Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

वैधता प्रमाणपत्र जोडण्याची सक्ती 'सामाजिक न्याय'

0
0
मेडिकल, इंजिनीअरिंग यासह विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या राखीव जागांवर प्रवेश घेताना जात वैधता प्रमाणपत्र जोडण्याची सक्ती सामाजिक न्याय विभागानेच केली असल्याचे समोर आले आहे. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली.

अफगाणला हवीय भारतीय लष्कराची

0
0
'अफगाणिस्तान आणि भारतासमोर दहशतवादाचे मोठे आव्हान उभे असून हा दहशतवाद संपविण्यासाठी भारताने आम्हाला लष्करी मदत द्यावी,' अशी अपेक्षा अफगाणिस्तानचे राजदूत शायदा महंमद अब्दाली यांनी शनिवारी व्यक्त केली.

तोतया पोलिसाला शिक्षा

0
0
पोलिस असल्याची बतावणी करून चार तोळे सोन्याचा ऐवज चोरून नेणाऱ्याला तीन वर्षे सक्तमजुरी आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी के. के. चाफळे यांनी ही शिक्षा सुनावली.

भोंदू महाराजाला अटक

0
0
हिंजवडीलगतच्या माण गावातील ३५ वर्षांची महिला व तिच्या दीड वर्षांच्या मुलीचा खून केल्याप्रकरणी शहर पोलिसांनी 'दत्तगुरू महाराज' नावाच्या भोंदूला अटक केली आहे.

संरक्षित क्षेत्रात चूक

0
0
पाषाण येथील 'हाय एनर्जी मटेरियल रिसर्च लॅबोरेटरी'च्या (एचईएमआरएल) हद्दीलगतचे संरक्षित क्षेत्र विकास आराखड्यात (डीपी) चुकीच्या पद्धतीने दाखविल्याचा आरोप पुणे बचाव समितीने शनिवारी केला आहे. दरम्यान, ही बाब तपासून घेण्यात येईल, असे महापालिकेच्या प्रशासनाने म्हटले आहे.

राष्ट्रवादीचा व्यापाऱ्यांना दम

0
0
महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि आरपीआयच्या पाठोपाठ आता पिंपरी- चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसनेही व्यापाऱ्यांच्या विरोधात रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे. बंदमध्ये सहभागी व्यापाऱ्यांनी उद्या, सोमवारपर्यंत (२० मे) बंद मागे घ्यावा, अन्यथा कुलूप तोडून दुकाने उघडण्यात येतील, असा इशारा राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष योगेश बहल यांनी दिला आहे.

'पारेषण'वर निष्क्रियतेचा ठपका

0
0
एकाच कंत्राटदाराला काम देणे, भूसंपादनाशिवाय कामे सोपविणे, निष्क्रीय उपकेंद्रे आणि पुरेशा परवानग्या न मिळविता कामे सुरू करणे, अशा सरधोपट कारभारामुळे महापारेषण कंपनीकडे सोपविलेल्या वीज पारेषणाच्या कामात महाराष्ट्र मागे राहिल्याचा ठपका महालेखापरीक्षकांच्या अहवालात ठेवण्यात आला आहे. हा विलंब कमी करणे शक्य होते, असाही शेरा या अहवालात मारण्यात आला आहे. या विलंबामुळे राज्याला कोट्यवधी रुपयांचा फटका बसला आहे.

पारा पुन्हा चढला

0
0
शहर आणि परिसरात शनिवारी उन्हाचा चटका पुन्हा वाढला असून, पारा ३८ अंशांवर पोहोचला. विदर्भात उष्णतेची लाट पसरली आहे. नागपूरमध्ये उच्चांकी ४७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

व्यापाऱ्यांमध्ये फूट

0
0
किराणा-भुसार आणि जीवनावश्यक वस्तूंच्या घाऊक व्यापाऱ्यांची पुणे मर्चंट्स चेंबर ही प्रमुख संघटना शनिवारी एलबीटीच्या विरोधातील 'बंद'मधून बाहेर पडली. येत्या सोमवारपासून (२० मे) मार्केट यार्डातील चारशे आणि पेठांमधील दुकाने सुरू होणार असून बंदमुळे हैराण झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार आहे.

रक्ताची माहीती एका क्लिकवर

0
0
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील रक्तपेढ्यांमध्ये कोणत्या गटाच्या रक्ताचा किती साठा आहे याची माहिती आता एका 'क्लिक'वर मिळणार आहे. त्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) स्वतंत्र वेबसाइट विकसित केली आहे.

