Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

एलबीटीवर फेरविचार नाहीः CM

0
0
‘राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था कर (एलबीटी) लागू करण्याचा कायदा सर्वपक्षीय संमतीने झाला आहे. जकातीला पर्यायी व्यवस्था म्हणून सरकारने त्याचा स्वीकार केला आहे. त्यामुळे, त्याचा फेरविचार होणार नाही,’ याचा पुनरुच्चार मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शुक्रवारी केला.

तुमची सावली हरवणार आहे

0
0
तुमची सावली कधीच तुम्हाला सोडून जात नाही, असे म्हटले जाते. प्रत्यक्षात मात्र, वर्षातून किमान दोन वेळा काही मिनिटांसाठी सावली गायब झाल्याचा क्षण आपल्याला अनुभवायला मिळतो. असा प्रसंग मंगळवारी पुणेकरांना तर गुरुवारी मुंबईकरांना अनुभवायला मिळणार आहे.

'व्हिजन' देणारे वक्ते हवेत- नितीन गडकरी

0
0
'समाज व लोकशाहीत परिवर्तन करण्यासाठी राजकीय पक्षांमधील कार्यकर्त्यांना प्रशिक्षित करण्याची गरज आहे. समाजाला व्हिजन देणारे वक्ते तयार झाले पाहिजेत,' असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी यांनी नुकतेच केले.

शहरात रक्ताचा ‘दुष्काळ’

0
0
रक्तदान शिबिरांमध्ये घट झाल्याने शहरातील विविध रक्तपेढ्यांमध्ये प्रामुख्याने ‘ए’ पॉझिटिव्ह, ‘बी’ पॉझिटिव्ह आणि ‘ए’ निगेटिव्ह या रक्तगटांबरोबरच विविध गटांच्या रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. या तुटवड्यामुळे पेशंटच्या नातेवाइकांना रक्तासाठी दाहीदिशा फिरण्याची वेळ आली आहे.

‘नळेगावमधील बस स्फोटाशी दहशतवादी कनेक्शन नाही’

0
0
नळेगावला बसमध्ये झालेल्या बाँम्बस्फोटाविषयी अद्याप कोणतीही माहिती आपल्यापर्यंत आलेली नाही असे सांगत या घटनेमागील दहशतवादी हल्ल्याची शक्यता केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी फेटाळली.

‘राष्ट्रवादीने बीडीपीबाबत भूमिका जाहीर करावी’

0
0
समाविष्ट गावांमधील जैववैविध्य उद्यानांचे (बीडीपी) आरक्षण कायम ठेवण्याची भूमिका मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जाहीर केल्यामुळे या गावांमधील बीडीपी विरोधकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसने बीडीपीच्या विषयावर आपली अधिकृत भूमिका जाहीर करावी, अशी मागणी पक्षात जोर धरू लागली आहे.

मॉर्निंग वॉकसाठी जाणा-यांवर सोनसाखळी चोरांची वक्रदृष्टी

0
0
पुणे शहर आणि परिसरात शनिवारी चार सोनसाखळी चोरीच्या घटना घडल्या. सोनसाखळी चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे.

अक्षय्य तृतीयेच्या तोंडावरही बाजार बंद

0
0
स्थानिक संस्था कराविरोधातील (एलबीटी) आंदोलनकर्त्या व्यापाऱ्यांमुळे अक्षय्य तृतीयेच्या तोंडावर किरकोळ दुकानदारांना व्यवहार बंद ठेवावे लागत आहेत. शहरभरातील दुकाने बंद असल्याने शनिवारची सुटी असूनही लोकांना खरेदीचा आनंद घेता आला नाही.

'पौर्णिमे'साठी वाट्टेल ते

0
0
हत्ती सांभाळणं सोप्पं नाही… या म्हणीचा अनुभव सध्या शहरातील प्राणीप्रेमी पौर्णिमा हत्तीणीच्या बाबतीत घेत आहेत. असे असलेतरी, पौर्णिमा हत्तीणीला वाचविण्यासाठी वाट्टेल ते प्रयत्न करण्याची त्यांची तयारी आहे.

व्यापारी परवाने परत करणार

0
0
स्थानिक संस्था कराला (एलबीटी) स्थगिती देण्याची मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळल्यानंतरही व्यापारी माघार घेण्याच्या तयारीत नाहीत.

कंपन्यांकडून LBT जमा

0
0
एकीकडे स्थानिक स्वराज्य संस्था कराच्या विरोधात (एलबीटी) व्यापा-यांचा बंद सुरू आहे. तर दुसरीकडे शहराच्या विविध भागांमधून महापालिकेकडे सुमारे दीड कोटी रुपयांच्या एलबीटीचा भरणा झाला आहे.

