Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

कस्तुरीरंगन समितीचा विचार एकांगी, अशास्त्रीय

$
0
0
डॉ. कस्तुरीरंगन समितीने निसर्ग आणि पर्यावरणाचा एकांगीपणाने विचार केला असून, तो अशास्त्रीय आणि चुकीच्या दृष्टीकोनातून मांडण्यात आला आहे, असे मत ज्येष्ठ पर्यावरण शास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांनी व्यक्त केले.

‘एमबीए’ प्रवेशासाठी ‘सीमॅट’चे बंधन पाळायचे का?

$
0
0
एमबीए अभ्यासक्रमांबाबत अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेची (एआयसीटीई) भूमिका केवळ सल्ल्यापुरती मर्यादित असल्याचे सुप्रीम कोर्टाने सांगितल्याने यंदाचे ‘एमबीए’चे प्रवेश ‘एआयसीटीई’च्या प्रवेश परीक्षेद्वारे करायचे बंधन पाळायचे का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

परिवर्तन घडविण्याची हीच वेळ

$
0
0
राज्यासमोर अनेक समस्या उभ्या राहिल्या असतानाही, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे भ्रष्टाचाराचे सत्र सुरू आहे. त्यामुळे, त्यांची सत्ता घालवून परिवर्तन घडविण्याचा एल्गार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी बुधवारी व्यक्त केला.

पुण्यातल्या नद्यांची स्थिती गंगेपेक्षाही विदारक

$
0
0
महाराष्ट्रातील नद्यांचे सध्या बिकट चित्र असून पुण्यातील नद्यांची परिस्थिती गंगा नदीपेक्षा जास्त विदारक झाली आहे. आता तरी पुणे महापालिकेने जागे होऊन नद्यांवरील अतिक्रमणाबाबत ठोस भूमिका घेत, पुनरुज्जीवनासाठी धोरण केले पाहिजे, असे स्पष्ट मत ज्येष्ठ जलअभ्यासक डॉ. राजेंद्र सिंह यांनी व्यक्त केले.

साखळीचोरीला उत

$
0
0
पोलिस असल्याची बतावणी करून चोरट्यांनी महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लुटल्याच्या चार तर, मंगळसूत्र हिसकावण्याच्या पाच घटना घडल्या. गुरुवारी सकाळी साडेसहा ते साडेनऊ या वेळेत या घटना घडल्या.

डिझेल घोटाळ्यातील आणखी दोघे चतुर्भुज

$
0
0
रेल्वेत बनावट नोंदीद्वारे दहा कोटी रुपयांच्या डिझेल घोटाळाप्रकरणी आणखी दोन कर्मचाऱ्यांना सीबीआयने अटक केली. या दोघांना येत्या नऊ मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश विशेष न्यायाधीश (सीबीआय) सुधाकर यार्लगड्ड यांनी दिला आहे.

घरातील शॉटसर्किटच्या धुरात गुदमरून अभियंत्याचा मृत्यू

$
0
0
घरातील फ्रीजमध्ये शॉटसर्किट होऊन झालेल्या धुराने गुदमरून सॉफ्टवेअर इं‌जिनीअरचा मृत्यू झाल्याची घटना औंधमधील माधव पार्क सोसायटीत गुरुवारी पहाटे अडीच वाजता घडली.

पारा चाळिशीपुढेच...

$
0
0
शहर आणि परिसरात गुरुवारी उकाडा कायम होता. पारा अद्याप चाळिशीच्या वरच असून, किमान तापमानातील वाढीमुळे दिवसभरासह रात्रीही नागरिकांवर हैराण होण्याची वेळ आली आहे.

‘विनाअनुदानित कॉलेजांसाठी सरकारी मान्यतेची गरज नाही’

$
0
0
कायम विनाअनुदानित तत्त्वावरील कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखांची कॉलेजेस सुरू करण्यासाठी आता राज्य सरकारच्या मान्यतेची गरज नाही. संबंधित विद्यापीठाची मान्यता मिळाल्यानंतर या अभ्यासक्रमांसाठीचे कॉलेज सुरू करता येईल, असा निर्णय सुप्रीम कोर्टाने गुरुवारी दिल्याची माहिती महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष पी. ए. इनामदार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

प्रदूषणाचा अंदाज वर्तवणारे ''सफर'' कार्यान्वित

$
0
0
शहराच्या कोणत्या भागातील प्रदूषण नागरिकांच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते, याचा एक दिवस आधीच अंदाज आता मिळू शकणार आहे. हा अंदाज वर्तविणारा ‘सफर’ हा प्रकल्प पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये सुरू झाला आहे.

