Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

टेम्पो उलटून दोन जण ठार

$
0
0
पुणे- सातारा महामार्गावर कापूरहोळ गावाजवळ डीजे वाद्याचा टेम्पो उलटून झालेल्या अपघातात दोन जण जागीच ठार झाले. शनिवारी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.

तीन बांगलादेशी मुलींची सुटका

$
0
0
बांगलादेश येथून एजंटमार्फत फसवून पुण्यात वेश्याव्यवसाय करण्यासाठी आणण्यात आलेल्या तीन मुलींची पोलिसांनी सापळा रचून सुटका केली. याप्रकरणी एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. तर एकजण कारवाईदरम्यान अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला.

शस्त्रसाठा प्रकरणी एकाला अटक

$
0
0
मध्यप्रदेशातून पुण्यात विक्रीसाठी आणलेला मोठा शस्त्रसाठा पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेतील संघटित गुन्हेगारी विरोधी पथकाने जप्त केला आहे. याप्रकरणी नगर येथील एका सराइत गुन्हेगाराला अटक करण्यात आली आहे.

वारज्यातील दोन फ्लॅट फोडले

$
0
0
वारजे माळवाडी येथील राहुल पार्कमधील दोन फ्लॅट फोडून चोरट्यांनी सुमारे तीन लाख रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली. याप्रकरणी सचित वर्मा (वय ३०, रा. राहुल पार्क, वारजे माळवाडी) यांनी तक्रार दाखल केली आहे.

एनसीपीकडून काँग्रेसचा विश्वासघात

$
0
0
‘केंद्रात आणि राज्यात एकत्र सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने विदर्भातील जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसचा विश्वासघात केला,’ अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी शनिवारी केली.

‘बीडीपी’मुळे राष्ट्रवादीत तट

$
0
0
पुण्यातील टेकड्यांवर बांधकाम करण्याबाबतचा मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये चांगलाच धुमसू लागला आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनीच याबाबत आरक्षणाच्या विरोधात भूमिका घेत थेट मुख्यमंत्र्यांनाच साकडे घातले आहे.

पंतप्रधान म्हणजे सरपंच नव्हे!

$
0
0
‘नरेंद्र मोदी यांना गुजरातचे मुख्यमंत्री झाल्यानंतर पंतप्रधानपदाची स्वप्ने पडत आहेत. पण, भाजपमध्ये या पदासाठी अंतर्गत वाद सुरू असून त्यांना पंतप्रधानपद हे सरपंचपदासारखेच वाटत आहे,’ अशी टीका काँग्रेसचे राज्याचे प्रभारी मोहन प्रकाश यांनी शनिवारी केली.

....अन् संसार मार्गस्थ झाला

$
0
0
किरकोळ कारणामुळे त्यांच्या सुखी संसारात वादाचे विघ्न आले. त्यातच दोघांच्या भांडणात घरच्या लोकांचा हस्तक्षेप वाढला आणि गुंता अधिकच वाढला. कोर्टाची पायरी न चढता तिने कौटुंबिक सल्ला केंद्राची मदत घ्यायचे ठरवले.

मध्यावधी निवडणुका नाहीतः शिंदे

$
0
0
केंद्र सरकार स्थिर आहे. त्यामुळे, लोकसभेच्या निवडणुका मुदतीतच होणार असल्याचे केंद्रीय गृहंमत्री सुशीलकुमार शिंदे यांनी स्पष्ट केले. लोकसभेत वित्त विधेयक मंजूर करण्यावरून मित्रपक्ष पाठिंबा काढून घेतील. त्यामुळे मुदतपूर्व निवडणुका होण्याची शक्यता शरद पवार यांनी बोलून दाखविली होती.

या आयुक्तांचे चुकले तरी काय?

$
0
0
अनधिकृत बांधकामांच्या विरोधात कठोर भूमिका घेतल्याच्या मुद्यावरून पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांच्या बदलीसाठी राजकीय पातळीवरून प्रयत्न सुरू आहेत.

