Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

९ वर्षाच्या कुणालचा काव्यसंग्रह प्रकाशित

$
0
0
स्वतःच्या नवव्या वाढदिवशी स्वतःचाच काव्यसंग्रह प्रकाशित होण्याचे भाग्य नुकतेच कुणाल देशपांडे या बालकवीला साधले. आई-वडिलांच्या व्यवसायानिमित्त अमेरिकेत स्थायिक कुणालने वयाच्या आठव्या वर्षी इंग्रजीतून काही कवितांचे लेखन केले होते.

हॉटेल्सच्या संपाने आज खवय्यांची तारांबळ

$
0
0
नव्याने लागू केलेला सेवा कर हा अन्यायकारक असल्याचा आरोप करत देशभरातील हॉटेलमालक आज, सोमवारी बंद पाळणार आहेत. त्यानुसार शहरातील सर्व हॉटेल्स बंद राहणार आहेत.

बंदी घातलेल्या रस्त्यांवरही धावतात रातराणी

$
0
0
एसटी वाहतुकीसाठी म्हात्रे पूल, नीलायम टॉकीजचा रस्ता बंद असतानादेखील या रस्त्याने बस नेण्याचे प्रकार पुन्हा एकदा सुरू झाले आहेत. वाहतूक पोलिसांच्या दुर्लक्षामुळे अशा बसचालकांवर कारवाई होत नसल्याचे समोर आले आहे.

सोनसाखळीच्या २ चोऱ्यांमध्ये ६० हजारांचे दागिने लांबवले

$
0
0
पोलिसांच्या डोकेदुखीत भर घालणाऱ्या सोनसाखळी चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र आहे. मध्यंतरी शहराच्या मध्यवस्तीत सातत्याने घडणाऱ्या या चोऱ्यांचे लोण आता उपनगरांमध्येही वाढीस लागले आहे.

समाजसुधारणेची जबाबदारी कायद्यासह माध्यमांवरही

$
0
0
‘बलात्काराच्या घटनांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने कडक कायदा केला आहे. मात्र, कायद्यात बदल करूनही किंवा सरकारने हातात दंडुके घेतल्यानंतरही बलात्काराच्या घटना घडत आहेत.

क्रीडानिकेतन शाळेत आठवीच्या वर्गाची मागणी

$
0
0
पुणे महानगरपालिकेच्या माध्यमिक विभागामार्फत क्रीडानिकेतन शाळेत इयत्ता आठवीचे वर्ग सुरू करण्याची मागणी शिक्षण मंडळ सदस्य लक्ष्मीकांत खाबिया यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

पक्ष्यांसाठी पाण्याची भांडी, बर्डफिडर ठेवा

$
0
0
उन्हाळ्यात पक्ष्यांसाठी पाण्याची भांडी ठेवल्यास तसेच घर, ऑफिसच्या परिसरात बर्डफिडर लावल्यास चिमण्यांची संख्या वाढण्यास मदत होऊ शकेल, असे सांगत पक्षी वाचविण्यासाठी विविध उपाय ‘ग्रीन ब्रिगेड’तर्फे पर्यावरण कट्टा उपक्रमांतर्गत नागरिकांना सांगण्यात आले.

संगीतकार प्यारेलाल शर्मा फसवणूकप्रकरणी एकाला कोठडी

$
0
0
ज्येष्ठ संगीतकार प्यारेलाल शर्मा यांच्या लोणावळ्याजवळील वरसोली गावातील प्लॉटची बोगस दस्ताऐवजांच्या माध्यमातून आणि बनावट व्यक्ती उभ्या करून विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार मागील आठवड्यात उघडीस आला.

रिक्षाजप्ती टाळण्यासाठी शेवटचे २ दिवस

$
0
0
इलेक्ट्रॉनिक मीटरच्या सक्तीमुळे पासिंग न करणाऱ्या रिक्षाचालकांविरोधात कडक पावले उचलली जात असल्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील सुमारे ६५ टक्क्यांहून अधिक रिक्षांना ‘ई- मीटर’ लागले आहेत.

किरकोळ कारणावरून वेटरचा खून

$
0
0
रात्री दारूपार्टीसाठी बसल्यावर चिकन एकट्यानेच खाल्ले या किरकोळ कारणावरून एका वेटरच्या डोक्यात दगड घालून खून केल्याप्रकरणी त्याच्या मित्राला खडकी पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी विजय शंकर पाटील (वय ४३, रा. खडकी) याला अटक करण्यात आली आहे.

आंबा विक्रीला दुष्काळामुळे फटका

$
0
0
पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीचा आंबा खरेदी विक्रीला चांगलाच फटका बसत असल्याचे दिसत आहे. आंब्याला ग्रामीण भागातून होणारी मागणी अद्याप सुरू झाली नाही.

