Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

‘बीडीपी’ग्रस्तांच्या पाठीशी खासदार सुप्रिया सुळे?

$
0
0
समाविष्ट गावांतील जैववैविध्य उद्यानांच्या (बीडीपी) आरक्षणांमुळे निर्माण झालेल्या नाराजीची धग आता वरिष्ठ नेत्यांपर्यंत पोहोचली आहे. बीडीपीग्रस्त भागाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या विषयावर बुधवारी या परिसरातील नगरसेवकांची बैठक घेऊन त्यांच्या भावना जाणून घेतल्याचे समजते.

मुदतवाढीच्या अंमलबजावणीचा पेच

$
0
0
विकास आराखड्यावर हरकती-सूचना दाखल करण्यास मुदतवाढ देण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी कोणत्या पद्धतीने होणार, याबाबत वेगवेगळी मते व्यक्त करण्यात येत आहेत.

वीस लाख फुटांची आरक्षणे बदलली

$
0
0
शहराच्या जुन्या हद्दीच्या विकास आराखड्यामध्ये उपसूचना देऊन माननीयांनी तब्बल वीस लाख चौरस फूटांची आरक्षणे बदलल्याची बाब समोर आल्याने खळबळ उडाली आहे. डीपीच्या प्रकाशनास मान्यता देण्यासाठी झालेल्या एकाच सर्वसाधारण सभेत झालेला हा कारभार समोर आला आहे.

विद्यापीठानेच पेपर पुढे ढकलावेत

$
0
0
पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) राज्यसेवा पूर्व परीक्षा देता यावी, यासाठी विद्यापीठानेच १८ मे रोजी होणारे आपले सर्व पेपर पुढे ढकलावेत, अशी विनंती ‘एमपीएससी’ने केली आहे.

बाजारपेठा सुरळीत

$
0
0
स्थानिक संस्था कराच्या विरोधात (एलबीटी) दोन दिवस बंद पाळल्यानंतर शहरातील बाजारपेठा बुधवारपासून सुरळीत सुरू झाल्या. लक्ष्मी रस्ता, तुळशीबाग, मार्केट यार्डासह शहरात खरेदीसाठी गर्दी झाली होती.

राज्यात सुरक्षेचे तीन-तेरा

$
0
0
पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, नांदेडसह राज्याच्या प्रमुख शहरांतील गजबजलेल्या ठिकाणांवर घातपाती कारवाईचा अलर्ट देऊन संशयास्पद हालचाली घडविल्यानंतरही स्थानिक पोलिसांना त्याचा थांगपत्ता लागला नाही.

मुलांचे रिअॅलिटी शो बंद होणार?

$
0
0
लहान मुलांसाठीच्या ‘टॅलेंट हंट’ आणि ‘रिअॅलिटी शो’ यांमधून बालकांची पिळवणूक होत असल्याच्या तक्रारी वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर अशा कार्यक्रमांवरच बंदी घालण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

गुलाल-खोबऱ्याच्या उधळणीत जोतिबाची यात्रा रंगली

$
0
0
हलगी-ताशांचा कडकडाट, ‘जोतिबाच्या नावानं चांगभलं’चा गजर आणि गुलाल-खोबऱ्याच्या उधळणीत उंचच उंच सासनकाठ्यांच्या भेटीचा सोहळा गुरुवारी जोतिबावर रंगला. उन्हाच्या तडाख्याची पर्वा न करता महाराष्ट्र आणि कर्नाटकसह देशाच्या अन्य भागांतून लाखोंच्या संख्येने आलेले भाविक गुलालात न्हाऊन गेले.

संगीतकार प्यारेलाल यांची फसवणूक

$
0
0
ज्येष्ठ संगीतकार प्यारेलाल शर्मा यांच्या वरसोलीतील प्लॉटची परस्पर विक्री करून सातबाऱ्यावर नावे लावण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. लोणावळा शहर पोलिस ठाण्यात फसवणूक व बनावट कागदपत्रे तयार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

झळांची तीव्रता वाढली

$
0
0
शहर आणि परिसरात गुरुवारी उन्हाचा चटका वाढला होता. शहरात ३९.१ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली, तर लोहगावमध्ये पारा ४० अंशांवर पोहोचला. उन्हामुळे पुण्यात अक्षरशः लाही-लाही झाली. उन्हाच्या वाढलेल्या काहिलीमुळे जिल्ह्याच्या काही भागांत हलक्या पावसाने हजेरी लावली.

संचालकांच्या भांडण्यात प्राध्यापक टांगणीला

$
0
0
संचालकांमधील अंतर्गत वादामुळे पुणे विद्यार्थी गृहाच्या इंजिनीअरिंग कॉलेजमधील दोनशेहून अधिक प्राध्यापकांचे पगार गेल्या दोन महिन्यांपासून रोखून धरण्यात आले आहेत. पगारासाठी प्राध्यापकांनी राजकीय नेत्यामार्फत मध्यस्थीचा प्रयत्न केल्याने संस्थेत काही काळ तणाव होता. अनुचित प्रकार घडू नये म्हणून अखेर पोलिसांनाही पाचारण करावे लागले.

