Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

आ. बापट खरे पुणेकर नाहीतच!

$
0
0
गेले वर्षभर पाणीकपातीने हैराण झालेल्या पुणेकरांचा ‘तीनदा अंघोळ करणारे’ म्हणून अवमान करणाऱ्या लोकप्रतिनिधींना खरे पुणेकर म्हणता येणार नाही, अशा शब्दांत काँग्रेसने भाजपचे आमदार गिरीश बापट यांच्या विधानावर गुरुवारी टीकास्त्र सोडले.

‘एक्सप्रेस वे’वर टँकर उलटला

$
0
0
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील अपघातांचे सत्र संपताना दिसत नाही. शुक्रवारी सकाळी ‘एक्सप्रेस वे’वर एक गॅस टँकर उलटला. या अपघातानंतर टँकरमधून गॅस गळती सुरू झाली. अखेर खबरदारीचा उपाय म्हणून ‘एक्सप्रेस वे’वरील दोन्ही बाजूने होणारी वाहतूक काही काळासाठी थांबवण्यात आली आहे.

टोपीखाली दडलीय हवेची झुळूक

$
0
0
उन्हात फिरताना डोक्यावर घातलेल्या टोपीमधून हवेची झुळूक मिळाली तर... नुसत्या कल्पनेनेच उकाडा दूर होतो ना? उन्हाच्या चटक्यातून दिलासा देणारी ‘सोलर फॅन कॅप’ ही अनोखी टोपी बाजारात उपलब्ध झाली आहे!

अतिक्रमणविरोधात मुंढव्यात कारवाई

$
0
0
महापालिकेच्या बांधकाम विभागाच्या वतीने मुंढवा आणि हडपसर परिसरातील बेकायदा बांधकामे शुक्रवारी पाडण्यात आली.

खाणपट्ट्यांच्या परवान्यांसाठी पर्यावरण ‘ऑडिट’

$
0
0
खाणपट्ट्यांचे जिल्हा प्रशासनाने दिलेल्या मुदतीत पर्यावरण ऑडिट न करणाऱ्यांचे उत्खनन परवाने रद्द केले जाणार असल्याची माहिती ‌अतिरिक्त जिल्हाधिकारी गणेश पाटील यांनी दिले. जिल्ह्यातील ७०० पैकी ३५० खाणपट्टाधारकांनीच आत्तापर्यंत पर्यावरण ऑडिट करून त्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाकडे सादर केला आहे.

मल्टिप्लेक्सची बेकायदा वसुली

$
0
0
करमाफी असताना मल्टिप्लेक्स थिएटरचालकांनी प्रेक्षकांकडून वसूल केलेले पैसे सामाजिक संस्थेला देण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारला दिले आहेत. या न्यायाने पुण्यातील मल्टिप्लेक्स चालकांनी बुडविलेल्या ८० कोटी रुपयांच्या करमणूक कराची रक्कमदेखील सामाजिक संस्थेला मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

उकाड्यातून अंशतः दिलासा

$
0
0
गेल्या रविवारपासून शहरात वाढलेला उन्हाचा चटका अंशतः कमी झाला आहे. सलग पाच दिवसांनंतर पारा चाळिशीच्या खाली उतरला असून, तो शुक्रवारी ३८ अंशांवर स्थिरावला. पुढील दोन दिवसांत तापमान स्थिर राहण्याचे संकेत वेधशाळेने दिले आहेत.

दुष्काळग्रस्तांसाठी ‘कर्जाचा’ घास

$
0
0
घर, वाहन, दागिने खरेदी आणि आजकाल तर अगदी पर्यटनासाठीदेखील कर्ज काढले जात असताना, दुष्काळी भागाला मदत देण्यासाठी ‘वैयक्तिक कर्ज’ घेण्याची संवेदनशीलता पुण्यातील दोन प्राचार्यांनी दाखविली आहे.

पत्नी आणि मुलांवर रॉकेल ओतून खुनाचा प्रयत्न

$
0
0
पत्नी आणि दोन्ही मुलांच्या अंगावर रॉकेल ओतून त्यांना पेटवून देण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी पतीला अटक केली. पत्नीच्या चारित्र्याच्या संशयावरून झालेल्या वादात गुरुवारी हा प्रकार घडल्याचे मुंढवा पोलिसांनी सांगितले.

पर्यटक वाहनांसाठी प्रवाशांची यादी ‘मस्ट’

$
0
0
पर्यटक परवाना घेणाऱ्या वाहनांना; तसेच तात्पुरत्या स्वरूपात प्रवासी वाहतुकीसाठी विशेष परवना घेणाऱ्या बस वाहतूकदारांनी यापुढे प्रवाशांची नाव व पत्त्यासह सविस्तर यादी सोबत ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे.

