Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

राष्ट्रीय 'सीईटी' आवाक्याबाहेर?

$
0
0
‘जेईई-मेन्स’मधून ‘जेईई-अॅडव्हान्स्ड’ला पात्र ठरण्यासाठीचे ११३ हे ‘कट ऑफ’ गुण मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी या वेळी ९० पैकी किमान २८ प्रश्नांची अचूक उत्तरे देणे अपेक्षित होते. मात्र, बहुतांश विद्यार्थ्यांसाठी हे आव्हानही कठीण असल्याचे चित्र आहे.

थकबाकी वसुलीकडे ‘पीएमपी’चे दुर्लक्ष

$
0
0
एकीकडे रोजचे खर्च भागविण्याची चिंता ‘पीएमपी’ पुढे उभी असताना दुसरीकडे ‘पीएमपी’ची येणी वसूल करण्याकडे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार कामगार संघटनेने केली आहे. बीआरटी मार्गावरील बसशेडवरील जाहिरातींचे कंत्राट दिलेल्या एका कंत्राटदाराने गेल्या सात वर्षांत ‘पीएमपी’कडे पैसे भरले नसल्याचे उघडकीस आले आहे. काही कोटी रुपयांची थकबाकी वसूल करण्यासाठी प्रशासन पावले उचलत नसल्याची टीका करून कामगार संघटनेच्या वतीने याबाबत पोलिसांत तक्रार करण्यात आली आहे.

परीक्षा कठीण नाही; अभ्यासाची पद्धत चुकीची’

$
0
0
आंध्र प्रदेशातील विद्यार्थी ‘जेईई-मेन्स’मध्ये उत्तम गुण मिळवत असताना महाराष्ट्रातील विद्यार्थी मात्र या परीक्षेत मागे पडत असल्याची बाब ‘मटा’ने गुरुवारी समोर आणली. ही पिछाडी परीक्षेच्या काठिण्य पातळीमुळे नव्हे, तर अभ्यासाच्या चुकीच्या पद्धतीमुळे आहे, ही बाबही आता स्पष्ट होत आहे.

ऑनलाइन प्रक्रियेमुळे पासपोर्ट वितरणात वाढ

$
0
0
पासपोर्ट अर्ज प्रक्रिया ऑनलाइन झाल्यामुळे पासपोर्ट वितरण प्रक्रियेत ६४ टक्क्यांनी वाढली आहे. एवढंच नव्हे तर पोलिसांचा सहभागही ऑनलाइन झाल्याने व्हेरिफिकेशन होणाऱ्या अर्जांचे प्रमाण १३३ टक्क्यांनी वाढविण्यात पासपोर्ट सेवा केंद्राला यश आले आहे, अशी माहिती मुख्य पासपोर्ट अधिकारी मुक्तेश परदेशी यांनी दिली.

सातारा रोडवर सीएनजी पंप सुरू

$
0
0
गेल्या चार वर्षांपासून रेंगाळलेल्या ‘सीएनजी’च्या पुरवठ्याचा प्रश्न आता काही अंशी मार्गी लागणार असून, पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे दोन नवे पंप कार्यन्वित झाले आहेत. तसेच, पुणे सातारा रोडवरील पंपावर २४ तास हे इंधन उपलब्ध होणार आहे. त्यामुळे या इंधनासाठी तासनतास रांगेत राहणाऱ्या रिक्षाचालकांची सुटका होण्याची आशा आहे.

नर्सिंगवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र मंडळ

$
0
0
राज्य नर्सिंग कौन्सिलमध्ये झालेल्या गैरव्यवहारामुळे हजारो विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आल्याने त्यांच्याकडील जबाबदारी काढून घेतली आहे. त्यामुळे नर्सिंगचा अभ्यासक्रम, परीक्षांबरोबर कॉलेजवर नियंत्रण ठेवण्यासाठी आता स्वतंत्र शिक्षण मंडळाची स्थापना करण्यात येणार आहे. यासंदर्भात राज्य सरकारने बुधवारी निर्णय घेतला असून, नर्सिंग कौन्सिलकडे असलेल्या पूर्वीच्या सर्व जबाबदाऱ्या काढून घेतल्या जाणार आहेत. त्यामुळे समांतर नवे मंडळ कार्यरत होणार आहे.

जात पडताळणीअभावी परीक्षेला ‘नो एंट्री’

$
0
0
जात पडताळणीचे प्रमाणपत्र सादर केल्याशिवाय परीक्षेला बसू दिले जाणार अशी ठाम भूमिका अनेक प्रसिद्ध कॉलेजांनी घेतल्याने पडताळणी प्रमाणपत्राअभावी, अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आले आहे. ‘जात पडताळणीचे प्रमाणपत्र घेऊन या, अन्यथा चालते व्हा’ असे स्पष्ट करीत अनेक इंजिनिअरिंग कॉलेजांनी आपल्या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसण्यासाठी मज्जाव केला आहे.

प्रवेश नाकारणाऱ्या खासगी शाळांवर कारवाई करू

$
0
0
शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत २५ टक्के आरक्षित जागांवर प्रवेश नाकारणाऱ्या पुण्यातील खासगी शाळांवर कारवाई करण्याचे आश्वासन राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालक महावीर माने यांनी गुरुवारी दिले. त्यासोबतच शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी १४ मे रोजी बैठक घेत, या कायद्याअंतर्गत असलेली प्रवेश प्रक्रिया गतिमानतेने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

उस्ताद झिया फरिदुद्दीन डागर यांचे निधन

$
0
0
ज्येष्ठ ध्रुपद गायक उस्ताद झिया फरिदुद्दीन डागर (८०) यांचे बुधवारी सायंकाळी पनवेल येथे वृद्धापकाळाने निधन झाले. नुकताच त्यांना पद्मश्री सन्मानही प्रदान करण्यात आला होता.

