्ती

$
0
0
भारत आणि चीनमध्ये होणा-या चर्चेत पारदर्शकता असायला हवी. या चर्चेतील मुद्द्यांबाबत जनतेला विश्वासात घेतले गेले पाहिजे. नाही तर १९६२ सारखी परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ शकते, अशी भीती ‘एनडीटीव्ही’चे संपादक (संरक्षण) नितीन गोखले यांनी बुधवारी व्यक्त केली.

पुणेकरांनी अनुभवले विषम वातावरण

$
0
0
उन्हाचा चटका, ढगाळ हवामानामुळे अंशतः दिलासा आणि पुन्हा उन्हाची तीव्रता अशा विषम वातावरणाचा अनुभव पुणेकरांनी गेल्या दोन दिवसांत घेतला आहे. मंगळवारी सहा अंशांनी घसरून ३४ अंशांवर स्थिरावलेल्या पाऱ्यात बुधवारी पुन्हा तीन अंशांची वाढ झाली.

चोरट्यांच्या निशाण्यावर कलाकार

$
0
0
घरफोड्या आणि चोऱ्यांचा फटका अनेकदा नामवंत कलाकारांनाही बसला असून कलाकारांच्या घरात झालेल्या चोरीत मुद्देमालासह अनमोल असे पुरस्कार चोरीला जाण्याच्या घटनाही घडल्या आहेत. चोरट्यांचा माग काढण्यात मात्र पोलिस अपयशी ठरल्याचे दिसते.

सराईत गुन्हेगार तावडीत

$
0
0
चेन्नई -मुंबई एक्स्प्रेसमध्ये चो-या करणा-या एका सराईत गुन्हेगाराला पुणे लोहमार्ग पोलिसांनी अटक केली आहे. त्याला २४ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

स्वयंचलित व्हॉल्व्ह ३ वर्षांपासून वापराविना

$
0
0
एसएनडीटी येथील जलकेंद्रात पाण्याच्या दोन टाक्यांसाठी खरेदी करण्यात आलेले तीन स्वयंचलित व्हॉल्व्ह तीन वर्षांपासून वापराविना पडून आहेत.

झाडे जगवा; अन् पैसे कमवा

$
0
0
रस्ते आणि कालव्याच्या कडेने दुतर्फा वनराई फुलविण्यासाठी सरकारने नवी योजना हाती घेतली आहे. या झाडांचे संगोपन करण्याची जबाबदारी गावकऱ्यांवरच सोपविण्यात येणार असून त्यापोटी या कुटुंबांना रोजगारही मिळणार आहे.

‘डीआयईटीं’साठी १२४ कोटी रुपये

$
0
0
राज्यातील ३३ जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थांसाठी (डीआयईटी) केंद्र सरकारने १२४ कोटींचा निधी उपलब्ध केला आहे. त्यासोबतच बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे एक तालुका शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था (बीआयईटी) सुरू करण्यासाठीही मान्यता दिली आहे.

फ्लॅट देण्याच्या बहाण्याने फसवणूक

$
0
0
स्वस्त दरात चांगल्या ठिकाणी फ्लॅट खरेदी करुन देतो, असे आमिष दाखवून साडेचार लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी एकाला अटक केली. त्याला कोर्टाने २६ मेपर्यंत कोठडी सुनावली.

वादग्रस्त बांधकाम पाडले

$
0
0
धनकवडी पुण्याईनगर येथील वादग्रस्त इमारतीचे बांधकाम अतिक्रमण विभागाने बुधवारी पाडून टाकले. या बांधकामावर करण्यात आलेल्या कारवाई नंतर खबरदारीचा उपाय म्हणून बांधकाम विभागाचे अतिरिक्त नगर अभियंता विवेक खरवडकर यांच्या कार्यालयाबाहेर सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली होती.

गंगा येणार अंगणी...

$
0
0
दुष्काळात पाणीटंचाईचा सामना कराव्या लागलेल्या गावांमध्ये पुन्हा ही परिस्थिती उद्भवू नये, म्हणून उभ्या राहिलेल्या दीड हजार सिमेंट बंधाऱ्यांच्या साखळीत येत्या पावसाळ्यामध्ये तब्बल सव्वाचार कोटी घनमीटर अधिक पाणी साठणार आहे.

घरफोडी करणा-या महिलेला अटक

$
0
0
पतीच्या मदतीने पुणे शहर आणि उपनगरात घरफोडी करणाऱ्या एका सराईत महिला आरोपीला डेक्कन पोलिसांनी अटक केली आहे. तिला कोर्टात हजर करण्यात आले असता, तिला २५ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

खुलला निवेदनाचा रौप्यमहोत्सवी प्रयोग

$
0
0
गेली अनेक वर्षे तीच-तीच गाणी गायली जातात. अशा वेळी निवेदन खुसखुशीत आणि खुमासदार करावं लागतं. त्याचवेळी निवेदन हा कार्यक्रमातला महत्त्वाचा भाग असला, तरी तो मुख्य भाग नाही, हे भान ठेवावं लागतं.

एरंडवणे, रास्ता पेठेत २ घरफोड्या

$
0
0
रास्ता पेठेतील स्वामी समर्थ अपार्टमेंटमध्ये चोरट्यांनी फ्लॅट फोडून पावणे तीन लाख रुपयांचा ऐवज चोरला. या प्रकरणी समर्थ पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल झाला आहे.

पाली विभागासाठी सहा प्राध्यापक

$
0
0
पुणे विद्यापीठातील पाली विभागाचे बळकटीकरण करण्यासाठी दोन प्राध्यापकांसह चार सहयोगी प्राध्यापकांच्या नियुक्तीला राज्य सरकारने हिरवा कंदील दाखविला आहे. या निर्णयामुळे विभागातील संशोधन कार्याला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images