Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

मालमत्तेसाठी आजीचा खून

$
0
0
अपघाताचा बनाव करून आजीचा खून करणा-या नातवासह दोघांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. यातील एक आरोपी पसार झाला आहे. मालमत्तेच्या कारणावरून आजीच्या खुनाचा घाट नातवानेच घातल्याचे तपासात उघड झाले आहे.

सुट्टीत लावा ‘खेळण्यांची लायब्ररी’

$
0
0
‘पंधरा दिवसांपूर्वीच एवढे महाग खेळणे आणले आणि आमच्या मन्याला आता त्याचा कंटाळा आलाय. कितीही खेळणी आणली, तरी मुलांच्या मागण्या संपत नाहीत...’ घराघरात ऐकायला मिळणा-या या संवादावर ‘खेळण्याची लायब्ररी’ हा एक उत्तम पर्याय पालकांनी शोधला आहे.

निघाली एकदाची एलबीटीची अधिसूचना

$
0
0
राज्य सरकारने स्थानिक संस्था कर (एलबीटीची ) मर्यादा एक लाख रुपयांवरून तीन लाख रुपये आणि दीड लाख रुपयांची मर्यादा चार लाख रुपये करण्याची अधिसूचना जारी झाले आहे.

‘सिटी कॉर्पोरेशन’ची १८ लाखांची फसवणूक

$
0
0
अमनोरा पार्क टाऊन येथील सिटी कॉर्पोरेशन या कंपनीत नोकरी करणाऱ्या दोघा कर्मचाऱ्यांनी कंपनीची १८ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. हडपसर पोलिसांनी एका संशयिताला अटक केली आहे, तर दुसरा पसार आहे.

रेल्वेत दहा कोटींचा डिझेल घोटाळा

$
0
0
बनावट नोंदी घेऊन रेल्वेच्या दौंड डेपोमध्ये वीस लाख लिटरचा डिझेल घोटाळा झाल्याचे उघडकीस आले आहे. या घोटाळ्याची रक्कम दहा कोटी रुपयांच्या आसपास असून दौंड डेपोच्या मुख्य लोको निरीक्षकाला सीबीआयने अटक केली आहे.

‘ब्लॅकलिस्ट’ला पायघड्या

$
0
0
पुणे महानगर परिवहन सेवेला (पीएमपी) तोट्यातून बाहेर काढण्यासाठी एक हजार बसेसच्या खरेदीचा प्रस्ताव तातडीने मंजूर करण्याची मागणी संचालकांनी पीएमपी प्रशासनाकडे केली आहे.

मध्यवस्तीतील शाळांच्या वेळा बदला

$
0
0
शाळांमधील विद्यार्थ्यांची ने-आण करणा-या वाहनांमुळे शहराच्या मध्यवस्तीत वाहतूक कोंडी होण्याचे प्रकार होतात. त्यामुळे मध्यवस्तीत असणाऱ्या शाळांच्या वेळेमध्ये बदल करण्याची सूचना वाहतूक पोलिसांनी केली आहे.

२५ दिवसांत १०० कोटी रुपये जमा

$
0
0
मिळकतकर देयकांचे १५ टक्के वाटप अद्याप अपूर्ण असतानाही, महापालिकेकडे गुरुवारअखेर शंभर कोटी रुपये जमा झाले आहेत. महापालिकेच्या इतिहासात २५ दिवसांत शंभर कोटी रुपये जमा होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

शिक्षकांचा संप सुरूच

$
0
0
वेतनाच्या फरकापोटी पाचशे कोटी रुपये शिक्षकांना वितरित करण्याबाबतचा आदेश (जीआर) राज्य सरकारने जारी केल्यानंतरही प्राध्यापक संपावर ठाम आहेत. त्यामुळे संप सुरू ठेवणा-या प्राध्यापकांना निलंबित करण्याचा इशारा उच्च शिक्षणमंत्री राजेश टोपे यांनी शुक्रवारी दिला.

चिनी मालाविरोधात मोहीम

$
0
0
भारतात घुसखोरी करीत असलेल्या चीनला सीमारेषेवरच थोपवण्याचे काम भारत सरकार आणि लष्करी सैन्य करणारच आहे. पण जागरूक नागरिक म्हणून आपण चिनी मालावर बहिष्कार टाकून चिनी लोकांचा भ्रम दूर केला पाहिजे, असे आवाहन शेतकरी संघाचे शरद जोशी यांनी व्यक्त केले.

