Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

वधूपित्याचा अपघाती मृत्यू

0
0
मुलीच्या लग्नपत्रिकांचे वाटप करून मुंबईवरून गावी निघालेल्या पित्याचा अपघाती मृत्यू झाला. देहूरोडजवळ किवळे पुलानजीक रविवारी (१२ मे) सकाळी पावणेसातच्या सुमारास हा अपघात झाला. या दुर्घटनेत वधूची आई गंभीर जखमी असून, तिच्यावर निगडीच्या खासगी रुग्णालयात उपचार चालू आहेत.

लाखभर युवकांना महाजेनकोचा शॉक

0
0
महाजेनको कंपनीचा बेरोजगार युवकांबाबत उदासीन कारभार पुन्हा समोर आला आहे. गेल्या वर्षी इंजिनीअर आणि सब इंजिनीअर पदासाठी अर्ज मागविल्यानंतर कंपनीने अजूनही भरतीची प्रक्रिया सुरू केलेली नाही.

डॉक्टरांची दुष्काळाबाबत जागृती

0
0
जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात पडलेल्या दुष्काळाबाबत जनजागृती करण्यासाठी 'जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन'च्या (जीपीए) वतीने रॅली काढून दुष्काळग्रस्तांसाठी निधी गोळा करण्यात आला.

अक्षय्य संधीचा 'क्षय'!

0
0
साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला आणि विविध प्रकारच्या बाजारपेठांमध्ये खरेदीची धामधूम असणारा अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त यंदा प्रथमच व्यापाऱ्यांच्या बंदमुळे सुना सुना ठरतो आहे. 'एलबीटी'चा तिढा ताणला जात 'अक्षय्य' संधी साधता न आल्याने ग्राहकांबरोबरच छोट्या-मोठ्या व्यापाऱ्यांमधूनही निराशेचा सूर उमटला आहे.

मित्राच्या मुलीवर रेपचा प्रयत्न

0
0
मित्राच्या पंधरा वर्षांच्या मुलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे. गणेश महादेव शिंदे (वय ४५, रा. टाइप- २, रेंजहिल्स, खडकी) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

पारा चढल्याने भाज्या महागल्या

0
0
घेवडा १४० रुपये...दोडका ८० रुपये...हिरवी मिरची ६० ते ७० रुपये...कारली, भेंडी, गवार, ६० रुपये...आणि कोथिंबीर जुडी २० रुपये तर, मुळा २५ रुपये जुडी ! भाज्यांचे हे प्रति किलोचे भाव आहेत किरकोळ बाजारातले.

सार्वजनिक सभेची नव्यानं ओळख

0
0
सार्वजनिक सभा इथं आयोजित करण्यात आलेल्या हेरिटेज वॉकमुळे या संस्थेची माहिती पुणेकरांना मिळाली. भारताच्या जडणघडणीत महत्त्वाचं योगदान असलेल्या या संस्थेविषयी माहिती मिळाल्याचं समाधान त्यांच्या चेहऱ्यावर झळकत होतं.

हापूसचा दर उतरला

0
0
व्यापाऱ्यांच्या आंदोलनामुळे शहरातील बाजारपेठांमध्ये शुकशुकाट दिसत असला तरी आंब्याच्या खरेदीसाठी मात्र रविवारी फळबाजार गर्दीने फुलून गेला होता. आंब्याचा भाव उतरल्याने पुणेकरांनी अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने मनसोक्त खरेदी केली.

'एनए' प्रक्रिया लवकरच सुरळीत

0
0
'बिगरशेतीच्या (एनए) प्रक्रियेत सुसूत्रता आणण्यासाठी राज्यातील विभागीय आयुक्तांकडून प्रस्ताव आला असून, त्यावर येत्या तीन महिन्यांत अंतिम निर्णय होईल,' अशी माहिती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी शनिवारी पुण्यात दिली.

प्यारेलालना फसवणारे चौघे अटकेत

0
0
ज्येष्ठ संगीतकार प्यारेलाल शर्मा यांच्या लोणावळ्याजवळील वरसोली गावातील जमिनीसंदर्भातील फसवणुकीप्रकरणी आणखी चौघांना अटक करण्यात आली. त्यांना १३ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली असून अद्याप सहा आरोपी फरारी आहेत.

