Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

मुहूर्ताचा दिवसही आंदोलनात

0
0
स्थानिक संस्था कराच्या (एलबीटी) विरोधात पुकारलेल्या बंदला सोमवारी (१३ मे) सलग सहाव्या दिवशीही प्रतिसाद मिळाला. अक्षय्य तृतीयाच्या दिवशी महाआरती, सभा या माध्यमांतून विरोध दर्शविण्यात आला.

'प्लॅस्टर ऑफ पॅरिस'च्या वापरावरील बंदी हटविली

0
0
'प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) वापरावर बंदी घालणे हे योग्य आणि कायदेशीर नाही. देशातील सर्व राज्यातील प्रदूषण नियंत्रण मंडळांनी तीन महिन्यांच्या पीओपीमुळे जलप्रदूषण होते किंवा नाही याचा सखोल अभ्यास करावा आणि त्यानंतर दोन आठवड्यांच्या आत लवादाकडे अहवाल सादर करावेत,' असा आदेश राष्ट्रीय हरित लवादाने दिला आहे.

प्रॉपर्टी टॅक्समधून २०० कोटी

0
0
स्थानिक संस्था कराचा (एलबीटी) तिढा कायम असताना एलबीटीनंतर पुणे महापालिकेचे मुख्य स्रोत असलेल्या प्रॉपर्टी टॅक्सच्या माध्यमातून सुमारे २०० कोटी रुपयांचा महसूल जमा झाला आहे.

'प्लॅस्टर ऑफ पॅरिस'च्या वापरावरील बंदी हटविली

0
0
'प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) वापरावर बंदी घालणे हे योग्य आणि कायदेशीर नाही. देशातील सर्व राज्यातील प्रदूषण नियंत्रण मंडळांनी तीन महिन्यांच्या पीओपीमुळे जलप्रदूषण होते किंवा नाही याचा सखोल अभ्यास करावा आणि त्यानंतर दोन आठवड्यांच्या आत लवादाकडे अहवाल सादर करावेत,' असा आदेश राष्ट्रीय हरित लवादाने दिला आहे.

व्यापा-यांवर आजपासून कारवाई

0
0
स्थानिक संस्था कराच्या (एलबीटी) विरोधात बंद पुकारलेल्या व्यापाऱ्यांचे परवाने रद्द करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. अन्नधान्याचा पुरवठा सुरळीत न करणाऱ्या व्यापाऱ्यांचे परवाने कोणतीही नोटीस न देता आजपासून (मंगळवारपासून) रद्द केले जाणार आहेत.

‘आयुष’च्या फतव्यामुळे आयुर्वेद कॉलेजांना संभ्रम

0
0
देशातील अडीचशेहून अधिक आयुर्वेद कॉलेजे आता एक जुलैला सुरू करून शैक्षणिक वर्षाचा निकाल पुढील वर्षीच्या ३० जूनला जाहीर करण्याचा फतवा ‘आयुष’ने काढला आहे.

‘चित्रांगणा’तून उलगडणार मुलांचे भावविश्व

0
0
मुलांची उन्हाळ्याची सुट्टी दर्जेदार सिनेमांच्या माध्यमातून सत्कारणी लागावी यासाठी भाषा फाउंडेशनच्या वतीने उद्यापासून (१६ मे) ‘चित्रांगण’ या बालचित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

मतदान ओळखपत्राचा गैरवापर करणारा दुकानदार अटकेत

0
0
कर्वेनगर परिसरातील एका नागरिकाच्या मतदान ओळखपत्राच्या झेरॉक्सचा गैरवापर करून सिम कार्डची विक्री केल्याप्रकरणी थेरगाव परिसरातील एका दुकानदाराला हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे. त्याला कोर्टात हजर करण्यात आले असता एका दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

पिस्तूल बाळगणा-या दोघांना अटक

0
0
महाराष्ट्र केसरी संजय पाटील यांच्या खुनाचा बदला घेण्यासाठी पिस्तूल बाळगणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने सोमवारी कात्रज परिसरातून अटक केली. बाळकृष्ण ऊर्फ पांड्या लक्ष्मण मोहिते (वय २७) आणि अभिजित रामचंद्र गायकवाड (२९, दोघेही रा. सांगली) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

सीएनजी चाचणीवेळी स्फोट; एक जखमी

0
0
हडपसर येथील पीएमपीच्या डेपोमध्ये सीएनजी स्टेशनची टेस्टिंग सुरू असताना झालेल्या स्फोटामध्ये महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड कंपनीचा एक कर्मचारी जखमी झाला. मंगळवारी रात्री हा प्रकार घडला.

