Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

डिझेल घोटाळाप्रकरणी वकिलास कोठडी

$
0
0
रेल्वेच्या दहा कोटी रुपयांच्या डिझेल घोटाळ्यात सीबीआयच्या न्यायाधीशांना मॅनेज करण्यासाठी रेल्वेच्या लोको निरीक्षकाकडून २८ लाख ९५ हजार रुपये घेतल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला वकील आणि त्याच्या सहकाऱ्याला कोर्टाने गुरुवारी न्यायालयीन कोठडी सुनावली.

साखळीचोरांना मदत करणा-या महिलेला अटक

$
0
0
सोनसाखळी चोरणाऱ्या तरुणाकडून चोरीचे दागिने घेऊन गहाण ठेवल्याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी एका महिलेला अटक केली आहे. तिला कोर्टात हजर करण्यात आले असता १८ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

लैंगिक अत्याचार करून लहानग्याचा खून

$
0
0
आठ वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार करून, त्याचा खून केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी एका परप्रांतीय व्यक्तीस अटक केली आहे. बुधवारी (१५ मे) रात्री साडेबारानंतर चाकण येथील कडाची वाडी येथे हा प्रकार घडला.

भिलारेवाडीसाठी आता लक्ष पर्यावरणवाद्यांवर

$
0
0
शहराच्या नव्या व जुन्या हद्दीतील टेकड्यांवर जैववैविध्य उद्यानाच्या (बीडीपी) आरक्षणासाठी पुढाकार घेणारे पर्यावरणवादी व स्वयंसेवी संस्था भिलारेवाडीतील टेकड्या वाचविण्यासाठी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मिळकतींवरील करासाठी मंगळवारपासून धडक मोहीम

$
0
0
अनधिकृत बांधकाम किंवा बांधकाम परवानगी घेतानाच्या अटी-शर्तींचे उल्लंघन करून मिळकतींचा वापर सुरू करणाऱ्या मिळकतींना कर लावण्यासाठी प्रशासनातर्फे येत्या मंगळवारपासून (२१ मे) धडक मोहीम हाती घेतली जाणार आहे.

दोनशे होर्डिंगलाच परवानगी

$
0
0
शहरात उभारण्यात आलेल्या २०० होर्डिंग व्यावसायिकांचे अर्ज नियमांची पुर्तता केल्याने मंजूर करण्यात आले असून ५८६ होर्डिंगचे अर्ज अमान्य करण्यात आल्याचे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप यांनी सांगितले.

‘सिझेरियन’चे ऑडिट व्हावे

$
0
0
‘गरज नसताना सिझेरियन करणे, अन्य औषधोपचार उपलब्ध असतानाही गर्भायशाची पिशवी काढण्याची शस्त्रक्रिया करणे, असे प्रकार वाढू लागले आहेत. याचा विपरीत परिणाम महिलांच्या आरोग्यावर होत आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या शस्त्रक्रियांचे सोशल ऑडिट केले जावे,’ अशी मागणी शिवसेनेच्या प्रवक्त्या व आमदार डॉ. नीलम गो-हे यांनी केली.

वेटिंग लिस्ट तेराशेवर गेल्यास रेल्वे नवी गाडी सोडणार

$
0
0
सुट्ट्यांच्या मोसमात आरक्षणामध्ये वेटिंगची कटकट साऱ्याच प्रवाशांना सतावत असते. त्यात रेल्वेने मात्र आनंदाची बातमी दिली आहे. प्रवाशांची वेटिंग लिस्ट तेराशेपर्यंत गेल्यास नवीन विशेष गाडी सोडण्याची तरतूद रेल्वेने केली आहे. रेल्वेच्या प्रवाशांची गैरसोय होऊ नये, म्हणून रेल्वे बोर्डाकडून हे पाऊल उचलण्यात आल्याचे सांगण्यात आले.

बनावट पोलिस परवाना तयार करून फसवणूक

$
0
0
महाराष्ट्र सरकारचा बनावट पोलिस परवाना तयार करून विमाननगर भागातील कोणार्क कॅम्पस य भागातील सोसायट्यांना ३४ सिक्युरिटी गार्ड पुरवून सरकार आणि लोकांची फसवणूक केल्याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

न्यायालयीन लढाईद्वारे मिळविला फ्लॅट परत

$
0
0
बांधकाम व्यावसायिकांकडून नोंदणी केलेला फ्लॅट मिळावा म्हणून दाखल केलेल्या केसमध्ये जिल्हा ग्राहक मंचापुढे हार मानावी लागल्यानंतरही राज्य ग्राहक आयोगाकडे पाठपुरावा केल्यामुळे एका ग्राहकाला त्याचा फ्लॅट परत मिळणार आहे. या प्रकरणी श्रीकांत वसंत चोपडे (रा. धानोरी) यांनी महाराष्ट्र राज्य ग्राहक आयोगाकडे तक्रार केली होती.