आषाढी वारीचा कार्यक्रम जाहीर

0
0
श्री संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थान आणि संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने आषाढी वारीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी ३० जूनला तर, संत तुकाराम महाराजांचा पालखी २९ जूनला पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहेत.

पारा पुन्हा चढला

0
0
शहर आणि परिसरात शनिवारी उन्हाचा चटका पुन्हा वाढला असून, पारा ३८ अंशांवर पोहोचला. विदर्भात उष्णतेची लाट पसरली आहे. नागपूरमध्ये उच्चांकी ४७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

कुलगुरूंची टिप्पणी खेदजनक

0
0
कौशल्य विकास केंद्राची स्वीकारलेली जबाबदारी ही विद्यापीठाच्या हितासाठी आणि लौकिकास बाधा येऊ नये, म्हणून केलेली तडजोड असल्याचे पुणे विद्यापीठाच्या परीक्षा नियंत्रक डॉ. संपदा जोशी यांनी शनिवारी स्पष्ट केले.

पुण्यातील तरुणांच्या NGOचा गौरव

0
0
दहावीची परीक्षा संपली की कॉलेज लाइफची धमाल अनुभवायची.. बहुतांश मुलांचे हेच स्वप्न असते. पण, आकाश आणि त्याच्या मित्रांनी अवघ्या पंधरा वर्षांचे असताना ‘अॅक्शन फॉर पुणे डेव्हलपमेंट’ ही एनजीओ सुरू केली. विशेष म्हणजे, ‘गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड सक्सेस’ या आंतरराष्ट्रीय संस्थेने त्यांच्या कार्याची दखल घेतलेय.

जान मे 'दम'!

0
0
व्यायामाची सुरुवात थोडीशी अंग दुखवणारी असली, तरी त्यात सातत्य राखणं आवश्यक आहे. शारीरिक तंदुरुस्तीच्या मुख्य घटकांवर टाकलेली एक नजर...

हसू नको छद्मीपणे

0
0
" अरे गाढवा, पुस्तकाच कपाट आवरायला सांगितल होत मी तुला, कचरा पिशवीत कोंबायला सांगितल नव्हत," बाबा उमेशला रागावत म्हणाले. सर्वसाधारण घरातला नेहेमीचाच प्रसंग. पण उमेश चिडला होता. बाबा त्याला नेहेमी असच बोलायचे, घालूनपाडून, अपमानकारक, तुच्छतेने.

अभिनेता इमरान खान आपल्यावर बसेलल्या 'चॉकलेट

0
0
अभिनेता इमरान खान आपल्यावर बसेलल्या 'चॉकलेट हिरो'च्या शिक्क्याला कंटाळलाय. वेगवेगळ्या भूमिका करूनही हा शिक्का पुसला जात नाहीये. आगामी सिनेमात गँगस्टरची भूमिका केल्यानंतर तरी आपल्याला चॉकलेट हिरो म्हटलं जाणार नाही अशी त्याला आशा आहे.

सद्यःस्थितीत सामान्य माणूस अस्वस्थ डॉ

0
0
सध्याच्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीत सामान्य माणूस अस्वस्थ आहे. अशावेळी पुन्हा लेखन सुरू करावे वाटते, असे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी सांगितले.

पुणे-सातारा महामार्गावर अपघात

0
0
पुणे-सातारा महामार्गावरील शिंदेवाडी गावाच्या टोलनाक्यासमोर पुण्याकडून साताऱ्याकडे जाणाऱ्या दुचाकीला मालमोटारीने धडक दिल्यामुळे दुचाकीवरील योगेश बबन जाधव (वय २७) रा. खंडाळा यांचा जागीच मृत्यू झाला.

मुलासाठी 'त्यांनी' घेतला एकत्र येण्याचा निर्णय

0
0
घटस्फोटानंतर मुलाच्या निमित्ताने होणा-या भेटीमुळे त्यांनी पुन्हा एकत्र येण्याचा निर्णय घेतला खरा... मात्र, कोर्टकचेरीच्या कचाट्यामुळे नको ते कोर्ट अशी मानसिकता झालेल्या त्या दोघांना एकत्र येण्यास अडचण वाटत होती... फॅमिली कोर्टातील समुपदेशकांनी त्यांना सहा महिने लिव्ह इन मध्ये राहण्याचा पर्याय सुचविला... त्यामुळे तब्ब्ल चार वर्षांनी ते पुन्हा एकत्र येणार आहेत.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images