Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

डॉ. बुरटेंना ३०एप्रिलपर्यंत मुदत

$
0
0
निरपराध नागरिकांचे बळी घेणाऱ्या बसचालक संतोष माने प्रकरणामध्ये कोर्टात खोटी साक्ष दिल्याप्रकरणी नोटीस बजावण्यात आलेल्या सोलापूर येथील डॉ. दिलीप बुरटे यांना त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी कोर्टाने ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ दिली आहे.

आडमुठेपणा सोडावा

$
0
0
‘स्थानिक स्वराज्य संस्था कर (एलबीटी) लागू करण्याबाबत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अनेक नियम शिथिल केले आहेत. त्यामुळे यासंदर्भात आता व्यापाऱ्यांनी आडमुठेपणाची भूमिका घेऊन चालणार नाही,’ असे महापालिकेचे आयुक्त महेश पाठक यांनी मंगळवारी सर्वसाधारण सभेत स्पष्ट केले.

हॉटेल्सचा येत्या सोमवारी बंद

$
0
0
हॉटेल व्यवसायावर लादण्यात आलेल्या करांच्या निषेधार्थ देशभरातील हॉटेल व्यावसायिकांनी येत्या सोमवारी (२९ एप्रिल ) देशव्यापी बंद पाळण्याचा निर्णय घेतला आहे. देशभरातील हॉटेल व्यावसायिकांच्या नुकत्याच मुंबईत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

एसटी-दुचाकी टक्कर, दोन ठार

$
0
0
एसटी-दुचाकीची वळवण येथे आज (बुधवारी) सकाळी टक्कर झाली. या अपघातात परीक्षेसाठी जात असलेल्या देवव्रत कलार (२२) आणि रौनक नंबियार (२३) या दोघांचा मृत्यू झाला. ते दोघेही खंडाळा येथील कोहिनूर मॅनेजमेंट इन्स्टिट्युटचे विद्यार्थी होते.

मिलिंद जोशींना अभय

$
0
0
बनावट पत्र आणि बनावट सहीद्वारे महामंडळाची फसवणूक केल्याचे सिद्ध झाले असले, तरी तरुण वयातील कारकीर्दीवर परिणाम होऊ नये, यासाठी राजीनामा घेऊन प्रा. जोशी यांना अभय देण्यात आल्याचे साहित्य परिषदेतर्फे सोमवारी स्पष्ट करण्यात आले.

शिक्षक आणि उत्तरदायित्व

$
0
0
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक यश हे निव्वळ त्यांच्या अभ्यासाचे आणि कष्टाचे फलित आहे, असे मत मोठ्या प्रमाणावर देश-विदेशातून व्यक्त होत राहिल्यास शिक्षकांचा आणि प्राध्यापकांचा एक प्रकारे पराभवच होईल.

तक्रार दाखल करा कुठेही!

$
0
0
पर्यटकाला कंपनीविषयी तक्रार असल्यास ती फक्त मुंबईतच करावी, अशी अट टूर पॅकेजमध्ये घालणाऱ्या ट्रॅव्हल कंपनीला ग्राहक मंचाने चांगलेच फटकारले आहे. ‘तक्रार कुठे दाखल करायची हे कोणी ठरवू शकत नाही,’ असा निकाल मंचाने दिला आहे.

चावंड किल्ल्यावर सुरक्षेसाठी रेलिंग

$
0
0
जुन्नरमधील अवघड व धोकादायक चढण असलेल्या चावंड किल्ल्यावर पर्यटकांच्या सुरक्षेसाठी वनविभागामार्फत लोखंडी रेलिंग बसविण्यात आली आहेत. त्यासाठी पावणेदोन लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत.

सिमकार्ड विक्रीप्रकरणी व्यावसायिकाला अटक

$
0
0
खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींनी वापरलेली सिमकार्ड बोगस नावावर खरेदी केल्याप्रकरणी सिमकार्ड विक्रेत्या दुकानदाराला अटक करण्यात आली आहे. विश्रांतवाडी येथे रामभाऊ गवळी उद्यानात तरुणाच्या खून प्रकरणी अटक केलेल्या आरोपींकडे ही सिमकार्ड सापडली होती.

कामांना नाही गती; खर्च वाढीचीही भीती

$
0
0
सुलभ दळणवळणासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने शहरात पाच उड्डाणपुलांची कामे हाती घेतली आहेत. मात्र नाशिकफाटा उड्डाणपुलाचा अपवाद वगळता अन्य कामे थंडावल्याचे दिसून येते.

