Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

मावळात वेगवेगळ्या ठिकाणी दोघांच्या आत्महत्या

$
0
0
मावळ तालुक्यात वेगवेगळ्या दोन ठिकाणी दोन तरुणांनी झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याच्या घटना उघडीस आल्या आहेत. या घटना लोणावळ्याजवळील वाकसई व तळेगावजवळील सांगवी गावात सोमवारी सकाळी घडल्या. दोन्ही घटनेतील आत्महत्येची कारणे अद्याप स्पष्ट झाली नाहीत.

नंदा माने यांना अटकपूर्व जामीन मंजूर

$
0
0
नूतन मराठी विद्यालयाच्या संस्थाचालक नंदा माने आणि संस्थेच्या पदाधिकाऱ्यांवर ४५ लाख रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात माने यांना कोर्टाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.

एलबीटीविरोधात खडकीत सत्यनारायणपूजा

$
0
0
एलबीटीविरोधात सुरू असलेल्या बंदच्या पार्श्वभूमीवर आज खडकीतील टीकाराम चौकामध्ये सोमवारी (१३ मे) सत्यनारायणाच्या महापूजेचे आयोजन करण्यात आले.

अनधिकृत थांब्यावर बस थांबविणा-यांवर कारवाई

$
0
0
अनाधिकृत थांब्यावर एसटी बस उभी करणा-या ३३१ ड्रायव्हर आणि कंडक्टर्सवर प्रशासनाने दंडात्मक कारवाई केली आहे. जानेवारी ते एप्रिल या कालावधीत घेण्यात आलेल्या विशेष मोहिमेमध्ये ही कारवाई करण्यात आल्याचे एसटीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

वकीलपत्राची अट शिथिल करावी

$
0
0
जेलमध्ये कैद्यांची मुलाखत घेण्यासाठी जाणाऱ्या वकिलांना मुलाखतीच्या अर्जासोबत वकीलपत्र घेतल्याची प्रत जोडण्याची अट शिथिल करण्यात यावी, अशी मागणी पुणे बार असोसिएशनतर्फे येरवडा जेलच्या अ​धीक्षकांकडे करण्यात आली आहे.

झोपडपट्टी पुनर्वसनाचे फसलेले नियोजन

$
0
0
पिंपरी-चिंचवड महापालिकेने हाती घेतलेल्या झोपडपट्टी पुनर्वसनाचे नियोजन फसल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. गेल्या सहा वर्षांत सहा ठिकाणच्या प्रकल्पांची सुमारे ७० टक्के कामे अपूर्ण आहेत.

कसबा पेठेत पादचारी ठार

$
0
0
कसबा पेठेतील कागदीपुरा मटन मार्केटसमोर शनिवारी रिक्षाची धडक बसून झालेल्या अपघातात पादचारी ठार झाला. फरासखाना पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल झाला आहे.

खडकीत गणरायाला १,१०० आंब्यांचा नैवैद्य

$
0
0
खडकीतील नवा बाजार गणेश उत्सव मंडळाच्या वतीने अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर गणरायाला १,१०० आंब्यांचा नैवैद्य दाखविण्यात आला.

मार्केट यार्डमध्ये पूर्ववैमनस्यातून खून

$
0
0
मार्केट यार्डमधील लक्ष्मी मार्केटसमोर पूर्ववैमनस्यातून तरुणाचा खून झाल्याचा प्रकार रविवारी रात्री घडला. या प्रकरणी तिघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.

सोनसाखळी ​हिसकावण्याचे तासाभरात दोन गुन्हे

$
0
0
मार्केट यार्ड परिसरात अवघ्या तासाभरात सोनसाखळी चोरीच्या दोन घटना घडल्या असून, त्यात सुमारे एक लाख रुपयांचे दागिने हिसकावण्यात आले आहेत.

नोकरीचे आमिष दाखवून बलात्कार

$
0
0
नोकरी लावण्याच आमिष दाखवून लोणावळा येथील एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा प्रकार सोमवारी ( १३ मे ) उघडीस आला. या प्रकरणी आरोपीस अटक करण्यात आली आहे.

