Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

शेती महामंडळ कामगारांचा आंदोलनाचा इशारा

$
0
0
कामगारांच्या न्याय मागण्यांसाठी शेती महामंडळ कार्यालयासमोर येत्या २ मे पासून बेमुदत उपोषण करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ कामगार लढा कृती समितीने दिला आहे.

लकी नंबरसाठी मोजा तिप्पट रक्कम

$
0
0
तुमच्या कारला लकी नंबर हवाय... या नंबरवरून तुमची ‘आयडेंटीटी’ तयार होईल... ती टिकविण्यासाठी पैसेही मोजाल... ही ओळख टिकविणे आता महागात पडणार असून, लकी नंबरसाठी तिप्पट पैसे मोजावे लागणार आहेत!

दिवसभरात साडेपाचशे रिक्षांना ‘ई-मीटर’

$
0
0
इलेक्ट्रॉनिक मीटर बसवून घेण्याची मुदत संपण्यास आता केवळ एकच दिवस राहिल्याने ‘ई-मीटर’ बसविण्यासाठी रिक्षाचालकांची धावपळ सुरू झाली आहे. सोमवारी दिवसभरात सुमारे साडेपाचशे रिक्षाचालकांनी ‘ई-मीटर’ बसविले असून, आत्तापर्यंत ८० टक्के रिक्षांनी ‘ई-मीटर’ बसविले आहे.

अन्नसुरक्षा विधेयकाला जाणीवपूर्वक विरोध

$
0
0
अन्नसुरक्षा विधेयक लवकरच संसदेत सादर करण्यात येणार आहे. मात्र, विरोधक जाणूनबुजून विधेयक मांडू देत नाहीत, अशी टीका केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केली.

पक्षी-विमान ‘षडाष्टका’बाबत पुण्यात संशोधन

$
0
0
विमानांना पक्षी धडकून होणाऱ्या अपघातांमुळे पक्ष्यांच्या प्रजातींना निर्माण होत असलेल्या धोक्याबद्दल पुण्यात संशोधन सुरू झाले आहे. विशेष म्हणजे, धोक्यात आलेल्या पक्ष्यांच्या प्रजातींपैकी एकाही प्रजातीतील पक्षी विमानांमुळे धोक्यात आल्याची घटना भारतात घडली नसल्याचे या अभ्यासामधून समोर आले आहेत.

‘पुणे-हावडा दुरान्तो’ला सुट्टीसाठी जादा डबे

$
0
0
उन्हाळी सुट्टीनिमित्त मध्य रेल्वेने पुणे-हावडा दुरान्तो एक्स्प्रेसला जादा डबे जोडण्याचा निर्णय घेतला आहे.

पत्नीला विष पाजून पतीचा आत्महत्येचा प्रयत्न

$
0
0
पत्नीला ढेकूण मारण्याचे औषध पाजून तिचा खून करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर पतीनेही तेच औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा प्रकार घडला आहे. शनिवारवाड्याच्या पटागंणात १२ एप्रिल रोजी हा प्रकार घडला.

एसटी कामगारांसाठी ‘मनसे’चे आंदोलन

$
0
0
एसटी कर्मचाऱ्यांना २२.५ टक्के वेतनवाढ हवी असताना, ती १३ टक्के कशी मान्य केली. एसटी कर्मचाऱ्यांना मिळत असणारी छत्र्या आणि रेनकोटची सुविधा का बंद झाली, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे एसटीच्या मान्यताप्राप्त संघटेनेने देण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेनेतर्फे करण्यात आली आहे.

संमेलनाचा निधी जमवा; मगच बोलवा

$
0
0
राज्यासमोरील भीषण दुष्काळी परिस्थिती पाहता संमेलनासाठी सरकारकडून मिळणाऱ्या अनुदानाची खात्री नसल्याने विश्व संमेलनाच्या आयोजकांनी निधी उपलब्धतेबाबत स्वयंपूर्ण आहोत का, याची खातरजमा करावी, असे साहित्य महामंडळाने लंडनच्या महाराष्ट्र मंडळाला कळविले आहे.

प्राध्यापकांना प्रतीक्षा फरकाच्या रकमेची

$
0
0
वेतनाच्या फरकाची रक्कम २९ एप्रिलपर्यंत देण्याचे आश्वासन राज्य सरकारने पाळले नसल्याचा दावा प्राध्यापकांनी सोमवारी केला. मात्र, फरकाची रक्कम सरकारकडून मिळाली असून, येत्या चार-पाच दिवसांत ती प्राध्यापकांच्या हातात पडेल, असा खुलासा उच्च शिक्षण संचालकांनी त्यावर केला आहे.