नदीपात्रातून बेकायदेशीर रस्त्यास परवानगीच कशी?

$
0
0
डेक्कन ते विठ्ठलवाडीपर्यंत मुठा नदी पात्रातून झालेला रस्ता पूररेषा ओलांडून तयार झाला आहे. महापालिकेच्या या बेकायदेशीर कामाला परवानगीच कशी दिली, असा प्रश्न राष्ट्रीय हरित प्राधिकरणाने पाटबंधारे विभागाला गुरुवारी विचारला.

कामगार कायद्यात बदल करा

$
0
0
कंत्राटी कामगारांना नोकरीत सामावून घेण्याची तरतूद कामगार कायद्यात करण्याची मागणी भारतीय मजदूर संघाच्या वतीने गुरुवारी करण्यात आली. कंत्राटी कामगारांच्या मागण्यांसंदर्भात भारतीय मजदूर संघाच्या वतीने कामगार उपायुक्त कार्यालयसमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

विमान प्रवासातून क्रीडा साहित्य वाहतुकीला सूट द्यावी

$
0
0
स्पर्धा आणि सरावासाठी विमानाने प्रवास करणाऱ्या खेळाडूंकडून त्यांच्या सोबत असलेल्या क्रीडा साहित्याचे अधिक पैसे घेतले जात आहेत. ही पद्धत थांबवावी व क्रीडा साहित्य वाहतूक मोफत असावी, अशी मागणी महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेने (एमओए) केली आहे.

‘ईएलयू’ची खरी माहिती द्या; अन्यथा उपोषण

$
0
0
विकास आराखड्यामधील जमीन वापराचा नकाशा महापालिकेने तयार केला आहे, की इंजिनीअरींग कॉलेजने; या बाबत पालिका प्रशासनाने उलटसुलट माहिती दिल्याचा आरोप करीत, योग्य माहिती न दिल्यास उपोषण करण्याचा इशारा ‘पुणे बचाव समिती’ने गुरुवारी दिला आहे.

प्रिंटींग मिस्टेकमुळे नागरिकांना नोटिसा

$
0
0
शहराच्या गावठाण भागातील एफएसआय दोनऐवजी दीड असल्याचा उल्लेख ही प्रिंटींग मिस्टेक असल्याचा खुलासा महापालिका प्रशासनाने यापूर्वी केला होता. परंतु, या चुकीच्या आधारे आता नागरिकांनाच नोटिसा बजाविण्यास सुरूवात झाल्याचा आरोप नगरसेवक संजय बालगुडे यांनी गुरुवारी केला.

प्यारेलाल यांना फसवणाऱ्यांना कोठडी

$
0
0
ज्येष्ठ संगीतकार प्यारेलाल शर्मा यांच्या लोणावळा जवळील वरसोलीगावातील प्लॉटची बोगस दस्ताऐवज व व्यक्तीद्वारे परस्पर विक्री केल्या प्रकरणी दोघांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

डॉ. सत्त्वशीला सामंत यांचे निधन

$
0
0
ज्येष्ठ भाषातज्ज्ञ डॉ. सत्त्वशीला सामंत यांचे बुधवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्या ६८ वर्षांच्या होत्या. त्यांच्यावर गुरुवारी वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

दुष्काळी जनतेला 'BPL' दर्जा?

$
0
0
दुष्काळी भागातील जनतेला दारिद्र्यरेषेखालील (बिलो पॉव्हर्टी लाइन - बीपीएल) कुटुंबांचा दर्जा देऊन त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारच्या विचाराधीन असल्याचे सूतोवाच केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी बुधवारी केले.

जावयाने केला सासूचा खून

$
0
0
कौटुंबिक कारणावरून झालेल्या भांडणात जावयाने सासूचा खून केल्याची घटना दापोडी येथील महादेवनगरमध्ये गुरुवारी दुपारी घडला. खूनी जावयाचा पोलिस शोध घेत आहेत.

पुण्याच्या जागेवर RPIचा दावा

$
0
0
रिपब्लिकन पार्टीने लोकसभेसाठी पुण्याची जागा मिळावी, अशी मागणी केली असून, लवकर निर्णय झाला तर तयारीला वेळ मिळेल, असे पक्षाध्यक्ष रामदास आठवले यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत जाहीर केले.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images