Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

पालिकेचे कालबाह्य नकाशे

$
0
0
जुन्या पुण्याच्या विकास आराखड्यासाठी (डीपी) अस्तित्वातील जमीन वापराचा अहवाल (ईएलयू) बनवताना पुणे महापालिकेने ब्रिटिशकालीन कालबाह्य नकाशे पुरवल्याचा गौप्यस्फोट ईएलयू तयार करणाऱ्या ‘कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग’ने केला आहे. डीपीतील रस्ते आणि नदी-नाल्यांचे नकाशे ईएलयूतील नकाशांशी जुळत नसल्याचेही कॉलेजने स्पष्ट केले आहे.

जेनरिक औषधे ९ ठिकाणी उपलब्ध

$
0
0
महागड्या औषधांना पर्याय आणि स्वस्त ठरणारी जेनरिक औषधे पेशंटला सहज उपलब्ध व्हावीत, यासाठी शहरातील नऊ ठिकाणच्या औषध विक्रेत्यांनी पुढाकार घेतला आहे. ही औषधे या केमिस्टकडे आता सहज मिळणार आहेत.

औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप

$
0
0
फार्मसिस्टची सक्ती, नव्या फार्मा पॉलिसीनुसार केमिस्टचे कमिशन, औषधांच्या किरकोळ विक्रीत येणारी परकीय गुंतवणूक यासारख्या विविध समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी येत्या दहा मे रोजी औषध विक्रेत्यांनी देशव्यापी संप पुकारला आहे.

यूपीएससीत मराठी झेंडा

$
0
0
यूपीएससी गुणवत्ता यादीत यंदा सत्तरहून अधिक मराठी उमेदवार झळकले असून, लातूरच्या कौस्तुभ दिवेगावकरने १५ वा क्रमांक पटकावला आहे. मूळ लातूरची; परंतु पुण्यातील ‘सीओईपी’ची विद्यार्थिनी क्षिप्रा आग्रे २९वी आली. मात्र, पहिल्या शंभरात महाराष्ट्राचे पाचच विद्यार्थी आहेत.

खड्डे बुजविण्यासाठी १३ कोटी

$
0
0
पुण्यात रस्ते कितीही चकाचक दिसत असले, तरी आगामी वर्षभरात त्यांची अवस्था दयनीय होणार असल्याचा महापालिकेला अंदाज आहे. त्यामुळे रस्त्यांच्या डागडुजीसाठी तब्बल १३ कोटी १२ लाख रुपये खर्च करून डांबर आणि एलडीओ खरेदी केले जाणार आहे. याबाबतचा प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समितीमध्ये दाखल केला आहे.

तिरंदाज प्रतिमाची आत्महत्या

$
0
0
आंतरराष्ट्रीय तिरंदाज प्रतिमा बोरो हिने वानवडी येथील आर्मी स्पोर्टस ट्रेनिंग सेंटर येथील होस्टेलमध्ये गळफास लावून आत्महत्या केली. हा प्रकार शुक्रवारी दुपारी दीडच्या सुमारास घडला. राष्ट्रीय शिबिरासाठी ती पुण्यात आली आली होती.

फुकट्या गावांचे पाणी बंद करणार

$
0
0
पुणे महापालिकेकडून पाणी घेऊन एक पैसाही न देणाऱ्या गावांचा पाणीपुरवठा बंद करण्याचा विचार महापालिका करीत आहे. संबंधित गावांना नोटिसा देण्यासाठी त्यांना पुरवण्यात येणारे पाणी आणि थकलेले बिल याचा अहवाल सादर करण्याचा आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाणीपुरवठा विभागाच्या सर्व कार्यकारी अभियंत्यांना दिला आहे.

महाराष्ट्रावर राज्य कंत्राटदारांचे!

$
0
0
सरकारच्या विरोधात वास्तव मांडले तर त्याचा किती विपर्यास होऊ शकतो, याचा अनुभव पश्चिम घाट जैवविविधता अहवालाच्या निमित्ताने घेतला आहे. कंत्राटदारांचे हितसंबंध जपण्यासाठी सरकारने अहवालात ‘ध’ चा ‘मा’ करून लोकांची दिशाभूल केली आहे. महाराष्ट्रावर सध्या कंत्राटदारच राज्य करीत आहेत, अशी टीका ज्येष्ठ पर्यावरण शास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांनी गुरुवारी केली.

पहिल्या शंभरात मराठी अधिक हवेत!

$
0
0
‘यंदा पहिल्या १०० उमेदवारांमध्ये राज्याचे उमेदवार खूपच कमी असल्याची खंत निश्चितच आहे. हा आकडा वाढायला हवा. त्याचप्रमाणे राज्याचे १०० उमेदवार ‘यूपीएससी’च्या गुणवत्ता यादीत झळकणे हेच आपल्यापुढील उद्दिष्ट हवे,’ अशी भावना माजी सनदी अधिकारी आणि चाणक्य मंडलचे संचालक अविनाश धर्माधिकारी यांनी व्यक्त केली.