बिबवेवाडी भागात पालिकेची कारवाई

$
0
0
बिबवेवाडी आणि गुलटेकडी भागात डोंगरमाथा आणि डोंगर उतारावर करण्यात आलेली बांधकामे महापालिकेच्या बांधकाम विभागाने सोमवारी पाडली. बिबवेवाडीत सहा दुमजली इमारतींचे बांधकाम तोडण्यात आले.

अल्पवयीन मुलावर अत्याचार; आरोपीला अटक

$
0
0
अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार केल्याप्रकरणी एकाला लोणी काळभोर पोलिसांनी अटक केली आहे. त्याला कोर्टात हजर करण्यात आले असता २ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

पुणेकरांची ‘हॉटेलिंग’ला सुट्टी

$
0
0
इडली, डोसा, पिझ्झा, बर्गर आणि पावभाजीपासून पंजाबी ड‌िशवर यथेच्छ ताव मारणाऱ्या पुणेकरांना सोमवारी हॉटेलच्या जेवणाची लज्जत लुटता आली नाही. या पदार्थांची जागा हातगाडीवरच्या वडापाव, भजी आणि सामोशांनी घेतली.

‘पब्लिक ट्रान्सपोर्ट हब’साठी ६ जकातनाक्यांची पाहणी

$
0
0
शहरातील ४१ पैकी सहा जकातनाक्यांवर ‘पब्लिक ट्रान्सपोर्ट हब’ उभारण्यासाठी महापालिका अधिकाऱ्यांनी पाहणी केली असून, कमी खर्चात उपलब्ध पायाभूत सुविधांचा वापर करण्यासाठी आराखडा तयार करण्यास सुरूवात झाली आहे.

मुख्य उद्यान अधीक्षकपदी वन खात्यातील अधिकारी?

$
0
0
पुणे महापालिकेत मुख्य उद्यान अधीक्षक पदावर असताना ‘पुणेकर पाण्याच्या बाबतीत माजलेत’ असे विधान चांगलेच अंगलट आलेल्या वन खात्यातील नरेश झुरमुरे यांच्या उदाहरणानंतरही राज्य सरकारने पुन्हा या पदावर वन खात्यातील अधिकाऱ्याचीच प्रतिनियुक्तीवर नेमणूक करण्याचा घाट घातल्याचे समजते.

...त्या एनजीओ गेल्या कुठे?

$
0
0
समाविष्ट गावांमध्ये जैववैविध्य उद्यानांचे (बीडीपी) आरक्षण ठेवण्यासाठी आवश्यक असलेला निधी उपलब्ध करून देऊ, असे आश्वासन पूर्वी देणाऱ्या स्वयंसेवी संस्था आता कोठे आहेत? असा सवाल राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सोमवारी केला आहे.

स्वस्त औषधांसाठी सरसावले केमिस्ट

$
0
0
‘ब्रँडेड’ कंपन्यांची महागडी औषधे घेणे ग्राहकांना परवडत नाही. त्यामुळे त्याच कंपन्यांची ३०० प्रकारच्या ‘जेनरिक’ औषधांची यादी पुण्यातील सहा केमिस्टच्या एका गटाने तयार केली आहे.

PI ने मागितली १० लाखांची लाच

$
0
0
बांधकाम व्यावसायिकाविरुद्ध वेळेत चार्जशीट दाखल करण्यासाठी, तसेच ऑफिस सील न करण्यासाठी दहा लाख रुपयांची लाच मागणाऱ्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिस निरीक्षकावर गुन्हा दाखल झाला आहे.

पालिकेचा लाचखोर अभियंता अटकेत

$
0
0
महापालिकेच्या पथविभागातील उपअभियंता मुश्ताक महंमद शेख (वय ५१, रा. कल्याणीनगर, येरवडा) यांना सात हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी सोमवारी दुपारी अटक करण्यात आली.

रिसर्च ‘फेलों’ ना ‘पेट’मधून सूट

$
0
0
पुणे विद्यापीठाशी संलग्नित वैज्ञानिक संशोधन संस्थांमधील कर्मचाऱ्यांना (रिसर्च फेलो) विद्यापीठांतर्गत पीएचडी करण्यासाठी चालना मिळावी म्हणून, विद्यापीठ आता खास सोय उपलब्ध करून देणार आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images