प्रयत्न पौर्णिमा हत्तीणीला वाचवायचे...

$
0
0
रस्त्याने जाताना अचानक आलेल्या अशक्तपणामुळे ‘पौर्णिमा’ ही हत्तीण रस्त्यातच थांबली. काही क्षण माहुतालाही काय करावे, हे समजेना. परंतु, ऐनवेळी धावून आलेल्या नागरिकांनी माहुताला धीर देत पौर्णिमेला खाऊ-पिऊ घालून उपचार सुरू केले.

औषध विक्रेत्यांचा आज संप

$
0
0
औषधनिर्माणाच्या नवीन धोरणासह फार्मसिस्टच्या सक्तीविरोधात अखिल भारतीय औषध विक्रेत्यांनी आज पुकारलेल्या देशव्यापी संपात पुण्यातील औषध विक्रेते सहभागी होणार आहेत.

पीएमपी’ला पालिकेने खडसावले

$
0
0
पुणे महापालिकेकडे असलेली ३३ कोटी रुपयांची थकबाकी देण्याची मागणी करणाऱ्या पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडला (पीएमपी) महापालिकेने खडसावले आहे. थकबाकी मागण्यापेक्षा स्थायी समितीच्या बैठकांना हजर राहा आणि त्या बैठकीत व्यथा मांडा, असा सल्ला देऊन जबाबदारीची आठवण करून दिली आहे.

स्कॉलरशिपचे निकाल लांबणीवर

$
0
0
चौथी आणि सातवीच्या स्कॉलरशिप परीक्षांचे निकाल एक मे रोजी जाहीर करण्याचे आश्वासन राज्य परीक्षा परिषदेला केवळ एकच वर्ष पाळता आले. यंदाच्या वर्षीच्या निकालाची तारीख अजूनही जाहीर झाली नसून शाळांना सुट्ट्या लागल्याने आता निकाल नवीन शैक्षणिक वर्षातच विद्यार्थ्यांच्या हाती पडू शकणार आहेत.

छोट्या व्यापाऱ्यांचा बंदला हरताळ

$
0
0
स्थानिक संस्था कराच्या (एलबीटी) विरोधात व्यापाऱ्यांनी पुकारलेल्या बंदला न जुमानता छोट्या दुकानदारांनी दुसऱ्या दिवशीही व्यवहार सुरू ठेवले होते. दुकानांचे शटर बंद असूनही खरेदी विक्रीचे व्यवहार न थांबल्याने पुणेकरांच्या ‘रुटीन’वर बंदचा फारसा परिणाम दिसून आला नाही. आज सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीनंतर आंदोलनाचे भवितव्य स्पष्ट होईल.

न्यायव्यवस्थांनी सूचना देऊ नयेत

$
0
0
‘सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट यांनी कायद्याचा अन्वयार्थ काढावा; पण सूचना देऊ नयेत. कायदेमंडळ श्रेष्ठ असून कायद्याप्रमाणे काम सुरू आहे की नाही, हे पाहण्याचे काम त्यांनी करावे,’ अशी अपेक्षा भारतीय जनता पक्षाचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी यांनी व्यक्त केली.

पेपर बदलून अर्ध्या तासात परीक्षा

$
0
0
परीक्षा प्रक्रियेत तंत्रज्ञानाचा वापर केल्यास प्रक्रिया कशी प्रभावी होऊ शकते, याचा अनुभव शुक्रवारी पुणे विद्यापीठाने घेतला. विद्यार्थ्यांच्या हातात पडलेला चुकीच्या अभ्यासक्रमावर आधारित पेपर अवघ्या अर्ध्या तासात बदलून विद्यापीठाने ११४ केंद्रांत नव्याने परीक्षा घेतली.

'परदेशी यांचा अर्ज फेटाळावा'

$
0
0
महापालिकेचे प्रभारी आरोग्यप्रमुख डॉ. एस. टी. परदेशी यांचा नोंदणी प्रमाणपत्राचा आणि त्याचा नूतनीकरणाचाही अर्ज महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलने नामंजूर केला आहे.

औषधविक्रेत्यांचा 'बंद', पेशंटचे हाल

$
0
0
औषधनिर्माण धोरण आणि फार्मसिस्टच्या सक्तीवरून औषधविक्रेत्यांनी पुकारलेल्या संपाचा फटका पुण्यासह राज्यातील सामान्य पेशंटला बसला. शंभर टक्के विक्रेत्यांचा बंद असल्याने औषधांसाठी नातेवाईकांना पळापळ करावी लागली.

FTIIला 'प्रभात'चे नाव द्यावे!

$
0
0
‘केंद्र सरकारने कोलकात्यामध्ये चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्था सुरु करताना त्याला श्रेष्ठ दिग्दर्शक सत्यजित रे यांचे नाव दिले.

राज्यात परतण्याची इच्छा नाही!

$
0
0
'माझी इच्छा नसतानाही मी दिल्लीत गेलो. आता मी दिल्लीत स्थिर झालो असून पक्षाने सोपविलेली जबाबदारी पार पाडत आहे. मला आता राज्यात परत यायची इच्छा नाही, राज्यात कोणतेही पद मी भूषवणार नाही', अशा शब्दांत भारतीय जनता पक्षाचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी यांनी शुक्रवारी आपली राजकीय भूमिका स्पष्ट केली.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images