Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

दहशतवाद रोखण्यासाठी राज्यभर जनजागृती

0
0
दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) दहशतवादी हल्ले रोखण्यासाठी संपूर्ण राज्यात जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. फरारी आरोपींची पोस्टर, फ्लेक्स लावणे, बस स्टँड, रेल्वे स्टेशनमध्ये आरोपींचे फोटो दाखविणे, स्थानिक केबल नेटवर्कवरून आरोपींची माहिती प्रसारित करणे, असे विविध कार्यक्रम हाती घेतल्याची माहिती ‘एटीएस’चे प्रमुख राकेश मारिया यांनी दिली.

शैक्षणिक साहित्य महागणार

0
0
क्रमिक पाठ्यपुस्तकांचा अपवाद वगळता इतर पूरक शैक्षणिक पुस्तके आणि साहित्यावर ‘एलबीटी’ (स्थानिक संस्था कर) लागू केला गेला असल्याने नव्या शालेय वर्षात पालकांवर खर्चाचा बोजा वाढणार आहे. तसेच, यामुळे पुण्यातून होणाऱ्या शैक्षणिक साहित्याच्या खरेदीवर परिणाम होण्याची भीती व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

मियाँ बिबी राजी तो…

0
0
‘मियाँ बिबी राजी, तो क्या करेगा काझी’ अशी एक म्हण आहे. त्या म्हणीचा प्रत्यय येईल, अशी एक घटना नुकतीच पुण्यात घडली. आपल्या मुलीने विधुराशी संसार थाटू नये, म्हणून इरेला पेटलेल्या कुटुंबीयांनी त्यांचे लग्नच रद्द करण्याची मागणी करणारा अर्ज थेट कोर्टात दाखल केला होता. पण त्या जोडप्याच्या एकत्र नांदण्याच्या इच्छेला मान देऊन कोर्टाने त्यांच्या बाजूने निकाल दिला.

शहराच्या कारभाऱ्यांना धक्का?

0
0
जुन्या हद्दीच्या विकास आराखड्यावर (डीपी) हरकती-सूचना दाखल करण्यास मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यामुळे शहराच्या कारभाऱ्यांना धक्का बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. विरोधी पक्षांनी मात्र मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे

‘फार्मसिस्टशिवाय दुकाने चालवू नका’

0
0
औषध दुकानांत फार्मसिस्टची संख्या अपुरी असल्याने त्या जागा भरण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडे (एफडीए) मुदत मागितली आहे. पूर्वीचा काळ बदलला असून फार्मसिस्टशिवाय दुकाने सुरू करू नका, अशा शब्दांत अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी केमिस्टना फटकारले.

शाळांच्या मान्यतेचा प्रश्न ऐरणीवर

0
0
राज्यातील इंग्रजी माध्यमांच्या ३ हजार ११५ शाळांच्या मान्यतेचा प्रश्न मार्गी लागत नसल्याने महाराष्ट्र राज्य इंग्लिश स्कूल असोसिएशनने गुरूवारी शिक्षण संचालनालयासमोर ठिय्या आंदोलन केले.

खाणकामांना आमंत्रण

0
0
पर्यावरण आधी, की विकास, असा प्राधान्यक्रमाचा प्रश्न ऐरणीवर आणणाऱ्या गाडगीळ समितीच्या अहवालाचा फेरअभ्यास करण्यासाठी नेमलेल्या डॉ. के. कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीने आपल्या अहवालातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण, वेंगुर्ला व दोडामार्ग या तालुक्यांना वगळले आहे.

पिंपरी आयुक्तांच्या पाठिंब्यासाठी सह्यांची मोहीम

0
0
पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांच्या संभाव्य बदली विरोधात शहरातील बिगर राजकीय संस्था, संघटना आणि नागरिकांनी सह्यांची मोहीम राबविण्यास प्रारंभ केला आहे. हे निवेदन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देण्यात येणार आहे.

गहजब करण्यापेक्षा वेळेतच माहिती भरा

0
0
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एपीएससी) परीक्षांविषयीची सर्वाधिक जागरूक असलेल्या पुण्या-मुंबईच्या उमेदवारांनीच ‘राज्यसेवा’ परीक्षेसाठी मुदतवाढ मिळाल्यानंतरही वैयक्तिक माहिती (प्रोफाइल) अद्ययावत करण्याकडे दुर्लक्ष केले आहे.

