Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

हायवेंवरील ‘ढाब्यां’चे आरोग्य धोक्यात

$
0
0
पुणे-मुंबई, पुणे-सातारा-कोल्हापूर, सोलापूर तसेच नगर हायवेवर असणाऱ्या ढाब्यांचा पारंपरिक ‘लूक’ बदलला असला तरी बहुतांश ढाब्यांमध्ये स्वच्छतेचा अभाव असल्याचे प्राथमिक निरीक्षण नोंदविण्यात आले आहे.

गोल्डमॅन फुगेंकडून खंडणी उकळणा-यांना अटक

$
0
0
भोसरी येथील ‘गोल्डन मॅन’ दत्ता फुगे यांच्याकडून ६१ लाख ५० हजार रुपयांची खंडणी उकळणाऱ्या अशोक कोतवाल (वय ३५) आणि मनोज कोतवाल (वय ३०) यांना गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने मंगळवारी अटक केली. कोतवाल बंधुंनी फुगे यांना पिस्तुलाच्या धाकाने धमकावल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

‘एलबीटीमधून अपेक्षेहून जास्त महसूल मिळेल’

$
0
0
‘एलबीटी’च्या नोंदणीमधून २० मे अखेरपर्यंत महानगरपालिका प्रशासनाला ४१ कोटी ६७ लाख रूपयांचा महसूल मिळाला आहे. तीन हजार २९३ व्यापाऱ्यांनी हा कर पालिकेकडे भरला आहे.

‘आरटीओं’मधूनही महसुलाची गळती

$
0
0
नव्याने नोंदणी केलेल्या प्रवासी व मालवाहू वाहनांपैकी तब्बल सव्वा लाख वाहनांच्या योग्यता प्रमाणपत्रांचे नूतनीकरण न केल्यामुळे राज्याच्या विविध ‘आरटीओं’मधून कोट्यवधी रुपयांच्या महसुलाचा फटका बसल्याचे ‘कॅग’च्या अहवालात उघडकीस आले आहे.

बापटांच्या वादग्रस्त विधानाचे ‘जीबी’त पडसाद

$
0
0
पाणीवापराबाबत पुणेकरांवरच टीका करणारे भारतीय जनता पक्षाचे आमदार गिरीश बापट यांच्या वक्तव्याचा पालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंगळवारी काँग्रेसच्या सभासदांनी निषेध केला. बापट यांच्या निषेधाच्या घोषणा यावेळी देण्यात आल्या.

...त्यापेक्षा ‘पीएमटी’च बरी!

$
0
0
‘पीएमपीएमएलपेक्षा पालिकेची स्वतंत्र परिवहन सेवाच बरी होती. कंपनी रद्द करून पुन्हा पीएमटी सुरू करा’, असा आग्रह सर्वपक्षीय सदस्यांनी मंगळवारच्या सर्वसाधारण सभेत धरला.

खासगी क्षेत्रच पीएमपीला तारेल

$
0
0
पीएमपीचा ९५ टक्के खर्च पगार आणि इंधनावर होतो. त्यामुळे, देखभाल-दुरुस्तीसह इतर सुविधा पुरविण्यावर मर्यादा येतात. त्यामुळे, पीएमपीतील सुधारणेसाठी खासगी सहभाग आवश्यकच असल्याचे स्पष्ट प्रतिपादन महापालिका आयुक्त महेश पाठक यांनी मंगळवारी केले.

ताम्हिणी अभयारण्यावर शिक्कामोर्तब

$
0
0
जैववैविध्याने समृद्ध असलेल्या ताम्हिणीला अभयारण्याचा दर्जा देणारी अधिसूचना काढून राज्य सरकारने अभयारण्यावर शिक्कामोर्तब केले आहे.

अपंगत्वाचे सर्टिफिकेट 'ऑनलाइन'

$
0
0
प्रमाणपत्रांच्या ‘बोगस’गिरीला आळा घालण्यासाठी सुरू केलेल्या अपंगांच्या ‘ऑनलाइन’ सर्टिफिकेट यंत्रणेत झालेला बिघाड दुरुस्त करण्यात आला आहे. त्यामुळे अंपगत्वाचे ऑनलाइन सर्टिफिकेट देण्यास पुन्हा सुरुवात झाली आहे.

गंज पेठेत भिंत कोसळली

$
0
0
गंज पेठ परिसरातील मासेआळीत मंगळवारी दुपारी नवीन सार्वजनिक शौचालयाचा पाया खोदताना जुन्या शौचालयाची भिंत कोसळून एक कामगार ठार झाला; तर पाच कामगार जखमी झाले. सरफुद्दीन माणिकसाहब शेख (वय ५०) असे मृत्युमुखी झालेल्या कामगाराचे नाव आहे.

