Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

‘रेल्वे कटिंग’चे सतराशे बळी

0
0
पायी जाण्याचे थोडेसे अंतर आणि वेळ वाचविण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून रेल्वे रूळ ओलांडणारे प्रवासी आपल्या आयुष्याचेच अंतर कमी करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. पुणे-सातारा व पुणे-सोलापूर या मार्गांवर दर दोन दिवसांमागे तीन प्रवासी रुळ ओलांडताना मृत्युमुखी पडत आहेत.

बेशिस्त वाहतुकीवर ‘मोबाइल व्हॅन’ची नजर

0
0
मद्यपान करून वाहन चालविणे, वेगमर्यादेचे उल्लंघन... काळ्या काचांवर कारवाई अशा प्रकारच्या मोहिमा वाहतूक पोलिसांना सातत्याने घेता याव्यात, नियम तोडणा-या वाहनचालकांवर कारवाई करता यावी, यासाठी वाहतूक पोलिसांनी मोबाइल व्हॅनचा उपक्रम राबवण्याचे निश्चित केले आहे.

तोतया पोलिसाला तीन वर्षांची शिक्षा

0
0
पोलिस असल्याची बतावणी करून चार तोळे सोन्याचा ऐवज चोरून नेणाऱ्याला तीन वर्षे सक्तमजुरी आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी के. के. चाफळे यांनी ही शिक्षा सुनावली. मोहसीन शब्बीर इराणी (वय २९, रा. शिवाजीनगर, रेल्वे स्टेशन झोपडपट्टी) असे आरोपीचे नाव आहे.

फिक्सिंगच्या निषेधार्थ खेळाडूंची बस अडविली

0
0
आयपीएलमध्ये झालेल्या स्पॉट फिक्सिंग प्रकरणाचा निषेध करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या मावळ तालुक्यातील कार्यकर्त्यांनी रविवारी (१९ मे) गहुंजे स्टेडिअम येथे सामन्यासाठी आलेल्या खेळाडूंच्या दोन बस रोखून निदर्शने केली. आमदार बाळा भेगडे यांच्या नेतृत्त्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

दुष्काळ हटविण्यास हवी दीर्घकालीन उपाययोजना

0
0
‘भोर-वेल्हे तालुक्यामध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या फारशी नसली, तरी दुष्काळात ग्रामीण व शहरी भागातील पाण्याची टंचाई कायमस्वरूपी दूर करण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजनांची आवश्यकता आहे,’ असे मत पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल कवडे यांनी व्यक्त केले.

पंचायतीच्या मागण्यांबाबत प्रधान सचिवांना निवेदन

0
0
पुणे व सातारा जिल्हा श्रमिक संघाने जिल्हा परिषदेकडे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या केल्या आहेत. त्या मागण्यांबाबतचे पत्र प्रधान सचिवांना जिल्हा परिषदेने नुकतेच पाठविले आहे.

बनावट पत्राच्या प्रकरणावर पडदा

0
0
महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉ. प्र. चिं. शेजवलकर यांच्या सहीचे खोटे पत्र सादर केल्याप्रकरणी माजी प्रमुख कार्यवाह प्रा. मिलिंद जोशी यांचा राजीनामा परिषदेच्या कार्यकारिणीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला.

उमेदवारांनी घेतला राज्यसेवा परीक्षेकडून धडा

0
0
नेहमीपेक्षा अवघड राज्यसेवा पूर्व परीक्षेचा अनुभव घेतलेले स्पर्धा परीक्षांचे उमेदवार आता त्याहीपेक्षा कठीण परीक्षेची तयारी करीत आहेत. कारण राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि या पूर्वी झालेली पोलिस उपनिरीक्षक पदासाठीची मुख्य परीक्षा पाहता, यापुढचा टप्पा याहीपेक्षा अवघड असण्याची शक्यता आहे.

‘कात्रज’च्या दोघांचा गुजरातेत विषबाधेने मृत्यू

0
0
दूध प्रक्रियेचे प्रशिक्षण घेण्यासाठी पुण्याहून आणंदला गेलेल्या बारा कर्मचाऱ्यांपैकी दोघांचा अन्नातून विषबाधा झाल्याने मृत्यू झाल्याचे रविवारी सकाळी उघडकीस आले. हे कर्मचारी कात्रज दूध डेअरीचे आहेत.

