Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

बहिःस्थ विद्यार्थ्यांना बाहेरचा रस्ता?

$
0
0
पुणे विद्यापीठात बहिःस्थ विद्यार्थी म्हणून प्रवेश घ्यायचा असेल, तर विद्यार्थ्यांना आपल्या शैक्षणिक कारकिर्दीत किमान तीन वर्षे खंड पाडावा लागेल. त्यासोबतच थोडे-थोडके नव्हे, तब्बल आठ हजार रुपयांचे शुल्कही भरावे लागेल...

पुणे विद्यापीठाचे ‘सोशल’ नेटवर्किंग

$
0
0
पुणे विद्यापीठाच्या आवारातील विभागामध्ये ‘मास्टर इन सोशल वर्क’चा (एमएसडब्ल्यू) अभ्यासक्रम सुरू करण्यास विद्यापीठाच्या विद्वत परिषदेने (अॅकॅडमिक कौन्सिल) बुधवारी मान्यता दिली.

व्यापाऱ्यांचे घूमजाव

$
0
0
स्थानिक संस्था कराविरोधातील (एलबीटी) व्यापाऱ्यांची व्यावसायिक परवाने परत करण्याची घोषणा अखेर वल्गनाच ठरली आहे. परवाने नूतनीकरणासाठी पाठविण्यात आल्याचे सांगून केवळ जीवनाश्यक वस्तूंच्या साठ्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना देऊन व्यापाऱ्यांनी पुन्हा एकदा घूमजाव केले.

जात प्रमाणपत्राबरोबर ‘जात वैधता’ही आवश्यक

$
0
0
मागासवर्गीय विद्यार्थ्यांना राखीव जागांवर प्रवेश घ्यायचा असेल, तर जात प्रमाणपत्राबरोबरच जात वैधता प्रमाणपत्रही (कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट) अनिवार्य असल्याचे ‘तंत्रशिक्षण संचालनालया’ने (डीटीई) स्पष्ट केले आहे.

दुकाने बंद; कारवाईचे कागदी घोडे

$
0
0
एलबीटीच्या मुद्द्यावर गेला आठवडाभर सुरू असलेल्या ‘बंद’मुळे पुणेकरांचे अतोनात हाल सुरू आहेत. बंदमुळे धान्य आणि जीवनावश्यक वस्तूंचे ‘शॉर्टेज’ झाल्याचे निमित्त करून अव्वाच्या सव्वा दराने या वस्तूंचा काळाबाजार सुरू झाला आहे.

दुकानदारांवर ‘शॉप अॅक्ट’नुसार नोटिसा

$
0
0
एलबीटी विरोधात बंद पुकारलेल्या दुकानदारांवर ‘शॉप अॅक्ट’नुसार नोटिसा बजाविण्याची कारवाई कामगार उपायुक्त कार्यालयाने सुरू केली आहे. ‘बंद’मध्ये सहभागी झालेल्या मार्केट यार्डमधील किरकोळ विक्री दुकानांनाही परवाने निलंबनाच्या नोटिसा बजा‌विण्यात येतील.

विरोधक करणार फेरविचार प्रस्ताव

$
0
0
कर रद्द करण्याबाबतचे अधिकार स्थायी समितीला कायमस्वरूपी असताना मिळकतकर निर्लेखित करण्याच्या प्रशासनाच्या प्रस्तावाला सत्ताधाऱ्यांनी मंजुरी दिल्याने त्याचा फेरविचार प्रस्ताव विरोधकांतर्फे सादर केला जाणार आहे.

मनसे-राष्ट्रवादीत खडाष्टक योग

$
0
0
महापालिकेच्या सत्तेत सहकारी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या सोयरिकीत खडाष्टक योग आला आहे. राष्ट्रवादीच्या पुढाकाराने आलेल्या बसखरेदी प्रस्तावाच्या विरोधात काँग्रेस बुधवारी रस्त्यावर उतरली; तर दुसरीकडे महापालिकेत काँग्रेसच्या ताब्यात असलेले एक कार्यालय काढून मनसेला देण्याचे राष्ट्रवादीने ठरविले आहे.

व्यापारी पुन्हा चर्चेच्या ट्रॅकवर

$
0
0
स्थानिक संस्था कर (एलबीटी) नकोच, या भूमिकेवर आठवडाभर अडून बसलेल्या आंदोलनकर्त्या व्यापाऱ्यांनी एक पाऊल मागे घेत आपल्या अधिकृत मागण्या राज्य सरकारपुढे बुधवारी मांडल्या. विशेष म्हणजे त्यामध्ये एलबीटी रद्द करण्याच्या मागणीचा समावेश नाही.

आवडीच्या नंबरला कारची किंमत!

$
0
0
हल्ली तीन ते साडेतीन लाखांत एखादी नवीन कार येते. मात्र, पुण्यातील अकरा कार मालकांनी प्रत्येकी एवढे पैसे देऊन ‘नंबर एक’ मिळविला आहे! तर, वर्षभरात ३३ हौशी वाहनचालकांनी दीड लाख रुपये मोजून नंबर ‘चॉइस’ केला. विशेष म्हणजे, टूव्हीलरच्या सिरीजमधील नंबरसाठी हे पैसे मोजले आहेत.