डॉक्टरांसह अधीर पेशंटही जबाबदार

$
0
0
गर्भाशय काढण्याच्या वाढत्या शस्त्रक्रियांना डॉक्टरांसह पेशंटही जबाबदार आहेत. 'गोळ्या नकोत, त्यापेक्षा पिशवी काढून टाका,' अशी मागणी महिलांकडून होते आहे. दुसऱ्या बाजूला, डॉक्टरांमध्येही गर्भाशयासंदर्भातील आधुनिक तपासण्या आणि तंत्रज्ञानाविषयी जागृती नसल्याने विनाकारण गर्भाशय काढण्याचे प्रकार होत आहेत.

'बीडीपी'बाबत सुळे 'सीएम'ना भेटणार

$
0
0
'समाविष्ट गावांमधील जैववैविध्य उद्यानांच्या (बीडीपी) आरक्षणाच्या मुद्द्यावर पुन्हा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेऊ,' असे खासदार सुप्रिया सुळे यांनी सोमवारी सांगितल्याचे समजते.

व्यापा-यांवर आजपासून कारवाई

$
0
0
स्थानिक संस्था कराच्या (एलबीटी) विरोधात बंद पुकारलेल्या व्यापाऱ्यांचे परवाने रद्द करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. अन्नधान्याचा पुरवठा सुरळीत न करणाऱ्या व्यापाऱ्यांचे परवाने कोणतीही नोटीस न देता आजपासून (मंगळवारपासून) रद्द केले जाणार आहेत.

मतदार मदत केंद्रांकडे पाठ

$
0
0
मतदारांचे फोटो मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सुरू केलेल्या मतदार मदत केंद्रांकडे नागरिकांनी पाठ फिरविली आहे. गेल्या दीड महिन्यात केवळ ६० हजार ५१३ नागरिकांनी या केंद्रात जाऊन फोटो अपलोड केल्याचे समोर आले आहे.

सोनेखरेदीचा मुहूर्त हुकला

$
0
0
अक्षय्य तृतीयेला झळाळण्याची वर्षानुवर्षांची परंपरा सराफ बाजाराने यंदा मोडली. सोमवारी या बाजाराने चक्क शुकशुकाट अनुभवला! व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद पाळल्याने नव्या वस्तू घरी नेण्याचा पुणेकरांचा मुहूर्त हुकला. परिणामी, पुणेकरांना खरेदीच्या आनंदाला मुकावे लागले.

आम्हाला गांधी मान्य नाही!

$
0
0
'अखंड हिंदुराष्ट्र घडवण्यासाठी कोणतीही तडजोड स्वीकारली जाणार नाही. यामध्ये मध्यस्थी करण्यासाठी आम्हाला कोणताही गांधी मान्य नाही,' असे सांगतानाच आपल्याला लाहोर, काबूल, रावळपिंडीमध्ये भगवा झेंडा फडकवायचा आहे, असे विधान विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी येथे केले.

हजारो बांधकामांवर संक्रांत

$
0
0
विकास आराखड्यात झालेल्या 'प्रिंटिंग मिस्टेक'मुळे शहराच्या मध्य भागातील हजारो चालू आणि नियोजित बांधकामांवर संक्रांत आली आहे.

व्यापारी आंदोलनावर ठाम

$
0
0
स्थानिक संस्था करासंदर्भात (एलबीटी) मुंबईत तोडगा निघण्याच्या दिशेने चर्चा सुरू असली तरी व्यापाऱ्यांनी आंदोलनाची भू‌मिका कायम ठेवली आहे.

स्वयंसेवी संस्थांसाठी मोफत वेबसाइट

$
0
0
महाराष्ट्राच्या विविध भागात कार्यरत असलेल्या छोट्या मोठ्या स्वयंसेवी संस्था, महिला बचत गट, गणेशोत्सव मंडळे, ज्येष्ठ नागरिक संघांना मोफत वेबसाईट बनवून देण्यासाठी येत्या १६ मे रोजी पुण्यात विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images