थेरगावात रिक्षाचालकाचा खून

0
0
अनैतिक संबंधांच्या संशयावरून एका रिक्षाचालकाचा डोक्यात दगड घालून खून करण्यात आला. थेरगाव येथील एम. एम. शाळेच्या पाठीमागील पाण्याच्या टाकीजवळ रविवारी (१२ मे) पहाटे एकच्या सुमारास ही घटना घडली.

अफगाणिस्तानचे सिनेमे

0
0
तालिबाननं अफगाणिस्तानचा ताबा घेण्यापूर्वीचा आणि या सत्तेचा पाडावा झाल्यानंतरचा सिनेमा पुण्यात पाहाता येणार आहे. १७ मेपासून अफगाणिस्तान फिल्म फेस्टिव्हल सुरू होत असून, २० सिनेमे यामध्ये दाखविले जाणार आहेत.

सौरभ झाला 'योद्धा'

0
0
सिनेमात पोलिसाची भूमिका साकारण्याचं स्वप्न पदार्पणाच्या सिनेमातच पूर्ण होत असल्यानं अभिनेता सौरभ गोखले भलताच खूष आहे. या भूमिकेसाठी त्यानं प्रचंड मेहनत घेतली आहे.

निरोगी आयुष्याचं 'हसरं' गमक

0
0
मे महिन्यातील पहिला रविवार जागतिक हास्यदिन म्हणून साजरा केला जातो. अर्थात, केवळ एक दिवस हास्यदिन साजरा करून त्याचा फायदा होणार नाही. त्यासाठी हास्ययोग नियमित करायला हवा. या हास्ययोगाबद्दल थोडेसे...

स्त्रीधन विकून महिलांनी काढले गर्भाशय

0
0
स्त्रीधन विकून महिलांनी काढले गर्भाशयअज्ञानापोटी ४० टक्के महिला विविध आजारांच्या विळख्यात चैत्राली चांदोरकर, पुणे'डॉक्टरांनी सांगितलं होतं, की पिशवी...

सरकारी शिक्षणाचा शून्याचा पाढा!

0
0
पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांची संख्या 'शून्य'... नगर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांची संख्याही 'शून्यच'... एवढंच नाही, तर राज्यातील सर्वच जिल्ह्यांमधील जिल्हा परिषदेच्या शाळांची संख्याही 'शून्यच' !

मान्सून गुरुवारपर्यंत अंदमानात

0
0
मान्सून येत्या गुरुवारपर्यंत अंदमानात दाखल होण्याचा अंदाज पुण्यातील हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

'एमबीए'च्या १.५ हजार जागा कमी होणार

0
0
गेली काही वर्षे सातत्याने वाढत असलेल्या एमबीए अभ्यासक्रमाच्या जागा यंदा चक्क घटल्या आहेत! राज्यात यंदा गेल्या वर्षीपेक्षा सुमारे दीड हजार जागा कमी होण्याची शक्यता आहे. एकट्या पुणे विद्यापीठातच ३० मान्यताप्राप्त संस्थांनी 'एमबीए'च्या तुकड्या कमी करण्यासाठी अर्ज दिले आहेत.

लैंगिक अत्याचारितांवर आता आधी उपचार, नंतर 'तपासणी'

0
0
लैंगिक अत्याचार झालेल्या युवती, महिलांसह अल्पवयीन मुला-मुलींची वैद्यकीय तपासणी करण्यापूर्वी त्यांच्यावर उपचार करण्याचे आदेश राज्याच्या आरोग्य खात्याने डॉक्टरांना दिले आहेत. पीडितांच्या मानसिक स्थितीचा विचार करून मगच तपासणीची औपचारिकता पूर्ण करावी, असेही बजावण्यात आले आहे.

'एक्स्प्रेस वे'वरील अपघातात ४ जनावरांचा मृत्यू

0
0
पुणे- मुंबई 'एक्स्प्रेस वे'वर लोणावळ्याजवळील तुंगार्ली गावच्या हद्दीत बेकायदा जनावरांची वाहतूक करणा-या टेम्पोला सोमवारी सकाळी झालेल्या अपघातात चार जनावरांचा जागीच मृत्यू झाला. तर, १६ जनावरे जखमी झाली असून त्यापैकी १० जनावरे गंभीर आहेत.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images