आयपीआर अभ्यासक्रमासाठी सीओईपीचा पुढाकार

$
0
0
नव्या संशोधनाबाबत, नवीन संकल्पनांबाबत जगभरात तातडीने पेटंट घेतले जात असताना, भारतीय विद्यार्थी किंवा संशोधक याबाबतीत काहीसे मागे आहेत. या पार्श्वभूमीवर इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांमध्ये आयपीआरबाबतची जागृती वाढावी, यासाठी पुण्याच्या शासकीय अभियांत्रिकी कॉलेजने (सीओईपी) पुढाकार घेतला असून संस्थेतर्फे बौद्धिक संपदा हक्क या विषयाचा अभ्यासक्रमातच समावेश करण्यात आला आहे.

‘राष्ट्रीय प्रज्ञे’ला मराठीचे वावडे

$
0
0
‘राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षे’त (एनटीएस) भाषा विषयाचा समावेश करून त्यात केवळ इंग्रजी किंवा हिंदी माध्यमाचा पर्याय देण्यामागे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचे वाढते वर्चस्व मोडून काढण्याचा उद्देश आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. असे असल्यास या अन्यायाविरोधात राज्याचे खासदार संसदेत प्रश्न उपस्थित करणार का, अशी विचारणा पालकांमधून होत आहे.

एसटी कामगार वेतनवाढीला मान्यता

$
0
0
एसटी कामगारांच्या चार वर्षांच्या वेतनवाढीपोटी दोन हजार कोटी रुपयांच्या प्रस्तावाला राज्य सरकारने मान्यता दिली आहे. कर्मचाऱ्यांचा वेतनकरार २०१२ - २०१६ या चार वर्षाचा असणार आहे.

... तर ‘मार्ड’च्या डॉक्टरांचे रजिस्ट्रेशन रद्द

$
0
0
‘सरकारी हॉस्पिटलमधील ‘मार्ड’च्या संपकरी डॉक्टरांनी सरकारी हॉस्टेल तातडीने रिकामी करावीत,’ असा आदेश वैद्यकीय शिक्षण मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी दिला आहे. डॉक्टरांनी शुक्रवारपर्यंत हॉस्टेल न सोडल्यास त्यांचे रजिस्ट्रेशन रद्द करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

वाहन खरेदीचा ट्रेंड ओसरला

$
0
0
वाहन खरेदीचा पुणेकरांचा ‘ट्रेंड’ ओसरला असून, कारपाठोपाठ टू‌ व्हीलर खरेदीकडे त्यांनी पाठ फिरवली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा टू व्हीलरच्या नोंदणीत दहा हजारांनी, तर कारच्या नोंदणीत दोन हजारांनी घट झाल्याचे स्पष्ट झाले आहे. नव्या वाहनांच्या नोंदणीत घट होण्याची गेल्या पाच वर्षांतील ही पहिलीच वेळ आहे.

शहरात सोनसाखळी चोरांचा उच्छाद

$
0
0
शहरात बुधवारी सकाळी दहा ते रात्री दहा या बारा तासांत सोन्याची साखळी हिसकावण्याच्या सात घटना घडल्या असून, त्यात साडेचार लाख रुपयांचे दागिने चोरीस गेले आहेत. सिंहगड रोड, नवी पेठ, नारायण पेठ आणि कोथरूड परिसरात या घटना घडल्या आहेत.

कस्तुरीरंगन समितीने सिंधुदुर्गातील संवेदनशील तालुके वगळले

$
0
0
जैववैविध्याने समृद्ध असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला राज्य सरकारने पर्यटन जिल्ह्याचा दर्जा दिला आहे; मात्र कस्तुरीरंगन समितीने पश्चिम घाटाच्या अहवालात सिंधुदुर्गातील मालवण, वेंगुर्ला आणि दोडामार्गला गायब केले आहे. खाणकाम प्रकल्पांचे सर्वाधिक प्रस्ताव असलेल्या या भागाला ‘इको सेन्सिटिव्ह झोन’मधून सोयीस्कररीत्या वगळून समितीने विकास प्रकल्पांना आमंत्रण दिले आहे.

प्रस्तावित बांधकामातील फ्लॅटमध्ये पाण्याचे रेशन

$
0
0
समाविष्ट गावांमध्ये सर्व प्रस्तावित बांधकामांमधील फ्लॅटमध्ये दरडोई ४० लिटर इतकेच पाणी महापालिकेकडून देण्यात येणार आहे. तसेच, भविष्यात २८ गावांचा महापालिकेत समावेश झाल्यानंतर तेथेही हेच धोरण लागू करण्यात येणार आहे. दरम्यान, अनधिकृत बांधकामे किंवा भोगवटापत्र नसलेल्या फ्लॅटमधील रहिवाशांचे नळजोड दंड आकारून नियमित करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.

पुण्यातील ‘मार्ड’चा संप मागे

$
0
0
विविध मागण्यांसाठी सरकारी हॉस्पिटलमधील संपावर गेलेल्या निवासी डॉक्टरांना (मार्ड) मुंबई हायकोर्टाने चांगलेच फटकारल्याने, पुण्यातील ससून हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी गुरुवारी संप मागे घेतला. मात्र, काळ्या फिती लावून निषेध सुरूच ठेवण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images