केरळात २ दिवस उशिरा पाऊस

$
0
0
अंदमानात नेहमीपेक्षा लवकर येण्याची सुखद वार्ता देणारा मान्सून केरळ किनारपट्टीवर मात्र दोन दिवस उशिराने दाखल होण्याची शक्यता आहे. तीन जूनपर्यंत मान्सून केरळमध्ये पोहोचेल, असे संकेत हवामान विभागाने दिले आहेत.

देशभरात ९७० प्रचलित भाषा

$
0
0
भाषावार प्रांतरचनेनंतर देशात आणि विविध राज्यांमध्ये बोलीभाषा किती, आदिवासींच्या भाषा किती, कोणत्या भाषा अस्तित्वात आहेत, याचा सविस्तर अभ्यास ‘भारतीय भाषांचे लोकसर्वेक्षण’ याद्वारे प्रथमच होत आहे. त्यामध्ये राज्यातील ६०, तर देशपातळीवर तब्बल ९७० भाषांचा शोध लागला आहे.

येमेनीवर उपचार, डॉक्टर गजाआड

$
0
0
यादवीत जखमी झालेल्या येमेनी तरुणावर शस्त्रक्रिया करून बंदुकीची गोळी काढणारे डॉक्टर टिमोथी जोन्स यांना; तसेच सॅलिसबरी पार्क परिसरातील हॉस्पिटलचे प्रशासक अनिल कांदणे यांना स्वारगेट पोलिसांनी बुधवारी अटक केली.

कात्रज टेकड्यांवर सिमेंटचे जंगल

$
0
0
शहरातील टेकड्यांवर बांधकामे असावीत की नकोत हा मुद्दा ऐरणीवर असतानाच कात्रजलगतच्या भिलारेवाडीमधील टेकड्यांचे निवासीकरण करण्याचा घाट घालण्यात आला आहे. त्यासाठी भिलारेवाडीला गावठाणचा दर्जा देऊन काही बड्या मंडळींवर कृपादृष्टी दाखविण्यात आली आहे.

‘संगीतोन्मेषा’चा रौप्यमहोत्सव

$
0
0
संगीतोन्मेष संस्थेच्या रौप्यमहोत्सवानिमित्त आजपासून (शुक्रवार) १९ मेपर्यंत विरासत संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्या निमित्ताने संस्थेचे कार्याध्यक्ष सुनील पासलकर यांनी घेतलाला संस्थेच्या कार्याचा हा आढावा…

विजयदुर्गाची भिंत नैसर्गिकच

$
0
0
विजयदुर्ग किल्ल्याजवळची, अनेक रहस्यांसाठी प्रसिद्ध असलेली समुद्रातील भिंत मानवनिर्मित नसून ती नैसर्गिक रचना असल्याचे संशोधनातून समोर आले आहे.

बहिरट यांचे सदस्यत्व रद्द झाल्याने पोटनिवडणूक

$
0
0
कल्पना बहिरट यांचे सदस्यत्व रद्द झाल्याने प्रभाग क्र. ४० अ येथील पोटनिवडणूक घेण्यासाठीचा मतदारयादीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगातर्फे जाहीर करण्यात आला आहे.

‘यंग सीनिअर्स’ आता ‘व्हॉलेन्टिअर’

$
0
0
वन्यप्राण्यांचे छायाचित्रण असो किंवा पिक्षनीरिक्षणाचा एखादा कॅम्प, या ठिकाणी केवळ तरुणच जातात, असा तुमचा समज असेल तर तो दूर करा. वन्यप्राण्याविषयी ज्येष्ठ नागरिकांनाही प्रचंड कुतूहल आणि आवड असून हेच ‘यंग सीनिअर्स’ आता राजीव गांधी प्राणी संग्रहालयामध्ये ‘व्हॉलेन्टिअर’ म्हणून काम करणार आहेत.

घरफोडी प्रकरणी आणखी एकाला अटक

$
0
0
मुकुंदनगर येथील परमार प्लाझा येथे वॉचमनच्या मदतीने फ्लॅटमध्ये चोरी करून साडेआठ लाख रुपयांची चोरी केल्याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी आणखी एकाला अटक केली आहे.

शरद मोहोळची रवानगी तळोजा कारागृहात

$
0
0
दहशतवादी कातिल सिद्दिकीचा येरवडा कारागृहात खून करणारा कुख्यात गुंड शरद मोहोळ याची ठाण्यातील तळोजा कारागृहात दोन दिवसांपूर्वी रवानगी करण्यात आली. मोहोळ याचा कारागृहात छळ होत असल्याचा आरोप त्याच्या पत्नीने केला होता. त्यानंतर त्याला पुण्याबाहेर पाठविण्यात आले आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images