विद्यापीठ उपकेंद्र उभारणीला धक्का

0
0
पुणे विद्यापीठाला जागा देताना कोणतीही सवलत मंजूर न करता बाजारभावानुसार तब्बल ५० कोटी रुपयांचा मोबदला मागण्यात आल्याने पिंपरी-चिंचवड परिसरासह ग्रामीण पुण्यातील विद्यार्थ्यांसाठी सुविधा केंद्र उभारण्याच्या विद्यापीठाच्या नियोजनाला धक्का बसला आहे.

एक्स्प्रेसवेवर अपघात;२ ठार,७ जखमी

0
0
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर कामशेत बोगद्याजवळ मारुती कार आणि बोलेरो जीपच्या अपघातात कारमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला असून, सातजण जखमी झालेत.

... आणि तो स्वतःच अडकला

0
0
बहिणीच्या आंतरजातीय विवाहाला विरोध करणाऱ्या भावाने बदल्याच्या भावनेतून नावडत्या मेव्हण्यासाठी कट रचला खरा परंतु, तो कट त्यांच्या अंगावर उलटला. या उच्चशिक्षित तरुणाच्या करिअरचे वाटोळे होवू नये, म्हणून पोलिसांनाच त्याची दया आली आणि सक्त ताकीद देऊन त्याची सुटका केली.

वळवाच्या पावसाची पुण्याकडे पाठ

0
0
चढत्या भाजणीने रोज वाढणारा उन्हाचा तडाखा आणि अंगाची लाही लाही करणारा उकाडा यांमधून तात्पुरती सुटका करणाऱ्या वळवाच्या पावसाने पुणे आणि मुंबईकडे पाठ फिरवल्याचे दिसते.

TDRचा पुन्हा 'कालवा'

0
0
खडकवासला धरणाच्या मुठा डावा कालव्याच्या कोट्यवधी रुपयांच्या हस्तांतरणीय विकास हक्काचा (टीडीआर) विषय यापूर्वी वादग्रस्त ठरला असतानाच आता जुन्या व नव्या मुठा उजव्या कालव्यालगतच्या ७३ एकर मोकळ्या जमिनीचा टीडीआर मिळण्याचा प्रस्ताव जलसंपदा विभागाने पुणे महापालिकेला दिला आहे.

आषाढी वारीचा कार्यक्रम

0
0
श्री संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थान आणि संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने आषाढी वारीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी ३० जूनला, तर संत तुकाराम महाराजांचा पालखी २९ जूनला पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे.

एक्स्प्रेस वेवर ट्रेलर उलटला

0
0
पुणे-मुंबई एक्सप्रेस वेवर अमृतअंजन पुलाजवळ ट्रेलर उलटून झालेल्या अपघातात चालक गंभीर जखमी झाला असून, अपघातामुळे मुंबईकडे जाणारी वहातूक दोन तास ठप्प झाली होती.

प्रभावी कलाप्रस्तुती

0
0
प्रभावी कलाप्रस्तुतीविरासत संगीत महोत्सवाची सांगता सुचिष्मीता आचार्य यांचं बासरीवादन आणि पं यादवराज फड यांच्या सुरेल गायनानं झाली...

सासवडच्या वाघ डोंगरासाठी ४ कोटींचा निधी

0
0
सासवडचा वाघ डोंगर परिसरासाठी चार कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करून, त्याचा विकास करण्यासाठी वनविभागाने पुढाकार घेतला आहे, त्याचप्रमाणे आता पुरंदर किल्ला व जेजुरी गड परिसरसुद्धा पर्यटन स्थळ विकसित केले जाणार आहे.

भोरमध्ये ५१ जोडप्यांचा बिगरहुंडा विवाह

0
0
अनंतराव थोपटे गौरव समितीच्या वतीने अयोजित केलेल्या सर्वधर्मीय बिगरहुंडा सामुदायिक विवाह सोहळ्यात ५१ जोडप्यांचे विवाह झाले. आमदार संग्राम थोपटे यांनी राजगड ज्ञानपीठ व राजगड साखर कारखान्याच्या सहकार्याने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

बगॅसच्या विजेची दरवाढ नाही

0
0
साखर कारखान्यांमधील उसाच्या चिपाडापासून उत्पादन होणाऱ्या (को जनरेशन) विजेच्या दरात वाढ देता येणार नाही, असा निकाल राज्य वीज नियामक आयोगाने नुकताच दिला आहे. त्यामुळे या विजेस प्रतियुनिट ४ रुपये ७९ पैसे इतकाच दर कायम राहणार आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images