पालिकेच्या लघुपटाची ‘लिम्का बुक’मध्ये नोंद

$
0
0
चित्रपट माध्यमाचा कोणताही अनुभव नसताना पुणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी निर्माण केलेल्या ‘फ्लायओव्हर’ या लघुपटाने ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स २०१३’मध्ये झेप घेतली आहे. शासकीय स्तरावर नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची दखल ‘लिम्का’ने घेतली.

‘एक्स्प्रेस वे’ आठ तास ठप्प

$
0
0
मुंबई- पुणे ‘एक्स्प्रेस वे’वर खंडाळा घाटात शुक्रवारी सकाळी झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातामुळे तब्बल आठ तास वाहतूक ठप्प झाली होती. घाटातील दस्तुरी गावच्या हद्दीत गॅसचा टँकर उलटून झालेल्या अपघातामुळे मोठ्याप्रमाणात गॅस गळती झाली आणि ‘एक्स्प्रेस वे’वर वाहनांच्या २५ किलोमीटरपर्यंत लांब रांगा लागल्या होत्या.

टँकरच्या धडकेत दोन कामगार ठार

$
0
0
मुंबई- पुणे ‘एक्स्प्रेस वे’वर खंडाळा घाटात आयआरबी कंपनीच्या डांबराच्या टँकरची पुढे जाणाऱ्या ट्रेलरला मागून जोरात धडक बसून झालेल्या अपघातात शुक्रारी पहाटे आयआरबीच्या दोन कामगारांचा जागीच मृत्यू झाला तर पाच जण गंभीर जखमी झाले. यामुळे या मार्गावरील वाहतूक चार तास खोळंबली होती.

शालेय विद्यार्थ्यांची आता दोनदा आरोग्य तपासणी

$
0
0
शून्य ते अठरा वर्षातील शालेय विद्यार्थ्यांसह इतर मुला-मुलींच्या आरोग्याची आता वर्षातून दोनदा मोफत तपासणी होणार आहे. पुणे जिल्ह्यासह राज्यात राबविल्या जाणाऱ्या ‘राष्ट्रीय बाल स्वास्थ्य’ कार्यक्रमामुळे ही तपासणी होणार आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी १५ एप्रिलची यादी अंतिम

$
0
0
जुलै ते सप्टेंबर या काळात मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीची निवडणूक येत्या जून महिन्यात घेतली जाणार आहे. या निवडणुकीसाठी १५ एप्रिलची मतदार यादी अंतिम धरली जाणार आहे.

विरोध असल्यास सुवर्णमध्य काढू

$
0
0
‘लकाकि तळ्याचे नुकसान करणे किंवा तेथील जैवविविधता नष्ट करणे हा आमचा हेतू नाही. आत्तापर्यंत या तळ्यातील गाळ काढलेला नाही, त्यामुळे पाणीसाठा दिवसेंदिवस कमी झाल्याचे निदर्शनास आले आहे. तरीदेखील नागरिकांचा याला विरोध असेल तर आपण सुवर्णमध्य काढू,’ अशी भूमिका महापालिकेने घेतली आहे.

‘जलसंपदा’च्या जळालेल्या फायलींचा शोध सुरू

$
0
0
विदर्भातील सिंचनाचा अनुशेष भरून काढण्याच्या ‘व्हीआयपी’ फाइलसह जलसंपदा विभागाच्या १८० फाइल मंत्रालयाला गेल्या वर्षी लागलेल्या आगीत नष्ट झाल्या आहेत. यातील ६७ मूळ फाइल सापडल्या असून, ५२ फायलींचा शोध सुरू आहे.

दोन घोटाळेबाज वकिलांना अटक

$
0
0
रेल्वेत बनावट नोंदींद्वारे झालेल्या दहा कोटी रुपयांच्या डिझेल गैरव्यवहारात न्यायाधीश आणि सरकारी वकिलांना ‘मॅनेज’ करण्यासाठी श्रीरामपूर येथील दोन वकिलांनी २८ लाख रुपये घेतल्याचे तपासात स्पष्ट झाले. याप्रकरणी सीबीआयने त्या दोन्ही वकिलांना अटक केली आहे.

फरारी खुन्याला अटक

$
0
0
पत्नीचा खून करून पाच वर्षे पोलिसांना गुंगारा देणाऱ्या आरोपीला गुन्हे शाखेने कल्याण येथील रेल्वे स्टेशनवर अटक केली. महिलेच्या वेषात फिरत असलेल्या या खुन्याने येरवडा येथे पत्नीचा खून केला होता.

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांसाठी ‘पोटभर अन्नसेवा’

$
0
0
दुष्काळग्रस्त भागातून पुण्यात शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी भारतीय जनता युवा मोर्चातर्फे ‘पोटभर अन्नसेवा प्रकल्प’ ही विनामूल्य खानावळ सुरू करण्यात आली आहे. सध्या दोनशेहून अधिक विद्यार्थी या खानावळीचा लाभ घेत आहेत.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images