Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

‘काळ्या यादी’तून कंपनी गायब

0
0
शहरातील वृक्षगणनेचे काम अपूर्ण ठेवल्यामुळे काळ्या यादीत टाकलेली कंपनी गेल्या आठवड्यात अचानक काळ्या यादीतून बाहेर आली. इतकेच नव्हे, तर ‘या कंपनीने वृक्षगणनेचे काम केले असून, ती काळ्या यादीत नाही,’ असे प्रमाणपत्रही पुणे महापालिकेकडून मुंबई महापालिकेला देण्यात आले आहे

स्वबळावर ठेवा आयोजनाची तयारी

0
0
राज्यासमोरील भीषण दुष्काळी परिस्थिती पाहता संमेलनासाठी राज्य सरकारकडून मिळणाऱ्या अनुदानाची खात्री नसल्याने विश्व संमेलनाच्या आयोजकांनी निधी उपलब्धतेबाबत स्वयंपूर्ण आहोत का, याची खातरजमा करावी, असे साहित्य महामंडळाने लंडनच्या महाराष्ट्र मंडळाला कळविले आहे.

‘मराठी’ नाही, तर परीक्षा नाही

0
0
राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेतील (एनटीएस) भाषा विषयासाठी मराठी माध्यम उपलब्ध व्हावे, म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने सोमवारी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त महावीर माने यांना घेराव घातला.

बालकामगार प्रथेविरोधात एल्गार

0
0
‘पुणे शहर बालकामगार मुक्त करा’, ‘बालकामगार प्रथा नष्ट करा’, ‘बालकामगारांचे योग्य पुनर्वसन करा’ आदी मागण्या करून पुण्यातील विविध संस्थांमधील विद्यार्थ्यांनी मंगळवारी बालकामगार प्रथेला विरोध केला.

कामगार आयुक्तालयावर येत्या गुरुवारी धरणे

0
0
कंत्राटी कामगार कायद्यातील विविध त्रुटींविरोधात भारतीय मजदूर संघाच्या ठेकेदार कामगार संघातर्फे येत्या गुरुवारी (२ मे) सकाळी अकरा वाजता कामगार आयुक्तालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

पुण्याचा पारा ४१.३

0
0
उन्हाच्या तप्त झळांच्या चटक्याने मंगळवारीही पुणेकरांच्या अंगाची लाही लाही केली. या हंगामातील उच्चांकी ४१.३ अंश सेल्सियस तापमानाची नोंद वेधशाळेत झाली. राज्यातही उन्हाची तीव्रता कायम असून, अमरावतीसह चंद्रपूर आणि नागपूर येथे सर्वाधिक ४५.४ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली.

७६ हजारांचा गुटखा जप्त

0
0
गुटखा व पानमसाल्याच्या विक्रीवर बंदी असताना छुप्या पद्धतीने शिरूर येथे गुटख्याची विक्री करीत असल्याचे आढळून आले. तेथील व्यापाऱ्याकडून ७६ हजार ८४९ रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला.

बेकायदा स्कूल व्हॅन, रिक्षांवर आरटीओचा कारवाईचा बडगा

0
0
शालेय विद्यार्थ्यांची बेकायदा वाहतूक करणाऱ्या रिक्षा, बस आणि व्हॅन चालकांवर जून महिन्यात कारवाईचा बडगा उगारण्याचा इशारा वाहतूक पोलिस आणि परिवहन खात्याने दिला आहे.

ब्लॅकलिस्टेड कंपन्या यादीतून बाहेर काढण्यात ‘काळेबेरे’

0
0
ब्लॅकलिस्टेड कंपनीला काळ्या यादीतून बाहेर काढण्याच्या प्रकरणी ‘काळेबेरे’ असल्याची टीका स्वयंसेवी संस्थांनी केली असून या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी मंगळवारी केली.

दादांच्या उपस्थितीत बीडीपीवर खडाजंगी

0
0
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर अनेकदा चकार शब्दही न काढणारे राष्ट्रवादीचे नगरसेवक आणि आमदारांनी मंगळवारी मात्र पवार यांच्या उपस्थितीतच जैववैविध्य उद्यानांच्या (बीडीपी) आरक्षणाच्या विरोधात जोरदार तोफा डागल्या.

