Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

नागरिकांच्या गैरसोयीची जाणीव, पण...

$
0
0
‘दुकाने बंद राहिल्याने नागरिकांचे हाल होत असल्याची जाणीव आहे. लोकांची गैरसोय करणे हा आंदोलनामागचा उद्देश नाही. ‘एलबीटी’तील जाचक तरतुदी वगळणे, नागरिकांवर दुहेरी बोजा टाकणारी करव्यवस्था सुधारणे, अशा न्याय्य मागणीच्या पूर्ततेसाठी सरकारविरोधातील ही लढाई आहे...’

‘दंडाची भाषा केल्यास कारवाईचा दंडुका’

$
0
0
दुकाने सुरू ठेवणाऱ्या व्यापाऱ्यांना दंडाची धमकी देणे, हे गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यास निमंत्रण ठरणार आहे. अशा प्रकारे कोणीही दंड आकारण्याची धमकी दिली, तर दंड न भरता पोलिस किंवा जिल्हा प्रशासनाकडे तक्रार करावी, असे आवाहन गुरुवारी प्रशासनाने केले आहे.

पुणेकर विद्यार्थ्यांचे उल्लेखनीय यश

$
0
0
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या पूर्वमाध्यमिक आणि माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षांचे निकाल गुरुवारी जाहीर झाले. पुण्यातील विद्यार्थ्यांनीही या परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश संपादित केले.

‘जात प्रमाणपत्रा’अभावी ‘एमसीए’ विद्यार्थी त्रस्त

$
0
0
राखीव जागांवर प्रवेश घेताना जात प्रमाणपत्राबरोबरच जात वैधता प्रमाणपत्रही जोडणे ‘तंत्रशिक्षण संचालनालया’ने (डीटीई) बंधनकारक केले आहे. या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करण्यास सुरूवात झाली आहे.

‘सीईटी’चा शेवट गोड

$
0
0
इंजिनीअरिंग आणि फार्मसी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी गुरुवारी घेण्यात आलेली राज्याची शेवटची ‘सीईटी’ सोपी होती. ही परीक्षा सोपी गेल्याने ‘कट ऑफ’ मात्र वाढण्याची शक्यता असून, चांगल्या कॉलेजांतील प्रवेशांसाठी यंदा चांगलीच चुरस असेल.

शिष्यवृत्ती ऑनलाइन... फेल!

$
0
0
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे शिष्यवृत्ती परीक्षांचा निकाल ऑनलाइन जाहीर करण्याचा निर्णय गुरुवारी फसला. परिषदेच्या www.mscepune.in या वेबसाइटवर हा निकाल उपलब्ध होण्यात अडचणी येत असल्याने निकाल नेमका पाहायचा तरी कुठे, अशी समस्या या परीक्षा दिलेल्या विद्यार्थी आणि पालकांसमोर उभी राहिली होती.

चुकीच्या नकाशाबद्दल निदर्शने

$
0
0
दहावीच्या भूगोलाच्या पुस्तकात भारताच्या नकाशामधून अरुणाचल प्रदेशाचा भाग वगळण्याच्या निषेधार्थ अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या पुणे शाखेने राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कार्यालयासमोर गुरुवारी निदर्शने केली.

डॉक्टरांना ‘एलबीटी’ नाही

$
0
0
किरकोळ ते बड्या व्यापाऱ्यांप्रमाणे राज्यातील हजारो डॉक्टरांना ‘एलबीटी’ लागू नसल्याचे स्पष्ट झाले आहे. ₨ चार लाखांपुढे उलाढाल असणाऱ्या डॉक्टरांना मात्र त्यांची नोंदणी करणे बंधनकारक केल्याने रेकॉर्ड द्यावे लागणार आहे.

ऑगस्टपर्यंत मिळेल पुरेसे पाणी

$
0
0
मान्सूनचे आगमन लांबले, तरी पुणेकरांना ऑगस्ट महिन्याच्या मध्यापर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा धरणांत राखीव ठेवण्यात आला आहे. गेल्या काही वर्षांचा मान्सूनचा अनुभव लक्षात घेता पाटबंधारे खात्याने पिण्याच्या पाण्यासाठी ही दक्षता घेतली आहे.

स्कॉलरशिपमध्ये मुलींची बाजी

$
0
0
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या पूर्वमाध्यमिक आणि माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षांमध्ये मुलींनी बाजी मारली. या परीक्षांच्या गुरुवारी जाहीर झालेल्या निकालांमध्ये पूर्वमाध्यमिक शिष्यवृत्तीत चार, तर माध्यमिक शिष्यवृत्तीत दोन मुलींनी सर्वाधिक गुण मिळवून, याही बाबतीत आपण मुलांच्या तुलनेत सरस असल्याचे दाखवून दिले आहे.

मनसे-व्यापारी आज आमने-सामने

$
0
0
‘एलबीटी’विरोधात व्यापाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे जीवनावश्यक वस्तू मिळवताना सर्वसामान्यांचे हाल होत असल्याने आजपासून (शुक्रवार) रस्त्यावर उतरण्याचा निर्णय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घेतला आहे.

