Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

‘जीएसटी’मुळे ‘एलबीटी’ लवकरच रद्द होईल

$
0
0
राज्यात नजीकच्या काळात वस्तू व सेवा कर (गुडस अॅण्ड सर्व्हिसेस टॅक्स : ‘जीएसटी’) लागू होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे ‘एलबीटी’ फार काळ राहण्याची शक्यता नाही, असे राज्याचे निवृत्त विक्रीकर आयुक्त दिलीप दीक्षित यांनी सांगितले.

स्वाइन फ्लूचे एप्रिलमध्ये नऊ बळी

$
0
0
‘स्वाइन फ्लू’च्या संसर्गाने आणखी एका वृद्धेचा मृत्यू झाला. स्वाइन फ्लूचा एप्रिल महिन्यातील हा नववा बळी ठरला असून मृतांची संख्या आता २२ झाली आहे.

व्यापाऱ्यांवर एक मेनंतर कारवाई

$
0
0
स्थानिक संस्था कराची (एलबीटी) नोंदणी न करणाऱ्या व्यापाऱ्यांवर एक मेनंतर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे एलबीटी विभागाचे प्रमुख विलास कानडे यांनी सांगितले.

विकास करताना पर्यावरणही हवे

$
0
0
‘देशाच्या प्रगतीसाठी आवश्यक असलेल्या विकासकामांना कोणाचाही विरोध नाही. जैवविविधता ही आपली संपत्ती आहे.

शेतमालासाठी अजूनही नाही देशभरात बाजारपेठ

$
0
0
शेतमालाच्या विक्रीसाठी देशांतर्गत बाजारपेठ विकसित करण्यात कृषि आणि पणन विभागाला अपयश आल्याची कबुली राज्याचे कृषिमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी बुधवारी दिली.

ढिसाळ सुरक्षा

$
0
0
पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, नांदेडसह राज्याच्या प्रमुख शहरांतील गजबजलेल्या ठिकाणांवर घातपाती कारवाईचा ‘अॅलर्ट’ देऊनही स्थानिक पोलिस ढिम्मच राहिल्याचे ‘एटीएस’ने घेतलेल्या मोहिमेत समोर आले आहे. या शहरांतील महत्त्वाच्या ठिकाणी संशयास्पद वस्तू ठेवूनही त्याचा थांगपत्ता स्थानिक पोलिसांना लागला नाही.

‘आयएमडी’वर अविश्वास

$
0
0
‘हवामान खात्याच्या अंदाजावर विसंबला, त्याचा कृषिकार्यभाग संपला...’ असे आता कृषी खात्यालाही वाटू लागले आहे. त्यामुळे त्यांनी हवामान अंदाजासाठी थेट ‘स्कायमेट’ या खासगी संस्थेशी करार केला आहे.

तळेगाव दाभाडेत तरुणाचा बुडून मृत्यू

$
0
0
तळेगाव दाभाडे येथील बालविकास जलतरण तलावात वडगाव येथील इंजिनीअरिंगचे शिक्षण घेत असलेल्या तरुणाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (२४ एप्रिल) सायंकाळी पाचच्या सुमारास घडली.

चंद्रग्रहण पाहण्याची आज संधी

$
0
0
खगोलप्रेमींना गुरुवारी (२५ एप्रिल) चंद्रग्रहण अऩुभवण्याची संधी मिळणार आहे. भारतीय वेळेनुसार गुरुवारी रात्री ११ वाजून २३ मिनिटांनी ग्रहणास सुरुवात होणार असून मध्यरात्रीनंतर सुमारे १.२० ते १.५३ या वेळेत पृथ्वीच्या उपछायेची सावली चंद्रावर पडणार आहे.

शॉर्टफिल्ममधून घ्या स्वतःचा शोध

$
0
0
‘शॉर्टफिल्म या माध्यमाची संस्कृती विस्तारली पाहिजे. महोत्सव डोळ्यासमोर ठेवून शॉर्टफिल्म केल्या जाऊ नयेत. तर, विद्यार्थ्यांनी त्यातून स्वतःचा शोध घेण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले पाहिजेत,’ असे मत ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांनी व्यक्त केले.