मनसे चित्रपट कार्यकारिणी बरखास्त

$
0
0
चित्रपट कलाकारांना सभासद होण्याची सक्ती व निर्मात्याकडून ५१ हजार रुपयांचा ‘दंड’ घेणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कामगार सेनेची पुण्याची कार्यकारिणी बरखास्त करण्याचा निर्णय अध्यक्ष अमेय खोपकर यांनी घेतला आहे.

बेपत्ता व्यक्ती व महिलेचा गळा आवळून खून

$
0
0
कोरेगाव पार्क येथून बेपत्ता झालेली ८४ वर्षीय व्यक्ती आणि त्यांच्या स्वीय सहायक महिलेचा गळा आवळून खून झाल्याचे उघडकीस आले असून, त्यांच्या दोघा मारेकऱ्यांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गजाआड केले.

पुण्यातील मनसेची चित्रपट कार्यकारिणी बरखास्त

$
0
0
चित्रपट कलाकारांना सभासद होण्याची सक्ती व निर्मात्याकडून ५१ हजार रुपयांचा ‘दंड’ घेणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कामगार सेनेची पुण्याची कार्यकारिणी बरखास्त करण्याचा निर्णय अध्यक्ष अमेय खोपकर यांनी घेतला आहे.

दिरंगाई करणा-या सर्व्हेअरवर कारवाईचा बडगा

$
0
0
जमिनीची मोजणी झाल्यानंतर एका महिन्यात मोजणीची ‘क’ प्रत न देणा-या सर्व्हेअरवर कारवाईचा बडगा जमाबंदी आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी उगारला आहे. मोजणी झालेल्या जमिनीची क प्रत संबधित मालकाला न देणा-या सर्व्हेअरवर कारवाई करावी, अशी सूचनाही दळवी यांनी दिली आहे.

कात्रज प्राणी संग्रहालयात गर्दीचा महापूर

$
0
0
पुस्तके, टीव्हीवरच्या मालिकांमध्ये दिसणा-या वन्यप्राण्यांना प्रत्यक्ष बघण्यासाठी दरवर्षी उन्हाळी सुट्यांमध्ये कात्रजच्या राजीव गांधी प्राणी संग्रहालयात जाणाऱ्या पुणेकरांची संख्या काही कमी नाही.

रेशनकार्डचे अर्ज आता झोन ऑफिसही स्वीकारणार

$
0
0
नागरिकांचा त्रास कमी व्हावा, यासाठी महा ई-सेवा केंद्राबरोबरच शहरातील आठ परिमंडळ कार्यालयात रेशनकार्डचे अर्ज स्वीकारण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. रेशनकार्डचे अर्ज देण्यासाठी ई सेवा केंद्रात होत असलेली गर्दी विचारात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.

‘इन्स्पेक्टर राज’ येणार नाही याची दक्षता घ्या

$
0
0
स्थानिक स्वराज्य संस्था कराची (एलबीटी) अंमलबजावणी करताना ‘इन्स्पेक्टर राज’ येणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश राज्य सरकारने महापालिकांच्या आयुक्तांना दिले आहेत.

सफाई कर्मचारी सर्वेक्षण समितीची स्थापना

$
0
0
पुणे शहरामध्ये दहा हजार ३८४ उघड्या नाल्यांचा वापर केलेली शौचालये (इन-सॅनिटरी लॅटरिन) असून, ९४ ठिकाणी मैला वाहून शौचालयांची सफाई केली जात असल्याचे उघड झाले आहे.

ईएलयू फसवणूकप्रकरणी चौकशी करा

$
0
0
विकास आराखड्यातील जमिन वापराच्या नकाशासंदर्भात (ईएलयू) महापालिकेची सर्वसाधारण सभा आणि नागरिकांची फसवणूक केल्याप्रकरणी चौकशी करण्यात यावी, अशी मागणी स्वयंसेवी संघटनांनी शनिवारी केली आहे.

आयुक्तांच्या बदलीप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे घूमजाव

$
0
0
पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रीकर परदेशी यांच्या बदलीची मागणी केली नव्हती, तर त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीत बदल करण्याची मागणी केली असल्याचे घुमजाव राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिका-यांनी केले आहे.

पोलिस असल्याच्या बतावणीने लूट

$
0
0
पोलिस असल्याची बतावणी करीत महिलांचे दागिने लुटण्याचे प्रकार वाढले असून हडपसरमधील एका महिलेच्या गळ्यातील सुमारे ७० हजार रुपये किमतीचे दागिने चोरट्यांनी नेले.
Viewing all 75772 articles
Browse latest View live


Latest Images