बारावीचा निकाल मे अखेर

0
0
‘बारावीचा निकाल मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातच जाहीर होईल,’ असा दिलासा शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी शुक्रवारी दिला. ‘ज्युनिअर कॉलेजच्या शिक्षकांनी उत्तरपत्रिका तपासणीवर घातलेल्या बहिष्काराचा बारावीच्या निकालावर परिणाम झालेला नाही,’ असेही त्यांनी स्पष्ट केले.

पोस्टातही आता मोबाइल मनी ट्रान्स्फर

0
0
एका ठिकाणाहून दुसरीकडे पैसे पाठविण्यासाठी पारंपरिक मनी ऑर्डर करण्यापेक्षा मोबाइलच्या माध्यमातून तत्काळ पैसे पाठविण्याची सुविधा आता पोस्टातर्फे उपलब्ध करून देण्यात आली आहे.

शब्दांचं अस्सल खणखणीत नाणं

0
0
थेट भावनांना हात घालणा-या शब्दांत लेखन करणा-या शरद देशपांडे यांचा ‘शब्दार्थ - एका कॉपीरायटरचा प्रवास’ या पुस्तकाचे प्रकाशन आज पुण्यात यशवंतराव चव्हाण सभागृहात सायंकाळी होत आहे. त्यानिमित्त...

नवीन पिढीपुढे आदर्शाची वानवा

0
0
‘नवीन पिढीसमोर आदर्श निर्माण होण्याची गरज असून सध्याच्या पिढीला आदर्श कुठे पाहावेत हे समजत नाही,’ असे मत मुंबई हायकोर्टाचे माजी न्यायाधीश चंद्रशेखर धर्माधिकारी यांनी शुक्रवारी व्यक्त केले.

मिठाईत खाद्यरंगाचा अति वापरामुळे दंड

0
0
म्हैसूरपाक या मिठाईत खाद्यरंगाचा वापर अधिक प्रमाणात केल्याचे निदर्शनास आल्याने मिठाई विक्रेत्याला पंचवीस हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली.

विज्ञानप्रेमींसाठी ‘जॉइंट मिशन’

0
0
दुर्बिणीतून एखादा सुपरनोव्हा सापडावा, माळरानावरून फिरता फिरता दुर्मिळ अशनींचे अवशेष सापडावेत, जंगलातून फिरताना एखाद्या प्राण्याची नामशेष झालेली प्रजात किंवा एखादी नवीन वनस्पती आपल्याला सापडावी...

‘एमबीए हा तांत्रिक अभ्यासक्रम नाही’

0
0
विद्यापीठाची मान्यता घेतलेल्या संस्थांना एमबीए किंवा एमसीए अभ्यासक्रमासाठी अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेकडून (एआयसीटीई) मान्यता घेण्याची गरज नसल्याचा निकाल सुप्रीम कोर्टाने नुकताच दिला आहे.

‘संपावरील प्राध्यापकांवर निलंबनाची कारवाई’

0
0
मागण्या मान्य केल्यानंतरही संप करून विद्यार्थ्यांना वेठीस धरणा-या प्राध्यापकांना निलंबित करण्याचा इशारा उच्च शिक्षणमंत्री राजेश टोपे यांनी दिला आहे. याबाबत राज्यातील सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंना आदेश देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

सुरक्षारक्षकांच्या वेतनात वाढ

0
0
सुरक्षारक्षक मंडळात कार्यरत असणा-या सुरक्षारक्षकांच्या वेतनामध्ये वाढ करण्यात आली आहे. यामुळे पुण्यातील रक्षकांना सव्वानऊ हजार रुपये वेतन मिळणार आहे.

गोवा-पुणे विमानांच्या वेळापत्रकात बदल

0
0
गोवा विमानतळाच्या धावपट्टीच्या दुरुस्तीकामामुळे २८ ते ३० एप्रिल दरम्यान पुणे-गोवा आणि पुणे-बेंगळुरू-हैदराबाद या विमान उड्डाणाच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.

मराठी विद्यार्थ्यांच्या कोंडीसाठी भाषा खेळी?

0
0
राष्ट्रीय प्रज्ञा शोध (एनटीएस) शिष्यवृत्ती मिळवणाऱ्यांमध्ये गेल्या दहा वर्षांत महाराष्ट्राचे २२ ते २५ टक्के विद्यार्थी असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांचे हे यश गणित आणि विज्ञानातील चांगल्या कामगिरीमुळे आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images