विद्यार्थ्याला फसविणा-या ‘NIIT’ला दणका

$
0
0
विद्यार्थ्यांना ९९ दिवसांत कम्प्युटरचा कोर्स पूर्ण केल्यास नोकरी देण्याची हमी देऊन फसवणूक केल्याप्रकरणी एका कम्प्युटर इन्स्टिट्यूटला विद्यार्थ्याची फी परत देण्याचा आदेश नुकताच ग्राहक मंचाने दिला आहे.

‘घरकुल’मध्ये राजकारण नको

$
0
0
आर्थिक दुर्बल घटकांसाठी राबवल्या जाणाऱ्या घरकुल योजनेतील लाभधारकांच्या जीवनाशी राजकारण करू नका, अन्यथा लोकप्रतिनिधींना घेराव घालावा लागेल, असा इशारा कष्टकरी कामगार पंचायतीने दिला आहे.

कोथिंबिरीसह भाज्या महागल्या

$
0
0
गेल्या आठवड्यात स्थिर भाव राहिलेल्या भाज्यांचे दर पुन्हा वाढले असून, हिरवी मिरची, कारली, फ्लॉवर, टोमॅटो आणि आले महाग झाले आहेत. कोंथिबिरीची आवक घटल्याने तिचा ‘भाव’वाढला आहे.

चुका सुधारा, कामाला लागा

$
0
0
‘मावळ आणि शिरूर लोकसभा मतदार संघातील मागील पराभव विसरून चुका सुधारा. नव्या जोमाने कामाला लागा,’ असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांना दिला आहे.

‘एसटी’ला टोलमधून वगळण्याची मागणी

$
0
0
एसटी बसना आकारण्यात येणारी टोलची रक्कम माफ करण्याचा निर्णय सरकारने तात्काळ घ्यावा, अशी मागणी महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेतर्फे करण्यात आली आहे.

‘ससून’ला हवा चार ‘एफएसआय’

$
0
0
आधुनिकीकरण, सुपर स्पेशालिटी सुविधा, कॅन्सर रिसर्च सेंटरसारख्या प्रकल्पांसाठी ससून हॉस्पिटलमध्ये बांधकामासाठी जागाच शिल्लक नाही. त्यामुळे विशेष बाब म्हणून ‘ससून’च्या विस्तारीकरणासाठी चार ‘एफएसआय’ (चटई निर्देशांक क्षेत्र) देण्यात यावा, असा प्रस्ताव हॉस्पिटल प्रशासनाने राज्य सरकारकडे पाठविला आहे.

गॅस टँकरच्या अपघातात इंदापूरजवळ २ ठार

$
0
0
पुणे-सोलापूर रोडवर इंदापूरजवळ रविवारी पहाटे अमोनिया गॅसची वाहतूक करणारा टँकर खड्ड्यात पडून झालेल्या अपघातात दोघे ठार तर दोघे किरकोळ जखमी झाले आहेत. टँकर चालक आणि क्लिनरचा मृत्यू हा गॅसमुळे झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

‘गुन्हेगाराचे वय ठरविण्याचा अधिकार न्यायाधीशांना द्या’

$
0
0
लज्जास्पद गुन्ह्यांमध्ये बालगुन्हेगार (विधीग्रस्त) हा ‘बाल’ आहे की प्रौढ याचा खटला चालविण्याचा अधिकार न्यायाधीशांना देण्यात यावा, असे मत अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एच. मोहम्मद यांनी व्यक्त केले.

कुंटणखाना चालविणाऱ्या दोघींना कोठडी

$
0
0
बुधवार पेठेमध्ये कुंटणखाना चालविणाऱ्या दोघींना फरासखाना पोलिसांनी अटक केली. त्यांच्या ताब्यातून दोन युवतींची सुटका करण्यात आली आहे. त्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. बी. देवरे यांनी हा आदेश दिला.

हद्दीलगतच्या २१ गावांना मोफत पाणी

$
0
0
पुणेकरांना पाणीकपातीला तोंड द्यावे लागत असताना, पुण्याजवळील २१ ग्रामपंचायतींना महापालिका दररोज १५ एमएलडी पाणी फुकट देत आहे. त्या पाण्याची बिले देण्यास संबंधित गावांकडून टाळाटाळ केली जात असल्याने थकबाकीचा आकडा तब्बल १२ कोटी रुपयांवर जाऊन पोहोचला आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images