Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

‘ऑनलाइन’ सर्टिफिकेटला ब्रेक

$
0
0
प्रमाणपत्रांच्या ‘बोगस’गिरीला आळा घालण्यासाठी अपंगाचे ‘ऑनलाइन’ सर्टिफिकेट देण्याच्या योजनेलाच अवघ्या दीड महिन्यातच ‘अपंगत्व’ आल्याचे ससून हॉस्पिटलमध्ये स्पष्ट झाले.

भाषा समितीच्या बैठकीत केवळ चर्चेचाच कीस

$
0
0
राज्याचे पुढील २५ वर्षांचे भाषा धोरण निश्चित करण्यासाठी सल्लागार समितीने बोलाविलेल्या बैठकीत तक्रारी आणि मागण्यांचा पाऊस पडला खरा; पण ठोस सूचनांअभावी साडेतीन तासांच्या चर्चेनंतरही ‘शब्द बापुडे; केवळ वारा’ अशीच स्थिती राहिली.

खडतर आर्थिक वर्षात नोकरीच्या संधी कायम

$
0
0
यंदाचे आर्थिक वर्ष अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने आव्हानात्मक ठरणार असले, तरी नोकरीच्या शोधत असणाऱ्यांना पुढील काही महिने संधीचे ठरणार आहेत. माहिती तंत्रज्ञान आणि औषध निर्मिती क्षेत्रात नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

मराठीची बोलू कौतुके; टॅब्लेटवरही वापरू शके

$
0
0
माहिती तंत्रज्ञान युगामध्ये इंटरनेट, टॅब्लेट, मोबाइलवर सहजपणे मराठी वापरता यावी, या साठी मूलभूत दहा कौशल्यांची माहिती देणारा ई-लर्निंग’ अभ्यासक्रम ‘महाराष्ट्र ज्ञान महामंडळा’तर्फे (एमकेसीएल) तयार करण्यात येत आहे.

शिक्षण मंडळ पालिकांमध्ये विलिनीकरणाच्या हालचाली?

$
0
0
महापालिकांमधील शिक्षण मंडळे संबंधित महापालिकांमध्ये विलीन करण्याच्या हालचाली सुरू असून याबाबत लवकरच मंत्रिमंडळापुढे प्रस्ताव आणण्यात येणार असल्याचे समजते. शिक्षणहक्काच्या प्रभावी अंमलबजावणीसंदर्भातील मुद्यावरून हा विषय छेडण्यात आला होता.

पारा घसरला

$
0
0
शहर आणि परिसरात कमाल तापमानात अंशतः घट झाली असून, बुधवारी ३९.८ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. चटका आणखी काही दिवस कायम राहणार असल्याचे संकेत पुणे वेधशाळेने दिले आहेत.

विद्येच्या माहेरघरीच होतेय ’शिक्षण हक्का’ची ऐशीतैशी

$
0
0
नव्या शैक्षणिक वर्षातील शाळा सुरू होण्यास जेमतेम महिन्याभराचा अवधी राहिलेला असताना पुणे शहरात शिक्षण हक्क कायद्यानुसार बंधनकारक असलेल्या प्रवेशांपैकी फक्त पंधरा टक्के जागांवरच प्रवेश झाले आहेत.

उस्ताद झिया फरिदुद्दीन डागर यांचे निधन

$
0
0
ज्येष्ठ ध्रुपद गायक उस्ताद झिया फरिदुद्दीन डागर यांचे बुधवारी सायंकाळी पनवेल येथे वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८० वर्षांचे होते. उत्तर भारतीय शास्त्रीय संगीतातील ध्रुपद गायकीचे वैशिष्ट्य जपणाऱ्या डागर कुटुंबात त्यांचा जन्म झाला होता.

‘एफडीए’ अधिकाऱ्यांची रिक्त पदांमुळे दमछाक

$
0
0
राज्यातील जनतेला भेसळमुक्त खाद्यपदार्थ देण्याबरोबरच बनावट औषधांना लगाम लावणे पुरेशा मनुष्यबळाअभावी अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) अधिकाऱ्यांना अशक्य होत असून कारभाराचा गाडा हाकताना त्यांची दमछाक होऊ लागली आहे.

परीक्षाकामांना नकारघंटा वाजविणाऱ्यांवर कारवाई

$
0
0
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेचे काम करण्यास नकार देणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

नागरिक सुविधा केंद्रे बंद

$
0
0
मिळकतकर भरण्यासाठी नागरिकांची लगबग सुरू असतानाच शहराच्या काही भागांमधील नागरिक सुविधा केंद्रे बंद आहेत. त्यामुळे नागरिकांना त्रास होत आहे. सध्या नागरिकांना मिळकतकराची बिले आली असून येत्या महिन्याअखेरीपर्यंत कर भरल्यास सर्वसाधारण करातून सवलत मिळते.