दुष्काळी भागातील कामांसाठी मदत करण्याचे आवाहन

$
0
0
राज्यात पडलेल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जनकल्याण समितीतर्फे छोटे बंधारे, शेततळी तयार करणे, जुन्या जलस्रोतांची स्वच्छता करणे आदी दीर्घकालीन उपाययोजना हाती घेण्यात येणार आहेत.

कुटुंब नियोजनासाठी आता नुकसानभरपाई

$
0
0
कुटुंब नियोजनासाठी प्रोत्साहन दिले जात असताना त्या प्रकारच्या ऑपरेशनदरम्यान गुंतागुंत होऊन एखाद्या पेशंटचा मृत्यू झाल्यास त्यांच्या नातेवाइकांना नुकसानभरपाई देण्याचा निर्णय आरोग्य खात्याने घेतला आहे.

जिल्ह्यातील २३० खाणपट्ट्यांचे परवाने रद्द

$
0
0
जिल्हा प्रशासनाने घालून दिलेल्या मुदतीत जिल्ह्यातील खाणपट्ट्यांचे पर्यावरण ऑडिट न करणाऱ्या २३० खाणपट्ट्यांची परवानगी प्रशासनाने रद्द केली आहे. परवाने रद्द करण्याच्या नोटिसा संबंधित खाणपट्टे मालकांना बजावण्यात आल्या आहेत.

पाचगाव पर्वतीतील अतिक्रमण हटविणार

$
0
0
पाचगाव पर्वती वनक्षेत्रामध्ये झालेले अतिक्रमण हटविण्याची मोहीम सध्या वन विभागाने हाती घेतली आहे. सहकारनगर भागातील वनक्षेत्राच्या हद्दीतील १७ व्यक्तींवर गुन्हे दाखल करून वन विभागाने नोटिसा पाठविल्या आहेत.

‘एक हजार पोलिसांची भरती’

$
0
0
पुणे पोलिस आयुक्तालयाची हद्द वाढल्याने लवकरच पोलिस दलात १००० कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी दिली. शिवाजीनगर पोलिस मुख्यालयात पोलिस भरती प्रक्रियेचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी ही माहिती दिली.

‘बायोमेडिकल वेस्ट संकलनाचे माफक दर हवेत’

$
0
0
शहरातील दोन हजारांहून अधिक दवाखाने, हॉस्पिटलमधून जमा होणाऱ्या बायोमेडिकल वेस्टची (जैव वैद्यकीय कचरा) विल्हेवाट लावण्यासाठी माफक दर आकारण्यात यावेत, अशी मागणी डॉक्टरांसह जन आरोग्य मंचाने केली आहे.

टँकरवर अवलंबून २६ लाख नागरिक

$
0
0
दिवसेंदिवस वाढत चाललेला उन्हाचा तडाखा आणि आटलेल्या पाणीसाठ्यांमुळे पाण्यासाठी टँकरवर अवलंबून असलेल्या लोकसंख्येत गेल्या पंधरा दिवसांत एका लाखांनी वाढ झाली आहे. पुणे विभागात सध्या तब्बल २६ लाख नागरिक टँकरवर अवलंबून आहेत.

किरकोळ व्यापाऱ्यांमध्ये बंदमुळे अस्वस्थता

$
0
0
दुकाने सुरू ठेवणाऱ्या व्यापाऱ्यांना दंडाची धमकी देणे, हे गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यास निमंत्रण ठरणार आहे. अशा प्रकारे कोणीही दंड आकारण्याची धमकी दिली, तर दंड न भरता पोलिस किंवा जिल्हा प्रशासनाकडे तक्रार करावी, असे आवाहन गुरुवारी प्रशासनाने केले आहे.

ही कारवाई बेकायदेशीर

$
0
0
‘एलबीटी’च्या विरोधात व्यापाऱ्यांनी पुकारलेल्या बंदच्या विरोधात व्यापाऱ्यांवर शॉप अॅक्टअंतर्गत कारवाई करण्याचा प्रशासनाने दिलेला इशारा पोकळ असल्याचे मत पूना मर्चंट्स चेंबरचे अध्यक्ष अजित सेटिया यांनी व्यक्त केले आहे.

‘बहिःस्थ’ निर्णयावरून विद्यापीठावर टीकास्त्र

$
0
0
बहिःस्थ अभ्यासक्रमाची प्रवेशपात्रता बदलण्याच्या विद्वत परिषदेच्या निर्णयावरून पुणे विद्यापीठावर टीकास्त्र सोडण्यात येत आहे. भरमसाठ संख्येने मंजुरी दिलेल्या कॉलेजचे ‘दुकान’ चालण्यासाठीच सर्वसामान्य, कष्टकरी विद्यार्थ्यांची शिक्षणसंधी हिरावून घेतली जात आहे, असा आरोप केला जात आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images