जर्मन बेकरी पुणेकरांच्या सेवेत

0
0
तीन वर्षांपूर्वी बॉम्बस्फोटात राखरांगोळी झालेली कोरेगाव पार्क येथील जर्मन बेकरी शनिवारपासून नव्या दिमाखात सुरू झाली. विशेष आश्चर्याची बाब म्हणजे दुपारी १२ वाजून ११ मिनिटांच्या मुहूर्तावर पुनरागमन केलेल्या या बेकरीच्या पहिल्या ग्राहक ठरण्याचा मानही दोन जर्मन तरुणींनी मिळवला.

पैशांसाठी गर्भाशयावर संक्रांत

0
0
‘गर्भाशयाला (पिशवीला) इन्फेक्शन झाले आहे. त्यामुळे भविष्यात कॅन्सर होण्याची शक्यता असते’, ‘युटेरसमध्ये फायब्रॉइडच्या गाठी आहेत. त्या किती वेळा काढल्या तरी परत होतात, त्यापेक्षा गर्भाशयच काढू…’ अशी भीती दाखवून महिलांचे गर्भाशय काढण्याचा ‘उद्योग’ पुण्यातील डॉक्टरांकडून सुरू आहे.

पोलिसांची वर्दी होणार स्मार्ट

0
0
पोलिसांना अधिक ‘स्मार्ट’ बनविण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांनी त्यांची ‘वर्दी’ अधिक आकर्षक बनविण्याची सूचना केली आहे. फक्त वर्दीच ‘स्मार्ट’ बनवून चालणार नाही, तर संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनीही स्वतःला फिट ठेवण्याचा प्रयत्न करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.

'गृह'-दक्ष आणि लांबणारं लग्न!

0
0
लग्नाच्या वेळी मुलाचं स्वतंत्र घर हवं, ही मुलींची अपेक्षा सध्या घराच्या वाढत्या किमती पाहाता, रास्त वाटते का? स्वतंत्र राहायला तर हवं; पण ते दोघांचं घर आहे, या विचारातून आणि स्वतः कमावत असूनही निम्मे पैसे घालण्याची मात्र मुलींची तयारी नसते. यावर काही उपाय नाहीच का?

साडेआठ लाखांचे भेसळयुक्त तेल जप्त

0
0
कोथरूड, बिबवेवाडी, मार्केट यार्ड, कात्रज तसेच चिंचवडमधील व्यापाऱ्यांकडील आठ लाख ५४ हजार २६१ रुपयांच्या भेसळयुक्त तेलाचा साठा जप्त करण्यात आला. 'अन्न व औषध प्रशासना'ने (एफडीए) कारवाई करून कोल्हापूर येथील घोडावत फूड्स इंटरनॅशनल प्रा. लि. या कंपनीने उत्पादित केलेले तेल जप्त केले.

खरेदीतही 'पीएमपी' लेट

0
0
केंद्र सरकारच्या जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनर्निर्माण अभियानाअंतर्गत (जेएनएनयूआरएम) खरेदी करावयाच्या काही बसच्या खरेदीला उशीर होत असल्यामुळे प्रवासी सेवेमध्ये अडचण निर्माण होत आहे.

'सह्याद्री टायगर'चे यश

0
0
भोसरीतील सागरमाथा गिर्यारोहण संस्थेने रमेश गुळवे यांच्या स्मरणार्थ आयोजित 'आर-मार्क द फोर्ट मॅरेथॉन' स्पर्धेत सह्याद्री टायगर टीमने उल्लेखनीय यश मिळविले. या स्पर्धेत शंभरहून अधिक संघांनी भाग घेतला.

गॅसगळतीमुळे घबराट

0
0
महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडच्या पाइपलाइनमधून अजमेरा कॉलनी येथे रविवारी (१२ मे) सकाळी अचानक 'सीएनजी'ची (कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस) गळती होऊन पेट घेतल्याची घटना घडल्याने काही काळ घबराट निर्माण झाली होती.

मुदतवाढीनंतरही कामे संथच

0
0
केंद्र सरकारच्या जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनर्निर्माण अभियानाअंतर्गत (जेएनएनयूआरएम) घाईने सुरू केलेल्या कोट्यवधी रुपयांच्या रस्तेविकासाच्या कामांना मुदतवाढ देऊनही अनेक कामे संथ गतीने चालू असल्याचे दिसून येत आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images