खडकीत उद्यापासून बंद

$
0
0
‘एलबीटी’च्या विरोधात पुणे शहर आणि पिंपरी चिंचवडच्या व्यापाऱ्यांनी पुकारलेल्या बंदला पाठिंबा देण्यासाठी खडकी भागातील व्यापारीही उद्यापासून बंदमध्ये सहभागी होणार आहेत. त्यातून मेडिकल स्टोअर्स, हॉटेल आणि अत्यावश्यक सेवा वगळल्या आहेत, असे खडकी व्यापारी महासंघाने जाहीर केले.

औषध दुकाने बंद ठेवू नयेत

$
0
0
नवीन फार्मा पॉलिसी, तसेच फार्मासिस्टच्या सक्तीविरोधात अखिल भारतीय औषध विक्रेत्यांनी उद्या (शुक्रवारी) पुकारलेल्या देशव्यापी बंदमध्ये पुण्यातील औषध विक्रेत्यांनी सहभागी होऊ नये, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) केले आहे.

कल्याणीनगरमधून तरुणीची सुटका

$
0
0
सामाजिक सुरक्षा विभागाने कल्याणीनगर येथील पॉश सोसायटीतून एका काश्मिरी तरुणीची बुधवारी सुटका केली. या तरुणीकडून वेश्या व्यवसाय करून घेणाऱ्या दलालाला अटक करण्यात आली आहे तर वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या सूत्रधाराचा शोध सुरू आहे.

पाणी कोठे मुरते त्याचा शोध घ्या

$
0
0
राज्यात दुष्काळाची परिस्थिती असल्याने पुणेकर काटकसरीने पाण्याचा वापर करत असतानाही पुणेकरांनी पाणी जपून वापरण्याचा सल्ला पाटबंधारे खात्याने दिला आहे.

पाच प्रभागांत २४ तास पाणी

$
0
0
पुणेकरांना २४ तास आणि समान पाणी मिळण्यासाठी भवानी पेठ, सहकारनगर, विमाननगर, नागपूर चाळ आणि कात्रजमधील राजस सोसायटी या पाच प्रभागांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर मीटरद्वारे पाणी देण्याची योजना अखेर ‘प्रवाही’ झाली आहे.

यंदा शेकरूंची संख्या वाढणार?

$
0
0
महाराष्ट्राचा राज्यप्राणी असलेल्या शेकरूची वार्षिक गणना येत्या १४ मेपासून भीमाशंकर अभयारण्यात सुरू होणार आहे. गेल्या वर्षी झालेल्या गणनेमध्ये साडेबाराशे शेकरूंची नोंद झाली होती. यावर्षी ही संख्या वाढेल, अशी शक्यता वनाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

बारावीचा निकाल मेअखेरीस?

$
0
0
राज्यभरातील ज्युनिअर कॉलेजच्या प्राध्यापकांनी बारावीच्या पेपरतपासणीवर टाकलेल्या बहिष्कारामुळे निकालप्रक्रियेत विलंब होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र, बहिष्कार मागे घेतल्यानंतर प्राध्यापकांनी पेपर तपासणीसाठी घेतलेल्या मेहनतीमुळे हा यंदा हा निकाल वेळेआधीच, म्हणजे मे महिन्याच्या अखेरीस जाहीर होण्याची शक्यता आहे.

...मग 'इस्मा' अंतर्गत कारवाई कशी?

$
0
0
‘स्थानिक संस्था करासाठी (एलबीटी) नोंदणी केलेली नसेल, तर व्यापार करण्याचा अधिकारच नाही, अशी कायद्यात तरतूद आहे. मग आम्ही व्यापार बंद केला असेल, तर जीवनावश्यक वस्तू नियंत्रण कायद्याअंतर्गत (इस्मा) कारवाई कशी करणार,’ असा प्रश्न पुणे व्यापारी महासंघाने बुधवारी मांडला. संपूर्ण ‘एलबीटी’ रद्द होईपर्यंत आता माघार घेणार नाही, असेही व्यापाऱ्यांनी स्पष्ट केले.

दुकानदारांना भीती सक्तीच्या 'बंद'ची

$
0
0
स्थानिक संस्था कराविरोधातील (एलबीटी) बंदला किरकोळ दुकानदारांकडून फारसा प्रतिसाद मिळाला नाही. व्यापारी महासंघाच्या आवाहनाला प्रतिसाद न देता त्यांनी दैनंदिन व्यवहार सुरू ठेवले होते. त्यामुळे पुणेकरांना बुधवारी बंदची झळ बसली नाही.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images