लाचखोर इंजिनीअरकडे सापडली ६० लाखांची मालमत्ता

0
0
लाचप्रकरणी अटक करण्यात आलेल्या महापालिकेच्या पथविभागातील इंजिनीअर मुश्ताक महंमद शेख (वय ५१, रा. कल्याणीनगर, येरवडा) यांच्या घर झडतीत कल्याणीनगर येथे एक रो-हाउस, चार दुकाने आणि एक फ्लॅट, इतर चीजवस्तू असा ६० लाख ५६ हजारांचा ऐवज मिळाला आहे.

विद्यापीठ होस्टेलवर पाण्याचा ठणठणाट

0
0
पुणे विद्यापीठाच्या होस्टेलवर कमी दाबाने होणाऱ्या पाणीपुरवठ्यावर मार्ग काढण्यासाठी आता विद्यापीठाच्याच सिनेट सदस्यांना पुढाकार घ्यावा लागत आहे.

जेनरिक औषधांसाठी ‘CAPD’चा पुढाकार

0
0
पुणे शहर व जिल्ह्यातील सहा हजार केमिस्टपर्यंत जेनरिक औषधांची यादी पोहोचविण्यासाठी आता केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्ट (सीएपीडी) संघटना पुढाकार घेणार आहे. त्यामुळे सर्व भागात जेनरिक व स्वस्त औषधे मिळण्याचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

'आधार'विनाच नवे गॅस कनेक्शन

0
0
नवीन गॅस कनेक्शन घेताना आधारकार्ड बंधनकारक नाही, त्यामुळे गॅस कनेक्शन रोखता येणार नसल्याचे जिल्हाधिकारी विकास देशमुख यांनी स्पष्ट केले आहे. तसेच, येत्या एक ऑक्टोबरपासून गॅसधारकांच्या बँक खात्यात सबसिडी जमा होईल, असेही त्यांनी सांगितले.

पीएमपीचा आर्थिक कणा मोडणार?

0
0
ब्लॅकलिस्टेड कंपनीकडून एक हजार बस खरेदी करण्याच्या प्रस्तावाला महापालिकेतील सत्ताधारी काँग्रेसने मंगळवारी जोरदार विरोध केला. आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या पीएमपीचा आर्थिक कणा या प्रस्तावामुळे मोडून पडेल, अशी टीका काँग्रेसचे गटनेते आणि विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे यांनी केली.

दोन प्राध्यापकांमध्ये हाणामारी

0
0
पुण्यातील एका प्रतिष्ठित कॉलेजातील दोन प्राध्यापकांमधील कुरबुरीचे पडसाद मंगळवारी पुणे विद्यापीठाच्या आवारात उमटले. त्यातील एका प्राध्यापकाने दुसऱ्या प्राध्यापकाच्या श्रीमुखात भडकावली.

आमदारांकडून पुणेकरांची टवाळी

0
0
उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याबरोबरच आता पुण्यातील लोकप्रतिनिधींनीही पुणेकरांच्या पाणी वापराची टवाळी सुरू केली आहे. ‘पुणेकर तीन वेळा आंघोळ करतात आणि दोन वेळा गाड्या धुतात.

पोलिस मुख्यालयात पुन्हा चोरी

0
0
शिवाजीनगर पोलिस मुख्यालयातील एका ‘आयपीएस’ अधिकाऱ्याच्या घराजवळील चंदनाचे झाड चोरीस गेल्याचा प्रकार रविवारी मध्यरात्री घडला. चारी प्रहर सशस्त्र गार्डचा पहारा असलेल्या मुख्यालयातील चंदनाची झाडेच सुरक्षित नसल्याचे या चोरीमुळे स्पष्ट झाले आहे.

दूध खरेदी दरात वाढीची मागणी

0
0
दुष्काळी परिस्थितीसह वीज, डिझेल, मजुरी व पुशखाद्यात वाढ झाली असल्याने शेतकऱ्यांच्या दूध खरेदी दरात वाढ करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य सहकारी दूध उत्पादक संघाने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे केली आहे.

पक्षनेते ठरवणार नवे पाणी धोरण

0
0
पुणे महापालिकेकडून समाविष्ट २३ गावे आणि भविष्यात येणाऱ्या २८ गावांमध्ये प्रस्तावित बांधकामांमधील फ्लॅटमध्ये दरडोई ४० लिटर एवढेच पाणी देण्याच्या धोरणाबाबत आता पक्षनेते निर्णय घेणार आहेत.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images