पथारीवाल्यांबाबत राबवावे कायमस्वरूपी धोरण

0
0
शहरातील पथारीवाले, हातगाडीवाल्यांबाबत कायमस्वरूपी धोरण राबविण्याची मागणी राष्ट्रवादी संघटित-असंघटित माथाडी कामगार संघातर्फे मंगळवारी पत्रकार परिषदेत करण्यात आली.

बाबूराव पाचर्णे यांचा भाजपमध्ये प्रवेश

0
0
शिरूरचे माजी आमदार बाबूराव पाचर्णे यांनी चार वर्षांनंतर पुन्हा भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाचर्णे यांच्या प्रवेशामुळे भाजप-शिवसेना युतीला बळ मिळणार आहे.

मल्टिप्लेक्सचालकांची आता कोर्टात धाव

0
0
करमाफी असताना प्रेक्षकांकडून ७८ कोटी रुपयांचा करमणूक कर वसूल केल्याप्रकरणी नोटीस बजावलेल्या मल्टिप्लेक्स थिएटरमालकांनी त्याविरोधात जिल्हा न्यायालयात धाव घेतली आहे.

‘सर्कशीतल्या हत्तींना जंगलात सोडा’

0
0
सर्कशीमध्ये वन्य प्राण्यांचा वापर करण्यास कायद्याने बंदी असतानाही रॅम्बो सर्कसमध्ये चार हत्तींना पाळण्यात आले आहेत. या हत्तींना तातडीने जंगलात सोडा, या मागणीसाठी ‘पीपल्स फॉर दी एथिकल ट्रीटमेंट ऑफ अॅनिमल्स’ (पेटा) या संस्थेच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी सकाळी सर्कसच्या तंबूबाहेर आंदोलन केले.

बंद फाटकातील घुसखोरीने उघडले तुरुंगाचे दार

0
0
रेल्वे क्रॉसिंगवरील फाटक बंद असताना घुसखोरी करणा-या ७५ जणांना तुरुंगाची हवा खावी लागली आहे. गेल्या वर्षी रेल्वे प्रशासनाने पुणे विभागातील विविध रेल्वे क्रॉसिंगवर ही कारवाई केली होती.

‘आळंदी पुलाच्या कामात तडजोड नाही’

0
0
आळंदी देवाची येथे नव्याने उभारण्यात येत असलेल्या पुलाच्या कामात लक्ष घालण्याचा निर्णय विभागीय आयुक्तांनी घेतला आहे. पुलाच्या कामाच्या दर्जात कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असे विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी सांगितले.

‘बीडीपी’बाबत सुळे घेणार पुन्हा मुख्यमंत्र्यांची भेट

0
0
‘समाविष्ट गावांमधील जैववैविध्य उद्यानांच्या (बीडीपी) आरक्षणाच्या मुद्द्यावर पुन्हा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेऊ,’ असे खासदार सुप्रिया सुळे यांनी सोमवारी सांगितल्याचे समजते.

रेल्वे डिझेल घोटाळ्यातील वकिलाच्या कोठडीत वाढ

0
0
रेल्वेच्या दहा कोटी रुपयांच्या डिझेल घोटाळ्यात सीबीआयच्या न्यायाधीशांना ‘मॅनेज’ करण्यासाठी रेल्वेच्या लोको निरीक्षकाकडून २८ लाख ९५ हजार रुपये घेतल्याच्या प्रकरणात अटक करण्यात आलेला वकील आणि त्याच्या सहायकाच्या पोलिस कोठडीत १६ मेपर्यंत वाढ करण्यात आली आहे.

मतदार मदत केंद्रांकडे नागरिकांची पाठ

0
0
मतदारांचे फोटो मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सुरू केलेल्या मतदार मदत केंद्रांकडे नागरिकांनी पाठ फिरविली आहे. गेल्या दीड महिन्यात केवळ ६० हजार ५१३ नागरिकांनी या केंद्रात जाऊन फोटो अपलोड केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे केवळ ३.०८ टक्के काम पूर्ण झाले आहे.

‘झटपट प्रसिद्धी नसल्याने वक्तृत्वकला पिछाडीवर’

0
0
‘वक्तृत्व ही एक आवश्यक आणि व्यक्तिमत्त्वाचा विकास साधणारी कला आहे. दुर्दैवाने, पटकन प्रसिद्धी मिळवून देणाऱ्या इतर कलांच्या तुलनेत वक्तृत्वकला काहीशी मागे पडत चालली आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images