‘एलबीटी’ची भीती नको

$
0
0
स्थानिक संस्था करासाठी (एलबीटी) महापालिकेकडे व्यापाऱ्यांनी नोंद केल्यानंतर तो भरावा लागेल असे नाही. कर लागू करून सरकारने त्यांच्यावर विश्वास दाखवला आहे, त्यामुळे त्यांनी भीती बाळगू नये,’ असे पालिकेचे ‘एलबीटी’ प्रमुख विलास कानडे यांनी शनिवारी सांगितले.

उलगडला ‘एका कॉपीरायटरचा प्रवास’

$
0
0
कधी शब्दांची चौफेर फटकेबाजी…कधी सर्वसामान्यांच्या मनाचा ठाव घेणारा हळूवार आणि संवेदशील संवाद.. अशा शब्दातून ग्राहकांपर्यंत पोहोचवलेला आशयबद्ध मजूकर…

‘बीडीपी’वर पुन्हा चर्चा

$
0
0
समाविष्ट गावांमधील जैववैविध्य उद्यानांच्या आरक्षणाबाबत (बीडीपी) पुन्हा सर्वांची बाजू ऐकून घेण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शनिवारी दिले आहे.

‘नाट्यगृहांमध्ये मराठी सिनेमांसाठी व्यवस्था असावी’

$
0
0
मराठी सिनेमांना कायमस्वरूपी थिएटर मिळण्यासाठी नाट्यगृहांची रचना थिएटर म्हणून वापरता येईल अशी असावी. नाट्यगृहांमध्ये नाटके वर्षभर होतातच असे नाही, त्या वेळी या जागेचा उपयोग मराठी सिनेमांना नक्की होईल, अशी कल्पना प्रसिद्ध संगीतकार कौशल इनामदार यांनी शनिवारी मांडली.

वृत्तपत्र विक्रेत्यांच्या मुलांना शिक्षणात हव्या सवलती

$
0
0
शहरातील वृत्तपत्र विक्रेत्यांच्या मुलांना पहिली ते दहावीपर्यंत मोफत पुस्तके मिळावीत, शुल्कात ५० टक्के सवलत, विद्यार्थ्यांना शाळांमध्ये शिष्यवृत्ती मिळावी यासारख्या विविध मागण्यांसाठी पुणे वृत्तपत्र व्रिकेता संघाच्या शिष्टमंडळाने शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांची भेट घेतली.

महापालिकेच्या बजेटचा बोजवारा

$
0
0
महापालिकेचे बजेट मंजूर होऊन एक महिना होत असतानाच नगरसेवकांनी बजेटचा बोजवारा उडवण्यास सुरुवात केली आहे. नगरसेवकांकडून एका महिन्यात तब्बल नऊ कोटी रुपयांच्या वर्गीकरणाचे प्रस्ताव स्थायी समितीमध्ये दाखल झाले आहेत.

मराठी भाषेतील परीक्षेसाठी खासदारांचा पुढाकार

$
0
0
राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेतील (एनटीएस) भाषा विषयाचा पेपर मराठीतून लिहिता यावा, यासाठी आता पुण्याच्या खासदारांनी पुढाकार घेतला आहे.

मोरांसाठी दिली धान्यांची मदत

$
0
0
एमआयटी टेकडीवर वास्तव्यास असलेल्या मोरांना अन्न आणि पाण्याचा तुटवडा पडू नये यासाठी डॉ. अजय कुलकर्णी यांना संदीप खर्डेकर यांनी शुक्रवारी धान्याची मदत केली. टेकडीवरील मोरांच्या संगोपनासाठी डॉ. अजय कुलकर्णी गेल्या दहा वर्षांपासून सातत्याने प्रयत्न करीत आहेत.

महावितरणच्या अधिकाऱ्याची आत्महत्या

$
0
0
मंचर येथील महावितरण कंपनीत कार्यरत असलेले अधिकारी कोरस पांडुरंग सवाई (वय २५) यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येमागचे कारण कळू शकले नाही.

PMP ची खरेदी तिप्पट नुकसानीची

$
0
0
एकरकमी पैसे देणे वाचविण्याच्या बदल्यात पीएमपीला एक हजार बसखरेदीसाठी तिपटीहून अधिक, म्हणजे तीनशे कोटींच्या बसेससाठी तब्बल साडेनऊशे कोटी रुपये मोजावे लागणार आहेत.
Viewing all 75772 articles
Browse latest View live


Latest Images