सोन्याची बिस्किटे, वळे घेण्याला ग्राहकांची पसंती

$
0
0
सोन्याच्या भावात घसरण झाली असल्याने भविष्यातील गुंतवणूक व गरजांसाठी सोन्याची खरेदी करण्याचे प्रमाण वाढले आहे. सोन्याचे दागिने खरेदी करण्याचे प्रमाण पन्नास टक्के आणि वळे, बिस्किटे यांचे प्रमाण पन्नास टक्के आहे, असे सराफांनी सांगितले.

जुन्या गावांच्या डीपीत बीडीपीचे आरक्षण हवेच

$
0
0
महापालिकेच्या जुना आणि समाविष्ट गावांच्या विकास आराखड्यात (डीपी) टेकड्यांवरील ‘बीडीपी’चे (बायो डायव्हर्सिटी) आरक्षण कायम असावे, अशी मागणी शिवसेनेच्या जिल्हासंपर्क प्रमुख आणि आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी बुधवारी केली.

कोकणच्या टेकड्यांत सांस्कृतिक इतिहासाचे पुरावे

$
0
0
कोकण किनारपट्टीवर गेल्या बाराशे वर्षांत झालेले सागरी पातळीवरील बदल, भूशास्त्रीय इतिहास, सागरी लाटा आणि भरती ओहोटीचे बदलते स्वरूप एवढंच नव्हे तर, किनाऱ्यावरील सांस्कृतिक इतिहासाचे पुरावे तेथील टेकड्यांमध्ये आढळले आहेत.

‘नॉझल’ बसविल्याने पाण्याची बचत

$
0
0
जगभर सर्वत्र गुरुत्वाकर्षणाच्या नियमानुसार (ग्रॅव्हिटेशनल फोर्स) पाणीपुरवठा केला जात असल्याने, पाण्याचा वेग वाढून त्याची नासाडी होते.

फुकट्या प्रवाशांचा रेल्वेला ताप

$
0
0
फुकट्या प्रवाशांना आवरण्याची डोकेदुखी रेल्वे प्रशासनासमोर उभी राहिली आहे. गेल्या वर्षात रेल्वेला दमडीही न देता प्रवास करणाऱ्यांची संख्या दीड लाखांच्या पुढे गेली आहे.

अनधिकृत होर्डिंगच्या सांगाड्यांवर कारवाई

$
0
0
शहरात आढळलेल्या सव्वातीनशे अनधिकृत होर्डिंगपैकी २३९ होर्डिंगवर कारवाई करण्यात आली आहे. मात्र, त्यांचे सांगाडे अद्याप तसेच असून गुरुवारनंतर हे सांगाडे काढून टाकण्याची मोहीम महापालिकेच्या वतीने हाती घेण्यात येईल, अशी माहिती महापालिकेचे आयुक्त महेश पाठक यांनी सर्वसाधारण सभेत दिली.

लोणावळ्यात एसटीच्या धडकेत २ विद्यार्थ्यांचा मृत्यू

$
0
0
लोणावळा येथे जुन्या मुंबई-पुणे राष्ट्रीय मार्गावर वलवण येथे निता व्होल्वो बस थांब्यासमोर एसटी आणि मोटार सायकलच्या अपघातात मोटार सायकलवरील दोन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला.

‘आरसी’ कार्डची टंचाई

$
0
0
परिवहन खात्याला वाहनांच्या रजिस्ट्रेशनची (आरसी) ब्लँक कार्ड गेल्या तीन महिन्यांहून अधिक काळ उपलब्ध होत नसल्याचे उघड झाले आहे. या कार्डअभावी पुण्यातील ४० हजार वाहनमालकांना ‘आरसी’ मिळालेली नाही. घरपोच ‘आरसी’च्या प्रतीक्षेत असलेल्यांना आता हेलपाटे मारावे लागत आहेत.

कचरा डेपोंचा निर्णय घ्यावा लागणार

$
0
0
कचऱ्याच्या प्रश्नावरून हायकोर्टाने महापालिकांच्या कारभारावर ताशेरे ओढल्यानंतर राज्य सरकारनेही महापालिकांनी कचऱ्याबाबतची कामे नियोजित वेळेत करण्याची तंबी देणारा अध्यादेश काढला आहे.

वाहतूक कोंडी ‘जैसे थे’च

$
0
0
शहराच्या मध्यभागातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी वाहतूक पोलिसांनी लक्ष्मी रोड, टिळक रोड, केळकर रोडवर बेशिस्तपणे वाहने उभी करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई सुरू केली असली तरी शहरातल्या अन्य रस्त्यांवर ही कारवाई होत नसल्यामुळे या ठिकाणची वाहतूक समस्या ‘जैसे थे’ आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images