सक्षम सरकार फक्त काँग्रेसच देईल!

$
0
0
आगामी निवडणुकीनंतर देशात मजबूत आणि सक्षम सरकार नसेल, तर देशाचे सोव्हिएट रशियाप्रमाणे विघटन होण्याचा धोका आहे. सक्षम सरकार देण्याची ताकद फक्त काँग्रेसच राखून आहे, असा दावा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.

कालबाह्य जकातनाके होणार बस स्टँड

$
0
0
स्थानिक स्वराज्य संस्था कर (एलबीटी) लागू झाल्यानंतर कालबाह्य होणाऱ्या ४१ जकातनाक्यांवर बसस्थानके सुरू करण्याची योजना महापालिका आखत आहे. पीएमपी आणि एसटी यांचे एकत्रित थांबे सुरू झाल्यास शहरातील वाहतुकीवरील ताण हलका होण्यास मदत होणार आहे.

'बीडीपी' प्रश्नी पवारांची दिशाभूल

$
0
0
समाविष्ट गावांमधील जैववैविध्य उद्यानांच्या (बीडीपी) आरक्षणाच्या मुद्यावरून बीडीपी विरोधकांनी कृषिमंत्री शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांची दिशाभूल करण्यात येत असल्याचा आरोप बीडीपी समर्थक संघटनेने रविवारी केला आहे.

होरपळीचे राज्य; पारा चाळिशी पार

$
0
0
उन्हाचा चटका, अंगाची लाही आणि घामाघूम जीव.. अशा उन्हाच्या तीव्रतेचा ‘कहर’ रविवारी राज्याने अनुभवला. बहुतेक ठिकाणी पाऱ्याने चाळिशी ओलांडली. राज्यातील सर्वाधिक म्हणजे ४७.६ अंश सेल्सियस तापमानाची नोंद चंद्रपूरमध्ये झाली.

‘एमसीए’चा पेपर फुटल्याची अफवा

$
0
0
पुणे विद्यापीठाच्या ‘एमसीए’चा सोमवार दुपारचा पेपर सकाळीच विद्यार्थ्यांच्या हातात पडला. पेपर फुटल्याचीच जोरदार चर्चा झाली अन् विद्यार्थ्यांमध्ये काही काळ गोंधळही झाला. अखेर हा पेपर फसवा असल्याचे सगळ्यांच्या ध्यानात आले!

‘आरटीआय’चा फेरआढावा

$
0
0
माहिती अधिकार अधिनियमांतर्गत (आरटीआय) प्रलंबित प्रकरणांची वाढती संख्या... माहिती मिळविण्यात येणाऱ्या अडचणी... या कायद्याचे हत्यार वापरून होणारे ब्लॅकमेलिंग... अशा गेल्या सात वर्षांत समोर आलेल्या या कायद्यातील विविध बाबींचा परामर्श घेण्याचे आता केंद्र सरकारनेच निश्चित केले आहे.

चीनला जाब विचारण्याची संधी

$
0
0
चीनचा भारताविषयीचा दृष्टिकोन अद्यापही स्पष्ट होऊ शकला नाही. मात्र, सद्यस्थितीत लडाखमधील चीनच्या वाढत्या कारवाया ही चीनला जाब विचारण्याची भारताकडे चालून आलेली मोठी संधी असल्याचे मत डॉ. लॉरा सालमन यांनी पुण्यात व्यक्त केले.

‘यंगिस्तान’च्या कल्पनांतून साकारताहेत मोबाइल अॅप

$
0
0
रिक्षांचे ट्रॅकिंग करता येईल का.., डाएट प्लॅनच्या नोंदी कशा ठेवायच्या..., शिक्षणाचे रेकॉर्ड कसे मिळेल... आदींची माहिती मोबाइल अॅप्लिकेशनच्या माध्यमातून मिळत आहेत. त्यामुळे भविष्यात एकाहून एक अशी अॅप उपलब्ध झाल्यास आश्चर्च वाटायला नको! ‘इन्फोसिस’च्या ‘कॅच देम यंग’ या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांनी विविध ‘अॅप’च्या संकल्पना मांडल्या आहेत.

मेंटल हॉस्पिटलमधील सफाई कर्मचाऱ्यांचा संप

$
0
0
येरवडा मेंटल हॉस्पिटलमधील ९० सफाई कर्मचारी गेल्या चार दिवसांपासून संपावर गेले आहेत. परिणामी, स्वच्छतेअभावी हॉस्पिटलमधील विविध वॉर्डांत दुर्गंधी पसरू लागली आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images