Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

भारदे यांच्या विचारांचे स्मरण

0
0
गांधीवादी विचारवंत, संतसाहित्याचे अभ्यासक आणि राजकारणी कै. बाळासाहेब भारदे यांच्या जयंतीनिमित्त ‘बाळासाहेब भारदे प्रतिष्ठान’च्यावतीने २५ मे रोजी संध्याकाळी साडेपाच वाजता कोथरूडच्या गांधीभवनामध्ये संस्थेच्या वेबसाइटचे प्रकाशन होणार आहे.

पावसाळ्याच्या तोंडावर प्रशासनाला जाग

0
0
पावसाळा सुरू होण्यास अवघे दहा दिवस उरलेले असताना महापालिका प्रशासनाला पावसाळी कामांची आठवण झाली आहे. शहराच्या विविध भागांतील या कामांसाठी नऊ कोटी रूपयांच्या कामाला मंगळवारी स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.

‘एमकॉम’चा पेपर पुढे ढकलला

0
0
पुणे विद्यापीठाच्या एमकॉम, एमसीए आणि एमकॉम, ई-कॉमर्सच्या विद्यार्थ्यांचा येत्या शुक्रवारी (२४ मे) होणारा पेपर पुढे ढकलण्यात आला आहे. सीए होण्यासाठी महत्त्वाची असणा-या ‘आयपीसीसी’च्या शुक्रवारी होणाऱ्या पेपरच्या पार्श्वभूमीवर हा बदल करण्यात आला आहे.

प्यारेलाल फसवणूकप्रकरणी आणखी दोघांना अटक

0
0
ज्येष्ठ संगीतकार प्यारेलाल शर्मा यांच्या लोणावळ्याजवळील वरसोली गावातील जमीन फसवणूकप्रकरणी लोणावळा पोलिसांनी आणखी दोघांना अटक केली आहे. त्यांना मंगळवारी शिवाजीनगर कोर्टात हजर करण्यात आले.

लोकलमधून पडल्याने आकुर्डीतील युवकाचा मृत्यू

0
0
कामशेत- मळवली लोहमार्गादरम्यान धावत्या लोकलमधून पडून एका युवकाचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (२० मे) रात्री पावणे आकराच्या दरम्यान कामशेत रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे गेट क्रमांक ४२ येथे घडली.

चॉइस नंबरच्या हौसेला फीवाढीने ‘ब्रेक’

0
0
वाहनाच्या ‘चॉइस’ नंबरच्या फीमध्ये तिप्पट वाढ केल्यानंतर मात्र, वाहनमालकांच्या हौसेला ‘ब्रेक’ लागला आहे. गेल्या चार दिवसांत पुण्यातून केवळ १२ वाहनमालकांनी ‘चॉइस’ नंबरसाठी नोंदणी केली आहे.

बारटक्के हॉस्पिटलच्या खासगीकरणाला विरोध

0
0
वारजे माळवाडी येथे महापालिकेने उभारलेल्या कै. अरविंद बारटक्के हॉस्पिटलचे खासगीकरण करण्याचा घाट घातला जात आहे. खासगीकरण केल्यास भारतीय जनता पार्टीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भाजपाच्या वैद्यकीय आघाडीच्या वतीने डॉ. राजेंद्र खेडेकर यांनी दिला आहे.

बांधकामे पूर्ण करा; नंतर प्रस्ताव द्या

0
0
‘ससून हॉस्पिटलच्या आवारात बांधण्यात येत असलेल्या अकरा मजली इमारतीचे बांधकाम पूर्ण करून ती वापरात आणा आणि त्यानंतर नवे प्रस्ताव सरकारला द्या,’ अशा शब्दांत वैद्यकीय शिक्षण खात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव आनंद कुलकर्णी यांनी ससून हॉस्पिटलला सूचना केली.

जैवविविधता मंडळाकडून वारसा स्थळांची यादी

0
0
पश्चिम घाटाला युनेस्कोने दिलेल्या ‘वर्ल्ड हेरिटेज साइट’ या मानांकनाची प्रेरणा घेऊन राज्याच्या जैवविविधता मंडळानेही आता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात लपलेल्या वारसा स्थळांची यादी करणे सुरू केले आहे. स्थानिक लोकांच्याच सहभागातून या वारसा स्थळांचे संवर्धन होणार आहे.

वेतनासाठी हवे आधार कार्ड

0
0
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी आधार क्रमांक दिल्याशिवाय मे महिन्याचे वेतन दिले जाणार नसल्याचा आदेश राज्य सरकारने काढल्याने सुमारे १७ हजार कर्मचाऱ्यांना वेतनासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

श्रमसंस्कारातून होतेय ‘खडकवासला’ गाळमुक्त

0
0
खडकवासला धरणातील गाळ काढण्यासाठी पुणे विद्यापीठाचा राष्ट्रीय सेवा योजना विभाग, ग्रीन थंब आणि अॅमनोरा पार्क टाउनतर्फे आयोजित श्रमसंस्कार महाशिबिराच्या कामाला मंगळवारी उत्साहात सुरुवात झाली.

हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी वेबसाइट

0
0
हरवलेल्या मुलांची माहिती एकत्रित करण्याच्या उद्देशाने लता एज्युकेशन सोसायटीतर्फे www.missingpersons-India.in ही वेबसाइट सुरू केली आहे.

रिसर्च सेंटर लॅबचा ‘ससून’चा प्रस्ताव

0
0
औंध येथे डेंटल कॉलेज, नवे कॅथलॅब, कॅन्सर इन्स्टिट्यूटसह डॉक्टरांना संशोधनाला वाव मिळावा यासाठी ‘बी. जे. मेडिकल रिसर्च सेंटर लॅब’ सुरू करण्याचा प्रस्ताव वैद्यकीय शिक्षण खात्याला देण्याचा निर्णय ससून हॉस्पिटल प्रशासनाने घेतला आहे.

‘धांगडधिंगा’ ही आपली संस्कृती नाही

0
0
‘जागतिकीकरणानंतर कलेचा रंग एक होत असला, तरी धांगडधिंगा करत बेभान होणे ही आपली संस्कृती नाही. मन ताळ्यावर ठेवून कला जोपासणे ही आपली खरी संस्कृती आहे,’ असे मत ज्येष्ठ रंगकर्मी कीर्ती शिलेदार यांनी व्यक्त केले.

‘सेल्फ फायनान्स स्कूल्स’साठी २ हजार ४१६ संस्था पात्र

0
0
राज्यातील दोन हजार ४१६ शैक्षणिक संस्थांना ‘सेल्फ फायनान्स स्कूल्स अॅक्ट’ नुसार स्वयंअर्थसहाय्यित शाळा सुरू करण्याची परवानगी मिळाली आहे. त्यानुसार या संस्थांना कोणत्याही शासकीय अनुदानाशिवाय शाळा सुरू करण्याचा मार्ग आता खुला झाला आहे.

स्वच्छतागृहात पार्टिशनच नाही

0
0
लष्कर परिसरातील बिशप्स स्कूलमध्ये विनापार्टिशन स्वच्छतागृहे असल्याप्रकरणी लष्कर पोलिसांकडे तक्रार करण्यात आली असून याप्रकरणी बालहक्काची पायमल्ली केल्याअंतर्गत शाळेवर कारवाई करावी, असे पत्र शिक्षण विभागामार्फत पोलिसांना पाठविण्यात आले आहे.

इलेक्शन ड्यूटीतून शिक्षकांची सुटका नाही

0
0
शिक्षकांकडे अशैक्षणिक कामे सोपविण्यात येऊ नयेत, असे परिपत्रक काढण्यात आले असले, तरी निवडणुकीच्या कामांमधून शिक्षकांना सुटका नसल्याचे स्पष्ट झाले आहे. सुटीच्या दिवशी किंवा शैक्षणिक कामे नसलेल्या दिवशी शिक्षकांना निवडणुकीची कामे करावी लागणार आहेत.

सेंट्रल बिल्डिंगला आग

0
0
वीजवाहिन्यांमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने मध्यवर्ती शासकीय इमारतीमध्ये (सेंट्रल बिल्डिंग) सोमवारी आग लागली. कर्मचाऱ्यांनी आग प्रतिबंधक उपकरणांचा वापर करून ती तातडीने आटोक्यात आणली. परंतु, या प्रकारामुळे कर्मचारी आणि नागरिकांमध्ये काही काळ घबराट पसरली होती.

वेश्या व्यवसायास प्रवृत्त करणा-या दलालांना कोठडी

0
0
वडगाव शेरी येथील ला ग्लोरिओसा या उच्चभ्रू सोसायटीमध्ये टाकण्यात आलेल्या छाप्यात तीन मुलींना वेश्या व्यवसाय करण्यास प्रवृत्त केल्याचे उघडकीस आले होते. या प्रकरणी तीन दलालांना मंगळवारी कोर्टात हजर करण्यात आले होते.

पुनर्मूल्यांकन गुण वाढवल्याप्रकरणी १२ जणांवर गुन्हा दाखल

0
0
पुणे विद्यापीठातील २१ विद्यार्थ्यांचे पुनर्मूल्यांकनात गुण वाढविल्याप्रकरणी चतुःश्रृंगी पोलिसांनी बारा जणांवर कोर्टात चार्जशीट दाखल केले आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images