लोणावळ्यात प्राध्यापकाची आत्महत्या

$
0
0
कौटुंबिक कलहाला कंटाळल्याने लोणावळ्यातील एका प्राध्यापकाने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. विश्वास दत्तात्रय कुंभार (वय ४५, नांगरगाव, लोणावळा) असे आत्महत्या केलेल्या प्राध्यापकाचे नाव आहे.

बहिःस्थ प्रवेशांबाबत फेरविचार

$
0
0
बहिःस्थ प्रवेशप्रक्रियेचे नियम बदलताना शैक्षणिक गुणवत्ता हाच मुख्य निकष डोळ्यासमोर ठेवण्यात आला आहे. त्यामध्ये कोणत्याही सामाजिक-आर्थिक घटकाचे नुकसान करण्याचा हेतू नाही. समाजातील सर्व घटकांचे मत लक्षात घेऊन बहिःस्थ प्रवेशांबाबत फेरविचार करण्यास आम्ही तयार आहोत, असे पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांनी स्पष्ट केले.

‘सीओईपी’च्या विद्यार्थ्यांचे ‘ईएमआर’ रेकॉर्ड तयार

$
0
0
पुण्याच्या ‘कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग’च्या (सीओईपी) होस्टेलवर राहात असलेल्या विद्यार्थ्यांचे ‘इलेक्ट्रॉनिक मेडिकल रेकॉर्ड’ (ईएमआर) तयार करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना हे रेकॉर्ड कुठूनही ‘ऑनलाइन’ पाहणे शक्य असल्याने भविष्यात पुढे कधी आजारी पडल्यास तज्ज्ञ डॉक्टरांकडून सल्ला घेताना उपचारांसाठी हे ‘रेकॉर्ड’ उपयोगी पडू शकणार आहे.

विद्यार्थ्यांवर अन्याय करण्यात ‘सामाजिक न्याय’ आघाडीवर

$
0
0
मेडिकल, इंजिनीअरिंग यासह विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या राखीव जागांवर प्रवेश घेताना जात वैधता प्रमाणपत्र जोडण्याची सक्ती सामाजिक न्याय विभागानेच केली असल्याचे समोर आले आहे.

परीक्षार्थी वाढल्याने ग्रामीण भागात केंद्रे

$
0
0
‘महाराष्ट्र लोकसेवा आयोगा’च्या (एमपीएससी) आज, शनिवारी होणाऱ्या पूर्वपरीक्षेला पुणे केंद्रातून ५४ हजार विद्यार्थी बसणार आहेत. विद्यार्थी संख्या वाढल्याने या परीक्षेसाठी प्रथमच ग्रामीण भागातही केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत.

बिशप्स स्कूलमध्ये २५ टक्के आरक्षणाचा आदेश

$
0
0
दि बिशप्स स्कूलच्या कॅम्प, कल्याणीनगर आणि उंड्रीमधील शाखांमध्ये शिक्षण हक्क कायद्यांतर्गत २५ टक्के आरक्षित जागांवरील प्रवेश राखून ठेवण्याचा आदेश मुंबई हायकोर्टाने शनिवारी दिला.

पूर्ववैमनस्यातून जुन्नरला तुफान दगडफेक

$
0
0
पूर्ववैमनस्यातून उद्‍भवलेल्या दंगलीत जुन्नरला दोन गटांकडून एकमेकांवर तुफान दगडफेक करण्यात आली. या घटनेत जुन्नरचे पोलिस निरीक्षक राजाराम परदेशी यांच्यासह सात जण जखमी झाले. या प्रकरणी पोलिसांनी १३ जणांना अटक केली आहे. ही घटना गुरुवारी रात्री घडली.

‘जेईई-मेन्स’धारकांना ‘ओएमआर’ मिळणार

$
0
0
यंदा ‘जेईई-मेन्स’ला बसलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या उत्तरपत्रिकेची (ओएमआर शीट); तसेच ‘आन्सर की’ आणि कॅलक्युलेशन शीटची छायाप्रत हवी असल्यास उपलब्ध होणार आहे. या परीक्षेचे संयोजन केलेल्या ‘केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळा’ने (सीबीएसई) याबाबतची अधिसूचना जारी केली आहे.

मेडिकलच्या जागा वाढविल्यास फी आवाक्यात

$
0
0
‘मेडिकल कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांसाठीच्या जागा कमी असून, त्या तुलनेत आवश्यक सुविधांवरील खर्च खूप जास्त आहे. त्यामुळे मेडिकल अभ्यासक्रमाची फी सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जात आहे. मेडिकल अभ्यासक्रमाच्या जागा वाढवून दिल्यास हा खर्च सर्वसामान्यांच्या आवाक्यात येऊ शकेल,’ अशी भूमिका ‘माईर्स एमआयटी’चे संस्थापक डॉ. विश्वनाथ कराड यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत मांडली.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images