श्याम भूतकर यांच्या घरात चोरी

$
0
0
ज्येष्ठ रंगकर्मी आणि नेपथ्यकार श्याम भूतकर यांच्या कोथरूड येथील घरी सोमवारी दुपारी चोरी झाली. चोरट्यांनी सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह त्यांना ‘रावसाहेब’ चित्रपटासाठी मिळालेले लाखमोलाचे रजत कमळही चोरून नेले. पोलिसांचा स्थानिकांवर संशय असून त्यादृष्टीने तपास सुरू झाला आहे.

भूगोलचे अभ्यास मंडळ बरखास्त

$
0
0
दहावीच्या भूगोलाच्या पुस्तकात अरुणाचल प्रदेश वगळून भारताचा नकाशा छापल्याप्रकरणी संबंधित दोषी कर्मचाऱ्याच्या निलंबनासोबतच भूगोल विषयाचे अभ्यास मंडळही मंगळवारी बरखास्त करण्यात आले.

आजपासून दूध दरवाढ

$
0
0
राज्यातील सर्व सहकारी आणि खासगी दूध संस्थांच्या गायीचे दूध प्रतिलिटर दोन रुपयांनी, तर म्हशीचे दूध तीन रुपयांनी महागले आहे. आजपासून (बुधवार) ही दरवाढ लागू होणार असून आता गायीचे दूध प्रतिलिटर ३२ रुपये तर म्हशीचे दूध प्रतिलिटर ४३ रुपये झाले आहे.

संजूबाबाचा मुक्काम येरवडा तुरुंगात

$
0
0
मुंबईतील १९९३च्या बॉम्बस्फोट खटल्यातील ‘खलनायक’ बॉलिवूड अभिनेता संजय दत्तचा ‘ऐषारामी’ तुरुंगवास आता पुण्याच्या येरवडा जेलमध्ये सुरू झाला आहे. मुंबईतल्या आर्थर रोड जेलमधून त्याला आज पहाटे गुपचूप येरवड्याला नेण्यात आलं आहे.

‘ढाब्यां’चे आरोग्य धोक्यात

$
0
0
पुणे-मुंबई, पुणे-सातारा-कोल्हापूर, सोलापूर तसेच नगर हायवेवर असणाऱ्या ढाब्यांचा पारंपरिक ‘लूक’ बदलला असला तरी बहुतांश ढाब्यांमध्ये स्वच्छतेचा अभाव असल्याचे प्राथमिक निरीक्षण नोंदविण्यात आले आहे.

साहित्यात केवळ गटबाजी

$
0
0
‘कलेच्या इतर प्रकारांमध्ये असणारी गुरु-शिष्य परंपरा साहित्यात मात्र दिसत नाही. साहित्यात संप्रदायाऐवजी केवळ गटबाजी दिसते. गुरुशिष्याची परंपरा साहित्यात जोवर मानली जात नाही, तोवर मराठी साहित्य समृद्ध होणार नाही,’ अशी टीका माजी संमेलनाध्यक्ष डॉ. द. भि. कुलकर्णी यांनी बुधवारी केली.

साताराः एव्हरेस्टवीर प्रियांका

$
0
0
सातारच्या आशीष माने याने हिमालयातील ल्होत्से शिखरावरील यशस्वी चढाई केल्याची घटना ताजी असतानाच, सातारकर प्रियांका मंगेश मोहिते या २१ वर्षीय युवतीनेही जगातील सर्वाधिक उंचीचे माउंट एव्हरेस्ट सर करत ‘सर्वोच्च’ कामगिरी बजावली आहे. बुधवारी सकाळी ११ वाजता तिने एव्हरेस्टवर पाऊल ठेवले.

‘स्किझोफ्रेनिया’विषयी जनजागृती हवी

$
0
0
स्किझोफ्रेनिया दिवसानिमित्त २४ मे रोजी ‘स्किझोफ्रेनिया अवेअरनेस असोसिएशन’ने जनजागृती व्याख्यानाचे आयोजन आयोजन केले आहे. त्यानिमित्त स्किझोफ्रेनिया या आजाराविषयी आणि संस्थेच्या कार्याविषयी...

जीव जातो अॅम्ब्युलन्सअभावी...

$
0
0
‘रेल्वे ट्रॅक’ ओलांडताना जायबंदी झालेल्या प्रवाशांना हॉस्पिटल्समध्ये अॅडमिट करण्यासाठी अॅम्ब्युलन्स वेळेत उपलब्ध होत नसल्याची वस्तुस्थिती आहे. वेळेवर उपचार न मिळाल्याने काही अपघातग्रस्तांना जीव गमवावा लागला आहे.

व्यापारी महासंघाच्या दुर्लक्षाने ‘बंद’मधून बाहेर पडलो

$
0
0
आमच्या मागण्यांचा व्यापारी महासंघाने विचार न केल्यानेच बंदमधून बाहेर पडल्याचे पूना मर्चंट्स चेंबरचे अध्यक्ष अजित सेटिया यांनी मंगळवारी स्पष्ट केले. व्यापाऱ्यांतील फुटीमुळेच बंद लांबल्याचा दावाही त्यांनी केला.
Viewing all 75772 articles
Browse latest View live


Latest Images