कर्मचारी संघटनांचा विद्यापीठात धुडगूस

$
0
0
परीक्षा नियंत्रक डॉ. संपदा जोशी यांना विद्यापीठात रुजू करून घेतल्याच्या निषेधार्थ पुणे विद्यापीठातील कर्मचारी संघटनांनी बुधवारी दुपारी आंदोलन केले. परीक्षांसाठीची बारकोड स्टिकर्स परीक्षा केंद्रांवर जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्नही झाला.

कलाध्यापक संघाच्या सर्व मागण्या मान्य

$
0
0
महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडळाच्या सर्व मागण्या येत्या दहा दिवसांत मान्य करण्याचे आश्वासन राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री राजेश टोपे यांनी दिले.

‘साहेबाच्या देशा’चे आकर्षण झाले कमी

$
0
0
भारतातून ब्रिटनमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत घट झाल्याचे ब्रिटन उच्चायुक्तालयातर्फे बुधवारी मान्य करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये घट झाली असली तरीही, येणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणात्मक दर्जा वाढला असल्याचा दावा करण्यात आला आहे.

कॉरिडॉरची व्यवहार्यता लवकरच समजणार

$
0
0
मुंबई-बेंगळुरू कॉरिडॉरच्या विकासासाठी ब्रिटन सरकार प्रयत्नशील असून, त्याच्या व्यवहार्यतेचा अहवाल लवकरच पूर्णत्त्वास जाईल. त्यानंतर, केंद्र आणि राज्य सरकारच्या सहकार्याने त्याबाबतचा सविस्तर अहवाल पुन्हा तयार केला जाणार आहे.

‘एनटीएस’प्रकरणी ‘मनविसे’चा इशारा

$
0
0
राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेमधील (एनटीएस) भाषेच्या पेपरच्या माध्यमावरून उठलेला वादंग थांबविण्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने केली आहे.

‘मार्ड’च्या २१५ डॉक्टरांना नोटिसा

$
0
0
प्रलंबित मागण्यांसाठी अचानकपणे संपावर गेलेल्या ‘मार्ड’च्या २१५ डॉक्टरांना कामावर हजर न राहिल्याबद्दल ससून प्रशासनाने नोटिसा जारी करून कारवाईचा बडगा उगारला आहे. ‘मार्ड’चे डॉक्टर संपावर असल्यामुळे संपाच्या दुसऱ्या दिवशीही वॉर्डमधील पेशंटचे हाल सुरूच राहिले.

मायलेकींसह भाचीचा तलावात बुडून मृत्यू

$
0
0
पाणी आणण्यासाठी गेलेल्या मायलेकींसह भाचीचा बुधवारी सायंकाळी तलावात बुडून मृत्यू झाला. जुन्नर तालुक्यातील वाघदरा या गावात ही घटना घडली.

ट्रॉलीखाली सापडून मुलगा ठार

$
0
0
वानवडी येथील रामटेकडी इंडस्ट्रिअल एरिया गेटजवळ ट्रॅक्टरच्या ट्रॉलीखाली बारा वर्षांचा मुलगा चिरडला गेल्याचा प्रकार मंगळवारी दुपारी घडला. या मुलाच्या पायावरून तसेच पोटावरून ट्रॉलीचे चाक गेले. वानवडी पोलिसांनी ट्रॅक्टर चालकाला अटक केली आहे.

इमारत बांधायची आहे? बिगाऱ्यांचा सल्ला घ्या!

$
0
0
पुणे महापालिकेमध्ये काम कोण करतो यापेक्षा काम होण्याशी मतलब, या वृत्तीने चाललेल्या प्रशासनाच्या कारभाराचा एक अजब प्रकार उघड झाला आहे.

फर्ग्युसनच्या प्राध्यापकाचा कार अपघातात मृत्यू

$
0
0
इंदापूरमधील तरडेवाडीजवळ कार उलटून झालेल्या भीषण अपघातात फर्ग्युसन कॉलेजमधील गणिताचे प्राध्यापक व त्यांच्या दोन मुलांचा मृत्यू झाला. हा अपघात बुधवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास झाला.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images